Monsoon news : उष्णतेच्या लाटेनंतर आता पुन्हा कशाची चाहुल? हवामान विभागाचा अंदाज काय? कुठ वाहणार 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे

| Updated on: May 22, 2023 | 10:28 AM

हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे. सध्या मुंबईत सर्व दूर ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली असून सकाळपासूनच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांची काहिली थांबली आहे.

Follow us on

मुंबई : मे महिना आता संपण्याला फक्त आठच दिवस राहीले आहे. येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा अवकाळीचा जोर पहायला मिळेल की नाही अशी शंका अता उपस्थित केली जात आहे. कारण दरम्यानच्या काळात मान्सून पुढे ढकल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे. सध्या मुंबईत सर्व दूर ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली असून सकाळपासूनच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांची काहिली थांबली आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये आजपासून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. पुढील तीन दिवसांत विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच विजांच्या कडकडाटासह जोरदार वारेही वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, भंडारा आणि यवतमाळ या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.