Abdul Sattar | ‘आम्ही ओके, तर शेतकरी ओके’, काय म्हणाले कृषी मंत्री? पोळा होणार का गोड?

Abdul Sattar | ‘आम्ही ओके, तर शेतकरी ओके’, काय म्हणाले कृषी मंत्री? पोळा होणार का गोड?

| Updated on: Aug 21, 2022 | 6:36 PM

Abdul Sattar | अतिवृष्टी, गोगलागायीचा, कीटकांच्या प्रादूर्भावामुळे सध्या शेतकरी हवालदिल झाला आहे. पण सर्वच जण कृषी पर्यटनाव्यतिरिक्त काहीच ठोस मदत देत नसल्याचे चित्र आहे.

Abdul Sattar | अतिवृष्टी(Heavy Rain), गोगलागायीचा, कीटकांच्या प्रादूर्भावामुळे सध्या शेतकरी हवालदिल झाला आहे. पण सर्वच जण कृषी पर्यटनाव्यतिरिक्त काहीच ठोस मदत देत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील मंत्री झाडी, हॉटेलचे ओके वर्णन करण्यात गर्क असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी लगावला होता. नांदेड दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्र्यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आम्ही ओके, तर शेतकरी ओके होईल’, असे वक्तव्य अब्दुल सत्तार (Abdul Sattar)यांनी केले. हे ताज्या दमाचे सरकार येऊन अवघे 45 दिवस झाले आहेत. पण ज्यांच्या हातात अनेक वर्षे सत्ता होती. त्यांना कृषी धोरण ठरविता आले नाही. त्यांनी शेतकरी आणि शेती ओके काय केले असा प्रति प्रश्न त्यांनी केला. तसेच लवकरच शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले.

Published on: Aug 21, 2022 06:35 PM