AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 18th May 2025 : हे सरकार शेतकऱ्यांचं नाही, सरकारला मेट्रोमध्ये रस, दानवे यांची टीका

| Updated on: May 23, 2025 | 9:15 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 18 मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 18th May 2025 : हे सरकार शेतकऱ्यांचं नाही, सरकारला मेट्रोमध्ये रस, दानवे यांची टीका

दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. बंडखोरी करत 15 नगरसेवकांकडून इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.दरम्यान मुंबईला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांची पातळी साठवण क्षमतेच्या 18 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. मुंबईकरांना पुढील 60 दिवस पाणीपुरवठा करता येईल, इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात न्याय मिळण्याच्या मागणीसाठी बीड परळी महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. जलालपूर भागात शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाली होती आणि याच प्रकरणात बीड परळी महामार्गावरील पांगरी येथे रास्तार रोको करण्यात आला. कल्याण स्टेशन परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाची बांग्लादेशीवर कारवाई. या कारवाईत 15 वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य, करणाऱ्या बांग्लादेशी महिलेला गुन्हे शाखा पथकाने ताब्यात घेतलं. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 May 2025 09:20 AM (IST)

    राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक केल्यानंतर स्टेशन डायरी नोंद

    बावधन पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक केल्यानंतर स्टेशन डायरी नोंद केली… राजेंद्र हगवणे व सुशील हगवणेला शिवाजीनगर कोर्टात दुपारी दोन वाजता हजर करणार…किती दिवसाचं रिमांड बावधन पोलिसांकडून मागितली जाणार? राजेंद्र व सुशीलला कोणी मदत केली ते कुठल्या ठिकाणी लपून बसले होते त्याचा शोध घ्यायचा आहे अशी अनेक कारणावर पोलीस मागणार रिमांड…

  • 23 May 2025 09:06 AM (IST)

    कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो ‘पीपीपी’ मॉडेलवर; महिनाअखेरपर्यंत निघणार निविदा

    बदलापूर, शीळफाटा, महापे, घनसोली, निळजे आदी भागांना थेट मुंबईशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिकेच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) महिनाअखेरपर्यंत टेंडर (स्वारस्य निविदा) काढली जाणार आहे. सार्वजनिक- खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) ३८ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार असून, घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेनंतर मुंबईतील दुसरी पीपीपी तत्त्वावरील मेट्रो मार्गिका ठरणार.  मेट्रो १४ मार्गिका ३८ किमी लांबीची असून, तिच्यावर एकूण १५ स्थानके असतील. या मार्गिकेला कांजूरमार्ग येथून सुरुवात होणार असून, घनसोलीपर्यंत ती भूमिगत असेल. हा मार्ग ठाणे खाडीखालून जाणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून, महिना अखेरपर्यंत एमएमआरडीएकडून स्वारस्य निविदा जाहीर होणार

  • 18 May 2025 07:50 PM (IST)

    बोरिवलीमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी, दोघांचा मृत्यू

    बोरिवली येथील एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सध्या, एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपींचा शोध सुरू आहे. जुन्या वादातून दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे.

  • 18 May 2025 07:32 PM (IST)

    जालन्याला पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी पाऊस

    जालन्यात जोरदार अवकाळी पाऊस

    भोकरदन तालुक्यात पावसाची बॅटिंग

    सर्व दूर जोरदार अवकाळी पावसाची हजेरी

    केदारखेडा येथे वीज पडून 19 वर्षीय तरुणाचा तर सिपोरा बाजार या ठिकाणी बैलाचा विज पडून मृत्यू

    शिपोरा बाजार आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे मोठं नुकसान

  • 18 May 2025 06:41 PM (IST)

    जळगावच्या पारोळा तालुक्यात दोन दुचाकींची धडक, चार जण गंभीर जखमी

    जळगावच्या पारोळा तालुक्यातील हनुमंतखेडा फाट्यानजीक दोन मोटारसायकलींच्या धडकेत चार जण गंभीर जखमी

    चारही गंभीर जखमींना पारोळा कुटीर रुग्णालय येथे उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.

  • 18 May 2025 06:38 PM (IST)

    हे सरकार शेतकऱ्यांचं नाही, सरकारला मेट्रोमध्ये रस, दानवे यांची टीका

    हे सरकार शेतकऱ्यांचं नाही- अंबादास दानवे

    सरकारला मेट्रोमध्ये रस, दानवे यांची टीका

  • 18 May 2025 05:37 PM (IST)

    पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार

    मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवादी सैफुल्लाह खालिदची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या मारुन सैफुल्लाह खालिदला संपवण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सैफुल्लाह खालिदची हत्या करण्यात आलीय. सैफुल्लाह खालिद हा लष्कर ऐ तैयबाचा टॉपचा कमांडर होता.

  • 18 May 2025 05:19 PM (IST)

    शरद पवारांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन, कारण काय?

    राष्ट्रवादी काँग्रेस शप गटाचे प्रमुख शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला आहे. शरद पवारांनी पुरंदरमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात दादांना फोन केलाय. शरद पवारांनी या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संपर्क केला. मात्र फडणवीस यांच्यासह संपर्क न झाल्याने शरद पवारांनी अजित पवार यांना संपर्क साधला.

  • 18 May 2025 05:06 PM (IST)

    जालन्यातील विविध भागात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस, शाळेवरील पत्रे उडाले

    जालना जिल्ह्याच्या विविध भागात दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. दुसरीकडे बदनापूर तालुक्यातील अकोला गावातही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. तर वादळी वाऱ्यामुळे या गावातील शाळेचे पत्रे उडाले. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दुखापत झाली नाही.

  • 18 May 2025 05:02 PM (IST)

    ठाण्यात ठाकरे गटाची भारतीय तिरंगा सन्मान यात्रा अंतर्गत बाईक रॅली

    ठाण्यात ठाकरे गटाकडून भारतीय तिरंगा सन्मान यात्रा अंतर्गत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली या रलँची आयोजन करण्यात आलंय. ही रॅली शहीद उद्यान,पाटीलवाडी येथे समाप्त होईल. त्यानंतर शहीद उद्यानात शहीद झालेल्या वीर जवानांना आणि पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 26 पर्यटकांना श्रद्धांजली देण्यात येणार आहे.

  • 18 May 2025 03:52 PM (IST)

    पवार म्हणाले वाझेला घेणार नाही मात्र थोड्या दिवसांनी सेवेत घेतले- अबु आझमी

    शरद पवार म्हणाले वाझेला घेणार नाहीत असे म्हणाले. मात्र थोड्या दिवसांनी त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं. परमवीर सिंग आयुक्त होते. ते मला म्हणाले वाझे कामाचा माणूस आहे असे नेते अबु आझमी यांनी म्हटले आहे.

  • 18 May 2025 03:35 PM (IST)

    राऊत काही स्वातंत्र्य लढ्यासाठी जेलमध्ये गेले नव्हते – दानवे यांची टीका

    राऊत काही स्वातंत्र्य लढा लढून आलेले आणि जेलमध्ये नव्हते गेले. ते कोणत्या कारणामुळे जेलमध्ये गेले होते हे त्यांनी रोखठोक मध्ये लिहावं असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे

  • 18 May 2025 03:25 PM (IST)

    एससी प्रवर्गात वर्गवारी करण्याचा न्या. भूषण गवई यांचा निर्णय चूकीचा – आनंदराज आंबेडकर

    जस्टीस भूषण गवई यांच्यासारखा बौद्ध माणूस एवढ्या मोठ्या पदावर बसला याचा मला आनंद आहे. पण त्यांचा एससी प्रवर्गात वर्गवारी करण्याचा निर्णय माझ्या दृष्टिकोनातून चुकीचा आहे, त्याचा निषेध मी करतो असे आनंदराज आंबेडकर परभणीत म्हणाले आहेत.

  • 18 May 2025 02:46 PM (IST)

    नवणीत राणा अमरावती महानगरपालिका स्वबळावर लढणार

    नवणीत राणांनी अमरावती महानगरपालिका स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं आहे. त्या म्हणाल्या की, “अमरावती मधील लोकांमध्ये पहलगामच्या घटनेच्या निषेधार्थ किती रोष आहे हे आज दिसून आलं. ज्यांना ज्यांना स्वाभिमान आहे देशातबद्दल प्रेम आहे ते सर्व लोक आज रस्त्यावर उतरले आहे.धर्म विचारून जेव्हा आमच्या लोकांना मारलं तेव्हाच आम्ही सांगितलं. जिसने धर्म पुछके मारा है उसे बिना धर्म पुछके मारेंगे हमारा धर्म हिंदुस्तानी आहे. आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदुस्थानात जन्माला आलो. मी काल जे बोलली ते माझा वैयक्तिक मत होतं.माझी इच्छा आहे भाजपने एकटं लढल पाहिजे.”

  • 18 May 2025 02:40 PM (IST)

    लोटे MIDC मधील लासा कंपनीत भीषण आग

    लोटे MIDC मधील लासा कंपनीत भीषण आग लागली आहे. आगीचे कारण अपष्ट. मात्र परिसरात धुराचे लोळ पसरल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. केमिकल कंपन्यांमध्ये लागणाऱ्या सततच्या आगीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या लगत हा अपघात झाल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

  • 18 May 2025 02:13 PM (IST)

    पीएमएलए कायद्याचा मलाही फटका: छगन भुजबळ

    पीएमएलए कायद्याबद्दल छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले “पीएमएलए कायद्याचा मलाही फटका बसला आहे. UPA सरकारच्या काळात PMLA कायद्याला विरोध केलेला त्यामुळे मला अडीच वर्ष जेलमध्ये काढावी लागली.” असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.

  • 18 May 2025 01:46 PM (IST)

    ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ जालन्यात तिरंगा रॅली; मामा चौकापासून झाली रॅलीला सुरुवात

    पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला आणि त्यानंतर देशभरात ठिकठिकाणी सर्वांनी एकत्र येत तिरंगा रॅली काढल्या. याच पार्श्वभूमीवर आज जालना शहरात देखील तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.शहरातील मामा चौकापासून तर राम मंदिरापर्यंत ही रॅली निघाली होती.यावेळी भाजपचे नेते रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे, बबनराव लोणीकर यांच्यासह मोठ्या संख्येने माजी सैनिकांचाही सहभाग होता.

  • 18 May 2025 01:29 PM (IST)

    अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागांना पंचनामे करून मदत करणार- अजित पवार

    राज्यात अवकाळी पाऊस पडतोय. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी यलो अलर्ट सांगितले आहे. काही पिकांना नुकसान तर काहींना फायदेशीर असलेला हा पाऊस आहे. नैसर्गिक संकटांना आपण कायमच मदत करत असतो. उद्या सूचना देऊन कॅबिनेट मध्ये आढावा घेणार. ओतूरसाठी ४५ कोटींचा निधी मंजूर करून दिला आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागांना पंचनामे करून मदत करण्याची भूमिका घेणार असे अजित पवार म्हणाले.

  • 18 May 2025 01:07 PM (IST)

    शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी बीड-परळीमध्ये रस्ता रोको

    बीडच्या परळी येथील शिवराज दिवटे या तरुणाला अपहरण करुन जबर मारहाण करण्यात आली. काल घडलेल्या या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर परळीतील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आज या घटनेचा निषेध व्यक्त करत कारवाईच्या मागणीसाठी परळीतीत नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत.

  • 18 May 2025 12:51 PM (IST)

    पुण्यातील बिबवेवाडी परिसरात मध्यरात्री गोळीबाराची घटना

    पुण्यातील बिबवेवाडी परिसरात मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली. गाडी घासल्याच्या कारणावरून दोघांकडून हवेत गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गणेश भालके आणि देवा डोलारे असं गोळीबार करणाऱ्या आरोपींची नावं आहेत.

  • 18 May 2025 12:43 PM (IST)

    शेतातील कुंपणाचा करंट लागल्यानं काका-पुतण्याचा मृत्यू

    शेतातील कुंपणाचा करंट लागल्यानं काका-पुतण्याचा मृत्यू झाला आहे. अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील निंभी गावामधली ही घटना आहे. संजय भुयार आणि प्रणय भुयार या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • 18 May 2025 12:30 PM (IST)

    कर्जत नेरळ रस्त्यावरील पाली भूतीवली धरणात दोघांचा बुडून मृत्यू

    कर्जत नेरळ रस्त्यावरील पाली भूतीवली धरणात दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिकांना यश मिळालं आहे.

  • 18 May 2025 12:20 PM (IST)

    अमरावतीत भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन

    अमरावतीत भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी अमरावतीत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. सर्वसामान्य नागरिक, माजी सैनिक, महिला देखील तिरंगा घेऊन रॅलीत सहभागी झाले आहेत. भाजप नेत्या नवनीत राणा देखील रॅलीमध्ये सहभागी झाल्या आहेत.

  • 18 May 2025 12:10 PM (IST)

    नाथुला मार्गे कैलास मानसरोवर यात्रेला यावर्षी जूनपासून पुन्हा सुरुवात

    2017 मध्ये डोकलाममधील वाद आणि कोविड-19 महामारीमुळे पाच वर्षांपासून स्थगित झालेल्या नाथुला मार्गे कैलास मानसरोवर यात्रेला यावर्षी जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे.

  • 18 May 2025 11:58 AM (IST)

    चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत

    चंद्रपूर जिल्हयात वाघाच्या हल्ल्यात आणखी 2 ठार झाले आहेत. नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील मारुती शेंडे 63 तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेला असता वाघाने त्यांना ठार केले. तर दुसर्‍या वेगळ्या घटनेत मूल तालुक्यातील भादूर्णी गावातील ऋषी पेंदोर हा शेतकरी वाघाच्या हल्ल्याला बळी पडला.

  • 18 May 2025 11:50 AM (IST)

    शिवसेनेची तिरंगा यात्रा

    ऑपरेशन सिंदूरनंतर शिवसेनेचे सचिव सिद्धेश कदम यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली ते अंधेरी अशी तिरंगा यात्रा बाइक रॅली काढण्यात आली. या तिरंगा रॅलीमध्ये शिवसेना खासदार रवींद्र वायकर, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

  • 18 May 2025 11:40 AM (IST)

    सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

    सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पहाटे 5 वाजता कांद्याचा ट्रक कंटेनर पलटी झाल्यामुळे पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना ट्राफिकचा सामना करावा लागत आहे.

  • 18 May 2025 11:28 AM (IST)

    अजित पवार ओतूर येथे दाखल

    उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकच्या कळवण येथील ओतूर येथे दाखल झाले आहेत. त्यांनी ओतूर धरणाचे दुरुस्ती ठिकाणी पाहणी केली. जवळपास ४५० हेक्टर वरील ओतूर धरण असून त्याच्या दुरूस्तीमुळे कळवण तालुक्यातील शेती सिंचनाला फायदा होणार आहे.

  • 18 May 2025 11:20 AM (IST)

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोठी तयारी

    महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते, उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी देण्यात आली.

  • 18 May 2025 11:09 AM (IST)

    गुजरातकडे जाणाऱ्या वाहतुकीला बसणार फटका

    मान्सूनपूर्व गायमुख घाटाचे पुन्हा एकदा डागडुजी करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मायक्रो सर्फेसिंगचे काम केले जाणार आहे. गायमुख घाटावर प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

  • 18 May 2025 11:01 AM (IST)

    11 दहशतवाद्यांची शोध मोहिम सुरूच

    जम्मू आणि काश्मीरमधील पाकिस्तानातील 11 दहशतवाद्यांची शोध मोहिम सुरूच आहे. त्यातील 6 जणांना नरकात पाठवण्यात आले आहे. तर उर्वरीत पाच जणांचा सैन्य दल, स्थानिक पोलीस शोध घेत आहेत.

  • 18 May 2025 10:57 AM (IST)

    जळगावच्या एरंडोल तालुक्यातील भातखेडे येथे लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी वधूचा मृत्यू

    लक्ष्मी मुकेश जगताप असे वीस वर्षीय मयत नववधूचे नाव आहे… लग्नाच्या दुसऱ्या दिवशी १५ मे रोजी लक्ष्मीची प्रकृती बिघडल्याने तिला एरंडोल व नंतर जळगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तपासणीनंतर लक्ष्मीला न्यूमोनिया आणि कावीळ असल्याने निदान झाले. डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही ती वाचू शकली नाही. शनिवारी पहाटे तिचा मृत्यू झाला… १४ मे रोजी दुपारी अचानक चक्कर येऊन लक्ष्मी खाली कोसळली. त्यावेळी गावातील डॉक्टरांना बोलावून प्राथमिक उपचार करण्यात आले आणि लग्न समारंभ पूर्ण झाला.

  • 18 May 2025 10:45 AM (IST)

    घर बचाओ… घर बनाओ.. आंदोलन

    कोथरुड येथील भिमनगरमधील रहिवास्यांकडून एसआरए योजने विरोधात लढा सुरू आहे. बिल्डर कडून फसवणूक होत असल्याने स्थानिक नागरिक आक्रमक आहेत. या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन…

  • 18 May 2025 10:33 AM (IST)

    युट्यूबर ज्योती मल्होत्राचं चीन कनेक्शन…. तपासात समोर

    पाकिस्ताननंतर ज्योती मल्होत्रा चीनमध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे. चिनी अधिकाऱ्याची भेट घेतल्यानंतर ज्योती तपास यंत्रणांच्या रडारवर.. चीनमध्ये तिला VIP ट्रिटमेंट आणि पोलीस सुरक्षा मिळाल्याची माहिती देखील समोर येत आहे.

  • 18 May 2025 10:15 AM (IST)

    सचिन वाझे सेवेत पुन्हा येऊ नये, म्हणून मी पवारांना भेटलो होतो – संजय राऊत

    सचिन वाझे सेवेत पुन्हा येऊ नये, म्हणून मी पवारांना भेटलो होतो…. पोलीस आयुक्तांच्या शिफारशीशिवाय PSI नोकरीत येऊ शकत नाही… सरकारनं ती फाईल थांबवायला पाहिजे होती… असं वक्तव्य संजय राऊन यांनी केलं आहे.

  • 18 May 2025 09:58 AM (IST)

    नांदेड – अमित देशमुख यांच्या ट्वेंटीवन साखर कारखान्याला हरित लवादाचा दणका.

    नांदेड –  अमित देशमुख यांच्या ट्वेंटीवन साखर कारखान्याला हरित लवादाचा दणका.  पर्यावरण पूरक नियमाचे उल्लंघन केल्याने 1 कोटी 13 लाख 40 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.

    शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून 54 लाख 43 हजार 955 रुपये देण्याचा आदेशही देण्यात आला.  राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम खंडपीठात सुनावणी झाली .

  • 18 May 2025 09:46 AM (IST)

    अमेरिकेतील कॅलिफोर्नियात स्फोट, एकाचा मृत्यू; दहशतवादी हल्ल्याच्या FBI चा दावा

    अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील पाम स्प्रिंग्ज येथील हेल्थ क्लिनिकजवळ स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना दहशतवादी हल्ला आहे, असा दावा एफबीआयने केला आहे.

  • 18 May 2025 09:26 AM (IST)

    नागपूर – मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थिती तिरंगा रॅली

    नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थिती तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये भाजपाचे आजी-माजी आमदार तसेच इतर पदाधिकारीही सहभागी झाले. या तिरंगा यात्रेला नागपूरमध्ये मोठा रिस्पॉन्स मिळताना दिसत आहे.

  • 18 May 2025 09:11 AM (IST)

    अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील शेतीतील पिकांना मोठा फटका

    अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील शेतीतील पिकांना मोठा फटका बसला आहे. काल आलेल्या अवकाळी पावसामुळे अमरावतीमध्ये कांदा पिकांचं प्रचंड नुकसान झालं.

    अमरावती नजीकच्या अंजनगाव बारी परिसरालाही अवकाळी पावसाने झोडपलं. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा,आणि काढून ठेवलेला कांदा खराब झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.

    वादळी वारा आणि पावसाचा संत्री बाग,ज्वारी आणि भाजी पाल्यालाही मोठा फटका बसला.

  • 18 May 2025 08:55 AM (IST)

    नाशिक – गुन्ह्यातील 2 आरोपींसोबत चक्क पोलिसांचीच पार्टी

    नाशिकमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यातील 2 आरोपींसोबत चक्क पोलिसांनीच पार्टी केली. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाकडून हॉटेलवर छापा टाकण्यात आला, त्यामध्ये  चार पोलिसांना रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत या चारी पोलीस कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यात आली.  न्यायालयातून सेंट्रल जेलकडे घेऊन जात असताना पुणे रोडवर एका हॉटेलात सुरू होती पार्टी. युनिट एकचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी हॉटेलवर छापा टाकत कारवाई केली .

  • 18 May 2025 08:46 AM (IST)

    दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का

    दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. बंडखोरी करत 15 नगरसेवकांकडून इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

    मुकेश गोयल हे तिसऱ्या आघाडीचे नेते बनले. वरिष्ठ नेते आणि नगरसेवकांमध्ये कोणताही समन्वय नव्हता. जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करू न शकल्यामुळेच हा वेगळा निर्णय घेतला असा दावा रामराम केलेल्या नगरसेवकांनी केला आहे.

Published On - May 18,2025 8:46 AM

Follow us
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?.
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर...
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय.
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी.
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?.
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले.
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून....
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला.