India vs England | कसोटी मालिकेसाठी उत्सुकता शिगेला, टीम इंडियाचे खेळाडू आणि इंग्लंड टीम चेन्नईत

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (england cricket team) यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.

1/5
india vs england 2021
इंग्लंड विरुद्धातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचे रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर मंगळवारी चेन्नईत दाखल झाले आहेत. हे तिघेही बायो बबलमध्ये राहणार आहेत. टीम इंडियाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
2/5
virat kohli
या कसोटी मालिकेतून कर्णधार विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने पुनरागमन केलं आहे.
3/5
team india quarantine
टीम इंडियाचे खेळाडू चेन्नईतील लीला पॅलेस हॉटेलमध्ये एकूण 6 दिवस क्वारंटाईन राहणार आहेत.
4/5
england team reach at chennai
इंग्लंड टीमही चेन्नईमध्ये दाखल झाली आहे. विमानतळावर उतरल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. यानंतर हे खेळाडू हॉटेलच्या दिशेने रवाना झाले. याआधी बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे चेन्नईत दाखल झाले. हे दोघेही सध्या क्वारंटाईन आहेत.
5/5
team india and england
दरम्यान टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला तर इंग्लंडने श्रीलंकेला कसोटी मालिकेत पराभूत केलं आहे. यामुळे दोन्ही संघांचा विश्वास वाढलेला आहे. यामुळे या कसोटी मालिकेत कोण वरचढ ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दोन्ही संघात एकूण 4 कसोटी सामने खेळण्यात येणार आहेत. या मालिकेची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून होणार आहे.