Maharashtra News LIVE : भोंदू अशोक खरातला फाशीची शिक्षा देण्याची सुनील तटकरे यांची मागणी
Maharashtra News LIVE Updates : मध्य रेल्वेच्या एल्फिन्स्टन पुलावरील जुना गर्डर हटवण्यात आला असला तरी दादर ते सीएसएमटी दरम्यान रेल्वे वाहतूक अद्याप बंद आहे, तर नाशिकमधील भोंदू बाबा खरात प्रकरणातील संशयित मुलगा फरार झाला आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीनिवासन यांचा राजीनामा
टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीनिवासन यांचा राजीनामा. श्रीनिवासन यांच्याकडून हीराबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तपदाचा राजीनामा. ट्रस्टचे माजी विश्वस्त मेहिल मेस्त्री यांनी श्रीनिवासन यांच्या नियुक्तीला धर्मादाय आयुक्तांकडे आव्हान दिलं होतं. यानंतर श्रीनिवासन स्वत:च पदावरुन पायउतार झाले
-
चाकणमध्ये प्रियकराच्या जाचाला कंटाळून तरुणीची आत्महत्या
पुण्याच्या चाकणमध्ये प्रियकराच्या जाचाला कंटाळून तरुणीची आत्महत्या…. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक… प्रियकराविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल… आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू…
-
-
भंडाऱ्याच्या शेतशिवारात शेतसाहित्य चोरणारी टोळी सक्रीय
भंडाऱ्याच्या शेतशिवारात शेतसाहित्य चोरणारी टोळी सक्रीय… शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण… एकाच रात्री 4 शेतकऱ्यांचे सौर कृषी पंपांचे केबल लंपास… ऐन उन्हाळी पिकाच्या वेळी चोरी वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता….
-
मंत्रालयातल्या कामासाठी लाच घेण्याचं आणखी एक प्रकरण समोर
मंत्रालयातल्या कामासाठी लाच घेण्याचं आणखी एक प्रकरण समोर. खारघर परिसरात सापळा रचून लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं. अर्थ आणि नियोजन विभागात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असणारे विलास लाड यांना अटक. निधी मंजूर करून देण्यासाठी 6 लाख 37 हजारांची लाच घेताना अटक. मंत्रालयातल्या लाचखोरीला चाप बसवण्यासाठी पुन्हा एकदा कारवाई.
-
तुळजाभवानी मंदिरामध्ये चैत्री यात्रेनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी
तुळजाभवानी मंदिरामध्ये चैत्री यात्रेनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी.. म्हाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून भावीक देवीच्या दर्शनाला.. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर परिसरात संस्थे तर्फे विविध सुविधा..
-
-
मालाड मालवणी तहसील कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल
दत्तप्रसाद बोभाटे यांनी असा आरोप केला आहे की मालाड पश्चिम, मालवणी येथील माने नावाचा तलाठी शनिवार दि. ०५ एप्रिल रोजी सायंकाळी ५०० रुपयांची लाच मागताना पकडला गेलाय. सामाजिक कार्यकर्ते दत्तप्रसाद बोभाटे यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला. बोभाटे यांनी सांगितले बोरीवली तहसिल कार्यालय ते तलाठी कार्यालय दलालांची साखळी बनली आहे. विद्यार्थी, विधवा, दिव्यांग बांधव यांच्याकडून शैक्षणिक व योजनांसाठी लागणार्या दाखल्यांसाठी ५ ते १० हजार रुपये लाच मागितली जात आहे. ही लाच स्वीकारण्यासाठी दलालांना नेमले जात आहे.
-
नाशकात अखिल भारतीय संत समितीची राष्ट्रीय बैठक
नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीची राष्ट्रीय बैठक पार पडली. नाशिक- त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहेत. आज बैठकीच्या होणाऱ्या समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय बैठकीला साधू – महंत जगद्गुरु विविध आखाड्यांचे महंत उपस्थित असतील.
-
-
आज जे काही मिळाले ते फक्त बाळासाहेबांच्या संविधान मुळे
आजचा दिवस माझ्यासाठी आंनदाचा आहे. भिकू समाजाचा आशीर्वाद घेऊन मी उद्या दिल्लीला शपथविधीसाठी जात आहे. आज जे काही मिळाले ते फक्त बाळासाहेबांच्या संविधान मुळे आहे. आज युद्धाची गरज नाही तर बौद्धाची गरज आहे. शेतकरी या सगळ्यांचा आवाज बनण्याचं काम मी नक्कीच राज्यसभेमध्ये माझ्या कारकिर्दीमध्ये करेल. बाबासाहेब आंबेडकरांना डीजेच्या तालावर नाचणारी नव्हे तर पुस्तक वाचणारी माणसं पाहिजे. बाबासाहेबांची पुस्तक वाचूया बाबासाहेबांना डोक्यावर घेण्यापेक्षा बाबासाहेबांचा विचार डोक्याच्या आत मध्ये घेऊयात. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की पुस्तक मानसाच मस्तक संपन्न करतं जे संपन्न मस्तक आहेत ते कधी कुणाचं हस्तक बनत नाही आणि जे मस्तक कधी कुणाचं हस्तक बनत नाही कोणासमोर नतमस्तक होत नाही, असे खासदार ज्योती वाघमारे म्हणाल्या.
-
कातकरी वस्तीवर पाणी टंचाई
इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव ग्रामपंचायत हद्दीतील कातकरी वस्तीवर पाणी टंचाई दिसून आली. 100 लोकवस्ती असलेल्या कातकरी वस्तीवर पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. डोंगर टेकड्या पार करून पाणी आणावे लागत आहे. लेकरा बाळांना कडेवर घेऊन एक किमी ची पायपीट करत पाणी आणावे लागते. दिवसातून काम सोडून महिलाना तीन ते चार खेपा माराव्या लागतात. आपला रोजगार बुडवून महिला पाणी भरत आहेत.
-
कृष्णा नदीत सुरू झाला बोटीचा थरार
सांगलीच्या कृष्णा नदीत अखिल भारतीय कनोईंग व कयाकिंग स्पर्धांना आज पासून प्रारंभ झाला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. 40 विद्यापीठ मधील 685 खेळाडूंना या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.तीन दिवस या स्पर्धा पार पडत आहेत. सांगलीच्या सरकारी कृष्णा नदी घाट परिसरात या स्पर्धा पार पडत आहेत.
-
तुळजाभवानी मंदिरामध्ये चैत्री यात्रेनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी
आज रविवारची सुट्टी आणि चैत्री पौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर मध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत तुळजाभवानी मंदिरामध्ये यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर संस्थांनी मंदिर परिसरामध्ये सुविधा उभ्या केल्या आहेत या चैत्री पौर्णिमेचे अवचित साधून तुळजाभवानी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे
-
सुनील तटकरेंचे तुळजाभवानी देवीला साकडे
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून तुळजाभवानीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साकडे घातले. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची बारामती येथील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी बोलणी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
-
मोहफूल वेचायला गेलेल्या ग्रामस्थाचा वाघाच्या हल्यात मृत्यू
नागभीड तालुक्यातील मींथुर येथे धक्कादायक घटना घडली आहे. हरिदास महादेव कुबडे (५८) असं मृतकाचं नाव असून शनिवारी सकाळी ते शेतात मोहफुले वेचण्यासाठी गेले होते. मात्र संध्याकाळ होऊनही ते परत आले नाही. या बाबत वनविभाग आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी शोध मोहीम राबवली असता आज सकाळी शेताजवळ असलेल्या नाल्यामध्ये बेपत्ता शेतकऱ्यांच्या मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास वनविभाग आणि नागभीड पोलीस करत आहेत.
-
आता खेळ हे करिअर बनले आहे – मत्री चंद्रकांत पाटील
एकेकाळी खेळायला गेल्यावर पालक आपल्या मुलांना रागवत होते. अभ्यास करायचा नाही का. पण आता खेळाला फार महत्त्व आले आहे.कारण याच खेळातून विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी लागते. त्यासाठी खेळ पण आता करिअर बनले आहे. असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. ते सांगली मध्ये कृष्णा नदीत बोटीचा स्पर्धां उदघाटन प्रसंगी बोलत होते.
-
ठाण्याच्या गडकरी रंगायतन मध्ये आंतरराष्ट्रीय बौद्धधम्म परिषदचे कार्यक्रम आयोजित
ठाण्याच्या गडकरी रंगायतन मध्ये आंतरराष्ट्रीय बौद्धधम्म परिषदचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल होणार आहेत. दीप प्रज्वलनच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री यांची हजेरी असणार आहे. खासदार ज्योती वाघमारे कार्यक्रमाला हजर आहेत.
-
भोंदू अशोक खरातला फाशीची शिक्षा देण्याची सुनील तटकरे यांची मागणी
भोंदू अशोक खरातला फाशी देण्याची सुनील तटकरे यांनी मागणी केली खरात असो कोणीही असो विकृत मनोवृत्तीच्या लोकांना ठेचून फाशीची शिक्षा द्यावी, हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे खरात प्रकरणावर सुनील तटकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने एसआयटीच्या माध्यमातून भोंदू अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि ज्यांचा ज्यांचा या प्रकरणाशी संबंध आला त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली…
-
कृष्णा नदीत सुरू झाला बोटीचा थरार
सांगलीच्या कृष्णा नदीत अखिल भारतीय कनोईंग व कयाकिंग स्पर्धांना आज पासून प्रारंभ झाला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. 40 विद्यापीठ मधील 685 खेळाडूंना या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.तीन दिवस या स्पर्धा पार पडत आहेत. सांगलीच्या सरकारी कृष्णा नदी घाट परिसरात या स्पर्धा पार पडत आहेत.
-
एका विशिष्ट तारखेला भोंदू बाबा अशोक खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडल्याची माहिती
एका विशिष्ट तारखेला भोंदू बाबा अशोक खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडल्याची माहिती समोर येत आहे. ‘त्या’ तारखेमागील रहस्य काय आहे, हा पोलीस खात्यात चर्चेचा विषय ठरला आहे. ‘त्या’ तारखेला खरातने खाते उघडले आहे का, त्याबाबत सर्व माहिती पोलिसांनी काही पतसंस्थाकडून मागवली आहे.
-
सांगलीच्या कृष्णा नदीत अखिल भारतीय कनोईंग आणि कयाकिंग स्पर्धांना आजपासून प्रारंभ
सांगलीच्या कृष्णा नदीत अखिल भारतीय कनोईंग आणि कयाकिंग स्पर्धांना आजपासून प्रारंभ झाला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. 40 विद्यापीठांमधील 685 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तीन दिवस या स्पर्धा पार पडणार आहेत. सांगलीच्या सरकारी कृष्णा नदी घाट परिसरात या स्पर्धा पार पडत आहेत.
-
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम टरबूज निर्यातीवर
जळगाव- आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम टरबूज निर्यातीवर झाला असून निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात टरबूजाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. व्यापाऱ्यांकडून केवळ तीन ते चार रुपये प्रति किलो दराने खरेदी केली जात असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. व्यापाऱ्यांनी खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारात आणि रस्त्यावर उतरून टरबूज विक्री करावी लागत आहे. देशांतर्गत बाजारात मागणी घटल्याने टरबूजाचे दर कोसळले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
-
टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीनिवासन यांचा राजीनामा
टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीनिवासन यांनी राजीनामा दिला आहे. हीराबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तपदाचा राजीनामा त्यांनी दिला आहे. माजी विश्वस्तांनी श्रीनिवास यांच्या नियुक्तीला आव्हान दिलं होतं.
-
धाराशिव- भोंदू अशोक खरातला फाशीची शिक्षा देण्याची सुनील तटकरे यांची मागणी
धाराशिव- भोंदू अशोक खरातला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुनील तटकरे यांनी केली. खरात असो किंवा आणखी कोणीही असो.. विकृत मनोवृत्तीच्या लोकांना ठेचून फाशीची शिक्षा द्यावी, हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावं, अशी मागणी सुनील तटकरेंनी केली. सरकारने एसआयटीच्या माध्यमातून भोंदू अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि ज्यांचा ज्यांचा या प्रकरणाशी संबंध आला त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
-
दीक्षित सोलंकी यांचं पार्थिव अद्याप मुंबईत परतलेलं नाही
मुंबईतील कांदिवलीमध्ये राहणारा दीक्षित सोलंकी यांचं ओमानच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू ऑईल टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला होता. दीक्षितचे वडील अमृतलाल सोलंकी आणि बहीण मिताली सोलंकी यांनी त्याचं पार्थिव आणण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज दीक्षित सोलंकी यांचं पार्थिव मुंबईत येण्याची शक्यता होती पण अजून आलेलं नाही. दीक्षितचं पार्थिव अद्याप भारतात परतलेलं नाही, यामुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठी चिंता आहे.
-
गॅस टंचाईच्या फटक्याने ग्रामीण भागात महिलांची चुलीसाठी लाकडं जमा करण्यासाठी धडपड सुरू
सध्या अमेरिका इराण युद्धाचा फटका सर्वत्र घरगुती गॅस धारकांना बसतोय बुकिंग केल्यावरही यास मिळत नसल्याची ओरड आहे. भुसावळ ग्रामीण भागात महिलांची ही धडपड सुरू आहे. सध्या ग्रामीण भागात महिला भर उन्हात चुलीसाठी लाकडं जमा करताना दिसत आहे. भर उन्हात ही महिलांची पायपीट सुरू आहे
-
नाशिकमध्ये शालेय विद्यार्थ्यांची तुफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
किरकोळ कारणातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. हे सर्व विद्यार्थी नाशिकच्या वडाळा परिसरातील एका शाळेतील आठवी आणि नववीतील असल्याचे समोर. किरकोळ कारणातून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, स्थानिक नागरिकांची विद्यार्थ्यांची हाणामारी सुरू असताना सोडवासोडव
-
जळगावात गॅस एजन्सी धारकांना घरपोच सिलिंडर देणे बंधनकारक: जिल्हा पुरवठा विभागाचे आदेश
एजन्सी किंवा गोडाऊनमधून सिलेंडर दिले तर थेट कारवाई करण्याचा इशारा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गॅस एजन्सींविरुद्ध जिल्हा पुरवठा विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना मोरे यांनी कारवाई संदर्भातले आदेश पारित केले आहेत…गॅस सिलिंडरचे गोडाऊन किंवा कार्यालयातून होणारे थेट वितरण तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात देण्यात आले आहेत
-
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा- संजय राऊत
बारामतीच्या पोटनिवडणुकीबद्दल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. महाविकास आघाडी एकसंघ म्हणन राहिल, असे राऊतांनी नुकताच म्हटले आहे.
-
मंत्री उदय सामंत शरद पवार यांच्या भेटीला..
मंत्री उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. मात्र, त्यांच्या या भेटीचे कारण पुढे येऊ शकले नाहीये. या भेटीमुळे आता राजकीय चर्चाना उधाण आल्याचे बघायला मिळतंय. या भेटीमुळे विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.
-
सुनेत्रा पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा- संजय राऊत
बारामती विधानसभेच्या बिनविरोध निवडणुकीच्या मुद्द्यावर सुनेत्रा पवार यांनी ठाकरेंसोबत चर्चा केल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी उमेदवार देणार नसल्याची भूमिका घेतल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
-
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज शेतकऱ्यांच्या बांधावर; अवकाळीने झालेल्या पीक नुकसानीची करणार पाहणी
बारामती तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या केळी, गहू, कलिंगड आणि इतर पिकांची प्रत्यक्ष पाहणी करतील. अवकाळीच्या तडाख्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या भेटीदरम्यान सुनेत्रा पवार बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा देणार आहेत.
-
चंद्रपूरला पावसाने झोडपले; विजेच्या कडकडाटासह पहाटेच जोरदार हजेरी, अनेक भागांत वीज गुल
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात आज पहाटे पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे शहराच्या अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला, परिणामी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून सोसाव्या लागणाऱ्या उष्णतेनंतर या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, तापमानात घट झाल्याने चंद्रपूरकरांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, पहाटेच्या सुमारास झालेल्या या पावसामुळे आणि वीज नसल्याने दैनंदिन कामकाजावर काही काळ परिणाम झाला होता.
-
पोल्ट्री उद्योगावर युद्धाचे सावट; निर्यात ठप्प झाल्याने अंड्यांचे दर कोसळले
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट तडाखा आता भारतातील पोल्ट्री उद्योगाला बसू लागला आहे. युद्धा मुळे महत्त्वाची निर्यात पूर्णपणे बंद झाल्याने लाखो अंडी देशांतर्गत बाजारपेठेत अडकून पडली आहेत. यामुळे पुरवठा वाढून अंड्यांचे दर उत्पादन खर्चापेक्षाही खाली घसरले असून, व्यावसायिकांना प्रति अंडे सुमारे १ रुपयाचे नुकसान सोसावे लागत आहे. एकीकडे कोंबड्यांच्या खाद्याचे दर गगनाला भिडलेले असताना दुसरीकडे अंड्याला मिळणारा कमी भाव, अशा दुहेरी संकटात पोल्ट्री चालक अडकले आहेत. निर्यातीचे दरवाजे बंद झाल्याने सध्या हा संपूर्ण उद्योग मोठ्या आर्थिक गर्तेत सापडला असून, छोटे व्यावसायिक मोठ्या तोट्याचा सामना करत आहेत.
-
बीड जिल्ह्यात पुतळे बसवण्याची स्पर्धा; २७ महिन्यांत १२८ अनधिकृत पुतळे, ५०० जणांवर कारवाई
बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून महापुरुषांचे पुतळे बसवण्यावरून एक वेगळीच स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्यातून प्रशासकीय पेच निर्माण झाला आहे. गेल्या २७ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल १२८ अनधिकृत पुतळे उभारण्यात आले आहेत. विशेषतः गेवराईतील घटनेनंतर हे प्रमाण वाढले असून, केवळ दोन वर्षांत प्रशासनाची परवानगी न घेता हे पुतळे बसवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १०९ फौजदारी गुन्हे दाखल केले असून, सुमारे ५०० कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. “महापुरुषांच्या पुतळ्यांना विरोध नाही, मात्र नियमानुसार समिती स्थापन करून त्यांचे संवर्धन करणे आणि महापुरुषांचे विचार आचरणात आणणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी केले आहे.
-
भोंदू अशोक खरातचा मुलगाही नॉट रिचेबल; पोलिसांना न सांगताच शहर सोडून गायब
नाशिकमधील बहुचर्चित भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एक नवीन वळण आले आहे. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात हा पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता शहर सोडून गायब झाला असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी कल्पना खरात फरार झाल्यानंतर पोलिसांनी हर्षवर्धनला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दोन दिवस कसून चौकशी केल्यानंतर त्याला सोडण्यात आले होते, मात्र त्यानंतर तो अचानक गायब झाल्याने पोलीस तपासात अडचणी वाढल्या आहेत. एकीकडे पोलीस मुख्य आरोपी कल्पना खरातचा शोध घेत असतानाच आता हर्षवर्धनही बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली असून, पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर; कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी संत समितीच्या बैठकीला लावणार हजेरी
पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या जय्यत तयारीसाठी नाशिकमध्ये हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर येत असून, अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्य समिती बैठकीच्या समारोप सत्राला ते उपस्थित राहणार आहेत. कुंभमेळ्याचे नियोजन, साधू-महंतांच्या सोयी-सुविधा आणि ‘नशामुक्त कुंभ’ संकल्पनेवर या बैठकीत विशेष मंथन करण्यात येत आहे. आगामी कुंभमेळा जागतिक स्तरावर आदर्श ठरावा या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचा हा दौरा आणि संतांशी होणारा संवाद अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
-
एल्फिन्स्टन पूल तोडकामाचा फटका; दादर ते सीएसटी रेल्वे सेवा ठप्प, प्रवाशांचे प्रचंड हाल
एल्फिन्स्टन पुलावरील गर्डर हटवण्याच्या कामासाठी घेण्यात आलेल्या विशेष ब्लॉकमुळे आज मुंबईकरांना मोठ्या रेल्वे विलंबाचा सामना करावा लागत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सध्या केवळ दादर स्थानकापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली असून, दादर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानची सेवा पूर्णपणे बंद आहे. पुलाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण झाले असले तरी, ओव्हरहेड वायरमधील तांत्रिक अडचणींमुळे रेल्वे पुन्हा सुरू करण्यास विलंब होत आहे. परिणामी दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली असून, रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने उद्घोषणा करून प्रवाशांना परिस्थितीची माहिती दिली जात आहे.
-
मुंबईतील ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा, अवजड गर्डर यशस्वीरीत्या हटवला
मध्य रेल्वेने मुंबईतील ऐतिहासिक एल्फिन्स्टन रोड पुलाच्या संवर्धनासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सुमारे ११३ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास लाभलेल्या या पुलाचा जुना आणि वजनदार गर्डर गॅस कटिंगच्या साहाय्याने यशस्वीरीत्या कापून वेगळा करण्यात आला. शनिवारी रात्री ११:३० वाजल्यापासून सुरू झालेली ही मोहीम पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होती. एका महाकाय क्रेनच्या साहाय्याने हा गर्डर उचलून बाजूला करण्यात आला असून, रेल्वेच्या या अत्यंत कठीण आणि तांत्रिक मोहिमेमुळे पुलाच्या पुनर्बांधणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
मुंबईत आज ऐतिहासिक एल्फिन्स्टन पुलाचा ११३ वर्षे जुना गर्डर मध्य रेल्वेने यशस्वीरित्या हटवला असला, तरी ओव्हरहेड वायरच्या कामामुळे दादर ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक अद्याप विस्कळीत आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. अनेक गाड्या दादरपर्यंतच चालवल्या जात आहेत. दुसरीकडे, नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक वळण आले आहे. त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात पोलिसांना न सांगताच गायब झाला आहे. या प्रकरणातील पीडित महिला प्रचंड मानसिक धक्क्यात असून त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत. विशेष तपास पथकाने महिलांना सुरक्षिततेची ग्वाही दिली असून तपासाचा वेग वाढवला आहे. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपेड्टस वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Apr 05,2026 8:58 AM
