तेच त्यांच्या डोळ्यात खुपलं.. ; भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा

तेच त्यांच्या डोळ्यात खुपलं.. ; भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा

| Updated on: Jul 19, 2025 | 1:43 PM

जाणूनबुजून सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर केलेलं नाही, असं माजी खासदार विनायक राऊतांनी म्हंटलं आहे.

सत्ताधाऱ्यांनी जाणूनबुजून विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर केलेलं नाही, असं माजी खासदार विनायक राऊतांनी म्हंटलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत होतं असं ही विनायक राऊत यांनी सांगितलं आहे. भास्कर जाधवांची आक्रमकता पाहून विरोधी पक्षनेतेपद देण्यास टाळाटाळ केली असंही राऊत म्हणाले. तर नितेश राणे यांनी एकमेकांमध्ये वाद लवण्याचं कळतं अशीही टीका त्यांनी केली.

यावेळी बोलताना माजी खासदार विनायक राऊत म्हणाले की, हेतुपूर्वक आणि जाणीवपूर्वक किंवा द्वेष म्हणून भाजपने किंवा सत्ताधारी पक्षाने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद जाहीर केलेलं नाही. शिवसेना उबाठा गटाकडून विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस झाली होती. तेच त्यांच्या डोळ्यात खुपलं. म्हणून भास्कर जाधव यांची आक्रमकता, त्यांचा अभ्यास, आणि अनुभव हा त्यांना भारी पडेल म्हणून ते विरोधी पक्षनेते पद जाहीर करायला तयार नाही, असा दावा विनायक राऊतांनी केला आहे.

Published on: Jul 19, 2025 01:43 PM