Ashadi Ekadashi 2024 : अवघे गरजे पंढरपूर… विठूनामाच्या गजरात माऊली दंग, वारकरी चंद्रभागेच्या तिरी दाखल

Ashadi Ekadashi 2024 : अवघे गरजे पंढरपूर… विठूनामाच्या गजरात माऊली दंग, वारकरी चंद्रभागेच्या तिरी दाखल

| Updated on: Jul 16, 2024 | 2:51 PM

पंढरपुरातील चंद्रभागेत स्नान करण्यासाठी वारकऱ्यांनी सकाळपासूनच चंद्रभागे तिरी एकच गर्दी केली आहे. यामुळे चंद्रभागेचा तीर वारकऱ्यांनी एकच फुललेला दिसतोय. आतापर्यंत ८ लाख वारकऱ्यांनी विठुरायाचं दर्शन घेतलं असून ते पंढरपुरातून बाहेर पडले आहेत. बघा कशी आहे पंढरपुरातील माहौल?

आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी, विठ्ठल भक्त पंढरपुरात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. यासह अनेक पालख्या पंढरपुरात दाखल होताना दिसताय. पंढरपुरातील चंद्रभागेत स्नान करण्यासाठी वारकऱ्यांनी सकाळपासूनच चंद्रभागे तिरी एकच गर्दी केली आहे. यामुळे चंद्रभागेचा तीर वारकऱ्यांनी एकच फुललेला दिसतोय. महाराष्ट्र शासनाकडून नमामी चंद्रभागा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ज्या पद्धतीने प्रदूषममुक्त इंद्रायणी त्याप्रमाणे प्रदूषममुक्त चंद्रभागा करण्यासाठी नमामी चंद्रभागा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमात सर्वाधिक प्राधान्य हे वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी देण्यात आलं आहे. दरम्यान, यंदा पंढरपुरात दाखल होणाऱ्य वारकऱ्यांची संख्याही २० ते २२ लाखांपर्यंत आहे. तर आतापर्यंत ८ लाख वारकऱ्यांनी विठुरायाचं दर्शन घेतलं असून ते पंढरपुरातून बाहेर पडले आहेत. बघा कशी आहे पंढरपुरातील माहौल?

Published on: Jul 16, 2024 02:51 PM