Maharashtra Election News LIVE : लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील- रवींद्र चव्हाण
Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय हलचालींना वेग आला आहे. यावेळेस वेगवेगल्या पक्षातून तब्बल साडेतीनशे महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना शनिवारी चिन्ह वाटप करण्यात आले. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या.

महापालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या तब्बल साडेतीनशे महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांमुळे यापैकी किती महिलांचा विजय होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. उल्हासनगरात अपक्ष उमेदवार भाजपच्या अधिकृत उमेदवार झाल्या आहेत. एकाच प्रभाग दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीत हा प्रकार घडला आहे. अशात तांत्रिक चूक झाल्याची भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी माहिती दिली आहे. तर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना शनिवारी चिन्ह वाटप करण्यात आले यात मोबाईल, छत्री, मेणबत्ती, कप, बशी, कपाट, आधी चिन्हांचा समावेश आहे यंदा 277 पक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा आज ठाण्यात रोड शो
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा आज ठाण्यात रोड शो
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा रोड शो
एकनाथ शिंदे यांच्या रोड शो ला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर राहणार
महापालिका निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात
-
धुळ्यात इम्तियाज जलील यांचा रोड शो
धुळे महानगरपालिकेच्या एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांचा रोड शो
शहरातील युनिटी सर्कलपासून शंभर फुटी रोडवर इम्तियाज जलील यांचा रोड शो
रोड शो मध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी
रोड शोला एमआयएमच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
-
-
नांदुरा – बुऱ्हाणपूर मार्गावर कालिपीली टॅक्सीचा भीषण अपघात
नांदुरा – बुऱ्हाणपूर मार्गावर कालिपीली टॅक्सीचा भीषण अपघात.
भरधाव टॅक्सी मार्गालगत खड्ड्यात पलटी झाल्याने टॅक्सीतील दहा जण गंभीर जखमी
सर्व गंभीर जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
अपघातानंतर नांदुरा बुऱ्हानपूर मार्गावरील वाहतूक ठप्प, पोलीस घटनास्थळी पोहोचले
-
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील साई किनारा हॉटेल वर टोळक्याचा हल्ला
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील साई किनारा हॉटेल वर टोळक्याचा हल्ला 10 ते 15 जणांच्या मद्यधुंद टोळक्याने लोखंडी रॉड आणि दांडक्याने केला हल्ला हल्ल्यात हॉटेल मधील मॅनेजर गंभीर जखमी तर हॉटेलचीही तोडफोड जखमी मॅनेजरवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर
हल्ल्याची घटना हॉटेलच्या CCTV कॅमेऱ्यात कैद
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
खंडणीसाठी हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज
-
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांच्या ओहायो येथील घरावर हल्ला झाला. या हल्ल्यात खिडकीची काच फुटली. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
-
-
छत्रपती संभाजी नगर महामार्गावर धाड गावाजवळ अपघात, तीन युवकांचा मृत्यू
बुलढाणा ते छत्रपती संभाजी नगर महामार्गावर धाड गावाजवळ एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. भीषण अपघातात दुचाकी वरील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव दुचाकी छत्रपती संभाजी नगरहून बुलढाणा कडे जाणाऱ्या शिवशाही बसला धडकून अपघात झाला. बुलढाणा तालुक्यातील ढाल सावंगी गावातील कैलास दांडगे, रवी चंदनशिव व अंकुश पाडळे असं विसीतील ठार झालेल्या तिन्ही युवकांचं नावं आहेत.
-
16 जानेवारीला नांदेडमध्ये भाजपाचा महापौर बसणार- मुख्यमंत्री फडणवीस
शहरांचा विस्तार झाला पण नियोजन नव्हतं. लोकसंख्या वाढली आणि विविध समस्या वाढल्या, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये केलं. मोदींमुळे शहरांना विकास निधी मिळू लागला, असंही फडणवीस यांनी सांगितलं. आता 16 तारखेला महापौर भाजपाचा बसणार आहे. लाडक्या बहिणी ज्यांच्या पाठीशी तो पुढे जाणार, असंही त्यांनी सांगितलं.
-
लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील- रवींद्र चव्हाण
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण आता अधिकच तापू लागला आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे. या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि भाजपमधील संघर्ष आता टोकाला जाण्याची शक्यता आहे.
-
स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा डागडूजीनिमित्त झाकल्याने राजकारण तापण्याची शक्यता
ऐन मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा डागडूजीनिमित्त झाकल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे. पुतळ्या पाठोपाठ मुंबईत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाही झाकण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात ही संकल्पना त्यांनी अंमलात आणली होती. गोरगरिबांना याचा लाभ व्हावा म्हणून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला होता. पण निवडणुकीत आता बाळासाहेबांच्या नावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आहे.
-
तुम्ही देवालाही सोडले नाही! शबरीमला मंदिरातील चोरीवर सर्वोच्च न्यायालयाची टीपणी
केरळमधील सबरीमाला मंदिरातील सोने चोरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने माजी टीडीबी सदस्य केपी शंकरदास यांना फटकारले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, “तुम्ही देवालाही सोडले नाही.” केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयातील परिच्छेद आणि टिप्पण्या वगळण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
-
नारायण राणेंना भेटून निवृत्तीच्या निर्णयाबाबत विचारणार – अजित पवार
नारायण राणेंनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, नारायणराव राणे यांनी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष काम केलेले आहे. अनेक मंत्रीपदं भूषवलेली आहेत. माझी भेट झाल्यावर विचारेन की का आपण असा निर्णय घेतला. तब्येतीचं कारण आहे की आणखीन काय कारण आहे? हे मी त्यांना विचारेन.
-
चिपळूण : नारायण राणेंच्या प्रकृतीत सुधारणा
वाशिष्टी कृषी मेळाव्यात नारायण राणे यांना आज भोवळ आली होती, मात्र सध्या आपली प्रकृती चांगली असल्याची माहिती राणे यांनी दिली आहे. ब्लडप्रेशरचा तास आणि डायबिटीस यामुळे तब्येत खालवली होती. मात्र सध्या माझी तब्येत बरी आहे. आता पुढच्या कार्यक्रमाला मी चाललो आहे असं राणे यांनी म्हटले आहे.
-
नागपूर : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नाका बंदी
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नागपूरच्या महत्वाच्या ठिकाणी नाका बंदी करण्यात आली आहे. निवडणूक आयोग, पोलीस आणि महापालिकेच्या ज्वाइंट पथक मार्फत नाकाबंदी केली जात आहे. बाहेरून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. निवडणुकीसाठी बाहेरून पैसे किंवा इतर साहित्य शहरात येऊ नये या साठी मुख्य पॉईंट वर नाकाबंदी केली जात आहे.
-
ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मनसैनिक शिवसैनिक एकदिलाने काम करत आहेत – पेडणेकर
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, राज ठाकरे आणि ऊद्धव ठाकरे एकत्र आल्याने मनसैनिक शिवसैनिक एकदिलाने काम करत आहेत. माझ्या वॉर्डात शाखा अध्यक्षाचा ऊद्रेक झाला होता पण आत्ता तोच माझ्यासोबत एक दिलाने काम करतोय. कार्यकर्त्यांमध्ये चांगली भावना आहेत, मनसैनिक शिवसैनिक निवडून येणार आहेत.
-
आमदार तानाजी सावंतांची आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर टीका
तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यावरून आमदार तानाजी सावंत यांची भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुळजाभवानी देवीचा गाभारा एक शक्तीपीठ आहे. “झक मारायची” तर बाहेर हात लावायचा गाभाऱ्याचं पावित्र्य कशाला भंग करतो. असं म्हणत तानाजी सावंत यांनी राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर सडकून टीका केली .
-
जळगावच्या सराफ बाजारात सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ
जळगावच्या सराफ बाजारात सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 1600 रुपयांची तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 39 हजार 668 इतके आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 47 हजार 200 रुपयांवर पोहचले आहे.
-
जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपकडून 32 नवीन उमेदवारांना संधी
भाजपकडून जळगाव महापालिका निवडणुकीत 32 नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. भाजपच्या 44 उमेदवारांमध्ये 17 माजी नगरसेवक असून त्यांना पुन्हा या निवडणुकीत संधी मिळाली आहे. शिवसेना शिंदे गटाने एकूण 23 उमेदवारांमध्ये 12 जुने तर 11 नवीन चेहरे दिले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 36 उमेदवारात 31 नवीन चेहरे आहेत. तर 6 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 6 उमेदवारामध्ये 2 माजी नगरसेवक आहेत.
-
नारायण राणे यांची तब्येत अतिशय उत्तम, भाजप नेते प्रशांत यादव यांची माहिती
नारायण राणे यांची तब्येत अतिशय उत्तम असल्याची माहिती भाजप नेते प्रशांत यादव यांनी दिली आहे. नारायण राणे यांना चिपळूणमध्ये वाशिष्टी उद्योगसमूहाच्या कृषी मेळाव्यात भाषण केल्यानंतर भोवळ आली होती. मात्र त्यानंतर आता राणे यांची प्रकृती स्थिर आहे. थोडीशी उन्हामुळे चक्कर आली होती, अशी माहिती प्रशांत यादव यांनी दिली.
-
प्रचारादरम्यान कपिलपाटील यांचा मनसे आणि ठाकरे गटावर जोरदार हल्ला
कल्याणमध्ये उमेदवाराच्या प्रचारादरम्यान केंद्रीय माजी मंत्री कपिलपाटील यांचा मनसे आणि ठाकरे गटावर जोरदार हल्ला. पोलिसांनी नेलं, दबाव टाकला हे आरोप दिशाभूल करणारे आहेत. जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून मतं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
-
शहरं विकसित झाली पाहिजेत म्हणून मोदींनी योजना सुरु केल्या- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शहरं विकसित झाली पाहिजेत म्हणून मोदींनी योजना सुरु केल्या. मोदी सत्तेत आल्यानंतर शहरांचा विकास झाला. 2014 नंतर शहर विकास निधी मिळू लागला असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,.
-
मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी
मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात सोमवारी एकच खळबळ उडाली. कारण रुग्णालयाला एक ईमेल आला होता. या ई-मेलमध्ये रुग्णालयाच्या परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने मुंबई पोलिसांना याची सूचना दिली.
-
भर कार्यक्रमात नारायण राणे यांना आली भोवळ
चिपळूण मधील कृषी महोत्सवाच्या कार्यकवेळी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांना आली भोवळ. भाषणादरम्यान अखेरच्या टप्प्यात आवाजही बसल्याने राणे यांनी भाषण आटोपले. चक्कर आल्यासारखे वाटत असल्याने माध्यमांशी बोलण्यास राणेंचा नकार.
-
परळच्या टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलला धमकीला मेल
टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलला धमकीला मेल मिळाल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालय परिसर रिकामा करण्यात आला आहे. तसंच धमकीचा मेल पाठवणाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. बॉम्ब शोधक पथकासह पोलीस रुग्णालय परिसरात दाखल झाले आहेत.
-
ठाण्यात नगरसेवक बिनविरोध आल्यावरून पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया
आरोप जरी झाले तरी ते बिनविरोध निवडून आले आहेत, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. ठाण्यात नगरसेवक बिनविरोध आल्यावरून पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
शिल्पा केळुस्करांविरोधातली सुनावणी ऐकण्यास हायकोर्टाचा नकार
शिल्पा केळुस्करांविरोधातली सुनावणी ऐकण्यास उच्च न्यायालयाने थेट नकार दिला आहे. आम्ही तुमची काहीही मदत करू शकत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. निवडणुकीसंदर्भातील याचिका ऐकण्यास कोर्टाने नकार दिला आहे. निवडणुकीसंदर्भातल्या जवळपास 10 याचिका ऐकण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.
-
जनसंख्या नियंत्रण विधेयकाला ओवैसी पाठिंबा देणार का? – नवनीत राणा
संविधानाला मानत नाही, असं ओवैसी म्हणतात. जनसंख्या नियंत्रण विधेयकाला ओवैसी पाठिंबा देणार का, असा सवाल करत नवनीत राणा यांनी असदुद्दीन ओवैसींवर पलटवार केला आहे.
-
जर मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत तर लाडकी बहीण योजना बंद होऊ शकत नाही- पंकजा मुंडे
“लाडक्या बहिणीला शक्ती दिली पाहिजे हे कोणाच्या डोक्यात एवढे दिवस आलं नाही. भाजपाला जर मतदान केलं तर लाडकी बहीण बंद होईल असा अपप्रचार केला. राज्यात महायुतीचं सरकार आहे मात्र मुख्यमंत्री फडणवीस आहेत. जर मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत तर ही योजना बंद होऊ शकत नाही,” असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय.
-
माझा भाऊ काय साधासुधा नाही मुख्यमंत्री आहे, असं प्रत्येक लाडकी बहीण सांगू शकते- पंकजा मुंडे
“भारत मातेवर प्रेम करणं हे भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीचा पहिला नियम आहे. देशाच्या पुढे कोणी नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक योजना देशासाठी केल्या आहेत. अशोकराव चव्हाण आमच्यासोबत आल्याने आमची फार मोठी ताकद वाढली आहे. हा मंगलमय संगम आहे. आज लाडक्या बहिणी इथे उपस्थित आहेत, आज माझा भाऊ काय साधासुधा नाही मुख्यमंत्री आहे असं बहीण सांगू शकते. माझ्या मुस्लिम बहिणीसुद्धा जाऊन सांगू शकतात मी देवेंद्र फडणवीस यांची लाडकी बहीण आहे,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
-
परळच्या टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलला धमकी
परळच्या टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलला धमकी. सुरक्षेच्या कारणास्तव परिसर केला रिकामी. धमकीचा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु.
-
बिनविरोध निवडून आले चांगलं आहे – चंद्रशेखर बावनकुळे
“ज्यांना जिथे जायचे तिथे जाण्याचा अधिकार आहे. अस कुठे लिहिले की बिनविरोध होऊ नये, चांगला पायंडा आहे. लोकशाहीत पायंडा आहे, बिनविरोध निवडून आले चांगलं आहे. शेवटी विकासाचा विचार आहे, त्या भागातील विकासासाठी काम करायचे आहे. आम्ही कुठेही विरोध केला नाही. अनेक सरपंच बिनविरोध झाले, ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध झाले ते काही नियमाच्या बाहेर आहे का?” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
-
मुंडे साहेब गेले तेव्हा लोक जीव देण्याचा प्रयत्न करत होते – पंकजा मुंडे
“नांदेडच्या विकासाची जबाबदारी आमच्या खांद्यावर द्या. फेकाफेकी करते असं वाटतं का तुम्हाला? ही गोपीनाथ मुंडेची लेक आहे. शब्द पूर्ण करणार. मला अभिमान वाटतो या ठिकाणी छोटासा चौक माझ्या बाबांचा आहे. बारा वर्षे झाले तरी प्रत्येकाला वाटत मुंडे साहेब चांगला माणूस आहे. मुंडे साहेब गेले तेव्हा लोक जीव देण्याचा प्रयत्न करत होते. नदीत उडी मारत होते. मी थकले होते. इथे आले डोळ्यांमध्ये फटाका गेला हे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
-
त्यांनी दबाव आणला – हरिभाऊ राठोड
“हा रडीचा डाव आहे. मी चुकलो ठीक आहे पण ते कशाला आले होते?. मी माझ्या मुलांचा फॉर्म भरण्यासाठी आलो होतो. ते नातेवाईक म्हणत नाहीत, तर म्हणतात कार्यकर्त्यांचा फॉर्म भरण्यासाठी आलो. हा रडीचा डाव आहे. ते पूर्णपणे दोषी आहेत. त्यांनी दबाव आणला” असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला.
-
देवेंद्र फडणवीसांसोबत सुधीर मुनगंटीवार रोड शो मध्ये
चंद्रपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य रोड शो ला सुरुवात. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस मैदानात. सुधीर मुनगंटीवारासह भाजप नेते रोड शो मध्ये सहभागी.
-
निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर आंदोलन
शिवसेना पक्षाच्या उमेदवाराकडून निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर आंदोलन. नाव व्यवस्थित न आल्याने उमेदवाराकडून आंदोलन सुरू. पुण्यातील सनस मैदान क्षत्रिय कार्यालयाबाहेर बसून आंदोलन.
-
अमरावती मध्ये भाजपाच्या विजयाचा विश्वास – नवनीत राणा
अमरावती मध्ये भाजपाच्या विजयाचा विश्वास वाटतो असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. युवा स्वाभिमानाने भाजप आमने-सामने निवडणूक जरी लढत असली तरी परिवार आहे परिवार म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत. भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ता म्हणून मी पक्षाला डेडिकेटेड आहे. रवी राणा हे नेहमी भाजप सोबतच आहेत. महापौर भाजपचा होईल असंही त्या म्हणाल्या.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार, प्रचार रॅलीत झाली नोटांची उधळण
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे, तिथे प्रचार रॅलीत नोटांची उधळण करण्यात आली. एमआयएम पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या रॅलीत एमआयएम समर्थकांकडून नोटांची उधळण करण्यात आली. निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
-
देवेंद्र फडणवीसांनी अमरावतीकरांचा अपेक्षाभंग केला – यशोमती ठाकूर
फडणवीसांनी अमरावतीकरांचा अपेक्षाभंग केला आहे असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. फडणवीसांचे कार्यकर्ते हे दादागिरी करतात, फडणवीसांनी विकास कुठे आणला ? असा सवालही यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे.
-
उध्दव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 जानेवारी रोजी सभा, टीझर जारी
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना 97 जागेवर लढत आहे. या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे हे 10 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये सभा घेणार आहेत. मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार असूनआहे. या सभेचा टीझर उबाठा कडून जारी करण्यात आले आहे.
-
उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण अहिल्यानगरमध्ये दाखल
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण अहिल्यानगरमध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराला अहिल्यानगरमध्ये सुरूवात होणार आहे.
-
नागपुरात लाडकी बहीण कोणाची, महापालिकेत श्रेयवादाचा नवा अंक
नागपूर महानगरपालिका निवडणुकीत आता लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या प्रभागात दादा गटाच्या नेत्या आभा पांडे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. अजित दादा निधी देतात, म्हणूनच लाडक्या बहिणी आमच्याच सोबत आहेत, असा दावा त्यांनी प्रभाग २१ मध्ये केला आहे. नागपुरात दादा गटाने तब्बल ९४ जागांवर उमेदवार उभे केल्याने भाजप आणि काँग्रेसच्या थेट लढतीत हा गट कोणाचे गणित बिघडवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या या लोकप्रिय योजनेचा फायदा नेमका कोणाला मिळणार आणि नागपूरच्या लाडक्या बहिणी कोणाच्या पारड्यात मत टाकणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल
-
नागपुरात बंडखोरांचे बंड जोरात, भाजप-काँग्रेसला अपक्षांच्या पॅनलचे तगडे आव्हान
नागपूर महानगरपालिका निवडणुकीत तिकीट वाटपावरून झालेला असंतोष आता थेट मैदानात उतरला आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारी नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या बंडखोरांनी प्रभाग ३१ मधून स्वतःचे स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मानमोडे यांची मुलगी पूजा मानमोडे यांनी काँग्रेसने शब्द देऊनही उमेदवारी नाकारल्याने चार उमेदवारांसह अपक्ष शड्डू ठोकला आहे. दुसरीकडे, भाजपच्या कार्यकर्त्या सोनाली घोडमारे, चार वेळचे माजी नगरसेवक विजय बाभरे आणि सचिन कांबळे यांनीही एकत्र येत आपले स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरवले आहे. पक्षाशी निष्ठा राखूनही डावलले गेल्याची भावना असलेल्या या बंडखोरांच्या पॅनलमुळे नागपुरात प्रस्थापित पक्षांची मोठी डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.
-
नाशिकमध्ये प्रचारासाठी नवीन क्लृप्ती, घरोघरी जाऊन वासुदेव मागतोय मतं
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी उमेदवारांकडून नवनवीन क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. नाशिकमध्ये सध्या डिजिटल मीडियाचा बोलबाला असला तरी, शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांनी मात्र लोकसंस्कृतीचा आधार घेत ‘वासुदेव’ स्टाईलने प्रचाराचा धडाका लावला आहे. “वासुदेव आला हो वासुदेव आला, मत मागण्यासाठी वासुदेव आला” असे खास गीत सादर करत हे वासुदेव घरोघरी जाऊन उमेदवारांचा प्रचार करत आहेत. पारंपारिक वेशभूषा, डोक्यावर मोरपिसांची टोपी आणि चिपळ्यांच्या तालावर रंगलेला हा प्रचार नाशिककरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत असून, या अनोख्या शक्कलेमुळे प्रचाराची चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
सांगलीत महाविकास आघाडीची छुपी खेळी, ७८ जागांवर उमेदवार उभे
सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीला सर्व जागांवर उमेदवार मिळाले नाहीत, या विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कदम म्हणाले की, आमचे ७८ च्या ७८ जागांवर उमेदवार उभे आहेत, समजने वाले को बस इशारा काफी है! असे विधान केले आहे. या विधानाद्वारे कदम यांनी काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये छुपी युती असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केल्याची चर्चा रंगू लागली आहे. सांगलीच्या विकासाची धमक घेऊन आमचे उमेदवार मैदानात उतरले असून आघाडी पूर्ण ताकदीने लढत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
-
नांदेड महापालिका रणसंग्राम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज तोफ धडाडणार
नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आज सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. भाजपच्या वतीने ८१ पैकी ६६ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले असून, मुख्यमंत्र्यांच्या या सभेसाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. विशेष म्हणजे, ही निवडणूक खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाजपसमोर मित्रपक्षातील अजित पवार गट, शिंदे शिवसेना आणि काँग्रेसचे मोठे आव्हान असणार आहे. आजच्या सभेत मुख्यमंत्री काय बोलणार आणि नांदेडचा गड राखण्यासाठी कोणती रणनीती मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय समीकरणे बदलली, तब्बल अडीच वर्षांनी सुप्रिया सुळे करणार घड्याळाचा प्रचार
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून एकमेकांपासून दुरावलेले दोन्ही राष्ट्रवादी गट आता एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे आणि रोहित पवार हे नेते घड्याळाचा प्रचार करताना दिसणार आहेत. शहरात शरद पवार गटाचे मातब्बर नेते जाहीर सभा आणि प्रचाराचा धडाका लावणार असून, या अनोख्या रणनीतीबाबत शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. दोन्ही गट एकत्र आल्याने महापालिकेच्या रणधुमाळीत आता विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता आहे.
-
माजी नगरसेविका शालन शिंदे यांचे पती शंकर शिंदेसह 11 आरोपीना दिवसाची पोलीस कोठडी
सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणातील 11 आरोपीना 4 दिवसाची पोलिस कोठडी. राजकीय वादातून मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची शुक्रवारी संध्याकाळी झाली होती. या हत्याप्रकरणात एकूण 15 आरोपीवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले होते. माजी नगरसेविका शालन शिंदेसह चार आरोपीना या आधीच पोलिसांनी अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत
-
धुळे गुरुद्वारा तणाव प्रकरणात शांतता, 12 जण पोलिसांच्या ताब्यात
दोन स्वतंत्र गुन्हे दाखल… गुरुद्वारामध्ये प्रवेश करून न दिल्याचा पहिला गुन्हा तर, दुसऱ्या गुन्हा मध्ये शस्त्रांसह जमावर हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल. सध्या गुरुद्वार परिसरामध्ये चौक पोलीस बंदोबस्त तैनात. गुरुद्वाराच्या गादीवरनं दोन गटांमध्ये तणाव. पोलिसांनी वेळेच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात…
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौऱ्यावर, जाहीर सभा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौऱ्यावर, महापालिका निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फडणवीसांची जाहीर प्रचार सभा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्यातल्या प्रचाराचा शुभारंभ जालन्यातून करणार,सभेची तयारी पूर्ण. जालना महानगरपालिका निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने भाजप नेते जालन्यात मागच्या काही दिवसापासून तळ ठोकून आहेत.
-
खासदार निलेश लंके यांनी केली अजित पवारांची पाठराखण
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतानाच,आता शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी थेट अजित पवारांची पाठराखण केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला संधी दिली तर त्यात वावगं काय आहे? असा सवाल करत, संबंधित उमेदवाराला त्या प्रभागाचा विकास करायचा आहे, असं मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केलं आहे.
-
चाकण शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस
महात्मा फुले मार्केटयार्ड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घातला.या कुत्र्याने तब्बल 33 जणांना चावा घेत गंभीर जखमी केले आहे. जखमी मध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांचा समावेश.जखमींना सुरुवातीला चाकणच्या सरकारी दवाखान्यात उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे त्यांना पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.
-
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी पुन्हा वाढण्याचे चिन्हे
वर्ष अखेरीपर्यंत असलेली थंडी हवामान बदलामुळे कमी झाले आहे मात्र आता पुन्हा हवामान पालट होण्याचे चिन्ह असून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे 9 ते 15 जानेवारी या कालावधीत तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
-
चाकण शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस
महात्मा फुले मार्केटयार्ड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. या कुत्र्याने तब्बल 33 जणांना चावा घेत गंभीर जखमी केले आहे. जखमी मध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांचा समावेश आहे. जखमींना सुरुवातीला चाकणच्या सरकारी दवाखान्यात उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे त्यांना पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आलं. यावेळी नागरिकांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. चाकण शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय, आणि नागरिकांनी ठोस कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.
-
सोलापुरात उद्या एम आय एम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन
सोलापुरात उद्या एम आय एम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील पानगल हायस्कूलच्या मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागांपैकी 23 जागांवर एमआयएम निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नेहमीच चर्चेत राहणारे एम आय एम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
-
पुण्यात २२ वर्षीय तरुणाकडे सापडली पिस्तुल आणि तीन जिवंत काडतूस
पुण्यात २२ वर्षीय तरुणाकडे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतूस सापडली आहेत. पुणे पोलिसांच्या ३ गुन्हे शाखेने सापळा रचत पुर्वेश चव्हाण याला अटक केली आहे. पूर्वेश हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे. टिळक रोड येथील पेट्रोल पंपाजवळ गुन्हे शाखा ३ च्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
-
नाशिकच्या पंचवटीत पुन्हा हत्या
नाशिकच्या पंचवटीत पुन्हा हत्या झाली आहे. काका पुतण्याने चॉपर ने वॉर करून युवकास ठार केलं आहे. रवी संजय उशिले (रा. हरिहरनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून शिवीगाळ करत हल्ला केला. घटनेनंतर अवघ्या दीड तासात पोलिसांनी संशयतांना ताब्यात घेतलं. संतोष गवळी ,आणि ओम गवळी या दोघा संशयतांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. खुनाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
गोंदिया : रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार, दुसरा गंभीर…
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार, दुसरा गंभीर झाला आहे. सोनेगाव शिवारात धक्कादायक घटना घडली आहे. जखमीला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. परिसरातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
Published On - Jan 05,2026 8:07 AM
