Maharashtra Lok Sabha Election Final Results 2024 LIVE : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी
Maharashtra Lok Sabha Election Final Results 2024 LIVE Winner Updates in Marathi: लोकसभेचे निकाल आल्यानंतर भाजपाला केंद्रात स्वत:च्या बळावर सरकार स्थापन करण्याएवढे बहुमत मिळालेले नाही. तर महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीला कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राजकारणात उलथापालथ झाली आहे.

लोकसभेचे निकाल आल्यानंतर भाजपाला केंद्रात स्वत:च्या बळावर सरकार स्थापन करण्याएवढे बहुमत मिळालेले नाही. तर महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीला कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता केंद्रात भाजपा सरकारला मित्रपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. येथे महाराष्ट्रातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला मिळालेल्या कमी जागांमुळे जबाबदारी स्वीकारत केंद्राला आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. विरोधकांनी भाजपा घटना बदलणार असा चुकीचा प्रचार केल्याने हे जागांचे नुकसान झाले अन्यथा भाजपा केंद्रात स्वबळावर पुन्हा आले असते असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 जून रोजी पुन्हा तिसऱ्यांदा सरकार स्थापन स्थापन करणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
भाजपने देशभरातील सर्व खासदारांना दिल्लीत बोलावलं
भाजपने देशातील सगळे २४१ खासदार दिल्लीत बोलावले आहेत. इंडिया आघाडीच्या हालचालीनंतर भाजपने खबरदारी घेतली आहे. उद्या सगळ्या २४१ खासदारांना दिल्लीत बोलवल आहे. ७ तारखेला एनडीए आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.
-
नवी मुबंईतील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
नवी मुंबई : कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस नाईक यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. सागर कुमार टकले आणि प्रज्ञेश नरेंद्र कोठेकर अशी या दोघांची नावे आहेत. जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान वेळेत ‘से-Say’ दाखल करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याकरीता सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर टकले यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. आणि तडजोडी अंती ४० हजार रुपये लाच स्वीकारली.
-
-
लोकसभेच्या विजयाचा उरण येथे जल्लोष साजरा
इंडिया आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षातर्फे उरण शहरातील गणपती चौक येथे असलेल्या काँग्रेस कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर पेढे वाटून, एकमेकांना शुभेच्छा देऊन, काँग्रेस पक्षाचा विजय असो असे नारे देत काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. यावेळी कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सर्वांना शुभेच्छा देत पदाधिकारी कार्यकर्त्यांना पेढे भरवून विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.
-
एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पाठिंब्याची पत्रे केली सादर
पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू असलेली एनडीएच्या घटक पक्षांची बैठक आता संपली आहे. बैठक संपल्यानंतर आता एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना पाठिंब्याची पत्रे सादर केल्याचे कळते.
-
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाची पिछेहाट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. यासह त्याने राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या निवासस्थानी जमली आहे. राजीनामा त्यांनी मागे घ्यावा अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली आहे.
-
-
इंडिया आघाडीच्या सत्ता स्थापनेसाठी हालचाली वाढल्या, मल्लिकार्जून यांच्या घरी नेत्यांची रेलचेल
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा आणि खासदार राहुल गांधी भारत आघाडीच्या बैठकीसाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले.
#WATCH दिल्ली: कांग्रेस संसदीय दल की अध्यक्ष सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी वाड्रा और सांसद राहुल गांधी INDIA गठबंधन की बैठक के लिए पार्टी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे के आवास पहुंचे। pic.twitter.com/A8hkKCr6w0
— ANI_HindiNews (@AHindinews) June 5, 2024
-
सत्ता स्थापनेचा दावा काँग्रेसने करावा, मित्रपक्षांचा दबाव- सूत्र
काँग्रेस पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा करावा, असा दबाव मित्रपक्षांनी टाकल्याची सूत्रांची माहिती आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशिवाय सत्ता स्थापन करणं कठीण आहे. मात्र असं असलं तरी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी रणनिती आखल्याचं बोललं जात आहे.
-
नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे सर्वांचे- संजय राऊत
नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांनी काँग्रेससोबतही काम केलं आहे. त्यामुळे ते सर्वांचे आहेत. नरेंद्र मोदींचं काम हम करे सो कायदा आहे. त्यामुळे त्याला इतर पक्षांना घेऊन सरकार चालवणं कठीण आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
-
भाजप आमदार प्रवीण पोटे यांचा अमरावती शहर भाजप अध्यक्ष पदाचा राजीनामा…
या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार प्रवीण पोटे यांचा अमरावती शहर भाजप अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. नवनीत राणा यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन पोटे यांनी शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रवीण पोटे यांनी राजीनामा पाठवला आहे. प्रवीण पोटे यांनी राजीनामा दिल्याने अमरावती भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
-
विशाल पाटील खर्गे यांची घेणार भेट
विशाल पाटील उद्या किवा परवा दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेणार आहेत.सांगली लोकसभा विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून लढवली होती. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून पाठिंबा देणार आहेत. विश्वजीत कदम यांच्यासोबत विशाल पाटील दिल्लीत येणार आहेत.
-
रक्षा खडसेंनी घेतला एकनाथ खडसेंचा आशीर्वाद
लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे विजयानंतर आज एकनाथ खडसेंचा घरी जाऊन आशीर्वाद घेतला.
-
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे दोन सोन्याचे हार अर्पण
पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे दोन सोन्याचे हार अर्पण करण्यात आले. हवेली तालुक्यातिल कुंजीरवाडी येथील विठ्ठल भक्त बबन रामचंद्र तुपे यांनी दोन सोन्याचे हार अर्पण केले आहेत.
-
फडणवीसांच्या नेतृत्वात आम्हाला पुन्हा चांगलं यश मिळेल – बावणकुळे
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आम्हाला पुन्हा चांगलं यश मिळेल. त्यांना सरकारमध्ये राहूनच संघटनेचं काम करावं अशी आमची इच्छा आहे – बावणकुळे
-
निकाल कमी आल्याने आम्हाला त्याचं दु:ख आहे – बावणकुळे
निकाल कमी आल्याने आम्हाला त्याचं दु:ख आहे. पण आम्ही पुन्हा एकदा संघटनेचं आणखी चांगलं काम करु. – बावणकुळे
-
फडणवीसांनी त्यांनी भावना व्यक्त केली – बावणकुळे
फडणवीसांनी त्यांनी भावना व्यक्त केली आहे. पण सरकारमध्ये राहून देखील काम करता येईल अशी आमची भूमिका आहे. असं चंद्रशेखर बावणकुळे यांनी म्हटले आहे.
-
देवेंद्र फडणवीसांची मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा
देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी व्यक्त केली इच्छा.
-
मला सरकारमधुन मोकळं करावं, केंद्रीय नेतृत्वाला विनंती करणार – फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी आपण राज्यात महायुतीला मिळालेल्या कमी जागांमुळे आपल्याला उपमुख्यमंत्री पदावरुन मोकळं करावे असे म्हटले आहे. मला सरकारमधून मोकळं करावं, केंद्रीय नेतृत्वाला विनंती करणार असेही फडणवीस म्हणाले आहेत.
-
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजाराचे सोन्याचे हार अर्पण
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजाराचे सोन्याचे दोन हार अर्पण केले आहेत, हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथील विट्ठल भक्त बबन रामचंद्र तुपे यांनी श्री विठ्ठलास चार पदरी आणि श्री रुक्मिणी मातेस पाच पदरी असे दोन सोन्याचे हार केले अर्पण केले आहेत.
-
आता मी खासदार झालो आहे, जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख झालो आहे – निलेश लंके
आता मी खासदार झालो आहे, जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख झालो आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कोणी माझ्यावर टीका केली ते विसरून जनतेच्या प्रश्नासाठी काम करणार असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.
-
संजय शिरसाट यांचे अत्यंत मोठे विधान
एनडीएचं सरकार स्थापन व्हायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. नितेश कुमार, चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेऊन आपण सरकार बनवू असं काहींना वाटू लागलंय. सरकारला कोणताच धोका नाही, सव्विस पक्षांपेक्षा या चार पक्षाचं सरकार केव्हाही चांगलं, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.
-
संजय पाटील मातोश्रीवर
ईशान्य मुंबईतून संजय पाटील यांचा विजय झाल्यानंतर संजय पाटील हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
-
हेमंत गोडसे यांचा मोठा आरोप
उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने हा निकाल आला. राज्यात शेतकऱ्यांच्या धोरणामुळे ही अनुभूती आली. भाजपने उमेदवार घोषित केले तेव्हाच पक्षाने उमेदवार देणे गरजेचे होते, असे हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे.
-
Live Update | बारामती शरद पवार यांचीच पुन्हा सिद्ध झालं – श्रीनिवास पवार
बारामती शरद पवार यांचीच पुन्हा सिद्ध झालं आहे. कौटुंबिक पातळीवर आम्ही एक आहोत.. श्रीनिवास पवार यांनी घेतली होती अजित पवार यांच्या विरोधात भूमिका.
-
Live Update | विधानसभेला कार्यकर्ते पुन्हा उत्साहाने काम करतील – पंकजा मुंडे
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया… विधानसभेला कार्यकर्ते पुन्हा उत्साहाने काम करतील… माझ्या आयुष्यातील वेगळी आणि विचित्र निवडणूक होती… मी कोणाची अवहेलना केली नाही, प्रक्षोभक बोलले नाही… असं वक्तव्य पंकडा मुंडे यांनी केलं आहे.
-
Live Update | काँग्रेसच्या विजयी उमेदवार शोभा बच्छाव धुळ्यातील काँग्रेस भवन मध्ये दाखल
काँग्रेसच्या विजयी उमेदवार शोभा बच्छाव धुळ्यातील काँग्रेस भवन मध्ये दाखल… काँग्रेस भवनमध्ये स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत छोटी बैठक… काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट इतर पक्ष उपस्थित
-
Live Update | अजित पवार गट बारामतीच्या पराभवाची करणार चिंतन
अजित पवार गट बारामतीच्या पराभवाची करणार चिंतन… दोन दिवसात बैठक होण्याची शक्यता… दोन दिवसात अजित पवारांना रिपोर्ट दिला जाणार… काही बूथवर शरद पवार गटाचा पोलिंग एजंट नसताना कसं मतदान जास्त झालं याच चिंतन केलं जाणार
-
Live Update | NDA नेते आजच पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ राष्ट्रपतींना पाठिंब्याचे पत्र देऊ शकतात
NDA नेते आजच पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ राष्ट्रपतींना पाठिंब्याचे पत्र देऊ शकतात…. आज संध्याकाळी चार वाजता होणार NDA ची बैठक… बैठकीनंतर आजच राष्ट्रपतींना पत्र देण्याची शक्यता
-
पवार गटाचे सर्व खासदार 9 जूनला मुंबईत एकत्र येणार
पवार गटाचे सर्व खासदार 9 जूनला मुंबईत एकत्र येणार आहेत. 9 जूनला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत 10 जूनला पक्षाच्या वर्धापन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
-
राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता
राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता आहे. केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे.
-
राज्यात लवकरच मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता…
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत भाजपचा दारूण पराभव झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार करून डॅमेज कंट्रोल केलं जाणार.
केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता आहे. आज भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होणार.
-
नरेंद्र मोदी हे भगवान ते पराभूत झाले आहेत – संजय राऊत
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका. नरेंद्र मोदी हे भगवान ते पराभूत झाले आहेत. मोदी हा आतापर्यंत चेहरा होता त्यांची गॅरंटी संपली आहे. तुम्ही पराभव स्वीकारा बीजेपीला बहुमत मिळालं नाही, असं राऊत म्हणाले.
-
पुण्यात भाजपचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा भव्य सत्कार
पुण्यात भाजपचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा भव्य सत्कार. पुण्यातील कसब्यात करण्यात येणार मोहोळ यांचं जंगी स्वागत. ग्रामदैवत कसबा गणपतीला आरती करत करण्यात येणार जल्लोष. पुण्यातील गणेश मंडळ आणि ढोल ताशा पथक एकत्रित येत विजयोत्सव साजरा करणार.
-
नाशिक – दिंडोरीचे नवनियुक्त खासदार भास्कर भगरे शिरसगाव मध्ये दाखल
नाशिक – दिंडोरीचे नवनियुक्त खासदार भास्कर भगरे शिरसगाव मध्ये दाखल. काल याच गावात झाला होता लढाऊ विमानाचा अपघात. भास्कर भगरे यांच्याकडून घटना स्थळाची पाहणी करण्यात आली.
-
Loksabha Election Result : पुण्यात वसंत मोरे यांना वंचितनेच नाकारले ?
गेल्या वर्षी पेक्षा यंदा वंचितकडून लढलेल्या वसंत मोरे यांना कमी मतदान झाले आहे. काल झालेल्या निकलात वसंत मोरे यांना फक्त ३१ हजार मते मते मिळाली.
-
Marathi news : खासदार ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी
शिवसेनेचे विजयी खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबई आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी सर्व विजयी खासदारांना उतात्काळ मुंबईत बोलवले आहे.
-
Marathi news : मुंबईत पावसाला सुरुवात
निवडणूक प्रचारात निर्माण झालेल्या गरम वातावरण आणि उन्हाचा पारा वाढल्यानंतर मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. उत्तर मुंबईतील सर्वच भागात पाऊस पडत आहे.
-
Lok Sabha Election Result : राजाभाऊ वाजे 161103 मतांनी विजयी
शेवटच्या फेरीचा निकाल जाहीर. अटीतटीची लढत या निवडणुकीमध्ये बघायला मिळाली. शिंदे गटाला नक्कीच मोठा झटका बसलाय.
-
कल्याण काळे आघाडीवर, रावसाहेब दानवे पिछाडीवर
कल्याण काळे यांना 20 व्या फेरीत 65,837 मतांची आघाडी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव जवळपास निश्चित.
-
माढा लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटील 84583 मतांनी आघाडीवर
धैर्यशील मोहिते पाटील यांना 484521 मते तर भाजपच्या नाईक निंबाळकर यांना 399938 मते
-
ओमराजे निंबाळकर यांना 3 लाख 14 हजार 938 मतांची विक्रमी लीड
ओमराजे यांना 7 लाख 19 हजार 553 मते तर अर्चना पाटील यांना 4 लाख 4 हजार 615 मते मिळाली आहेत.
-
Nanded Lok Sabha Election Result : वसंत चव्हाण आघाडीवर
विसावी फेरी- वसंतराव चव्हाण 411296, प्रताप पाटील चिखलीकर 388892, काँग्रेसचे वसंतराव चव्हाण -22404. एकविसावी फेरी- वसंतराव चव्हाण – 429316, प्रताप पाटील चिखलीकर – 407787. काँग्रेसचे वसंतराव चव्हाण 21529 मतांनी आघाडीवर
-
Lok Sabha Election Result : सोलापूरमधून प्रणिती शिंदे विजयी
सोलापूरमध्ये अटीतटीचा सामना बघायला मिळाला. आता सोलापूरमधून प्रणिती शिंदे विजयी झाल्या आहेत. सुरूवातीपासूनच प्रणिती शिंदे आघाडीवर होती.
-
Beed Lok Sabha Election Result : उदयनराजे भोसले विजयी
साताऱ्यातून उदयनराजे भोसले हे विजयी झाले आहेत. या लढतीकडे राज्याचे लक्ष होते. भाजपाकडून उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढवली.
-
Lok Sabha Election Result 2024 : अमोल कोल्हे विजयी
नुकताच शिरूर लोकसभेचा निकाल जाहीर झालाय. अमोल कोल्हे हे विजयी झाले आहेत. सुरूवातीच्या फेरीपासूनच अमोल कोल्हे हे आघाडीवर होते.
-
ओमराजे निंबाळकर यांनी मोडले सर्व रेकॉर्ड
ओमराजे निंबाळकर यांना 2 लाख 95 हजार 288 मतांची विक्रमी लीड. ओमराजे यांना 6 लाख 74 हजार 812 मते तर अर्चना पाटील यांना 3 लाख 79 हजार 524 मते.
-
Lok Sabha Election Result : मोठा धक्का, उज्वल निकम यांचा पराभव
उज्वल निकम यांचा पराभव झालाय. वर्षा गायकवाड या विजयी झाल्या आहेत. हा मोठा धक्का बीजेपीला म्हणावा लागणार आहे.
-
Lok Sabha Election Result : डॉ. हेमंत सावरा विजयी
पालघर लोकसभेची मतमोजणी पूर्ण झालीये. पालघर लोकसभा मतमोजणीची 29 वी फेरी पूर्ण. डॉ. हेमंत सावरा मताधिक्याने विजयी.
-
Lok Sabha Election Result : भाजप नेता पंकजा मुंडे यांची आघाडी
पंकजा मुंडे या आघाडीवर आहेत. 33623 मतांनी पंकजा मुंडे या आघाडीवर आहेत. बजरंग सोनवणे हे पिछाडीवर आहेत.
-
Candidate Election Final Result 2024 : विजयानंतर श्रीकांत शिंदे भावूक
कल्याणमधून श्रीकांत शिंदे हे विजयी झाले आहेत. विजयानंतर श्रीकांत शिंदे हे भावूक होताना दिसत आहेत. सुरूवातीपासूनच श्रीकांत शिंदे आघाडीवर होते.
-
नंदुरबार लोकसभेत काँग्रेसने पुन्हा मारली मुसंडी
काँग्रेस उमेदवार एक लाख ५९ हजार ४२ मतांनी विजयी झाले. विजयानंतर काँग्रेसकडून जल्लोष करण्यात येत आहे.
-
Jalna Lok Sabha Election Result : जालन्यात रावसाहेब दानवे पिछाडीवर
जालन्यात रावसाहेब दानवे 43 हजार 312 मतांनी पिछाडीवर आहेत. 15 व्या फेरीत दानवे पिछाडीवर आहेत. या मोठा धक्का म्हणावा लागेल.
-
Beed Lok Sabha Election Result : पंकजा मुंडे आघाडीवर
बीडमध्ये मोठी टक्कर बघायला मिळतंय. आता पंकजा मुंडे या आघाडीवर आहेत. 16 हजार मतांनी पंकजा मुंडे आघाडीवर आहेत. बजरंग सोनवणे हे पिछाडीवर आहेत.
-
Lok Sabha Election Result : संदिपान भुमरे आघाडीवर
संदिपान भुमरे हे 51546 मतांनी आघाडीवर आहेत. संभाजीनगरमधून संदिपान भुमरे (शिवसेना) 291720, इम्तियाज जलील (MIM) 240174, चंद्रकांत खैरे (शिवसेना UBT) 184439
-
Lok Sabha Election Result : यवतमाळमधून संजय देशमुख आघाडीवर
20 व्या फेरीमध्ये संजय देशमुख 4 लाख 37 हजार 281, राजश्री पाटील 3 लाख 73 हजार 949, संजय देशमुख -63 हजार 332 लीडवर
-
Election Final Result 2024 : अमोल कोल्हे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल
शिरूर लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा असून अमोल कोल्हे हे आघाडीवर आहेत. 16 व्या फेरीत शिरुरमधुन अमोल कोल्हे 71982 मतांनी आघाडीवर.
-
पंकजा मुंडे समर्थांकडून जल्लोष
बीडमध्ये कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला. निकाल लागण्याआधीच बीडमध्ये जल्लोष. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, गुलाल उधळला
-
Lok Sabha Election Result : ओमराजे निंबाळकर यांची विजयाकडे वाटचाल
सोळावी फेरी अखेर 2 लाख 05 हजार 392 मतांची ओमराजे निंबाळकर यांची आघाडी.
-
Maval Lok Sabha Election Result : श्रीरंग बारणे विजयी
मावळमधून महाविकास आघाडीचे श्रीरंग बारणे हे विजयी झाले आहेत. संजोग वाघेरे यांचा पराभव झालाय.
-
Latur Lok Sabha Election Result : शिवाजी काळगे विजयी
लातूरमधून शिवाजी काळगे हे विजयी आहेत. शिवाजी काळगे हे सुरूवातीपासून आघाडीवर बघायला मिळाले.
-
Lok Sabha Election Result : श्रीकांत शिंदे 199700 मतांनी आघाडीवर
कल्याण लोकसभा मतमोजणीची 15 वी फेरी सुरू आहे. श्रीकांत शिंदे 199700 मतांनी आघाडीवर आहेत. आता थोड्याच वेळात कल्याणमधील चित्र स्पष्ट होईल.
-
Lok Sabha Election Result : शिर्डीतून बाळासाहेब वाकचाैर विजयी
शिर्डीतून बाळासाहेब वाकचाैर विजयी झाले आहेत. बाळासाहेब वाकचाैर हे ठाकरे गटाचे आहेत. अंतिम फेरी नुकताच पार पडलीये.
-
Beed Lok Sabha Election Result : पंकजा मुंडे आघाडीवर
बीडच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. मोठी टक्कर बीडमध्ये बघायला मिळत आहे. पंकजी मुंडे या आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. 11 हजार मतांनी पंकजा मुंडे या आघाडीवर आहेत.
-
Maval Lok Sabha Election Result : महायुतीचे श्रीरंग बारणे आघाडीवर
श्रीरंग बारणे (महायुती) – 446602, संजोग वाघेरे (महाविकास आघाडी)- 376030, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 70,572 मतांनी आघाडीवर.
-
मतमोजणी केंद्रावर खासदार सुभाष भामरे हजर
काँग्रेस उमेदवार डॉ. शोभा बच्छाव या देखील मतमोजणी केंद्रावर झाल्या दाखल आहेत. विजयाची मते जास्त नसल्याने फेर मतमोजणी मागणी करण्याची शक्यता.
-
मध्यप्रदेशमध्ये अजून काम करण्याची आवश्यक्ता- शरद पवार
मध्यप्रदेशमध्ये अजून काम करण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. लोकसभेच्या निकालावर बोलताना शरद पवार हे दिसले.
-
Lok Sabha Election Result : ‘हा’ निकाल परिवर्तनाला पोषक- शरद पवार
हा निकाल परिवर्तनाला पोषक आहे, असे मोठे विधान शरद पवार यांनी केले आहे. परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेऊ असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
-
Lok Sabha Election Result : निकालावर शरद पवार यांचे मोठे विधान
लोकसभा निवडणूकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. यावेळी लोकसभेच्या निकालावर शरद पवार यांनी मोठे भाष्य केले आहे. आपल्या एकट्याचे यश नसून संपूर्ण महाविकास आघाडीचे यश असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
-
Lok Sabha Election Result Nashik : राजाभाऊ वाजे यांचा विजय जवळपास निश्चित
राजाभाऊ वाजे यांचा नाशिकमधून विजय जवळपास निश्चित आहे. यामुळे आता शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय.
-
Solapur Lok Sabha Election Result : प्रणिती शिंदे आघाडीवर
तेराव्या फेरीत प्रणिती शिंदे 33207 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 352075 मते तर भाजपच्या राम सातपुते यांना 318868 मते मिळाली आहेत.
-
Jalna Lok Sabha Election Result : रावसाहेब दानवे पिछाडीवर
जालन्यातून रावसाहेब दानवे हे पिछाडीवर आहेत. काही फेऱ्यांमध्ये दानवे हे पुढे होते. आता जालन्याच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
-
Lok Sabha Election Result : 80 हजार मतांनी सुनील तटकरे आघाडीवर
सुनील तटकरे हे मोठ्या आघाडीवर दिसत आहे. तब्बल 80 हजारांनी सुनील तटकरे हे आघाडीवर आहेत. 27 वी फेरी सध्या सुरू आहे.
-
Beed Lok Sabha Election Result : पंकजा मुंडे बीडमध्ये आघाडीवर
बीडमध्ये पंकजा मुंडे तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये जोरदार टक्कर बघायला मिळत आहे.
-
अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे 17 व्या फेरीत 16371 मतांनी आघाडीवर..
अभय पाटील, काँग्रेस. – 294278, अनूप धोत्रे, भाजप.- 310449, प्रकाश आंबेडकर, वंचित. – 189294, 16371 मतांनी भाजप आघाडीवर
-
सोळाव्या फेरी अखेर उदयनराजे भोसले 12,781 मतांनी आघाडीवर
सोळाव्या फेरी अखेर उदयनराजे भोसले 12,781 मतांनी आघाडीवर आहेत. उदयनराजे – 5,17,211, शशिकांत शिंदे -5,04,430 मते.
-
Lok Sabha Election Result : कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर
श्रीकांत शिंदे 166413 मतांनी आघाडीवर आहेत. सुरूवातीच्या फेरीपासूनच श्रीकांत शिंदे हे आघाडीवर दिसत आहेत.
-
Lok Sabha Election Result : नारायण राणे 45 हजार मतांनी आघाडीवर
नारायण राणे 45 हजार मतांनी आघाडीवर आहेत. सुरूवातीच्या फेऱ्या सोडल्या तर नारायण राणे हे आघाडीवरच दिसत आहेत. या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
-
60 हजार मतांनी चंद्रकांत खैरे पिछाडीवर
चंद्रकांत खैरे मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले आहेत. 60 हजार मतांनी पिछाडीवर असल्याने अखेर सोडले मतदान केंद्र.
-
Sangli Lok Sabha Election Result :14 व्या फेरीत विशाल पाटील आघाडीवर
14 व्या फेरी अखेर विशाल पाटील 60 हजार मतांनी आघाडीवर. विशाल पाटील – 3 लाख 63 हजार 392. संजयकाका पाटील 3 लाख 2 हजार 618 मते
-
Nanded Lok Sabha Election Result : वसंत चव्हाण यांची आघाडी कायम
नांदेडमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळत आहे. नांदेडमध्ये वसंत चव्हाण हे आघाडीवर आहेत. काही वेळातच नांदेडचे चित्र स्पष्ट होईल.
-
Lok Sabha Election Result : जळगावात भाजपचा मोठा जल्लोष
जळगावच्या भाजपाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष केला जातोय. जळगावमधून महायुतीचे उमेदवार आघाडीवर. स्मिता वाघ रक्षा खडसे एक लाखाच्या मताधिक्यांनी पुढे. भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या तालावर गुलाल उधळत ठेका धरला..
-
Beed Lok Sabha Election Result : बजरंग सोनवणे आघाडीवर
बीडच्या लोकसभा निवडणुकीची मतदान मोजणी सुरू आहे. पंकजा मुंडे या पिछाडीवर गेल्या असून बजरंग सोनवणे हे आघाडीवर आहेत. बीडचे चित्र अजून स्पष्ट होऊ शकले नाहीये.
-
Lok Sabha Election Result : काँग्रेसचे डॉ.नामदेव कीरसान आघाडीवर
गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी सुरू आहे. काँग्रेस डॉ. नामदेव कीरसान- 227843, भाजपा अशोक नेते- 189296, काँग्रेसचे डॉ.नामदेव कीरसान 38547 आघाडीवर आहेत.
-
Lok Sabha Election Result : सुनील तटकरे आघाडीवर
सुनील तटकरे हे आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे त्यांनी 45 हजारांची लीड मिळाली आहे. ही निवडणूक अटीतटीची होताना देखील दिसत आहे.
-
कल्याण लोकसभेच्या चार ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड
तीन विधानसभेच्या चार ईव्हीएम मशीनमध्ये झाला तांत्रिक बिघाड झाला आहे. आकडेवारी दाखवत नसल्याने व्हीव्हीपॅड मधील मतपत्रिका मोजल्या जाणार आहेत.
-
सुप्रिया सुळे 45 हजार मतांनी आघाडीवर
बारामतीची निवडणूक सर्वाधिक चर्चेची ठरलीये. आता या निकालाचे आकडे पुढे येताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे या तब्बल 45 हजार मतांनी पुढे आहेत.
-
Beed Lok Sabha Election Result : पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेमध्ये जोरदार लढत सुरू
बीड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेमध्ये लढत सुरू आहे. सर्वांच्या या निकालाकडे नजरा लागल्या आहेत.
-
Lok Sabha Election Result : निलेश लंके आघाडीवर
नगरमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळत आहे. निलेश लंके हे आघाडीवर दिसत आहेत. या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे बघायला मिळत आहे.
-
Lok Sabha Election Result : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे पिछाडीवर
तब्बल 56 हजार मतांनी चंद्रकांत खैरे पिछाडीवर आहेत. हा अत्यंत मोठा धक्का नक्कीच म्हणावा लागणार आहे. संदीपान भुमरे 18 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
-
Lok Sabha Election Result : धैर्यशील मोहिते-पाटील आघाडीवर
8 व्या फेरीस अखेरीस धैर्यशील मोहिते-पाटील यांना 27 हजार 63 मतांनी आघाडीवर मिळाली आहे. या निवडणूकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
-
Parbhani Lok Sabha Election Result : नवव्या फेरीतही संजय जाधव आघाडीवर
संजय जाधव सुरूवातीपासूनच आघाडीवर दिसत आहेत. विशेष म्हणजे नवव्या फेरीतही संजय जाधव हे आघाडीवर आहेत. महादेव जानकर यांना हा मोठा धक्काच म्हणावा लागणार आहे.
-
Lok Sabha Election Result : रक्षा खडसे यांची आघाडी कायम
रावेर लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. रक्षा खडसे (महायुती) – 183968, श्रीराम पाटील (महाविकास आघाडी) – 110283, रक्षा खडसे या 73 हजार 685 मतांनी आघाडीवर आहेत.
-
Lok Sabha Election Result : मुरलीधर मोहोळ आघाडीवर
भाजपाचे मुरलीधर मोहोळ 45 हजारांनी आघाडीवर आहेत. पुण्यातील या निवडणुकीकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत.
-
Lok Sabha Election Result : अनिल देसाई आघाडीवर
अनिल देसाई यांना आता 25 हजारांचे लीड मिळाल्याचे बघायला मिळत आहे. लोकसभेच्या निवडणूकीची मतदान मोजणी सुरू आहे. राहुल शेवाळेंचे वाटले टेन्शन
-
Lok Sabha Election Result : श्रीरंग बारणे यांची आघाडी कायम
नवव्या फेरीमध्येही श्रीरंग बारणे हे आघाडीवर आहेत. श्रीरंग बारणे (महायुती) – 272341, संजोग वाघेरे (महाविकास आघाडी) – 231469, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 40,872 मतांनी आघाडीवर आहेत.
-
Nanded Lok Sabha Election Result : वसंत चव्हाण आघाडीवर
नांदेडमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळत आहे. आठवी फेरी सुरू असून संत चव्हाण 13500 मतांनी आघाडीवर आहेत.
-
Lok Sabha Election Result :1 लाख 511 मतांनी ओमराजे निंबाळकर आघाडीवर
ओमराजे निंबाळकर यांनी पार केला आठव्या फेरीत 1 लाख 511 मतांच्या फरकाचा टप्पा. आठवी फेरी अखेर 1 लाख 511 मतांची ओमराजे निंबाळकर यांची आघाडी.
-
रावसाहेब दानवे यांना धक्का, काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर
डॉ.कल्याण काळे (काँग्रेस ) 76731, रावसाहेब दानवे (भाजपा ) 70582, काँग्रेसचे डॉ कल्याण काळे 6149 आघाडीवर आहे. भाजवाचे रावसाहेब दानवे यांना धक्का
-
Beed Lok Sabha Election Result : आठव्या फेरीत पंकजा मुंडे आघाडीवर
आठव्या फेरीत पंकजा मुंडे आघाडीवर आहेत. लीड पंकजा मुंडे यांना मिळाली आहे. पंकजा मुंडे विरूद्ध बजरंग सोनवणे अशी लढत बघायला मिळत आहे.
-
Lok Sabha Election Result : संजय देशमुख आघाडीवर
संजय देशमुख 1 लाख 94 हजार 877, राजश्री पाटील- 1,64,036, संजय देशमुख 30 हजार 841 लीडवर आहेत.
-
मावळ लोकसभा निवडणूकीत श्रीरंग बारणे आघाडीवर
मावळ लोकसभा निवडणूकीची सातवी फेरी सुरू आहे. श्रीरंग बारणे (महायुती) -220016,
संजोग वाघेरे (महाविकास आघाडी) – 175327, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 44,689 मतांनी आघाडीवर आहेत.
-
पंधराव्या फेरीत श्रीकांत शिंदे आघाडीवर
पंधराव्या फेरीत श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत. श्रीकांत शिंदे यांना 154553 मिळाली आहेत.
-
Parbhani Lok Sabha Election Result : संजय जाधव आघाडीवर
महादेव जानकर हे पिछाडीवर दिसत आहेत. संजय जाधव हे आघाडीवर आहेत. परभणी लोकसभा निवडणूकीची मतदान मोजणी सुरू आहे.
-
Satara Lok Sabha Election Result : साताऱ्यात शशिकांत शिंदे आघाडीवर
साताऱ्यात शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे मोठी लीड शशिकांत शिंदे यांना मिळताना दिसत आहे.
-
Lok Sabha Election Result : राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांची जबरदस्त कामगिरी
राज्यात महाविकास आघाडीची चांगली कामगिरी दिसतंय. राज्यात 30 चा आकडा आता महाविकास आघाडीने गाठला आहे. मराठवाड्यात अधिक संख्या आहे.
-
अमरावतीमधून बळवंत वानखडे आघाडीवर
तिसऱ्या फेरीत 8973 मतांनी बळवंत वानखडे आघाडीवर. तिसऱ्या फेरीत बळवंत वानखडे यांना 87 हजार 405 मते तर नवनीत राणा यांना 78 हजार 432 मते मिळाली.
-
Lok Sabha Election Result : रावसाहेब दानवे आणखी पिछाडीवर
रावसाहेब दानवे आणखी पिछाडीवर गेले आहेत. कल्याण काळे 2683 मतांनी आघाडीवर आहेत. या निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. सुरूवातीच्या फेरीमध्ये रावसाहेब दानवे आघाडीवर होते.
-
South Central Mumbai Lok Sabha Election Result : अनिल देसाई आघाडीवर
दक्षिण मध्य मुंबईच्या लोकसभा निवडणूकीची मतदान मोजणी सुरू आहे. अनिल देसाई – १०२३७४१, राहूल शेवाळे – १०१२८९३, अनिल देसाई हे १०८४८ मतांनी पुढे आहेत.
-
Beed Lok Sabha Election Result : पंकजा मुंडे आघाडीवर
बीड लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये मोठी लढत बघायला मिळत आहे. पंकजा मुंडे या दोन हजार मतांनी आता आघाडीवर आहेत.
-
Beed Lok Sabha Election Result : पंकजा मुंडे पाचव्या फेरीतही पिछाडीवर
पंकजा मुंडे पाचव्या फेरीतही पिछाडीवर आहेत. बजरंग सोनवणे हे आघाडीवर आहेत. पंकजा मुंडे यांच्यासाठी हे चिंतेचे आहे. या निवडणूकीकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे बघायला मिळतंय.
-
Lok Sabha Election Result : संदीपन भूमरे आघाडीवर
संभाजीनगरमध्ये संदीपन भूमरे आघाडीवर आहेत. संदिपान भुमरे (शिवसेना) – 50946, इम्तियाज जलील (MIM) – 50718, चंद्रकांत खैरे (शिवसेना UBT) – 35506
-
Thane Lok Sabha Election Result : ठाण्याच नरेश मस्के आघाडीवर
ठाण्यात लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. नरेश मस्के-22620, राजन विचारे-18397, 4223-नरेश मस्के हे आघाडीवर आहेत.
-
Baramati Lok Sabha Election Result : सुप्रिया सुळे 19 हजार मतांनी आघाडीवर
बारामतीमध्ये मोठी लढत बघायला मिळतंय. सुप्रिया सुळे 19 हजारांनी आघाडीवर आहेत. सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी लढत बघायला मिळत आहेत.
-
Baramati Lok Sabha Election Result : अजित पवारांच्या मतदार संघात सुप्रिया सुळे यांना मोठी लीड
बारामतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अजित पवार यांचा मतदार संघ असलेल्या बारामतीमधून मतदार संघातून सुप्रिया सुळे यांनी लीड मिळाली आहे.
-
प्रणिती शिंदे 10 हजार 476 मतांनी आघाडीवर
तिसरी फेरीअखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे 10 हजार 476 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 89217 मते. भाजपच्या राम सातपुते यांना 78741 मते. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे 10 हजार 476 मतांनी आघाडीवर आहेत.
-
ओमराजे निंबाळकर यांनी पार केला 1 लाख मतांचा टप्पा
शिवसेनेचे उबाठा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी पार केला 1 लाख मतांचा टप्पा. चौथी फेरी सुरुवातीला ओमराजे यांना मिळाली 1 लाख 3 हजार मते. दोन्ही उमेदवार यांच्यात 44 हजार मतांचा मोठा फरक आहे.
-
Maval Lok Sabha Election Result : श्रीरंग बारणे आघाडीवर
श्रीरंग बारणे (महायुती) – 61431, संजोग वाघेरे (महाविकास आघाडी) – 53124, महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे हे 8307 मतांनी पिछाडीवर आहेत.
-
अमरावतीमध्ये बळवंत वानखडे 4444 मतांनी आघाडीवर
दुसऱ्या फेरीत अमरावती काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे 4444 मतांनी आघाडीवर आहेत. बळवंत वानखडे यांना आतापर्यंत मिळाले 9852 मते मिळाली आहेत. नवनीत राणा यांना आतापर्यंत मिळाले 5408 मते मिळाली आहेत.
-
Parbhani Lok Sabha Election Result : उज्वल निकम आघाडीवर
उज्वल निकम हे आघाडीवर आहेत. वर्षा गायकवाड यांना हा मोठा धक्का म्हणाला लागणार आहे. भाजपाकडून उज्वल निकम यांनी निवडणूक लढवली आहे.
-
Lok Sabha Election Result : श्रीकांत शिंदे आघाडीवर
श्रीकांत शिंदे 25334 मतांनी आघाडीवर आहेत. वैशाली दरेकर एकूण मत 32285, श्रीकांत शिंदे 25334 मतांनी आघाडीवर आहेत.
-
Raver Lok Sabha Election Result : रक्षा खडसे आघाडीवर
रावेर लोकसभा मतमोजणी सुरू असून रक्षा खडसे या आघाडीवर आहेत. श्रीराम पाटील (महाविकास आघाडी) – 58748, रक्षा खडसे (महायुती) – 1 लाख 4 हजार 347. 45599 मतांनी रक्षा खडसे आघाडीवर आहेत.
-
Lok Sabha Election Result : इम्तियाज जलील आघाडीवर
संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील हे आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. संभाजीनगरमध्ये अटीतटीची लढत असून इम्तियाज जलील आघाडीवर आहेत.इम्तियाज जलील 30560, संदीपन भुमरे 20066, चंद्रकांत खैरे 13883, इम्तियाज जलील 10494 मतांनी पुढे
-
Lok Sabha Election Result : माळशिरस तालुक्यातील ईव्हीएम मशीन पडल्या बंद
माळशिरस तालुक्यातील 2 ईव्हीएम मशीन पडल्या बंद. ईव्हीएम मशीन उघडल्या की, दाखवला जातोय एरर. माढा मतदार संघाचा तिसरी फेरी थांबवली. टेक्निकल टीमकडून ईव्हीएमची होत आहे तपासणी.
-
शिरुरमधून अमोल कोल्हे आघाडीवर
अमोल कोल्हेची आघाडी कायम. अमोल कोल्हे 18674 मतांनी आघाडीवर आहेत. शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.
-
Beed Lok Sabha Election Result : बजरंग सोनवणे आघाडीवर
बीडमध्ये महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे हे आघाडीवर दिसत आहेत. हा पंकजा मुंडे यांना मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. तिसऱ्या फेरीत बजरंग सोनवणे हे आघाडीवर आहेत.
-
Lok Sabha Election Result : नवनीत राणा यांना धक्का, बळवंत वानखडे आघाडीवर
महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे अमरावतीतून आघाडीवर आहेत. अमरावतीच्या काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसाच्या कार्यकर्त्यांमध्ये सकाळपासून उत्साह पाहायला मिळतोय.
-
Lok Sabha Election Result : कोल्हापूरमध्ये ईव्हीएम मशिन बंद
विधानसभा मतदारसंघातील दुसऱ्या फेरीचे मशीन बंद झाले. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील तिसऱ्या फेरीचे मशिन बंद पडले.
-
Nanded Lok Sabha Election Result : प्रताप पाटील चिखलीकर आघाडीवर
नांदेड लोकसभा निवडणूकीमध्ये प्रताप पाटील चिखलीकर हे आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. प्रताप पाटील चिखलीकर- 3814 मते, वसंत चव्हाण – 2694 मते
-
Nashik Lok Sabha Election Result : नाशिकमधून राजाभाऊ वाजे आघाडीवर
नाशिकमधून राजाभाऊ वाजे हे आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. तिसऱ्या फेरीत अखेर राजाभाऊ वाजे 36340 मतांनी आघाडीवर आहेत.
-
श्रीकांत शिंदे 524 मतांनी आघाडीवर
कल्याण लोकसभा मतदान मोजणीला सुरूवात झालीये. कल्याण पूर्व 142 पहिली फेरी मतमोजणी. श्रीकांत शिंदे 9474 एकूण मतं 3358. वैशाली दरेकर 9474 एकूण मत 2894.
-
Nandurbar Lok Sabha Election Result : नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवार आघाडीवर
काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी यांना पाहिल्या फेऱ्यात 50, हजार मताने आघाडी मिळाली आहे. अजून बऱ्याच फेरी शिल्लक आहेत. यामुळे आकड्यांमध्ये बदल होऊ शकतात.
-
Baramati Lok Sabha Election Result : सुप्रिया सुळे आघाडीवर
बारामतीमधून दुसऱ्या फेरीत सुप्रिया सुळे या आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये ही लढत सुरू आहे.
-
Lok Sabha Election Result : यामिनी जाधव आघाडीवर
यामिनी जाधव या आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. या निवडणूकीकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे बघायला मिळत आहेत.
-
Lok Sabha Election Result : राज्यात महाविकास आघाडी 26 जागांवर आघाडीवर
राज्यात महाविकास आघाडी 26 जागांवर आघाडीवर असल्याचे सध्याचे चित्र आहे. मराठवाड्यात उमेदवार आघाडीवर असल्याचे देखील बघायला मिळत आहे.
-
Yavatmal Lok Sabha Election Result : संजय देशमुख आघाडीवर
यवतमाळमधून संजय देशमुख हे आघाडीवर आहेत. यवतमाळ लोकसभा निवडणूकीची मतमोजणी ही काही वेळापूर्वीच सुरू झालीये. अटीतटीची लढत सुरू आहे.
-
Kalyan Lok Sabha Election Result : श्रीकांत शिंदे आघाडीवर
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हे आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. कल्याणच्या निवडणूकीकडे सर्वांच्या नजरा असल्याचे बघायला मिळाले होते.
-
Lok Sabha Election Result : महायुती 20 जागांवर आघाडीवर
लोकसभेच्या निवडणूकीच्या मतमोजणीला सुरूवात झालीये. आता महायुती 20 जागांवर आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. अजून आकड्यांमध्ये बदल होईल.
-
Lok Sabha Election Result : श्रीरंग बारणे आघाडीवर
मावळमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळतंय. श्रीरंग बारणे हे आता आघाडीवर आहेत. संजोग वाघेरे हे पिछाडीवर आहेत. या निवडणूकीकडे सर्वांच्या नजरा आहेत.
-
Thane Lok Sabha Election Result : ठाण्यातून नरेश म्हस्के आघाडीवर
ठाण्यातून नरेश म्हस्के आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. राजन विचारे 3418, नरेश म्हस्के 8142, नरेश म्हस्के 3824 मतांनी आघाडीवर आहेत.
-
काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे पहिल्या फेरीत आघाडीवर
रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे हे पहिल्या फेरीनंतर सुमारे 6000 मतांनी आघाडीवर आहेत.
-
Solapur Lok Sabha Election Result : प्रणिती शिंदे यांची आघाडी कायम
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. शहर उत्तर , दक्षिण सोलापूर, मंगळवेढा पंढरपूर , मोहोळ या मतदारसंघातून प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत.
-
धैर्यशील मोहिते पाटील पहिल्या फेरीत आघाडीवर
माढामधून धैर्यशील मोहिते पाटील पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. 5068 मतांनी धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत.
-
सुप्रिया सुळे पहिल्या फेरीत आघाडीवर
बारामतीमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळतंय. सुप्रिया सुळे या पहिल्या फेरीत आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे.
-
Lok Sabha Election Result : रावेरमधून रक्षा खडसे आघाडीवर
रावेरमधून भाजपाच्या रक्षा खडसे या आघाडीवर दिसत आहेत. सुरूवातीपासून रक्षा खडसे आघाडीवर आहेत.
-
पहिल्या फेरीत अखेर संजय जाधव आघाडीवर
पहिल्या फेरीत अखेर संजय जाधव आघाडीवर आहेत. संजय जाधव यांना 20,786, महादेव जानकर 17612
-
Amravati Sabha Election Result : नवनीत राणा पिछाडीवर
नवनीत राणा यांनी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवली आहे. मात्र, नवनीत राणा या पिछाडीवर दिसत आहेत. हा मोठा धक्का म्हणावा लागणार आहेत.
-
Raigad Lok Sabha Election Result : सुनील तटकरे आघाडीवर
अनंत गीते हे पिछाडीवर असून सुनील तटकरे हे आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. या निवडणूकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
-
Lok Sabha Election Result : नितीन गडकरी आघाडीवर
भाजपाचे नेते नितीन गडकरी हे नागपूरमधून आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. सहा हजार मतांनी नितीन गडकरी हे आघाडीवर आहेत.
-
Beed Lok Sabha Election Result : पंकजा मुंडे पिछाडीवर
बीडमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळतंय. आता पंकजा मुंडे या पिछाडीवर आहेत. बजरंग सोनवणे हे आता आघाडीवर आहेत.
-
Hingoli Lok Sabha Election Result : मतदान मोजणीच्या मशिनमध्ये बिघाड
हिंगोली येथील मतदान मोजणी मशिनमध्ये बिघाड झालाय. हिंगोली येथील खडकी बूथ क्रमांक 08 खोली क्रमांक 01 मधील मशीनमध्ये बिघाड झाला आहे.
-
Pune Lok Sabha Election Result : पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर
पुण्याच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा असून पुण्यातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय.
-
Lok Sabha Election Result : राहुल शेवाळे आघाडीवर
लोकसभा निवडणूकीची मतदान मोजणी सुरू झालीये. राहुल शेवाळे हे आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहेत.
-
Baramati Lok Sabha Election Result : बारामतीमध्ये ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीला सुरूवात
बारामतीमध्ये ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीला सुरूवात झालीये. सध्या सुप्रिया सुळे या आघाडीवर असल्याचे कळते आहे.
-
Jalgaon Lok Sabha Election Result : करण पवार आघाडीवर
जळगाव लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झालीये. यावेळी करण पवार हे आघाडीवर दिसत आहेत. या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
-
Amravati Lok Sabha Election Result : नवनीत राणा पिछाडीवर
पोस्टल मतमोजणी प्रक्रियेत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आघाडीवर आहेत. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा पिछाडीवर असल्याचे चित्र बघायला मिळतंय. अमरावतीत बळवंत वानखडे व नवनीत राणा यांच्यात लढत
-
Lok Sabha Election Result : अमोल कोल्हे आघाडीवर
शिरूरमधून अमोल कोल्हे हे आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. अमोल कोल्हे हे सुरूवातीपासूनच जोरदार प्रचार करताना देखील दिसले. अटीतटीची लढत बघायला मिळाली.
-
Parbhani Lok Sabha Election Result : संजय जाधव आघाडीवर
परभणी लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा असून संजय जाधव हे सध्या आघाडीवर आहेत.
-
Solapur Lok Sabha Election Result : प्रणिती शिंदे आघाडीवर
सोलापूरमधून प्रणिती शिंदे या आघाडीवर आहेत.
-
Lok Sabha Election Result : महाविकास आघाडी राज्यात 16 जागांवर आघाडीवर
महाविकास आघाडीचे उमेदवार चांगलेच आघाडीवर असल्याचे सध्या बघायला मिळतंय. 16 जागांवर महाविकास आघाडी पुढे आहे.
-
नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभेसाठी थोड्यात वेळात मतमोजणीला सुरूवात
नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभेसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अवघ्या काही क्षणामध्ये पहिला कल हाती येईल. माविआ उमेदवार निलेश लंके आणि भाजप सुजय विखे यांच्यात चुरशीची लढत.
-
Beed Lok Sabha Election Result : बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर
बीडच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर आहेत.
-
Mumbai Lok Sabha Election Result : भाजपाचे पियुष गोयल आघाडीवर
भाजपाचे उमेदवार पियुष गोयल हे आघाडीवर दिसत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळतंय.
-
नंदुरबार लोकसभेच्या टपाली मतदान मोजणीला सुरूवात
सुरुवातीला टपाली मतमोजणी होणार. 3852 मतदानापैकी 2599 टपाली मतदान झालंय. त्यानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅड मशीनची मतमोजणी सुरू होणार आहे.
-
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात
लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरूवात झालीये. हळूहळू आकडेवारी पुढे येईल. या निवडणूकीकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत.
-
Solapur Lok Sabha Election Result : सोलापूर लोकसभेच्या मतमोजणीला होणार सुरुवात
थोड्याच वेळात सोलापूर लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सोलापुरातील स्ट्रॉंग रूम उघडण्यात आले आहे.
-
Lok Sabha Election Result : चार मिनिटांमध्ये मतमोजणीला होणार सुरूवात
पुढील चार मिनिटांमध्ये मतमोजणीला सुरूवात होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या निकालाची सर्वजण आतुरतेने वाट पाहताना दिसत होते.
-
Nanded Lok Sabha Election Result : थोड्यात वेळात होणार मतमोजणीला सुरूवात
आठ वाजता पोस्टल बॅलेट मोजायला सुरवात होणार. एकूण 5239 पोस्टल मतदान. 8 वाजून 30 मिनिटाला ईव्हीएम मशिन वरील काउंटीगला सुरवात होणार. नांदेडच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत.
-
Dhule Lok Sabha Election Result : थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात
पहिल्या फेरीत पोस्ट मतदानाची मतमोजणी केली जाईल. 16 टेबलांवर होणार पोस्टल मतदानाची मतमोजणी. निकालाकडे सर्वांच्या नजरा.
-
परभणी लोकसभा निवडणुकीचे स्ट्रॉंग रूम खोलण्यात आले
पोस्टल मतदान बॅलेट पेपर मोजणीसाठी नेत आहेत. काही वेळात सुरू होणार पोस्टल बॅलेटची मत मोजणी. परभणीमध्ये संजय जाधव विरूद्ध महादेव जाणकर अशी लढत बघायला मिळणार आहे.
-
Nandurbar Lok Sabha Election : नंदुरबार लोकसभा मतदानाच्या मतमोजणीला होणार सुरूवात
नंदुरबार लोकसभा मतदानाच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात होणार आहे. सुरुवातीला टपाली मतमोजणीला सुरूवात होईल. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी २५९९ टपाली मतदान झालंय. त्यानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅड मशीनची मतमोजणी सुरू होणार.
-
छत्रपती संभाजीनगर येथे ईव्हीएम मशीन ठेवलेले स्ट्रॉंग रूम उघडायला सुरुवात
ईव्हीएम मशीन ठेवलेले स्ट्रॉंग रूम उघडायला सुरुवात करण्यात आलीये. उमेदवार आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडायला सुरुवात. छत्रपती संभाजीनगरच्या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष
-
ओमराजे निंबाळकर यांचा विजयरथ तयार
मतमोजणीपूर्वीच शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा विजयरथ तयार. ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांना विजयाचा विश्वास. ओमराजे निंबाळकर निवडून आल्यानंतर याच विजय रथातून होणार त्यांची मिरवणूक.
-
Nashik Lok Sabha Election : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ
नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ निर्माण झालाय. उमेदवारांच्या प्रतिनिधीने ईव्हीएम मशीनची माहिती आणि मतमोजणीसाठी काही कागदपत्र आत सोबत नेण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ. उमेदवाराच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
-
विशाल पाटील मतमोजणी केंद्रावर दाखल
मिरज येथील सांगली लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील दाखल झाले आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये टपाली मतपेट्या उघडायला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात टपाली मतपेट्या उघडायला सुरुवात, 8 वाजता टपाली मतदान मोजणी होणार सुरू होणार
-
Parbhani Lok Sabha Election : परभणी लोकसभा मतमोजणीला काही वेळात होणार सुरूवात
सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात येणार आहे. सातशे कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साडेआठ वाजता प्रत्यक्षात ईव्हीएमवरील मतमोजणी सुरू होणार. प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी 14 टेबल लावण्यात आलेले आहेत. एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. फायनल निकाल 5 वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे.
-
Dindori Lok Sabha Election : भास्कर भगरे यांचे मोठे विधान
मतमोजणीला सुरुवात होण्याआगोदर भास्कर भगरे यांनी घेतले आईचे व गावातील ग्रामदैवतचे दर्शन. शेतीसह अनेक प्रश्न भाजप खासदारांच्या काळात सुटले नाहीत. मला जनतेने मतदान केल्याने मी निवडून येणार असल्याचे भगरे यांनी म्हटले. –
-
Maval Lok Sabha Election : मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली आहे- संजोग वाघेरे
लोकसभेचा निकाल अगदी थोड्यात वेळात जाहीर होईल. हाविकास आघाडीकडून मावळ लोकसभा निवडणूकीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी मोठे भाष्य केले असून ते म्हणाले की, मतदारांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. मतदार राजा महाविकास आघाडीच्या बाजूने निर्णय घेतील.
-
रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटलांची लढत
श्रीराम पाटील रावेर लोकसभेचे उमेदवार असून त्यांनी हनुमंत रायाला आज साखड घातलंय. आज आहे रावेर लोकसभेच्या निकालाचा फैसला
-
बीडच्या लढतीकडे राज्याचे लक्ष
बीडमध्ये पंकजा मुंडे विरोधात बजरंग सोनवणे अशी लढत बघायला मिळाली. आता या निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
-
मुंबईच्या लोकसभा निकालाकडे सर्वांच्या नजरा
लोकसभा निवडणूकीच्या मुंबईच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
-
कोल्हापूरातील निवडणूकीकडे सर्वांच्या नजरा
कोल्हापूरमध्ये शाहू महाराज विरूद्ध संजय महाडिक असा सामना बघायला मिळतो. यापैकी कोणी बाजी मारणार हे अगदी थोड्याच वेळात समजेल.
-
Mumbai Lok Sabha Election: मुंबई मतमोजणीची तयारी पूर्ण
मुंबईतील सर्व सहा मतदार संघात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी होणार आहे.
Published On - Jun 04,2024 12:23 AM
