AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE: नाशिकच्या लासलगावात गॅस टाकीच्या स्फोटाने घराचे नुकसान

| Edited By: | Updated on: May 06, 2026 | 8:04 AM
Share

Maharashtra News LIVE: अंगारकी चतुर्थी निमित्ताने आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनसाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अंगारकी चतुर्थी निमित्ताने लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पहायला मिळतंय.

Maharashtra News LIVE: नाशिकच्या लासलगावात गॅस टाकीच्या स्फोटाने घराचे नुकसान
tv9 marathi blogImage Credit source: Tv9

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर इथल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या आणि हत्येच्या प्रकरणावरून ग्रामस्थांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, या घटनेतील आरोपी भीमराव कांबळे याला मृत्युदंड (फाशी) व्हावा, अशी मागणी करणारं निवेदन देण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिलं आहे की, या प्रकरणात दोषीला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आरोपीला लवकरात लवकर फासावर चढवण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून खटला चालवण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं आहे. यासह राज्यातील, देश-विदेशातील इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग..

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 May 2026 06:41 PM (IST)

     संगीतकार पलाश मुच्छलविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

    संगीतकार पलाश मुच्छलविरुद्ध सांगली पोलिसात फसवणुकीचा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अभिनेता-निर्माता विज्ञान माने यांनी अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) कायद्यांतर्गतही फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे. तर मुच्छलने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत आणि बदनामीसाठी 10 कोटींचा दावा दाखल केला आहे.

  • 05 May 2026 06:23 PM (IST)

    नाशिकच्या लासलगावात गॅस टाकीच्या स्फोटाने घराचे नुकसान

    नाशिक येथील लासलगावच्या सोहन नगरमध्ये पत्र्याच्या घरात गॅस टाकीचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. पत्र्याचे घर असल्याने प्रचंड उकाड्यामुळे घरातील सदस्य घराबाहेर झाडाखाली बसलेले असल्याने पाच जणांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.  या गॅस टाकीच्या स्फोटात संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

  • 05 May 2026 06:05 PM (IST)

    मुस्लिमांना ‘ॲट्रॉसिटी’सारखा विशेष संरक्षण कायदा आणा, मुस्लिम आरक्षण कृती समितीची मागणी

    बीडमध्ये मुस्लिम आरक्षण कृती समितीने पत्रकार परिषद घेत आरक्षणासोबतच समाजासाठी ‘ॲट्रॉसिटी’सारखा विशेष संरक्षण कायदा करण्याची मागणी केली आहे. धर्माच्या आधारावर होणारी टीका आणि व्यवसायिक टार्गेटिंग रोखण्यासाठी असा कायदा आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे. पुण्यातील मोहसीन शेख आणि जळगावच्या सुलेमान पठाण प्रकरणांचा दाखला देत, समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याची विनंती राज्य सरकारला करण्यात आली आहे.

  • 05 May 2026 05:51 PM (IST)

    महिलांसाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करा – रोहिणी खडसे

    महिलांसाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना का करू शकत नाही कारण हे तर सरकारच्या हातात आहे ना ? तुम्हाला महिलांना न्याय द्यायचा आहे ना तर मग स्वतंत्र न्यायालय का नाही ? असा सवाल विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला आहे.

  • 05 May 2026 05:29 PM (IST)

    यवतमाळ- आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आणलेला गहू पावसाने भिजला

    यवतमाळ- आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आणलेला गहू पावसाने भिजला आहे.  बाराशे ते पंधराशे क्विंटल गहू भिजल्याची माहिती आहे. हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला तीन दिवसाचा दिला होता येलो अलर्टचा इशारा दिला होता. दुपारच्या सत्रात अचानक पाऊस झाल्याने शेतकऱ्याचा गहू भिजल्याची घटना घडली आहे.

  • 05 May 2026 04:55 PM (IST)

    अकोल्यातील अनिकट परिसरात मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ

    अकोला शहरातील अनिकट परिसरात आज एक मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून तपासाला गती दिली आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली असून सांगाड्याची ओळख पटवण्याचे काम सुरू असून नेमका हा प्रकार कसा घडला? सांगाडा किती दिवसांपासून येथे होता आणि यामागे काही गुन्हेगारी कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

  • 05 May 2026 04:42 PM (IST)

    भंडाऱ्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका

    भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसात अनेक धान उत्पादक शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले होते. त्यातच आता नव्याने आलेल्या पावसामुळे कापणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या धान पिकाला धोका निर्माण झाला आहे.

  • 05 May 2026 04:32 PM (IST)

    बीड – प्रशासनाचा दावा ठरला फोल, जिल्ह्यात इंधन टंचाई

    बीड जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची टंचाई भासत आहे. बहुतांश पंप बंद असुन अत्यावश्यक सेवेसाठीचा साठा देखील संपला आहे. यामुळे पंप चालकांनी गाड्या पंपात येऊ नयेत यासाठी थेट दगड आणि लाकडांसह लोखंडी फ्रेम लावून रस्ते ब्लॉक केले आहेत. दोन दिवसांपूर्वी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील स्थिती सुरळीत होईल असे सांगितले होते मात्र हा दावा फोल ठरला आहे.

  • 05 May 2026 04:20 PM (IST)

    संभाजीनगर : मोंढा नाका येथे हार्डवेअर दुकान फोडून चोरी

    छत्रपती संभाजीनगर शहरातील मोंढा नाका परिसरात मध्यरात्री हार्डवेअर दुकान फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुमारे 75 हजार रुपयांचा माल चोरीस गेला होता. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी अवघ्या 12 तासांत दोन आरोपींना अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे.

  • 05 May 2026 04:06 PM (IST)

    बीड – नवव्या लग्नात तरुणीचे बिंग फुटले; तरुणाची केली लाखोंची फसवणूक

    बीड जिल्ह्यात बोगस लग्न लावून देणारी टोळी समोर आली आहे. या पूर्वीही ग्रामीण भागातील अनेक तरुणांची फसवणूक या बोगस लग्न लावणाऱ्या टोळीने केली आहे. मात्र असाच प्रकार बीडच्या उमापूर गावातून समोर आला असून नवरी एक अन् नवरदेव अनेक असे म्हणण्याची वेळ आली आहे.

  • 05 May 2026 02:55 PM (IST)

    नसरापूर प्रकरणातील आरोपीला हालहाल करत संपवावं, राज ठाकरेंची मागणी

    नसरापूर प्रकरणातील आरोपीला हालहाल करत संपवावं, राज ठाकरेंची मागणी.. फास्टट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणणाऱ्या सरकारने फास्टट्रॅकची व्याख्या सांगावी..राज्यात कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही.. राज ठाकरेंची प्रतिक्रिया..

  • 05 May 2026 02:45 PM (IST)

    नसरापूर घटनेतील पीडित मुलीचा अॅस्फिक्सियामुळे मृत्यू

    नसरापूर घटनेतील पीडित मुलीचा मृत्यू अॅस्फिक्सियामुळे… शवविच्छेदन अहवालातून माहिती समोर…. अॅस्फिक्सिया म्हणजे श्वास कोंडणे, याच कारणाने चिमुरडीचा मृत्यू… नराधमाने तोंडात सॉक्स कोंबल्याने चिमुरडीचा श्वास कोंडला…

  • 05 May 2026 02:30 PM (IST)

    नसरापूर प्रकरणात 3 सरकारी वकिलांच्या नावांची शिफारस

    नसरापूर प्रकरणात तीन सरकारी वकिलांच्या नावांची शिफारस… पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य सरकारला तीन जणांची नावं पाठवली…. नसरापूर प्रकरणात ऍडव्होकेट अजय मिसर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता…

  • 05 May 2026 02:12 PM (IST)

    नसरापूर मधील घटनेच्या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली चर्चा

    नसरापूर मधील घटनेच्या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली चर्चा… लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल देऊ नका… फडणवीस सरकार कायद्यात करणार बदल… विधी व न्याय विभागाला मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

  • 05 May 2026 02:00 PM (IST)

    हिंगोली शहरासह परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस

    हिंगोली शहरासह परिसरात अचानक वादळी वाऱ्या सह रिमझिम पाऊस पडला. हवा सुटल्याने शहरातील चौका-चौकातील लावलेले पोस्टर फाटले. अचानक सुटलेल्या वाऱ्या मुळे किरकोळ फळ विक्रेत्यांसह भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची धांदल उडाली.

  • 05 May 2026 01:50 PM (IST)

    गेवराई शहरात मध्यरात्री डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण‌

    बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचे मध्यरात्रीच्या सुमारास पुतळे बसवले जात आहेत. गेवराई मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला पंचायत समिती कॉर्नर परिसरात हा पुतळा बसवण्यात आला. याच गेवराईमध्ये काही दिवसांपूर्वी रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यानंतर संत सेवालाल महाराजांचा देखील पुतळा बसवण्यात आला होता. आता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याचे रात्रीतून अनावरण झाले आहे. एकंदरीत बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी महापुरुषांचे मध्यरात्रीच्या सुमारास पुतळे बसवण्यात येत असल्याने पोलिस प्रशासनाची मात्र दमछाक होत आहे.

  • 05 May 2026 01:40 PM (IST)

    ठाणे शहराला देखील पाणी कपातीचे संकट

    धरणातील पाणीटंचाई आणि वाढत्या औद्योगीकरणामुळे मुंबई शहरानंतर ठाणे शहराला देखील पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवसभरात 70 ते 75 पाण्याचे टँकर ठाणे शहरातील विविध भागात पाणीपुरवठा करताना दिसत आहेत. ठाण्यातील साकेत या ठिकाणी टँकरच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने जास्ती जास्त पाणी देण्याची मागणी अनेक गृह संकलन करत आहे.

  • 05 May 2026 01:30 PM (IST)

    ओएसडीकडून पत्नी व मुलाला बॅटने मारहाण

    कॅबिनेट मंत्री यांच्या ओएसडी कडून पत्नी मारहाण व मुलाला बॅटने मारहाण हा गुन्हा अहिल्यानगर सुरुवातीला नोंद करण्यात आला तो परत आमच्या कडे वर्ग करण्यात आला आहे. ३० एप्रिल ला पुण्यातील क्विन्स गार्डन येथे ही मारहाणीची घटना घडली आहे. पती पत्नी चे मोबाईल चाटिंग वरुन भांडणे झाले. आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. त्यासाठी आम्ही आमची पथके पाठवली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

  • 05 May 2026 01:20 PM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्या भेटीची चर्चा

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या अपघातग्रस्त पत्नीची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. खासदार दिना पाटील यांच्या पत्नीचा अपघात झाला होता , त्यांच्यावर मुंबईतील फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे अनेक वेळा राजकीय संघर्ष विसरून याआधी सुद्धा अनेक विरोधकांच्या बाबतीत अशा पद्धतीच्या भेटी घेत असल्याने या भेटीचीही राजकिय वर्तूळात चर्चा आहे.

  • 05 May 2026 01:10 PM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच

    आज सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 4 हजारांची घसरण झाली. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 52 हजार 234 रूपयांवर आले आहेत. तर चांदीचे दर 2 लाख 52 हजार 350 रुपयांवर आहेत. गेल्या चार दिवसांपासून सोन्याने चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे

  • 05 May 2026 01:00 PM (IST)

    लहान बाळ चोरण्याच्या तयारीत असलेल्या एका महिलेला नागरिकांकडून बेदम चोप

    नागरिकांनी चोप दिलेल्या महिलेक कडील बॅग मध्ये चाकू, मुंगीचे औषध आणि स्प्रे आढळून आले आहेत. या महिलेला काळभोर नगर परिसरातील नागरिकांनी पिंपरी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. ही महिला नेमकं कोणत्या कारणासाठी लहान बाळ चोरी करत होती आणि तिचे आणखी काही साथीदार आहेत का ? याचा तपास सध्या पिंपरी पोलीस करत आहेत. मात्र या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील लहान बाळ चोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर वर आला आहे

  • 05 May 2026 12:57 PM (IST)

    नरसापूर घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन सुरू

    नरसापूर घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन सुरूआहे.  सोलापुरातील नागरिक आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु आहे. शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आंदोलनात सहभागी आहेत.

  • 05 May 2026 12:45 PM (IST)

    जळगावच्या 400 ते 500 वर्ष पुरातन अशा तरसोद येथील गणपतीच्या तीर्थक्षेत्रावर भाविकांची मोठी गर्दी

    आज अंगारकी चतुर्थी असल्याने पहाटे चार वाजेपासूनच भाविकांसाठी मंदिर खुल करण्यात आले असून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. जागृत देवस्थान असल्याने गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 1662 साली मंदिराची स्थापना करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी साखरपुडा पार पडल्याची आख्यायिका आहे.

  • 05 May 2026 12:35 PM (IST)

    डोंबिवलीत धक्कादायक घटना

    डोंबिवलीतून एक  धक्कादायक घटना समोर येत आहे. तीन लहान मुलांना रस्त्यावर सोडून आई बेपत्ता झालीची माहिती समोर येत असून, पोलिसांनी शोध कार्य सुरु केलं आहे.

  • 05 May 2026 12:25 PM (IST)

    नाशिकमध्ये शिवसेना महिला आघाडीचे आंदोलन

    पुण्यातील नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेवर अत्याचार व निर्घृण खून प्रकरणी आंदोलन पुकारण्यात आलं आहे. गंभीर प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून महिलांमध्ये तीव्र रोष दिसत आहे.  घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी आक्रमक झाली आहे,  नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

  • 05 May 2026 12:17 PM (IST)

    पोटच्या दोन चिमुरड्यांना डिझेल ओतून जाळण्याचा बापाकडून प्रयत्न

    माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथे कौटुंबिक वादातून दोन चिमुरड्यांना डिझेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीशी सुरू असलेल्या वादाच्या रागातून आरोपीने हे कृत्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला असून महिलेने पोलिसात धाव घेतली आहे. माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

  • 05 May 2026 11:57 AM (IST)

    नंदुरबार शहरात पाणीटंचाईचं संकट?

    नंदुरबार शहरातील नागरिकांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. नंदुरबार शहरात १० मेपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.  उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे धरणांतील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.  वीरचक प्रकल्पात सध्या केवळ ६१ टक्के पाणी शिल्लक आहे. दररोज ७५ लाख लिटर पाण्याची गरज असल्याने प्रशासनावर ताण वाढला आहे.  नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

  • 05 May 2026 11:43 AM (IST)

    लहान बाळ चोरण्याच्या तयारीत असलेल्या महिलेला नागरिकांनी दिला चोप

    पिंपरी चिंचवड शहरातील काळभोर नगर परिसरामध्ये एका अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान बाळ चोरण्याच्या तयारीत असलेल्या एका महिलेला नागरिकांनी पकडून बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं.

  • 05 May 2026 11:32 AM (IST)

    नरसापुर घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन सुरू

    नरसापुर घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन सुरू आहे.  सोलापुरातील नागरिक आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत रस्त्यावर ठिय्या आंदोलन.  शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आंदोलनात सहभागी झालेत.

  • 05 May 2026 11:23 AM (IST)

    पुण्यातील धायरी परिसरात कचऱ्याला लागली आग

    पुण्यातील धायरी परिसरात कचऱ्याला लागली आग, या आगीत पार्क असणारी रिक्षा जळून खाक झाली.  आगीचे कारण अद्याप अस्पष्ट.  लोकवस्तीमध्ये असलेल्या मोकळ्या मैदानावरील कचऱ्याला आग लागल्याने शेजारी उभी असलेली रिक्षा पूर्णपणे जळून खाक.  धायरी येथील खडक चौक परिसरात काल दुपारची घटना.

  • 05 May 2026 11:08 AM (IST)

    सत्तेशिवाय भाजपला दुसरे काही दिसतं नाही. महाराष्ट्रात चांगलं काय घडतंय ? प्रणिती शिंदे यांचे टीकास्त्र  

    – भाजपचं फक्त इलेक्शन टू इलेक्शन सुरूये.  सत्तेसाठी हावरटपणा सुरु आहे. सत्तेशिवाय भाजपला दुसरे काही दिसतं नाही.   राज्यात वारंवार अत्याचार सुरू आहे.  महाराष्ट्रात चांगलं काय घडतंय ?  एका मुलीवर बलात्कार आणि हत्या झाली,  आणि तुम्ही पेढे वाटत फिरताय – प्रणिती शिंदे यांचे टीकास्त्र

  • 05 May 2026 10:57 AM (IST)

    नसरापूर प्रकरणी तो CCTV ठरला निर्णायक; नसरापूर प्रकरणातील आरोपी जेरबंद

    भोर तालुक्यातील नसरापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे हा पोलिसांना चकवा देण्यासाठी मोबाईलचा वापरच करत नव्हता. पूर्वीच्या दोन गुन्ह्यांतून निर्दोष सुटका झाल्यानंतर त्याने तांत्रिक तपासापासून वाचण्यासाठी फोन वापरणे बंद केले होते. तो विविध ठिकाणी शेतमजुरीची कामे करून आपली ओळख लपवत असे. मोबाईल लोकेशन नसल्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते, मात्र अखेर परिसरातील एक सीसीटीव्ही फुटेज या प्रकरणात निर्णायक ठरले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

  • 05 May 2026 10:47 AM (IST)

    नसरापूर अत्याचार प्रकरणावरून संगीता तिवारी यांचा संताप, मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी

    पुण्यातील नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ज्या कोवळ्या मुलीला अजून दुनिया माहीत नाही, तिच्यावर झालेला अत्याचार भयंकर आहे, असे म्हणत त्यांनी कायद्याच्या दिरंगाईवर बोट ठेवले. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझेच्या पाटलाचा चौरंगा केला होता, तशीच कठोर शिक्षा या नराधमाला देण्यात यावी. वारंवार गुन्हे करूनही आरोपी जामिनावर सुटत असल्याने त्यांनी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याप्रकरणी आरोपीला वाचवणाऱ्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.

  • 05 May 2026 10:37 AM (IST)

    पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, कारला लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू

    पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर वडगाव मावळ येथील उड्डाणपुलावर मध्यरात्री दीडच्या सुमारास एक थरारक अपघात घडला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव चारचाकी वाहनाला अचानक भीषण आग लागली. ही आग इतकी वेगाने पसरली की चालकाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही, परिणामी त्याचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली, मात्र तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून वडगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

  • 05 May 2026 10:27 AM (IST)

    नसरापूर अत्याचार प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर मुख्यमंत्र्यांची नजर

    नसरापूर येथील अत्याचार प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत. तपासातील प्रगती, गोळा केलेले पुरावे आणि तांत्रिक बाबींबाबत मुख्यमंत्री सातत्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, पुणे ग्रामीण पोलीस दलाला आवश्यक त्या सूचना त्यांच्याकडून दिल्या जात आहेत. केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील या संवेदनशील प्रकरणाचा पाठपुरावा करत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी तपासाचे वेळोवेळचे अपडेट्स घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 05 May 2026 10:17 AM (IST)

    निकाल लोकशाहीच्या नावाने स्वीकारायचे असतात, पुन्हा उभं राहायचं असतं- संजय राऊत

    ३६५ दिवस रोज निवडणुका कशा लढायच्या आणि कशा जिंकायच्या यावर त्यांचे काम सुरु असते. जगात इतक्या मोठ्या घडामोडी सुरु असताना देशाचे पंतप्रधान दोन महिने ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये स्वत:ला झोकून देतात, गृहमंत्री २० दिवस जाऊन पश्चिम बंगालमध्ये राहतात. संपूर्ण सत्तेचा वापर केला जात आहे. कोण निवडणुका जिंकल्याने कोण निवडणुका हरलं, याबद्दल चर्चाच होऊ शकत नाही, अशाप्रकारच्या या निवडणुका आहेत. हे निकाल लोकशाहीच्या नावाने स्वीकारायचे असतात, पुन्हा एकदा उभं राहायचं असतं.

  • 05 May 2026 10:09 AM (IST)

    नसरापूर प्रकरणातील आरोपीला हाल हाल करत संपवावं – राज ठाकरे

    पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

  • 05 May 2026 09:55 AM (IST)

    चाळीसगावच्या बेलदारवाडीत तीव्र पाणीटंचाई

    चाळीसगावच्या बेलदारवाडीत तीव्र पाणीटंचाई, ग्रामस्थांचा संताप उफाळला. तीव्र पाणीटंचाईविरोधात महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा. ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गावात गेल्या अनेक दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई. कोदगाव धरणात मुबलक प्रमाणावर पाणीसाठा शिल्लक असूनही पाणीटंचाई का? ग्रामस्थांचा संताप

  • 05 May 2026 09:40 AM (IST)

    पिसाळलेल्या कुत्र्याचा अक्षरशः अहाकार, 10 महिलांना चावला

    वाशिमच्या जऊळका येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा अक्षरशः अहाकार पाहायला मिळत आहे.नागरिकांसह तब्बल 10 महिलांना कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली आहे.जखमींना तातडीने मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  • 05 May 2026 09:25 AM (IST)

    धाराशिवमध्ये तीन दिवसांपासून डिझेलची टंचाई

    धाराशिव जिल्ह्यात वाशी आणि कळंब परिसरामध्ये गेले तीन दिवसापासून डिझेलची टंचाई असल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल पंपावर लागले डिझेल संपलेचे बोर्ड. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेतातील कामे ठप्प झाली आहेत.

  • 05 May 2026 09:15 AM (IST)

    महापौर रितू तावडेंनी केली नाल्यांच्या सफाईची पाहणी

    मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज सकाळ पासून मुंबई उपनगरातील विविध नाल्यांच्या सफाईची पाहणी केली.भांडुप, मुलुंड, घाटकोपर, साकीनाका परिसरातील महत्त्वाच्या नाल्यांवर आज महापौर अधिकाऱ्यांसह पोहचल्या आणि किती टक्के नालेसफाई झाली आहे याची माहिती त्यांनी घेतली.या वेळी त्यांनी नालेसफाई सह विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.

  • 05 May 2026 09:00 AM (IST)

    पुण्यातील नसरापूर घटनेच्या साक्षीदाराचे जबाब नोंदवण्यास सुरुवात

    पुण्यातील नसरापूर घटनेच्या साक्षीदाराचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली असून पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने महत्त्वाच्या व्यक्तीची जबाब नोंदवून घेतले आहेत. विशेष तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज विविध तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. नराधमा आरोपी भिमराव कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

  • 05 May 2026 08:50 AM (IST)

    नसरापूर घटनेतील नराधम आरोपी भीमराव कांबळेची तिसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणी पूर्ण

    पुण्यातील नसरापूर घटनेतील नराधम आरोपी भीमराव कांबळेची तिसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली. ससून रुग्णालयात आरोपीची सक्षमता तपासणी करण्यात आली आहे. तपास जलद गतीने करायचा असल्याने सक्षमता तपासणीचा अहवाल तातडीने सादर करण्याचा पोलिसांच्या सूचना आहेत. हा अहवाल लवकरात लवकर द्यावा अशी मागणी पोलिसांनी रुग्णालयाकडे केली आहे.

  • 05 May 2026 08:40 AM (IST)

    जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पत्नीला मिळविण्यासाठी शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी

    सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पत्नीला मिळविण्यासाठी शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षात आमदार महेश शिंदे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यताआहे. पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून भिन्न भूमिका मांडल्याचा महेश शिंदे यांच्यावर आरोप असून याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात शिस्तभंगाबाबत कठोर भूमिका घेतली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाविरोधी विधान किंवा कृती सहन केली जाणार नाही, असाही इशारा देण्यात आला आहे.

  • 05 May 2026 08:30 AM (IST)

    जळगावमध्ये वाढत्या तापमानाचा विमानसेवेवरदेखील मोठा परिणाम

    जळगावमध्ये वाढत्या तापमानाचा विमानसेवेवरदेखील मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. विमानसेवा सुरळीत राहावी यासाठी विमान कंपन्यांकडून प्रवासी संख्या कपात करण्यात आल्याची माहिती विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दिली. वाढत्या उष्णतेमुळे हवामान कोरडं होऊन वातावरणातील हवेचा दाब कमी झाल्याने विमान उड्डाण करण्यासाठी अडचणी येत आहेत.

  • 05 May 2026 08:20 AM (IST)

    त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन काळाबाजार प्रकरणात पाच आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

    नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन काळाबाजार प्रकरणात पाच आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. नाशिक न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्यासह चार जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. व्हिआयपी दर्शनासाठी पैसे उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने न्यायालयाने जामीन नाकारला आहे.

  • 05 May 2026 08:11 AM (IST)

    मुंबई-सातारा हायवे मार्गावरील आंदोलनाबाबत पुणे पोलिसांचं स्पष्टीकरण

    भोर तालुक्यातील नसरापूर इथल्या बालिकेवरील अत्याचार आणि खून प्रकरणानंतर शनिवारी सायंकाळी नवले पुलाजवळ मुंबई-सातारा मार्गावर आंदोलन करण्यात आलं होतं. त्यामुळे वाहतूक चार तास ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलक आणि पीडितेच्या कुटुंबीयांशी चर्चा केली, मात्र काही जण आंदोलन मागे घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अनेकजण वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. अखेर सौम्य बळाचा वापर करावा लागला, असं पोलिसांनी स्पष्ट केलं.

  • 05 May 2026 08:09 AM (IST)

    हत्तीपाय रोगाचा पुण्यात शिरकार; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात 44 रुग्ण

    विदर्भातील जिल्ह्यात प्रामुख्याने आढळणाऱ्या हत्तीपाय रोगाचा शिरकाव आता पुण्यातही झाला आहे. जिल्ह्यात एकूण 44 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे शहर ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमधील रुग्णांचा समावेश असून बहुतांश रुग्ण इतर जिल्ह्यातून स्थलांतरित झाले आहेत.

  • 05 May 2026 08:08 AM (IST)

    नसरापूर प्रकरणातील मुलीच्या तोंडात आढळला मोजा; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर

    नसरापूर इथं साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना आरोपीने मुलीच्या तोंडात मोजा कोंबल्याच तसेच छातीवर वळ उमटल्याचं शवविच्छेदन करताना निदर्शनास आलं. ससून रुग्णालय प्रशासनाने शविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला आहे. नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या बालिकेवर 65 वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केली.

Published On - May 05,2026 8:05 AM

Follow Us
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच...
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच....
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर.
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या....
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या.....
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या...
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या....
परभणीत भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
परभणीत भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू.
नाशिक विधान परिषद जागेवर महायुतीतच चुरस; भाजप-शिंदे सेना आमनेसामने
नाशिक विधान परिषद जागेवर महायुतीतच चुरस; भाजप-शिंदे सेना आमनेसामने.
वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; अंबाजोगाईला हलवण्याच्या हालचाली सुरु..
वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; अंबाजोगाईला हलवण्याच्या हालचाली सुरु...
देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट...
देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट....
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....