Rajan Salvi Shivsena Video : ठरलं तर… राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ घेणार हाती; ‘येणाऱ्याचं स्वागत, कारण…’

Rajan Salvi Shivsena Video : ठरलं तर… राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ घेणार हाती; ‘येणाऱ्याचं स्वागत, कारण…’

| Updated on: Feb 12, 2025 | 5:10 PM

काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा शिवसेनेच्या किरण सामंत यांनी पराभव केला होता. किरण सामंत हे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधु आहेत. मागच्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. ते पक्ष सोडणार असून ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती.

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटातील बडे नेते राजन साळवी हे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत होती. मात्र उद्या उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचे दिसतंय. कारण आजच राजन साळवींनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजन साळवी उद्या दुपारी तीन वाजता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये उद्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ते प्रवेश करणार आहे. ‘जे लोकं येतील त्यांचं स्वागतचं आहे. कारण गेल्या अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आनंद दिघेंच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद आणि अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले, शिवसेनेमध्ये सामील झाले. त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे म्हणून बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही सरकार स्थापन केलं, अडीच वर्ष जे काम केलं ते लोकांना माहीत आहे आणि म्हणून जो विश्वास लोकं दाखवताहेत कामावर हे काम करणार सरकार आहे, घरी बसणार सरकार नाही’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

Published on: Feb 12, 2025 05:10 PM