Budget 2024 : … हाच आमचा विकासाचा मंत्र, बजेटचं वाचन सुरू होताच निर्मला सीतारामन यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Feb 01, 2024 | 12:04 PM

अंतरिम अर्थसंकल्पाचं वाचन सुरू होताच त्यांनी गेल्या १० वर्षात देशाचा सकारात्मक विकास झाल्याचे वक्तव्य केले. तर आमच्या सरकारने व्यापक विकासाची काम केली असं म्हणत सबका साथ सबका विकास हाच आमचा विकासाचा मंत्र असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले.

Follow us on

नवी दिल्ली, १ फेब्रुवारी २०२४ : आर्थिक वर्ष २०२४ -२०२५ या वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ११ वाजता संसदेत सादर करण्यास सुरूवात केली. अंतरिम अर्थसंकल्पाचं वाचन सुरू होताच त्यांनी गेल्या १० वर्षात देशाचा सकारात्मक विकास झाल्याचे वक्तव्य केले. तर आमच्या सरकारने व्यापक विकासाची काम केली असं म्हणत सबका साथ सबका विकास हाच आमचा विकासाचा मंत्र असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले. पुढे त्या असेही म्हणाल्या की, भारतातील लोकं ही आशावादी आहेत. आशावादीवृत्तीने ही लोकं भविष्याकडे पाहत असतात. लोकांच्या आशीर्वादामुळेच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्तेत आलो. सबका साथ, सबका विकासचा मंत्र घेऊन आम्ही सर्व अडचणींचा सामना करायला सज्ज झालो असल्याचा पुन्नरूच्चार त्यांनी केला.