Chandrakant Patil Speech | राज्यकर्त्यांना घालवण्यासाठी रस्त्यावर उतरलो
दाऊदला मदत करणाऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याासठी सरकारची धडपड आहे. यांना शेतकऱ्यांची चिंता नाहीये. वीजेची कनेक्शन कापली जात आहेत. पिकं जळून जात आहेत. परीक्षांचे पेपर हुकतायत. त्याचं नाही नाही. यांना मलिकांना वाचवायचंय, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी भाषणात केला.
दाऊदशी संबंधित व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करण्याचा आरोप असलेले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. आज मुंबई येथील आझाद मैदानावर भाजप समर्थकांनी विराट मोर्चा काढला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), आशीष शेलार, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार आदी भाजप नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. दाऊदच्या दबावाला बळी पडून हे सरकार नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाहीये. त्यांना पाठिशी घालत आहे. दाऊदला मदत करणाऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याासठी सरकारची धडपड आहे. यांना शेतकऱ्यांची चिंता नाहीये. वीजेची कनेक्शन कापली जात आहेत. पिकं जळून जात आहेत. परीक्षांचे पेपर हुकतायत. त्याचं नाही नाही. यांना मलिकांना वाचवायचंय, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी भाषणात केला.
