Maharashtra Breaking News LIVE | प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर आता अजित पवार नवाब मलिक यांच्या भेटीला

| Updated on: Aug 17, 2023 | 7:07 AM

Maharashtra Breaking News LIVE updates : राज ठाकरे यांचा रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राज्य सरकारवर निशाणा. यासह राज्य आणि देशातील विविध सामाजिक, राजकीय घडामोडी जाणून घ्या...

Maharashtra Breaking News LIVE | प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर आता अजित पवार नवाब मलिक यांच्या भेटीला

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : मागच्या आठवड्यात शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात एका व्यावसायिकाच्या घरी भेट झाली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही या बैठकीचे पडसाद उमटत आहेत. शरद पवार यांच्या या भेटीमुळे काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या बद्दल चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर आज चांद्रयान 3 वर चंद्राच्या कक्षेत एक महत्त्वाचा मॅन्यूव्हर होणार आहे. चांद्रयान 3 ला चंद्रापासून 100 किलोमीटरच्या कक्षेत आणून ठेवलं जाईल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Aug 2023 09:56 PM (IST)

    Kalyan News : कल्याण पूर्वेत धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलीवर प्राणघात हल्ला

    कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर प्राणघात हल्ला करण्यात आल्याची घडना घडलीये. चाकूने सात ते आठ वार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दुर्गा दर्शन सोसायटीत राहणाऱ्या आई आपल्या मुलीला घरी घेऊन जात असताना सोसायटीच्या आवारातच घडला प्रकार घडला आहे. नागरिकांनी हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात देखील दिले आहे. या मुलीवर आता खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 16 Aug 2023 09:48 PM (IST)

    Mumbai News : अंधेरीमध्ये गोदामाला आग लागल्याची घटना

    अंधेरी पश्चिम वीरा देसाई रोड अंधेरी चित्रकूट मैदानावर एका गोदामाला आग लागली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, आग आटोक्यात असून या आगीमध्ये कोणतीही जखमी झाले नाहीये.  अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून  हीआग विझवण्याचे काम सध्या सुरू आहे.

  • 16 Aug 2023 09:33 PM (IST)

    Latur News : अहमदपूर जवळच्या सुनेगाव-सांगवी येथे एसटी बस आणि ट्रकची धडक

    अहमदपूर जवळच्या सुनेगाव-सांगवी जवळ एसटी बस आणि ट्रकची समोरा समोर धडक झाल्याची घटना घडली आहे. पाच प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रवाशांना उपचारासाठी लातुरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. बसमध्ये 29 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदपूर इथे उपचार सुरू आहेत.

  • 16 Aug 2023 09:23 PM (IST)

    राज्यातील आमदार मध्यप्रदेशला ट्रेनिंगसाठी जाणार

    19 ऑगस्टला राज्यातील आमदार मध्यप्रदेशला जाणार आहेत. भाजप आमदार भोपाळला जाणार आहेत. 4 राज्यातील 350 आमदारांच ट्रेनिंग भोपाळमध्ये होणार आहे. 18 तारखेला आमदार भोपाळमध्ये पोचनार असल्याची माहिती आहे. निवडणूक पूर्व सर्व्हे करण्यासाठी आमदारांना ट्रेनिंग दिल जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

  • 16 Aug 2023 09:09 PM (IST)

    राहुल गांधी दोन दिवस लेह-लडाखच्या दौऱ्यावर जाणार

    नवी दिल्ली : 

    काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवस लेह-लडाखच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 17 आणि 18 ऑगस्ट असे दोन दिवस राहुल गांधी जम्मू काश्मीर आणि श्रीनगर दौरा करणार आहेत. या दरम्यान ते काश्मीरमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

  • 16 Aug 2023 07:37 PM (IST)

    Ajit Pawar Meets Nawab Malik | उपमुख्यमंत्री अजित पवार नवाब मलिक यांच्या भेटीला

    मुंबई | उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे भेटीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या घरी पोहचले आहेत. नवाब मलिक यांना मनी लॉड्रिंग प्रकरणात आरोग्याच्या कारणामुळे 2 महिन्यांचा जामीन देण्यात आला आहे. तेव्हापासून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी नवाब मलिक यांची घरी जाऊन भेट घेतली आहे.

  • 16 Aug 2023 04:41 PM (IST)

    Sharad Pawar News : अजूनही माझ्या राजकीय निवृत्तीची वेळ जवळ आलेली नाही

    अजूनही माझ्या राजकीय निवृत्तीची वेळ जवळ आलेली नाही, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी विरोधकांना दिले. औरंगाबादमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्ही सर्वांनी मिळून इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. आम्हाला बदल हवा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला 2024 मधील स्थिती अनुकूल नसल्याचा दावा त्यांनी केला.

  • 16 Aug 2023 04:00 PM (IST)

    Sharad Pawar News : भाजप आणि मोदीविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न

    भाजपची भूमिका समाजविरोधी आणि फुट पाडणारी असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते. ते देशपातळीवर दोन सभा घेणार आहेत. 1 सप्टेंबर रोजीच्या सभेत पुढील रणनीती सांगण्यात येईल.  बिहार आणि कर्नाटकात या सभा घेण्यात येतील. भाजप आणि मोदीविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 16 Aug 2023 03:57 PM (IST)

    Sharad Pawar News : अनेक दिवसांपासून राज्याचा दौरा- शरद पवार

    अनेक दिवसांपासून राज्याचा दौरा सुरु आहे. राज्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. उद्या ते बीडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. ते कवी ना. धो. महानोर यांच्या गावी गेले. तिथे त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले.

  • 16 Aug 2023 02:55 PM (IST)

    पुणे : प्रसिद्ध हॉटेल वैशालीचा वाद समोर, हॉटेलच्या मालक निकिता शेट्टींचा पतीवर गंभीर आरोप

    बंदुकीच्या धाकावर हॉटेलची पॉवर ऑफ ॲटर्नी लिहून घेतली, असा गंभीर आरोप वैशाली हॉटेलच्या मालक निकिता शेट्टी यांनी त्यांच्या पतीवर लावला आहे.

    आपल्या ४ वर्षांच्या मुलाला घेऊन पती फरार झाला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दाखल करूनही ते कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे, असा आरोपही त्यांनी लावला आहे.

  • 16 Aug 2023 02:41 PM (IST)

    नूह हिंसाचार : बिट्टू बजरंगी याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

    बिट्टू बजरंगीला हरियाणाच्या नूह जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. नूह पोलिसांनी काल बिट्टू बजरंगीला अटक केली होती.

  • 16 Aug 2023 02:21 PM (IST)

    भाजपाने लव्ह जिहादसारखे मुद्दे ठेचून काढावेत - संघाची भूमिका, सूत्रांची माहिती

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. सरकारमध्ये गृहखातं हे भारतीय जनता पक्षाकडेच आहे, त्यामुळे लव्ह जिहादसारखे मुद्दे वेळीच ठेचून काढले पाहिजेत, अशी भूमिका संघाने या बैठकीत मांडल्याची माहिती समोर येत आहे.

  • 16 Aug 2023 02:14 PM (IST)

    दिल्ली : नीतीश कुमार यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली

    बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.

  • 16 Aug 2023 02:07 PM (IST)

    सोबत येत नसाल तर निवृत्ती घेऊन तटस्थ रहा

    शरद पवार सोबत येत नसतील तर निवृत्ती घेऊन तटस्थ रहावं, असा पर्याय अजित पवार गटाने शरद पवार यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याचे समजते.

    राष्ट्रवादीची शिवसेनेसारखी स्थिती होऊ नये, पक्षाचे २ गट पडल्यास निवडणुकीत फटका बसेल त्यामुळे पक्ष एकसंघ ठेवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

  • 16 Aug 2023 01:40 PM (IST)

    Eknath Khadse | हे सरकार नुसतं घोषणाबाजी करणारं सरकार- एकनाथ खडसे

    एकनाथ  खडसेंची सरकारवरच टीका. हे सरकार नुसतं घोषणाबाजी करणारं सरकार आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा सर्वसामान्यांचा नुकसान मोठ्या प्रमाणात झालेल होतं. किमान नुकसानग्रस्तांना 10 हजार मदत देऊ असे मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी घोषणा केली होती मात्र अद्यापही पंचनामे ही झाले नाहीत आणि मदतही मिळालेली नाही.

  • 16 Aug 2023 01:26 PM (IST)

    Raj Thackeray | निर्धार मेळावा! राज ठाकरे यांची खड्ड्यांवर टिपण्णी

    राज ठाकरे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांवर टिपण्णी केली. चांद्रयान चंद्रावर पाठवण्यापेक्षा महाराष्ट्रात पाठवायला पाहिजे होतं, खर्च वाचला असता. पनवेल शहरात वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात निर्धार मेळावा. गेले 17 वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग आणि राज्यातील रस्त्यांची अवस्था या विषयांवर राज ठाकरेंचं भाष्य.

  • 16 Aug 2023 01:17 PM (IST)

    Raj Thackeray | 70 हजार कोटींच्या आरोपानंतर टुणकन इकडे आले

    अजित पवारांवर राज ठाकरे यांची नक्कल करत टीका. 70 हजार कोटींच्या आरोपानंतर टुणकन इकडे आले. खोके... खोके ओरडणाऱ्यांकडे कंटेनर.

  • 16 Aug 2023 01:12 PM (IST)

    Raj thackeray | भाजपने इतरांचे पक्ष न फोडता स्वतःचा पक्ष उभारावा

    पुण्यात मराठी माणसांची कोंडी. एकाच पुण्यात 5 शहरं झाली आहेत. भाजपने इतरांचे पक्ष न फोडता स्वतःचा पक्ष उभारावा. दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा स्वतःचा पक्ष उभारायला भाजपनं शिकावं.

  • 16 Aug 2023 12:58 PM (IST)

    रविकांत तुपकर यांनी 'स्वाभिमानी' शिस्तपालन समितीकडे आपलं मत मांडलं

    रविकांत तुपकर यांनी दर्शवलेल्या नाराजीनंतर त्यांना देण्यात आलेला अल्टिमेटम संपला

    तुपकर  यांनीसमिती समोर न जात पत्राद्वारे त्यांचं म्हणणं मांडलं

  • 16 Aug 2023 12:51 PM (IST)

    Raj thackeray : राज ठाकरे यांचा सरकारवर निशाणा

    चांद्रयान चंद्रावर पाठवण्यापेक्षा महाराष्ट्रात पाठवायला पाहिजे होतं, खर्च वाचला असता

    राज ठाकरे यांचा रस्त्यातील खड्ड्यांवरून सरकारवर निशाणा

  • 16 Aug 2023 12:46 PM (IST)

    Raj Thackeray in Panvel : जमलेल्या माझ्या मराठी बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो...; राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात

    पनवेलमध्ये मनसेचा निर्धार मेळावा

    राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना संबोधन

  • 16 Aug 2023 12:30 PM (IST)

    धाराशिवच्या आंबेडकर विद्यापीठत गोंधळ

    धाराशिवच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्रात19 वा वर्धापन दिन कार्यक्रमात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

    विद्यापीठ उपकेंद्र कार्यक्रमात जोरदार घोषणाबाजी

    स्वतंत्र विद्यापीठ करण्याची मागणी तसंच उपकेंद्र परिसरात विकास कामं करण्याची मागणी यावेळी करण्यात आली

  • 16 Aug 2023 12:18 PM (IST)

    पुण्यात राष्ट्रवादीचा मेळावा

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वात रविवारी 20 ऑगस्टला पुण्यात कार्यकर्ता मेळावा

    मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार उपस्थित राहणार

  • 16 Aug 2023 12:05 PM (IST)

    Supriya sule : आम्ही आमच्यासाठी निकष काढला - सुप्रिया सुळे

    आम्ही आमच्यासाठी निकष काढला आहे, त्यामुळं प्रत्येक पक्षाला त्यांचा निकष काढण्याचा अधिकार आहे. आमचं कुटूंब एकत्र आहे, मात्र राजकीय भूमिका वेगवेगळ्या आहेत. महाविकास आघाडीत संभ्रम असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.

  • 16 Aug 2023 11:37 AM (IST)

    Nawab Malik : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिक यांना फोन केला

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिक यांना फोन केला असल्याची माहिती मिळाली आहे.

  • 16 Aug 2023 11:35 AM (IST)

    SHARAD PAWAR : शरद पवारांनी आमच्यासोबत यावे असं मंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन

    शरद पवारांनी आमच्यासोबत यावे असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी आवाहन केलं आहे. आम्ही शरद पवार साहेबांना साकडं घातलं आहे. राष्ट्रवादी परिवार हा एक आहे. ईडीची चौकशी संपली का ? असं विचारताचं मुश्नीफ म्हणाले मला न्यायालयातून दिलासा मिळाला आहे.

  • 16 Aug 2023 11:19 AM (IST)

    Nagpur news : ५४ बुलेट नागपूर पोलीसांकडून जप्त

    स्वातंत्र्यदिनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. नागपूर शहरात तीन हजारपेक्षा जास्त जणांवर वाहतूक पोलीसांनी कारवाई केली आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी नागपूरात ५४ बुलेट नागपूर पोलीसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

  • 16 Aug 2023 11:12 AM (IST)

    Ashok chavan : काँग्रेस कोअर कमिटीची आज बैठक

    काँग्रेस कोअर कमिटीची आज बैठक होणार आहे. राजकीय संभ्रम झाला आहे, पण महाविकास आघाडी एकत्र येणार आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठकीमुळं मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षानं आपला संभ्रम दूर करावा असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

  • 16 Aug 2023 11:01 AM (IST)

    SHARAD PAWAR : आम्ही शरदमित्र नावाने नोंदणी

    पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नवीन अभियानाला सुरुवात, आम्ही शरदमित्र नावाने नोंदणी करण्यात येणार आहे. पुण्यातील कोथरूड भागातून सदस्य नोंदणीचा शुभारंभ झाला आहे. खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं अभियान होणार झालं आहे.

  • 16 Aug 2023 10:56 AM (IST)

    Ajit Pawar : अजित पवारांच्या बंगल्यात बैठक सत्र सुरु

    अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यात मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक सुरू, जिल्हाध्यक्ष निवड, तालुकाध्यक्ष निवड यावर आज चर्चा होणार , लवकरच नियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. अजित दादा समर्थकांच्या नियुक्त्या सर्वत्र होणार आहेत. त्यासोबतच मुख्यमंत्री पदावरूनही अजित पवार यांची आमदार आणि उपस्थित मंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे.

  • 16 Aug 2023 09:46 AM (IST)

    Live Update | 'चांद्रयान - ३'चं शेवटच्या ऑर्बिटमध्ये प्रवेश, इस्त्रोची माहिती

    'चांद्रयान - ३'चं शेवटच्या ऑर्बिटमध्ये प्रवेश झाला असल्याची माहिती इस्त्रोने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 'चांद्रयान - ३' साठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. 'चांद्रयान - ३' चंद्रापासून फक्त १०० किमी अंतरावर असल्याची माहिती देखील मिळत आहे. 'चांद्रयान - ३' मोहीम अखेरच्या टप्प्यात असल्याची माहिती देखील इस्त्रोने दिली आहे.

  • 16 Aug 2023 09:36 AM (IST)

    Live Update | शरद पवार सोबत आल्यास अजितदादांना मुख्यमंत्रीपद, मोदींची अट - विजय वडेट्टीवार

    शरद पवार सोबत आल्यास अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळू शकेल, अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे.. असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. पवार - दादांच्या भेटी आमच्यासाठी चिंताजनक आहे. पवार सोबत नसल्यास काँग्रेसचा प्लॅन ए, प्लॅन बी आणि प्लॅन सी देखील तयार आहे... असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत...

  • 16 Aug 2023 09:24 AM (IST)

    Live Update | सातारा येथे लाईटचा लोखंडी रॉड चार चाकी वाहनावर कोसळला

    खंबाटकी बोगद्यामध्ये असणारा लाईटचा लोखंडी रॉड चार चाकी वाहनावर कोसळला आहे. सुदैवाने कोणतीही या अपघातात जीवित हानी झालेली नाही. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहेत. ज्यामुळे साताराहून पुण्याकडे जाणाऱ्या खंबाटकी बोगद्यामध्ये काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. ज्यामुळे खंडाळा घाटातून वाहतूक पुण्याच्या दिशेने वळवली

  • 16 Aug 2023 09:10 AM (IST)

    Live Update | ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक ना.धो. महानोर यांचे निधन

    ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक ना.धो. महानोर यांचे निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे त्यांच्या कुटुंबीयांची पळसखेडे या गावी जाऊन भेट घेणार आहेत. सध्या शरद पवार यांचा गाड्यांचा ताफा पळसखेड या गावाच्या दिशेने रवाना झाला आहे.

  • 16 Aug 2023 09:05 AM (IST)

    Raj Thackeray | राज ठाकरे आज काय निर्धार करणार?

    पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात आज मनसेचा निर्धार मेळावा होणार आहे. त्यात मनसे अध्यक्ष काय भूमिका घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. वाचा सविस्तर....

  • 16 Aug 2023 08:51 AM (IST)

    Earthquake | पश्चिम महाराष्ट्रात कुठे जाणवले भूकंपाचे धक्के

    पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. कोल्हापूर जिल्ह्यात चांदोली अभयारण्य परिसरात 3.4 रिश्टर स्केलचा धक्का जाणवला. कोल्हापूर शहरापासून 76 किमी अंतरावर जाणवला भूकंपाचा धक्का. आज पहाटे 6 वाजून 45 मिनिटांनी जाणवले भूकंपाचे धक्के.

  • 16 Aug 2023 08:24 AM (IST)

    ST Bus Accident | एसटी बसचा अपघात

    सवणा ते चिखली एस टी बसचां अपघात झालाय. स्टिअरिंग लॉक झाल्याने गाडी पलटी झाली. दहा ते पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. चालक सुद्धा जखमी झाला आहे. बस सवणावरून चिखलीकडे जात होती. बसमध्ये साधारण विद्यार्थ्यांसह 25 प्रवाशी प्रवास करत होते. सकाळी सातच्या सुमारास घडली घटना.

  • 16 Aug 2023 08:11 AM (IST)

    Sharad Pawar | शरद पवार गटाकडून आजपासून नवीन अभियान

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाकडून आता नवीन अभियान राबवलं जाणार आहे. आम्ही शरदमित्र नावाने केली जाणार सदस्य नोंदणी. पुण्यात आज कोथरुड भागात सदस्य नोंदणीचा शुभारंभ होणार. खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्घाटन. जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं अभियान होणार सुरू.

Published On - Aug 16,2023 8:10 AM

Follow us
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.