Silencer theft : काळ्या धुरानं माखलेल्या सायलेन्सरमागे हात धुवून का लागले चोर! मोठ्या शहरांत वाढल्या सायलेन्सर चोऱ्या

| Updated on: Jan 15, 2023 | 9:04 AM

सध्या चोरांच्या जमातीत सायलेन्सर चोर हा शब्द का होतोय रूढ? मुंबई, लखनऊ, अहमदाबाद यासारख्या मोठ्या शहरात अचानक का वाढली चारचाकी गाड्यांच्या सायलेन्सरची चोरी? जाणून घेण्यासाठी बघा टीव्ही 9 चा स्पेशल रिपोर्ट...

Follow us on

तुम्ही सोनं, चांदी, पैसा, महागड्या गाड्या, मौल्यवान वस्तू यांची चोरी झाल्याचे ऐकले असेल पण तुम्ही कधी सायलेन्सर चोरी बद्दल ऐकले आहे का? सध्या अनेक मोठ्या शहरात चोर सायलेन्सरची चोरी करून लखपती झाल्याचे समोर आले आहे. मुंबई, लखनऊ, अहमदाबाद यासारख्या मोठ्या शहरात चारचाकी वाहनांचे सायलेन्सर चोरीचे प्रमाण वाढले आहे.

चोरांच्या जमातीत सायलेन्सर चोर हा शब्द का होतोय रूढ? मुंबई, लखनऊ, अहमदाबाद यासारख्या मोठ्या शहरात अचानक का वाढली चारचाकी गाड्यांच्या सायलेन्सरची चोरी? गेल्या काही दिवसांपासून काळ्या धुराने माखलेल्या सायलेन्सर चोरी करण्यात भुरट्या चोरांचा कल वाढल्याचे समोर आले आहे. या चारचाकी गाड्यांचे सायलेन्सर चोरून त्यांना नेमकं कोणतं समाधान मिळतंय? अचानक मोठ्या शहरांमध्ये चारचाकी गाड्यांचे सायलेन्सर चोरीच्या घटनांचे प्रमाण का वाढले? सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बघा टीव्ही 9 चा स्पेशल रिपोर्ट…