Nashik News : मनसेच्या पूजेत ठाकरेंच्या सेनेची हजेरी; दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन

Nashik News : मनसेच्या पूजेत ठाकरेंच्या सेनेची हजेरी; दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन

| Updated on: Jun 06, 2025 | 10:16 AM

Thackeray brothers reunion : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांचं मनोमिलन बघायला मिळालं.

नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे सेनेच्या स्थानिक नेत्यांची जवळीक बघायला मिळाली. नाशिकमध्ये मनसेने राजगड कार्यालयात सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. या पूजेला ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते देखील उपस्थित राहिलेले दिसले. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी विनंती कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी भेट म्हणून देण्यात आलेल्या एका फ्रेमवर हिंदुत्व+ठाकरे=महाराष्ट्र आणि सोबत ठाकरे बंधूंचा फोटो असा मजकूर लिहिलेला दिसून आला.

राज्यातल्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चा होत असतानाच ठाकरेंच्या सेनेतील पदाधिकारी नेत्यांकडून या युतीबद्दल सकारात्मक प्रतिसाद देण्यात येत असला तरी अद्याप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर उघडपणे कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र दोन्ही पक्षातले स्थानिक पातळीवरील पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते हे या युतीच्या चर्चेने चांगलेच खुश झालेले बघायला मिळत आहेत.

Published on: Jun 06, 2025 10:16 AM