Chandrapur Video : ‘तो’ बाईकवरून उतरला, दोन पाऊलं चालला अन् थेट खाली कोसळला, बघा CCTV, तुम्हीही व्हाल शॉक

Chandrapur Video : ‘तो’ बाईकवरून उतरला, दोन पाऊलं चालला अन् थेट खाली कोसळला, बघा CCTV, तुम्हीही व्हाल शॉक

| Updated on: Aug 20, 2025 | 3:44 PM

पावसाळ्यामुळे चेंबर आणि नाल्यांवर पाण्याचे आच्छादन आल्याने, चेंबरची स्थिती लक्षात आली नाही. याच दरम्यान, एक तरुण त्या चेंबरवर उभा राहिला आणि अचानक चेंबरचे झाकण तुटले, त्यामुळे तो नाल्यात पडला.

चंद्रपूरमधील एक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. चेंबरवर उभा असलेला एक युवक थेट अचानक नालीत कोसळल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही घटना चंद्रपूरमधील जनता कॉलेज चौकातील असल्याची माहिती मिळतेय. चेंबरवर उभा असलेला एक युवक थेट नालीत पडल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे शहरातील नागरी सुविधा आणि पावसाळ्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने अशा धोकादायक ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याची आणि नागरिकांनीही सावधानता बाळगण्याची गरज आहे.

तर दुसरीकडे वसईत साचलेल्या पाण्यात पडून एका 70 वर्षे वृद्ध महिलेचा जीव गेला आहे. लिलाबाई रोहम असं या वृद्ध महिलेचे नाव आहे. वसई पश्चिमेच्या विशाल नगर परिसरात भगवती अपार्टमेंट ही महिला राहत होती. या महिलेच्या घरामध्ये चार ते पाच फूट पाणी होतं. या पाण्यामध्ये ही महिला काल दुपारी पडली आणि तिचा मृत्यू झाला.

Published on: Aug 20, 2025 03:44 PM