Maharashtra News LIVE : पुणे विधानपरिषद निवडणुकीत नाराज असलेल्या सगळ्यांना भेटणार- विक्रम काकडे
Maharashtra News LIVE : व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झाली असून त्यामुळे आता हॉटेलिंग महागू शकतं, बाहेर खाण्या-पिण्याचे दर वाढू शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू शकते. व्यावसायिक सिलेंडरच्या दरातील या वरषातील ही 7वी वाढ आहे. वाचा सविस्तर अपडेट्स.

19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ, 42 ते 53 रुपयांनी सिलेंडर महागला असून त्यामुळे आता महागाईचा चटका आणखीनच लागू शकतो. दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरचे दर 3,113.50 रुपये झालेत. तसेच 5 किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलेंडरच्या दरातही 11 रूपयांनी वाढ झाली. 1 जून म्हणजे आजपासूनच या नव्या किमती लागू होणार आहेत. गोंदियामध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यात गारपीट व पावसाचा अंदाज वर्तवण्यात ाला आहे. 2 जूनपासून पुढे यलो अलर्ट जारी. ज्येष्ठ गायिक सुमन कल्याणपूर यांचे काल वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. आज दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासह देश, विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
LIVE NEWS & UPDATES
-
परभणीच्या इंदेवाडी शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस
परभणीच्या इंदेवाडी शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस
वादळी वाऱ्यामुळे घराची भीत कोसळली
भिंती खाली चिरडून 11वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
दिपाली नंदगे वय 11वर्ष असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव
घटनेमुळे गावावर शोककळा
-
जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जळगाव शहरात तब्बल अर्धा तास मुसळधार पाऊस
अचानकच्या मुसळधार पावसामुळे घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाचे हाल
सकाळपासूनच ढगाळ वातावरण, सायंकाळच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस
जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये देखील मुसळधार पाऊस
-
-
वाशिम तालुक्यातील ढिल्ली गावात वादळी पावसाचा तडाखा
वाशिम तालुक्यातील ढिल्ली गावात वादळी पावसाचा तडाखा
जोरदार वाऱ्यामुळे डीपी कोसळली
काही वीज खांब उन्मळून पडले
घरांवरील व गोठ्यांवरील पत्र्यांचे नुकसान, गावातील वीजपुरवठा खंडित
-
घोटी त्रंबक रोडवर जवळ भीषण अपघात, दोन जन गंभीर जखमी
घोटी त्रंबक रोडवर जवळ भीषण अपघात
छोटा हत्ती व मोटरसायकलची झाली समोरासमोर धडक
अपघातामध्ये दोन जन गंभीर जखमी
जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात केले उपचारासाठी दाखल
-
नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11 जून रोजीची बैठक
नीती आयोगाच्या नियामक परिषदेची बैठक 11 जून रोजी बोलावण्यात आली आहे. ही बैठक दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री तसेच सर्व मुख्यमंत्रीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
-
-
‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके भारतात परणार, शिक्षणमंत्र्यांविरुद्ध आंदोलन करणार
‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके 6 जून रोजी भारतात येणार आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे.
-
पुणे विधानपरिषद निवडणुकीत नाराज असलेल्या सगळ्यांना भेटणार- विक्रम काकडे
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण तापलं आहे. पुणे विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी दिली गेली आहे. असं असताना पुण्यात नाराज असलेल्या सगळ्यांना भेटणार असं विक्रम काकडे यांनी सांगितलं आहे. सुनील टिंगरेंचीही भेट घेऊन नाराजी दूर करणार असल्याचं विक्रम काकडे यांनी पुढे सांगितलं.
-
पश्चिम बंगालमध्ये अराजकतेचे वातावरण आहे: ममता बॅनर्जी
टीएमसी सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमध्ये अराजकतेचे वातावरण असून, आपला पक्ष फोडण्याचे प्रयत्न होत आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांना सभा घेण्याचीही परवानगी दिली जात नाही, असा आरोप त्यांनी केला.
-
शिवकुमार शपथ घेण्यापूर्वी दिल्लीत दाखल
कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे बुधवार, 3 जून रोजी होणाऱ्या त्यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी काँग्रेस नेतृत्वाला भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. ते म्हणाले, “माझ्या कर्नाटकला हार्दिक शुभेच्छा. कर्नाटकची जनता खूप दिवसांपासून याची वाट पाहत आहे.”
-
काँग्रेसचं घाटकोपरमध्ये इंधनदरवाढीविरोधात आंदोलन
काँग्रेसने इंधनदरवाढीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसकडून घाटकोपरमध्ये आंदोलन केलं जात आहे.काँग्रेसच्या या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.
-
दिलीप वळसे पाटील यांच्याकडून माजी आमदार विलास लांडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
पिंपरी चिंचवडमध्ये माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या विधानाच चर्चा रंगली आहे. वळसे पाटलांनी केलेलं विधान हे कोड्यात टाकणारं आहे.त्यामुळे चर्चा पाहायला मिळत आहे. पक्षाने एकदा उमेदवारी जाहीर केल्यानंतर कोणीही बंडखोरी करणार नाही अशी अपेक्षा असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी माजी आमदार विलास लांडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
-
सीजेपीप्रमुख अभिजीत दीपके यांच्याकडून दिल्लीत आंदोलनाची घोषणा, कारण काय?
कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके भारतात येणार आहेत. अभिजीत दीपके यांनी यावेळेस नवी दिल्लीत 6 जून रोजी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचं दीपके यांनी म्हटलं. तसेच या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन दीपके यांनी विद्यार्थ्यांना केलं.
-
उमेदवारी न मिळाल्याने शेखर गोरेंची नाराजी योग्य,पण…, मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले?
शेखर गोरे हे माझे बंधू आहेत. उमेदवारी मिळावी अशी त्यांची भावना होती. मात्र उमेदवारी न मिळाल्याने साहजिकच ते नाराज असतील, पण पक्षाकडून त्यांना नक्कीच योग्य ठिकाणी संधी देईल,अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री आणि शेखर गोरे यांचे बंधू जयकुमार गोरे यांनी दिली आहे.
-
जळगाव : कुऱ्हा काकोडा परिसरात पेट्रोल-डिझेलची टंचाई
मुक्ताईनगरमधील कुऱ्हा काकोडा परिसरात गेल्या 3 दिवसांपासून पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नाही. यामुळे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्याचे हाल होत आहेत. कंपनीकडे तीन दिवसांपासून पेट्रोल पंप धारकांनी मागणी करूनही पेट्रोल डिझेल मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.
-
नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पी व्ही कुलकर्णींच्या घरावर बुलडोझर
नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पी व्ही कुलकर्णी यांची बीडमध्ये संपत्ती असल्याचे समोर आले होते. त्यांच्या मोठ्या कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू होते. मात्र हे बांधकाम विनापरवाना आणि अनाधिकृतपणे सुरू असल्याचं नगरपालिकेने स्पष्ट केलं होतं. यानंतर हे बांधकाम पाडून टाकावं अन्यथा आपण तोडक कारवाई करू अशी नोटीस नगरपालिकेने बजावली होती. नगरपालिकेने बजावलेल्या नोटीसी नंतर पी व्ही कुलकर्णी आणि त्याच्या लोकांकडून बुलडोझरच्या मदतीने आता स्वतःहून हे बांधकाम पाडण्यात येत आहे.
-
जालना : घनसावंगी तालुक्यात मान्सून पूर्व पावसाचा केळी बागांना फटका
जालन्यात मान्सून पूर्व पावसाचा केळीबागांना फटका बसला असून जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथील शेतकऱ्याची दोन एकर केळी बाग जमीनदोस्त झाली आहे. मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विक्रीला आलेल्या केळीचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-
कत्तलखान्याच्या मुद्द्यावरून नंदुरबार पालिका सभेत भाजप-शिंदे गट आमनेसामने
नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि शिंदे गटामध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष रंगला. शहरातील बंद असलेले कत्तलखाने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. तसेच विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलनही करण्यात आले. मात्र, बंद कत्तलखाने पुन्हा सुरू करण्यात येत नसून शासनाने ज्या प्राण्यांच्या कत्तलीस परवानगी दिली आहे, त्याच प्राण्यांची कत्तल संबंधित कत्तलखान्यात होणार असल्याचे स्पष्टीकरण नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी दिले.
-
संपूर्ण काँग्रेस भाजपमध्ये विलीन करा-वडेट्टीवार
संपूर्ण काँग्रेस भाजपमध्ये विलीन करा… ‘भाजपच्या नेत्यांना भाजपमधून हटवून त्याला काँग्रेस करा’… उमेदवार आयातीवरून वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा
-
संजय काकडे व विक्रांत काकडे यांचा पक्षप्रवेश
पुण्यात राष्ट्रवादीत मोठी घडामोड… संजय काकडे आणि विक्रम काकडेंचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश… विक्रम काकडेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी तर सुनील टिंगरेनाही पक्षाकडून अर्ज भरण्याच्या सूचना…राष्ट्रवादीकडून दोन अर्ज दाखल केले जाण्याची शक्यता
-
महायुतीकडून रायगडसाठी अनिकेत तटकरेंना उमेदवारी
कोकण विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरेंनी उमेदवारी अर्ज भरला… अर्ज भरताना शिवसेनेचे उदय सामंत, सुनील तटकरे, नितेश राणे, आणि महेंद्र थोरवे यांची उपस्थिती
-
पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटलांना उमेदवारी
सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी मविआ आणि महायुतीचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल. पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटलांना उमेदवारी तर, भाजपकडून धैर्यशील कदम यांना उमेदवार
-
जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून दोन उमेदवारांना एबी फॉर्म
जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषद निवडणुकीत दोन उमेदवारांना एबी फॉर्म. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे युवा जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांना देखील पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे
-
इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन फुटली
इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करणारी भावली डॅम येथील धरणातून येणारी पाइपलाइन फुटली आहे. दरवर्षी याच परिसरात पाइपलाइन फुटते. शहरात काही ठिकाणी नव्या पाईप लाइन द्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो तर काही ठिकाणी जुन्या पाईपलाईंन द्वारे. नव्या पाईपलाईंन द्वारे होणारा पाणीपुरवठा झाला खंडित.
-
यवतमाळ विधान परिषदेसाठी दुष्यंत चतुर्वेदी भरणार फॉर्म?
यवतमाळ विधान परिषदेसाठी दुष्यंन्त चतुर्वेदींचे नाव फायनल करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. थोड्याच वेळात ते फॉर्म भरणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यासाठी हॉटेल राधामंगल येथे शिवसेनेचे नगरसेवक दाखल झाले आहेत.
-
दहिसरमध्ये बेस्ट बसच्या धडकेत घोडा गंभीर जखमी
मुंबईतील दहिसर पूर्व येथील जरीमरी गार्डनसमोर आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास एक अपघात घडला. ओशिवरा ते भाईंदर मार्गावरील 707 क्रमांकाच्या बेस्ट बसने तांगागाडीला ओव्हरटेक करताना घोड्याच्या मागील पायावर टायर चढविल्याची घटना घडली.
-
नाशिक- महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे अर्ज भरण्यासाठी दाखल
नाशिक- महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे अर्ज भरण्यासाठी दाखल झाले आहेत. दराडे यांच्यासोबत भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. महायुतीकडून नरेंद्र दराडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
-
सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं प्रत्येक गीत शंभर नंबरी सोन्यासारखं- मंगला खाडीलकर
सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने चित्रपट आणि संगीतसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. मृदू, कोमल आणि दाणेदार स्वरांची गायिका म्हणून सुमनताईंची ओळख होती. त्यांनी गायलेलं प्रत्येक गीत शंभर नंबरी सोन्यासारखं होतं. त्यांनी कधीच कोणाशी स्पर्धा केली नाही किंवा मनात कटुता बाळगली नाही. साधेपणा आणि आत्मसन्मान जपणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. वडीलधाऱ्या भावसंगीतातील एक सोनेरी पर्व आज संपलं, अशा शब्दांत लेखिका आणि निवेदिका मंगला खाडीलकर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
-
सोलापूर विधानसभेचे भाजप उमेदवार राजेंद्र राऊत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल
सोलापूर विधानसभेचे भाजप उमेदवार राजेंद्र राऊत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार ज्योती वाघमारे, भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांसह जिल्ह्यातील महायुतीचे सर्वच आजी-माजी आमदार अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले आहेत. सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे देखील भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा अर्ज भरण्यासाठी दाखल झाले आहेत.
-
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. थोड्याच वेळात सभापती राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल होणार आहे. भाजपाने दिलेल्या संधीबद्दल तनपुरे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत. “मिळालेल्या संधीचे नक्कीच सोनं करेन,” अशी प्रतिक्रिया तनपुरे यांनी दिली.
-
ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या सुमधुर आवाजाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचं रविवारी निधन झालं. आज दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शिवशक्ती अपार्टमेंट इथं ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता शासकीय इतमामाच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
-
ठाणे विधानपरिषदेसाठी शिंदे शिवसेनेकडून रवींद्र फाटक रिंगणात
गेल्या काही दिवसांपासून ठाणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. थोड्याच वेळात ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
-
गाफील न राहता, निवडणूक निवडणुकीसारखीच लढणार! प्राजक्त तनपुरे यांचा निर्धार
राहुरी-अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातून एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच उमेदवारी जाहीर झालेले प्राजक्त तनपुरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अहिल्यानगर येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे यांच्या मातोश्री उषाताई तनपुरे यांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले आणि त्यांना विजयासाठी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. मतदारसंघात असलेले राजकीय संख्याबळ पाहता प्राजक्त तनपुरे यांचा विजय निश्चित आणि सोपा मानला जात असला, तरीही त्यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. “विजय सोपा दिसत असला तरी आम्ही अजिबात गाफील राहणार नाही, ही निवडणूक आम्ही संपूर्ण ताकदीने आणि निवडणुकीच्या नियमांप्रमाणेच लढवणार आहोत,” असा निर्धार भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
-
अजित दादा असताना विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या – सुनील तटकरे
पार्थ पवार राजकारणात सक्रीय झाले ही चांगली गोष्ट आहे. अजित दादा असताना राष्ट्रवादीत विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, ३ पक्ष एकत्र असताना सर्वच गोष्टींवर एकमत होत नाही, प्राजक्त तनपुरेंनी फार मोठा स्फोट केला नाही, असे विधान सुनील तटकरे यांनी केले.
-
अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूक: अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; महायुती आणि महाविकास आघाडीत घडामोडींना वेग
अहिल्यानगर विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीकडून भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे हे राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या वतीने खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरणार आहेत. मात्र, दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपावरून प्रचंड विसंवाद आणि बंडाळीचे चित्र पाहायला मिळत आहे. मविआमध्ये काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण आणि श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने यांनी अपक्ष किंवा स्वतंत्र तयारी केल्याने आघाडीत फूट पडल्याची चर्चा आहे, तर महायुतीतही अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप आणि भाजपचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी उमेदवारी अर्ज नेल्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
-
पुण्यात राष्ट्रवादीची मोठी खलबतं! सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बैठक; विधान परिषदेचा उमेदवार कोण?
पुण्यातील विधान परिषदेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज दुपारी तीन वाजेपर्यंत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात प्रचंड वेगाने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पुण्याच्या ‘जिजाई’ या निवासस्थानी सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सध्या एक महत्त्वाची आणि गुप्त बैठक पार पडत आहे. या बैठकीला आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार विलास लांडे देखील उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असले तरी, पुण्याच्या या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अंतिम नाव अजूनही गुलदस्त्यात असल्याने महायुतीचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.
-
बीडमध्ये संताप, घरात एकट्या असलेल्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण; व्हिडीओ किती?
बीड तालुक्यातील रंजेगाव येथे एका महिलेला लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ही महिला घरात एकटी असताना, काही तरुणांनी तिच्या घरासमोर लघुशंका करून घरावर दगडफेक केली. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी महिला पुढे आली असता, नराधमांनी तिला अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यात महिलेच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून तिच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. “माझ्यावर प्रचंड अत्याचार आणि दाखवता न येण्यासारखी मारहाण केली आहे,” असे रडत सांगतानाचा पीडितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, याप्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही.
-
त्र्यंबकेश्वर देवस्थान मालामाल! VIP दर्शनातून एकाच दिवसात २० लाखांची कमाई
नाशिकच्या प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत असून, देवस्थानने सुरू केलेल्या २५०० रुपयांच्या तत्काळ दर्शन तिकिटांच्या योजनेला भाविकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. व्हीआयपी पासच्या नावाखाली होणारा कोट्यवधी रुपयांचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने ही योजना सुरू केली होती, जी आता प्रचंड यशस्वी ठरताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एकाच दिवसात तब्बल ८३६ भाविकांनी या सुविधेचा लाभ घेतल्याने संस्थानाला २० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे, तर अवघ्या चार दिवसांत एकूण १४०० तिकिटांची विक्री होऊन देवस्थानच्या तिजोरीत ३५ लाख रुपयांची भर पडली आहे.
-
जळगाव विधानपरिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
जळगावच्या विधान परिषदेसाठी पाच दिवसात एकूण 63 व्यक्तींकडून तब्बल 91 उमेदवारी अर्जाची खरेदी..पाच दिवसात केवळ तिघांकडून अपक्ष अर्ज दाखल झाला असून एकही प्रमुख पक्षाकडून अद्याप उमेदवारी अर्ज दाखल नाही. महायुतीमध्ये जागेचा तिढा सुटला असून जळगावची जागा भाजपला सुटली तसेच नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी निश्चित झाले आहे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे शरद तायडे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे..
-
भाजपमधील गटबाजीचा मला नक्कीच फायदा होईल- महेश देशमुख
धाराशिव-बीड-लातूर तिन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. माझ्या समोरचे उमेदवार बसवराज पाटील हे पूर्ण भाजपचे उमेदवार नसून ते एका गटाचे उमेदवार आहेत. भाजपमधील गटबाजीचा मला नक्कीच फायदा होईल आणि मी निवडून येईल. काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे, असे उमेदवार महेश देशमुख यांनी म्हटले.
-
खेड तालुक्यातील कडूस येथे कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा थरार कॅमेरात कैद
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कडूस गावातील धायबर शिवार परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार पाळीव कुत्रे आणि शेळ्यांवर हल्ले करत बिबट्याने त्यांना फस्त केल्याच्या घटना समोर येत आहेत. रात्रीही धायबर यांच्या घराजवळील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा थरार कॅमेरात कैद झाला यात बिबट्याने कुत्र्याचा फडशा पडलाय
-
भोंदू अशोक खरात याच्या बनावट बँक खात्यांचा तपास SIT कडे वर्ग होण्याची शक्यता
समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत अशोक खरात नॉमिनी असणारी शंभर खाती. खात्यांवरून जवळपास 70 कोटींचे व्यवहार. शिर्डी पोलिस करत असलेला तपास आता SIT कडे वर्ग होण्याची शक्यता. SIT ने मागवला अशोक खरात आणि पतसंस्थेच्या व्यवस्थापकावर दाखल गुन्ह्याचा तपशील. मुंबई येथील उद्योजक दिनेश प*रब यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांत भोंदू अशोक खरात सह समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकावर झालाय दोन महिन्यांपूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल..
-
विधानपरिषदेसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आज दाखल करणार अर्ज रायगडच्या जागेवरून महायुतीत पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. उमेदवार जाहीर केले. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्व पक्ष कामाला लागली आहेत.
-
नांदेडच्या देगलूर तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावकऱ्यांकडुन गोंधळ
मागील पाच वर्षात ग्रामपंचायतीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गावातील दोन गट आमने समाने. विकास कामाचे हिशोबाचे रजिस्टर गहाळ झाल्याचा आरोप. भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे ग्रामसभेत ग्रामस्थांकडून सादर. भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने गावकरी आक्रमक. ग्रामसभेतील गोंधळाचा व्हिडिओ होऊ लागलाय समाज माध्यमावर व्हायरल
-
पुण्यात व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ
पुण्यात व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाली आहे. 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत 42 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
या दरवाढीनंतर आता पुण्यामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचा दर साधारणपणे आता 3122रुपये झाला आहे.
-
जळगाव जिल्ह्यात अवकाळीचा कहर; गारपीट, मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठे नुकसान
जळगाव जिल्ह्यात अवकाळीचा कहर; गारपीट, मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले. भडगाव व चाळीसगाव तालुक्यांना अवकाळीचा फटका बसला असून भडगावच्या गुढे, जुवार्डी आणि आडळसे तर चाळीसगाव तालुक्यात शिवापुर परिसराला गारपिटीचा तडाखा बसला. लिंबू, केळी, गावरान आंबा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.
-
पालकमंत्री पद आणि विधानपरिषद जागेबाबत कोणतीही देवाणघेवाण नाही – भरत गोगावले
पालकमंत्री पद आणि विधानपरिषद जागेबाबत कोणतीही देवाणघेवाण नाही, अशी माहिती शिंदेंच्या शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी दिली. पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णयही एकनाथ शिंदे घेतील , असं ते म्हणाले.
-
सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर होताच बार्शी मध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. पालकमंत्री जयकुमार गोरे, शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांच्यासह महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज अर्ज दाखल करणार आहेत..
-
गणेश गीते यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही करणाऱ्या नगरसेवकांकडे विचारणा
नाशिक – गणेश गीते यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही करणाऱ्या नगरसेवकांकडे विचारणा होणार आहे. कोणाच्या सुचनेनुसार सूचक अनुमोदक सही केली याबाबत पक्षाकडून विचारणा करण्यात येणार आहे. गणेश गीते यांनी भाजप आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत . नाशिकच्या जागेबाबत निर्णय होण्या पूर्वीच गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज भरला .
-
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात : ट्रक आणि कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण रस्ता अपघात झाला. त्यात दोघांचा मृत्यू तर 1 गंभीर जखमी आहे. पुण्याहून मुंबईकडे जात असलेला तेलाच्या डब्यांनी भरलेला एक भरधाव कंटेनर किलोमीटर 38 येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेत उलटला.
कंटेनर उलटल्यानंतर काही क्षणांतच मागून येणाऱ्या आणि मुंबईकडे तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाला वाहनावरील नियंत्रण राखता आले नाही. परिणामी ट्रकने अपघातग्रस्त कंटेनरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकमधील चालक आणि क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला. 80 वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
पुणे विषारी दारूकांड – मिथेनॉल पुरवठ्याचा तपास केंद्रस्थानी, आठही आरोपींची सीआयडीकडून चौकशी
पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी दारूकांड प्रकरणाचा तपास सीआयडीने हाती घेतल्यानंतर तपासाला वेग आला आहे. रविवारी सीआयडीने अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींची पाषाण येथील कार्यालयात कसून चौकशी केली, यामध्ये विषारी दारूमध्ये वापरलेल्या मिथेनॉलच्या स्रोताचा शोध घेण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
-
मनपा निवडणुकीनंतर नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना लागली कामाला
मनपा निवडणुकीनंतर नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना कामाला लागली. ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर बैठकांचे सत्र सुरू आहे. – आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर पदाधिकाऱ्यांना बूस्टर डोस. शिवसेना उपनेते तथा नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका होतील.
Published On - Jun 01,2026 8:06 AM
