AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : यशवंतराव चव्हाण कनेक्टिंग लिंकवर अपघातांची मालिका; 2 वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात

| Updated on: Oct 06, 2026 | 8:17 AM
Share

Maharashtra News LIVE : 2026 च्या खरीप हंगामातील कळ-1 लागू झालेल्या राज्यातील 284 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पुढील वर्षापर्यंत अल-निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने सर्व संबंधित यंत्रणांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश दिले.

Maharashtra News LIVE : यशवंतराव चव्हाण कनेक्टिंग लिंकवर अपघातांची मालिका; 2 वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात
लाइव्ह अपडेट्सImage Credit source: Instagram

LIVE NEWS & UPDATES

  • 06 Oct 2026 08:45 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यात यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद

    धाराशिव जिल्ह्यात यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ६२ टक्के पावसाची नोंद झाली असून, २२५ पैकी तब्बल ५० प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ११४ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या असून, २१२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तसेच सहा गावांना आठ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ६.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

  • 06 Oct 2026 08:35 AM (IST)

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकवर कंटेनर आणि खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकवर कंटेनर आणि खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर पुढे जाणाऱ्या कंटेनरला मागून खासगी ट्रॅव्हल बसने धडक दिली. या अपघातात बसमधील ५ ते ६ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून, वाहनचालकांना पर्यायी मार्गाने द्रुतगती महामार्गावर वळवण्यात आले होते. अपघातग्रस्त वाहने हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.

  • 06 Oct 2026 08:25 AM (IST)

    सोलापूर शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांविरोधात भाजप आमदार देवेंद्र कोठे यांची आक्रमक भूमिका

    सोलापूर शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांविरोधात भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार कोठे यांनी मध्यरात्री शहरातील विविध भागात फिरून रस्त्यांवर पडलेल्या कचऱ्याची पाहणी केली आणि यावेळी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. सोलापूर शहर कचरामुक्त आणि धुळमुक्त करण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहणीदरम्यान अनेक घंटागाडी चालक घरोघरी जाऊन कचरा संकलित करत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही ठिकाणी घंटागाड्यांकडून केवळ रस्त्यावर साचलेला कचरा उचलला जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा प्रकारे काम करणाऱ्या घंटागाडी चालकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला असून, दररोज एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

  • 06 Oct 2026 08:15 AM (IST)

    नाशिककरांवर पुन्हा एकदा पाणी कपातीचे संकट

    नाशिककरांवर पुन्हा एकदा पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. राज्यातील मर्यादित जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांना किमान १० टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. यासंदर्भात आज होणाऱ्या महापालिकेच्या महासभेत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • 06 Oct 2026 08:12 AM (IST)

    नाशिक- नऊ महिन्यांपासून रखडलेल्या १० स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्ती प्रक्रियेला सुरुवात

    नाशिक महापालिका निवडणुकीनंतर तब्बल नऊ महिन्यांपासून रखडलेल्या १० स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्ती प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रतीक्षा करणाऱ्या राजकीय पक्षांना आता दिलासा मिळणार आहे. उच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने नियुक्तीची प्रक्रिया गतिमान केली आहे. त्यानुसार येत्या २१ ऑक्टोबरपर्यंत सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या वाट्याला आलेल्या जागांसाठी इच्छुक उमेदवारांची नावे महापालिकेकडे सादर करावी लागणार आहेत. पक्षांकडून उमेदवारांची नावे प्राप्त झाल्यानंतर संबंधित उमेदवारांचे अर्ज स्वीकारून त्यांची छाननी करण्यात येईल.

  • 06 Oct 2026 08:11 AM (IST)

    यशवंतराव चव्हाण कनेक्टिंग लिंकवर मध्यरात्रीपासून अपघातांची मालिका

    रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील यशवंतराव चव्हाण कनेक्टिंग लिंकवर मध्यरात्रीपासून अपघातांची मालिका पाहायला मिळाली. पहाटे सुमारे ३ वाजता केळी वाहतूक करणारा पिकअप टेम्पो अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याच्यावर खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेम्पो पलटी झाल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात केळी विखुरल्याने मिसिंग लिंकवर अक्षरशः केळ्यांचा ढीग साचला होता. अपघातग्रस्त टेम्पो आणि रस्त्यावर पडलेल्या केळी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, याच मार्गावर बस आणि ट्रकमध्येही भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ६ ते ७ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

  • 06 Oct 2026 08:09 AM (IST)

    नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात स्वच्छता मोहीम

    नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात स्वच्छता मोहीम सुरू आहे. श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात स्वच्छता आणि साफसफाईला वेग आला आहे. मंदिराचं शिखर पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात येत आहे. नवरात्रौत्सवासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. सध्या तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरू असून ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे.

संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलसंपदा विभागाने पाण्याचे धरणनिहाय आणि वापरनिहाय सूक्ष्म नियोजन केलं आहे. पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं असून 16 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान दहा टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तर दुसरीकडे औद्योगिक क्षेत्राने उपलब्ध एकूण वापरापैकी किमान 30 टक्के पाण्याचा पुनर्वापर करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यासह राज्य, क्रीडा, मनोरंजन आणि राष्ट्रीय क्षेत्रातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..

Published On - Oct 06,2026 8:07 AM

Follow Us
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?