Nitin Gadkari | साखर कारखाने चालवून थकलो, पण बंद पडले नाहीत, नितीन गडकरी यांचं भन्नाट भाषण

| Updated on: Sep 25, 2021 | 2:35 PM

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे आज सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये (Karad) आहेत. त्यांच्या हस्ते कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयातील (Krishna Medical collage) कोविड योद्ध्यांचा सत्कार झाला. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी कोरोना काळातील आरोग्य सुविधांवरुन शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राबाबत मोठं भाष्य केलं.

Follow us on

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे आज सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये (Karad) आहेत. त्यांच्या हस्ते कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयातील (Krishna Medical collage) कोविड योद्ध्यांचा सत्कार झाला. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी कोरोना काळातील आरोग्य सुविधांवरुन शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राबाबत मोठं भाष्य केलं. नितीन गडकरी म्हणाले, “आरोग्य किंवा शिक्षण क्षेत्राबाबत केवळ सरकारवर भर न टाकता, समाजातील अन्य घटकांनी समाजासाठी एकत्र आलं पाहिजे. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्राचा लाभ सर्वांना मिळावा, यासाठी सरकारशिवाय, सामाजिक संस्था, खासगी कंपन्या, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा”

कोव्हिडं काळाची आठवण काढली तरी डोळ्यात पाणी येतं. शिक्षण आणि आरोग्य आरोग्य क्षेत्रांती सरकारसंह समाजातील घटकांचं योगदान आवश्यक आहे. देशात आता तातडीने 600 मेडिकल कॉलेज आणि अन्य सुविधा गरजेच्या आहेत. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या खाजगी संस्थांना मदत करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

सरकारला आउट ऑफ बॉक्स कल्पना सांगताना आणि अंमलात आणताना खूप त्रास होतो. सत्ताकारण हेच राजकारण हे मला पटत नाही. पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांनो साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल, मी इथेनॉल निर्मिती संकल्पना आणली नसती तर सगळे खड्यात गेले असते. येणाऱ्या काळात आत्मनिर्भर भारत आपल्याला बनवायचा आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात आजूनही खूप कामाची गरज आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.