PHOTOS : जम्मू-काश्मीरमधून खास प्रकारच्या चेरीची पहिली खेप दुबईला रवाना, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार

काश्मीर खोऱ्यातील चेरी आता आखाती देशांमध्ये चांगलीच पसंतीला उतरत आहे. पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधून मिश्र चेरीची पहिली खेप दुबईला पाठवण्यात आलीय.

1/5
काश्मीर खोऱ्यातील चेरी आता आखाती देशांमध्ये चांगलीच पसंतीला उतरत आहे. पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधून मिश्र चेरीची पहिली खेप दुबईला पाठवण्यात आलीय. कृषी कल्याण विभागाचे प्रधान सचिव नवीन कुमार चौधरी यांनी सोमवारी (5 जुलै) श्रीनगरमधून दुबईसाठी चेरी रवाना केली. कृषी विभागाने यासाठी गो एअरलायन्ससोबत करार केलाय.

2/5
केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी ट्वीट करत म्हटलं, "आता दुबई देखील काश्मीरच्या चेरीची चव लक्षात ठेवेल.  श्रीनगरमधून दुबईला होणाऱ्या या चेरी निर्यातीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होईल आणि जागतिक बाजारात आपली भागेदारी वाढेल."

3/5
यंदा जम्मू-काश्मीरमध्ये 12 हजार मेट्रिक टन चेरीचं उत्पादन झालंय. त्यामुळे चेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल, असं जाणकारांचं मत आहे.

4/5
चेरीचं फळ एप्रिलमध्ये पिकतं. या काळात इतर कोणतंही फळ पिकलेलं नसतं. त्यामुळे चेरीला या काळात चांगली मागणी असते. त्यामुळे बाजारात चेरीची मागणी वाढून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते.

5/5
कोरोना संसर्गाच्या काळातही चेरीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलीय. कारण चेरीत व्हिटॅमिनचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे चेरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीत चांगली वाढ होते. मिश्र चेरीला सर्वोत्कृष्ट मानलं जातं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI