AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE : उबाठा गट 11 ऑगस्टपासून महाराष्ट्रभर आंदोलन सुरू करणार

| Edited By: | Updated on: Aug 10, 2025 | 9:20 AM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : उबाठा गट 11 ऑगस्टपासून महाराष्ट्रभर आंदोलन सुरू करणार
live breaking

इंडिया आघाडीचा 11 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपानंतर वातावरण चांगलच तापलं आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंताच्या राजिनाम्या नंतर जिल्हात राजीनामा सत्र सुरुच आहे. संजय कोकाटे आणि पंढरपूरचे महेश साठे या दोघांमुळे सोलापूर जिल्हातील शिवसेना फोडली. सोलापुरातील शरणू हांडे अपहरण प्रकरणात आणखी दोन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये राकेश भीमाशंकर कुदरे, श्रीकांत बाबुराव सुरपुरे या दोन आरोपीना पोलिसांनी कर्नाटकातील इंडी गावातून ताब्यात घेतलं. उद्धव गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघ आक्रमक झाला आहे. हेदवतड मधील सभेत खोतकीबाबत केलेल्या विधानावरून उद्धव गटाचे नेते भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यात नवा संघर्ष पेटला आहे. यासह महाराष्ट्र, देश विदेशातील महत्वाच्या, राजकीय, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Aug 2025 07:44 PM (IST)

    उबाठा गट 11 ऑगस्टपासून महाराष्ट्रभर आंदोलन सुरू करणार

    शिवसेना (यूबीटी)  अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेना सोमवारी म्हणजेच 11 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू करणार आहे. आम्ही कलंकित मंत्र्यांविरुद्ध आंदोलन करत आहोत आणि महाराष्ट्राची प्रतिमा मलिन केल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी करत आहोत.

  • 09 Aug 2025 07:32 PM (IST)

    दिल्लीतील रुग्णालयात आगीच्या घटनेत एकाचा मृत्यू

    दिल्लीतील विकास मार्गावरील कॉसमॉस रुग्णालयात आगीच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आठ रुग्णांना जवळच्या पुष्पांजली रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

  • 09 Aug 2025 07:18 PM (IST)

    मुंबई विमानतळावर नेटवर्क बिघाड, सिस्टीम डाउन

    मुंबई विमानतळावरील नेटवर्क बिघाडामुळे सर्व यंत्रणा बंद पडल्या आहेत. चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रिया सध्या मॅन्युअल पद्धतीने सुरू आहे आणि आपत्कालीन व्यवस्था सक्रिय करण्यात आली आहे.

  • 09 Aug 2025 07:02 PM (IST)

    लालू यादव किंवा मला शिवीगाळ करून बिहारला फायदा होणार नाही: तेजस्वी यादव

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बिहार दौऱ्यावर राजद नेते तेजस्वी यादव म्हणाले की, अमित शाह येथे येताना दरवेळी एकच गोष्ट बोलतात. ते बिहारच्या प्रगतीबद्दल, बेरोजगारी, महागाई किंवा गरिबी संपवण्याबद्दल बोलतात, पण ते याबद्दल बोलत नाहीत. दिवसभर लालू यादव किंवा तेजस्वी यांना शिव्या देऊन बिहारला फायदा होणार नाही.

  • 09 Aug 2025 06:55 PM (IST)

    जळगाव: उत्तराखंडमध्ये अडकलेले 3 जण सुखरूप परतले

    जळगावातील मेहरा कुटुंबातील 3 सदस्य उत्तराखंडमध्ये अडकले होते, मात्र आता ते सुखरूप परतले आहेत. भुसावळ रेल्वे स्थानकावर नातेवाईकांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र व उत्तराखंड सरकार तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने आपण सुखरूप परतल्याचे त्यांनी सांगितले.

  • 09 Aug 2025 06:40 PM (IST)

    गोंदिया: जागतिक आदिवासी दिनानिमित्त रॅली

    आज 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जात आहे. गोंदिया जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून गोंदिया जिल्ह्यात देखील आज जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह बघायला मिळाला. गोंदिया शहरासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आल्या होत्या. या रॅलीमध्ये आदिवासी बांधवांनी पारंपारिक नृत्य सादर करत जागतिक आदिवासी दिन निमित्त आनंद साजरा केला.

  • 09 Aug 2025 06:25 PM (IST)

    हिंगोली: विशेष पदभरतीसाठी आदिवासी समाजाचा मोर्चा

    विशेष पदभरती करावी यासह विविध मागण्यांसाठी आज हिंगोलीत आदिवासी समाज बाधवांनी जिल्हाधिकारी कर्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात प्रतिकात्मक गळ फास घेतलेल्या विद्यार्थ्यांने सर्वांचे लक्ष्य वेधले होते.

  • 09 Aug 2025 06:09 PM (IST)

    जागतिक आदिवासी दिन ठाणे शहरात उत्साहात साजरा

    आज जागतिक आदिवासी दिन ठाणे शहरात मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात. भाईंदर पाडा येथील पोष माता मंदिरापासून भव्य अशी बाईक व रिक्षा रॅली काढण्यात आली. या रॅलीत ठाणे, मुंबई, नवी मुंबई, मिरा भाईंदर, भिवंडी, शहापूर भागातून आलेले सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  • 09 Aug 2025 05:13 PM (IST)

    शरद पवार साहेबांचे खच्चीकरण झालेय म्हणूनच… पंकज भोयर यांची टीका

    वर्धा : गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. विधानसभेतील पराभव बघून शरद पवार साहेबांचे खच्चीकरण झालेले आहे. त्यामुळे आता कुठले तरी असे वक्तव्य करून समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत, असं पंकज भोयर यांनी म्हटलंय.
  • 09 Aug 2025 05:06 PM (IST)

    उत्तराखंडमध्ये अडकलेले तिघे जळगावात सुखरूप परतले

    उत्तराखंडमध्ये अडकलेले तिघे जळगावात सुखरूप परतले

    भुसावळ रेल्वे स्थानकावर नातेवाईकांनी केले स्वागत

    ढगफुटीमुळे अडकले होते उत्तराखंडमध्ये

    महाराष्ट्र व उत्तराखंड सरकार तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने आपण सुखरूप परतल्याची दिली माहिती

  • 09 Aug 2025 05:03 PM (IST)

    पुण्यात पुमा कंपनीच्या बनावट वस्तुंची विक्री करणाऱ्या दुकानावर छापा

    पुण्यात पुमा कंपनीच्या बनावट वस्तुंची विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांचा छापा

    डुप्लिकेट टी शर्ट, नायट्रो शुज, चप्पल, ट्रॅक पॅन्टची दुकानदारांकडून विक्री

    छापेमारीत पोलिसांनी जप्त केला 8 लाख रुपयांचा मुद्देमाल

    पुण्यातील आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्टायलॉक्स फॅशन नावाच्या दुकानावर छापा

  • 09 Aug 2025 05:01 PM (IST)

    पुण्यात वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

    पुण्यात वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

    अंधाराचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना

    आरोपींना सिंहगड रोड पोलिसांकडून  48 तासांमध्ये अटक

    गोविंदा कुमार ओमप्रकाश, राहुल कुमार श्यामकुमार असं अटक केलेल्या आरोपींची नावे

    घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची पोलिसांकडून माहिती

  • 09 Aug 2025 04:16 PM (IST)

    सौंदड ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणाचा वाद पेटला, उपसरपंचांचं अमरण उपोषण

    सौंदड ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणाचा वाद पेटला, उपसरपंचांचं अमरण उपोषण

    कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, सौंदडमध्ये वातावरण तापलं

    उपसरपंच रोशन शिवणकर यांचं अमरण उपोषण

    न्याय न मिळाल्याने शिवणकर यांनी केली आमरण उपोषणाची घोषणा

  • 09 Aug 2025 03:54 PM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिर्डी विमानतळावर आगमन

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिर्डी विमानतळावर आगमन, काही वेळातच हेलिकॉप्टरने अकोले येथे पोहचणार आहेत.

  • 09 Aug 2025 03:37 PM (IST)

    जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांनी रक्षाबंधन साजरे केले

    जळगावात पाळधी येथील निवासस्थानी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या बहिणीने राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले आहे.

  • 09 Aug 2025 03:23 PM (IST)

    सोलापूरच्या शरणु हांडे अपहरण प्रकरणातील आणखी दोन आरोपीना पोलीस कोठडी

    सोलापूरच्या शरणु हांडे अपहरण प्रकरणातील आणखी दोन आरोपीना 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. राकेश भीमाशंकर कुदरे, श्रीकांत बाबुराव सुरपुरे या दोघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी

  • 09 Aug 2025 03:11 PM (IST)

    जळगावात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा

    जळगावातील हरिजन कन्या छात्रालयाच्या विद्यार्थिनींनी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला आहे.

  • 09 Aug 2025 01:59 PM (IST)

    मंत्री उदय सामंत जम्मू मध्ये दाखल

    ऑपरेशन सिंदूर नंतर शिवसेनेकडून आयोजित महारक्तदान शिबिर साठी कॅबिनेट मंत्री उदय सामंत जम्मू मध्ये दाखल , तसेच ऊद्या जम्मूत होणाऱ्या महासभेची तयारीचा आढावा घेण्यासाठी ऊदय सामंत पोहोचले. उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी श्रीनगरला दाखल होणार आहेत.

  • 09 Aug 2025 01:50 PM (IST)

    मुंडे भाऊ-बहिणींचे रक्षाबंधन

    आमदार धनंजय मुंडे बहीण पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर दाखल झाले आहेत. मुंडे भाऊ-बहिणी रक्षाबंधन साजरे करणार आहेत. रासपचे महादेव जानकर देखील रामटेक बंगल्यावर दाखल झाले आहेत.

  • 09 Aug 2025 01:42 PM (IST)

    नवनीत राणा यांना धमकावणारा अटकेत

    माजी खासदार नवनीत राणा यांना व्हिडिओद्वारे शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात अमरावती शहर क्राईम ब्रांचच्या पथकाने मुख्य आरोपी इसा नामक व्यक्तीला छत्तीसगड मधून अटक केली. नवनीत राणा यांच्या हत्येचा कट रचला गेला त्यासाठी मीटिंगा झाल्या यामध्ये आणखी आठ ते दहा आरोपी आहेत असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला.

  • 09 Aug 2025 01:30 PM (IST)

    अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा प्रश्न सुटला

    सांगलीच्या इस्लामपूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा प्रश्न अखेर आमदार जयंत पाटील यांनी मार्गी लावलाय.राजारामबापू पाटील बँकेच्या माध्यमातून शहरातल्या मुख्य चौकात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला जाईल,अशी घोषणा आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.एक ऑगस्टपासून इस्लामपूर शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी मातंग समाजाच्यावतीने वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाची दखल आमदार जयंत पाटलांनी घेत आंदोलकांची भेट घेऊन अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा प्रश्न सोडवला आहे.

  • 09 Aug 2025 01:20 PM (IST)

    लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत आलो

    लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत आलो असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांना कार्यक्रमात महिलांनी राखी बांधली.

  • 09 Aug 2025 01:10 PM (IST)

    पाकिस्तानची 5 लढाऊ विमानं पाडली

    आम्ही पाकिस्तानची 5 लढाऊ विमानं पाडली अशी माहिती भारताचे एअर चिफ मार्शल यांनी दिली. त्यांनी ऑपरेशन सिंदूरमधील घडामोडींवर प्रकाश टाकला.

  • 09 Aug 2025 01:00 PM (IST)

    अनेकांच्या पोटात वेदना-शरद पवार

    राज ठाकरे भूमिका घेतात दोन भाऊ काय निर्णय घेतात.. दोन्ही भावांना एकत्र येऊन द्या अनेकांच्या पोटात वेदना होत आहे ते होऊ द्या.. अनेकांची झोप उडाली ते एकत्र आले, तर आम्हाला आनंद.. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ अगोदर त्यांना एकत्र येऊ द्या, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.

  • 09 Aug 2025 12:45 PM (IST)

    नांदेडच्या लहान तांडा रस्त्याचीही दुरावस्था

    नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लहान ते लहान तांडा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गावकऱ्यांनी चक्क खड्ड्यात बसून सुरु केले आंदोलन. शाळेत जायला चिमुकल्यांना त्रास होत असल्याने गावकरी आक्रमक झाले आहेत. रस्ता न झाल्यास जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा इशारा

  • 09 Aug 2025 12:30 PM (IST)

    जळगावत एकनाथ खडसें विरोधात भाजपा आक्रमक

    जळगावच्या चाळीसगावात एकनाथ खडसे विरोधात भाजपा आक्रमक झाल आहे. एकनाथ खडसेंच्या फोटोला जोडे मारत भाजपचे आंदोलन सुरु आहे. काल जिल्हाभरात एकनाथ खडसे यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आले होते. आजही हे आंदोलन सुरु आहे.

  • 09 Aug 2025 12:12 PM (IST)

    राज्य महामार्गाचे पाणी शहरात घुसले

    हिंगोली राज्य महामार्गाचे पाणी कळमनुरी शहराच्या तिरुपती नगरमध्ये घुसल्याचे समोर आले आहे. कळमनुरी शहरातल्या तिरुपती नगरमधील अनेक घरात पाणी शिरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाईपाच्या साह्याने काढून दिलेले राज्य महामार्गाचे पाणी तिरुपती नगर मधील अनेक घरात घुसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • 09 Aug 2025 11:57 AM (IST)

    एक कार्यकर्ता चक्क खडसेंच्या फोटोवर थुंकला

    जळगावच्या चाळीसगावात एकनाथ खडसे विरोधात भाजपा आक्रमक. एकनाथ खडसेंच्या फोटोला जोडे मारत भाजपच आंदोलन. जोडे मारत असताना एक कार्यकर्ता चक्क खडसेंच्या फोटोवर थुंकला. काल जिल्हाभरात एकनाथ खडसे यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आले.

  • 09 Aug 2025 11:48 AM (IST)

    शेतकऱ्याला 60 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश

    बँकेच्या चुकीमुळे शेतकऱ्याला अनुदान न मिळाल्याने 60 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश. धाराशिव येथील शेतकरी व माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धाराशिव शाखेविरुद्ध ग्राहक मंचाकडे केली होती तक्रार. पीक कर्जाची नियमित परतफेड करूनही बँकेच्या चुकीमुळे शासनाच्या कृषी सन्मान अनुदानापासून नानासाहेब पाटील यांना राहावे लागले होते वंचित. स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्याच्या कर्जाबाबतची माहिती शासनाकडे कळवताना धाराशिव ऐवजी परंडा तालुका असा केला उल्लेख.

  • 09 Aug 2025 11:14 AM (IST)

    राहुल गांधींचे मतचोरीचे आरोप संशय घेण्यासारखे – शरद पवार

    “राहुल गांधींचे मतचोरीचे आरोप संशय घेण्यासारखे. राहुल गांधींकडून एफिडेविट मागणं योग्य नाही. आयोगावर लावलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप नोंदवलाय. राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवं, भाजपकडून नको” असं शरद पवार म्हणाले.

  • 09 Aug 2025 11:11 AM (IST)

    उद्धव ठाकरेंच्या फोटोवरुन विनाकारण राजकारण – शरद पवार

    “उद्धव ठाकरेंच्या आसन व्यवस्थेच्या फोटोवरुन विनाकारण राजकारण. प्रेझेंटेशन सुरु होतं, म्हणून ठाकरे मागे बसलेले. प्रेझेंटेशनच्यावेळी स्क्रिनच्या जवळ बसत नाहीत. ठाकरे मागे बसले हा चर्चेचा विषय कसा होऊ शकतो? राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला मी सुद्धा हजर होतो” असं शरद पवार म्हणाले.

  • 09 Aug 2025 10:25 AM (IST)

    दादर कबूतरखाना बंद झाल्यानंतर कबुतरांना दाणे देण्याची पद्धत बदलली

    दादर कबूतरखाना बंद झाल्यानंतर कबुतरांना दाणे देण्याची पद्धत बदलली आहे. आता जैन समाजाने एक नवी कल्पना राबवली आहे चारचाकी वाहनावर ट्रे ठेवून त्यावर दाणे टाकणे. यामुळे कबुतर मोठ्या प्रमाणात त्या गाडीवर येऊन दाणे खात आहेत.

  • 09 Aug 2025 10:15 AM (IST)

    जळगावात राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा

    जळगावातील राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्रातील क्रिशा जैन तर मुलांमध्ये दिल्लीतील आरित कपिल विजेता. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आठ लाखांसह उत्तेजनार्थ परितोषिके प्रदान

  • 09 Aug 2025 09:59 AM (IST)

    राहुल गांधी आणि खर्गे यांनी उद्धव ठाकरेंशी स्वतंत्र चर्चा केली – संजय राऊत

    राहुल गांधी आणि खर्गे यांनी उद्धव ठाकरेंशी स्वतंत्र चर्चा केली. निवडणूक आयोगाविरोधातील लढा तीव्र करण्याचं बैठकीत ठरलं – संजय राऊत

  • 09 Aug 2025 09:47 AM (IST)

    बुलढाणा – जिल्ह्यातील 51 हजार लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला.

    विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्य शासनाने घाई गडबडीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली.. परंतु आता या योजनेचा अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरीवर पडत असल्याची ओरड होत आहे. या योजनेतील लाभार्थी कमी करण्यासाठी शासन विविध उपाय करत आहे, त्यामुळे 65 वर्षावरील आणि एका परिवारातील 2 पेक्षा जास्त लाभार्थींचा लाभ बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील या दोन्ही अटीत बसणारे एकूण 51 हजार 430 लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता थांबविण्यात आलेला आहे

  • 09 Aug 2025 09:27 AM (IST)

    पुणे मुंबई एक्सप्रेस वर मोठी वाहतूक कोंडी, वाहनाच्या 2 किलोमीटर पर्यंत रांगा

    लोणावळा – पुणे मुंबई एक्सप्रेस वर मोठी वाहतूक कोंडी, वाहनाच्या दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मनस्ताप होत असून  मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतुक संथ गतीने सुरू आहे.

    पुण्याकडून मुंबईकडे जाणारे वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. खंडाळा टनल जवळ वाहनांची वाहतूक कोंडी, रक्षाबंधन आणि सलग सुट्यांमुळे वाहतूक कोंडी झाली आहे.

  • 09 Aug 2025 09:10 AM (IST)

    बीडच्या आणखी एका तरूणाची बंदुकीसोबतची रील व्हायरल

    बीडच्या आणखी एका तरूणाची बंदुकीसोबतची रील व्हायरल झाली आहे.  बंदूक हातात घेऊन रील बनवुन सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असून संबंधित तरूण वाल्मीक कराडचा समर्थक असल्याचा दावा केला जातोय.

    यापूर्वी कैलास फड, गोट्या गित्ते, कुणाल फड अशा अनेकांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.  पोलीसांकडून तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.

  • 09 Aug 2025 09:03 AM (IST)

    सप्ताहाची वर्गणी का दिली नाही, विचारत आष्टीमध्ये एकाला विटेने मारहाण

    बीड – सप्ताहाची वर्गणी का दिली नाही असे विचारत आष्टी शहरात एकाला वीटेने मारहाण करण्यात आली.

    या मारहाणीत अतुल केरूळकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर आष्टीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोतीराम केरूळकर या आरोपीच्या विरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

  • 09 Aug 2025 08:49 AM (IST)

    दादर येथील कबूतरखाना बंद झाल्यानंतर कबुतरांना दाणे देण्यासाठी अनोखी पद्धत

    दादर कबूतरखाना बंद झाल्यानंतर कबुतरांना दाणे देण्याची पद्धत बदलली आहे. आता जैन समाजाने एक नवी कल्पना राबवली आहे.  चारचाकी वाहनावर ट्रे ठेवून त्यावर दाणे टाकणे. यामुळे कबुतर मोठ्या प्रमाणात त्या गाडीवर येऊन दाणे खात आहेत. कबूतरखाना बंद झाल्यानंतर कबुतरे शहरात इकडे-तिकडे विखुरली असताना,ही नवी शक्कल लढवली आहे.

  • 09 Aug 2025 08:43 AM (IST)

    इंडिया आघाडीचा 11 ऑगस्टला मोर्चा

    इंडिया आघाडीचा 11 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा निघणार आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपानंतर वातावरण चांगलच तापलं असून घोटाळ्याविरुद्ध संसद आणि बाहेरही लढा उभारण्याचा निर्णय सर्वच विरोधी पक्षांनी घेतला आहे

Published On - Aug 09,2025 8:42 AM

Follow us
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.