Chenab River Video : ऑपरेशन सिंदूरनंतर आता वेगळं टेन्शन, चिनाब नदीतून धो-धो पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?

Chenab River Video : ऑपरेशन सिंदूरनंतर आता वेगळं टेन्शन, चिनाब नदीतून धो-धो पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?

| Updated on: May 10, 2025 | 3:50 PM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने चिनाब नदीवरील बागलिहार आणि सलाल धरणातील पाणी पाकिस्तानसाठी रोखलं होतं. मात्र आज शनिवारी चिनाब नदीवर बांधलेल्या दोन्ही धरणांचे काही दरवाजे उघडण्यात आले. याचे व्हिडिओही समोर आले आहेत.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या काळात, भारताने अनेक धरणांचे पाणी थांबवले होते. यामध्ये भारताने पहिल्यांदा सिंधू त्यानंतर चिनाब नदीवर बांधलेल्या धरणाचे पाणीही रोखले होते. मात्र आज शनिवारी चिनाब नदीवरील सलाल धरणातून आता पाणी सोडण्यात आलं आहे. सलाल धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून पाणी सोडलं जात आहे. चिनाब नदीवरील सलाल धरणातून मोठ्या प्रवाहाने हे पाणी सोडल्यानंतर पाकिस्तानात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कडक पाऊलं उचलत सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला जाण्यापासून रोखलं होतं. भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानची तळ पायाची आग मस्तकात गेली आणि भारताला उलटसुलट धमक्या दिल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, सिंधू जल करार जागतिक बँकेने केला होता. या करारावर १९६० मध्ये तत्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्रपती अयुब खान यांनी स्वाक्षरी केली होती. दोन शत्रुत्वाच्या शेजाऱ्यांमधील शांततापूर्ण सहकार्याचे एक दुर्मिळ उदाहरण म्हणून याचे अनेकदा कौतुक केले जाते.

Published on: May 10, 2025 03:50 PM