वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
महाराष्ट्र विधानसभेत आज वसई-विरारमधील पूरस्थितीचा मुद्दा चांगलाच गाजला. शिवसेना (ठाकरे गट)चे आमदार भास्कर जाधव यांनी वसई-विरारमधील पूरस्थिती आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. यानंतर सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मुद्दा मांडताना भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका करत, “या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी कॅबिनेट मंत्री कुठे आहेत? उपमुख्यमंत्री सभागृहात का उपस्थित नाहीत?” असा सवाल उपस्थित केला. पूरग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, या मुद्द्यावरून सभागृहात वातावरण तापले असताना शिवसेना (ठाकरे गट)चे नेते आदित्य ठाकरे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही नेत्यांमधील हमरीतुमरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
या घटनेमुळे विधानसभेतील कामकाजावर काही काळ परिणाम झाला. दरम्यान, वसई-विरारमधील पूरस्थिती, मदतकार्य आणि सरकारच्या भूमिकेबाबत पुढील चर्चेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.