UdayanRaje Bhosale : ब्रिटिश राजवटीत स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नाही तर… उदयनराजेंच्या वक्तव्यानं वाद पेटणार?

UdayanRaje Bhosale : ब्रिटिश राजवटीत स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नाही तर… उदयनराजेंच्या वक्तव्यानं वाद पेटणार?

| Updated on: Apr 11, 2025 | 12:54 PM

स्त्रियांची पहिली शाळा प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. तर या उदयनराजेंच्या वक्तव्याचा ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी समाचार घेतल्याचेही पाहायला मिळाले.

पुण्यातील भिडे वाड्यात सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी ब्रिटिश राजवटीत १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली भारतीय शाळा सुरू केली. मात्र स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नव्हे तर थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली, असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. “सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. एका दृष्टीकोनातून आपण पाहीलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं. स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली, ती देखील सातऱ्याच्या स्वत:च्या राजवाड्यात सुरु केली.”, असं मोठं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी आज केलं.

थोरले प्रतापसिंह महाराज यांच्या सातऱ्याच्या त्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहीलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं, अशी माहिती देखील उदयनराजे भोसले यांनी दिली. ते पुण्यात महात्मा फुले वाड्यात बोलत होते. पुढे उदयनराजे भोसले यांनी असंही म्हटलं की, आतापर्यंत जे युग पुरूष होऊन गेलेत अशा लोकांचं स्मारक जतन करणं आपलं कर्तव्य आहे. कारण भावी पिढीला या स्मारकाच्या माध्यमातून प्रेरणा मिळू शकेल आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण भावी पिढीने करून आपल्या जीवनात त्या विचारांचं अनुकरण केलं पाहिजे.

Published on: Apr 11, 2025 12:54 PM