Maharashtra Breaking News LIVE 27 February 2025 : स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर सांगली एसटी विभाग अलर्ट मोडवर
Maharashtra News LIVE : आज 27 फेब्रुवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

कांदिवली पश्चिमेकडील लालाजी पाडा येथील एका हॉटेलमध्ये लागलेली भीषण आग विझवण्यात आली आहे. प्राथमिक तपासात सिलेंडर स्फोटाचे प्रकरण उघड झाले आहे. कांदिवली पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक वेळेवर पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्यात मोठे यश मिळाले. स्थानिक नगरसेवक कमलेश यादव म्हणाले की, आग विझवण्यात आली आहे. सिलिंडरचा स्फोटही झाला आहे. शिवाजी पार्क मैदानात अनधिकृतपणे गाड्या उभ्या केल्या जात असल्याच्या तक्रारींमुळे रहिवाशांमध्ये नाराजी आहे. स्काऊट गाइड सभागृहाच्या मागील बाजूस खासगी कार पार्क करण्यात येत असून, पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. गाड्या त्वरित हटवल्या नाहीत, तर आम्ही सुद्धा आपल्या कार मैदानात उभ्या करू, असा इशारा शिवाजी पार्क रहिवाशी संघटनेने दिला आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
जम्मू-काश्मीर: उधमपूरमध्ये सतत पाऊस सुरूच
जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे.
-
राहुल गांधींची आसामच्या नेत्यांसोबत बैठक
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आसाममधील काँग्रेस नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीतील इंदिरा भवन येथे पोहोचले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
-
-
नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कामकाजावरील स्थगिती वाढवली
नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कनिष्ठ न्यायालयाच्या कामकाजावरील स्थगिती वाढवण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या कारवाईवरील स्थगिती २८ जुलैपर्यंत वाढवली आहे. न्यायमूर्ती विकास महाजन यांच्या खंडपीठाने सुनावणी 28 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना त्यांचे लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितले. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केली आहे.
-
स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर सांगली एसटी विभाग अलर्ट मोडवर
स्वारगेट एसटी डेपोतील अत्याचार प्रकरणानंतर सांगली एसटी विभाग अलर्ट मोडवर आलं आहे. आगारात पडून असलेल्या बसेसची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली आहे. या आगारात तब्बल 12 शिवशाही बसेस 5 वर्षापासून भंगारात पडून आहेत.
-
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, बीडमध्ये CID पथक दाखल
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. बीडमध्ये CID पथक दाखल झालं आहे. सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बसवराज तेली उपस्थिती आहेत. सीआयडी पथकातील कर्मचारी न्यायालयात उपस्थित आहेत. सीआयडीचं पथक बीडच्या विशेष न्यायालयात दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल करणार आहे.
-
-
स्वारगेट अत्याचार प्रकरण, ओरीपीचा डॉग स्कॉडच्या माध्यमातून शोध
पुण्यातील स्वारगेट एसटी डेपो अत्याचार प्रकरणात आरोपीचा डॉग स्कॉडच्या माध्यमातून शोध सुरू आहे. ड्रोन कॅमेरा आणि डॉग स्कॉडच्या साह्याने उसाच्या शेतात आरोपीचा शोध सुरू आहे. पुणे क्राईम ब्रँचच्या पथकाकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध सुरु आहे.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी नांदेड दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी 28 फेब्रुवारीला नांदेड दौऱ्यावर असणार आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यासह अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रवेश सोहळा आणि मेळाव्यानंतर अजित पवार नांदेडच्या कंधार तालुक्यातील उमरज येथील संस्थानाला भेट देऊन दर्शन घेणार आहेत.
-
नाशिकचे पालकमंत्रीपद मंत्री गिरीश महाजन म्हणाले…
नाशिक पालकमंत्रीपद भाजपकडे येणार असल्याच्या बातम्या आल्या. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी कानावर हात ठेवले आहे. यासंदर्भात मला अधिकृतरित्या अद्याप कोणीही काही सांगितलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
-
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लाडू वाटप
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहराच्या वतीने आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ठाणे स्टेशनबाहेर लाडू वाटप करण्यात आले. मनसे नेते अविनाश जाधव व ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
-
दत्तात्रय गाडे याची माहिती देणाऱ्यास लाखाचे बक्षीस
स्वारगेट येथे 26 वर्षे तरुणीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध पोलिसांकडून सुरू केला आहे. त्याची माहिती देणाऱ्यास एका लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.
-
एसटी बसेसेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार
राज्यातील परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसेसेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बसेसमध्ये जीपीएस यंत्रणाही सक्तीची करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
-
Pune Crime News:शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी आमदार माऊली कटकेंचा कार्यकर्ता
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी हा पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवाशी असून आरोपी हा शिरूर हवेली विधानसभेचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार माऊली कटके यांचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणानंतर कटकेंवर देखील टिका होताना दिसत आहे. कटकेंनी या आरोपांचं, टिकांचं खंडन केलं आहे. मतदारसंघ हा अतिशय मोठा विस्तृत असल्यानं कामानिमित्त अनेक लोक भेटत असतात या आरोपीशी त्यांचा कुठलाही संबंध नसून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी अशी मागणी माऊली कटके यांनी केली आहे.
-
Pune Crime News:शिवशाही बसमध्ये तरुणवरती अत्याचार करणारा आरोपी मुळचा शिरूरचा
पुण्याच्या स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बस मध्ये 26 वर्षीय तरुणवरती अत्याचार करणारा आरोपी मुळचा शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा अत्याचार करून आपल्या गावात आला त्याने घरी जाऊन विश्रांती केली आणि त्याने नंतर गावातच मुक्काम केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आरोपीवर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत. पण सध्या आरोपी सध्या फरार झाला असून त्याचा पोलीस कसून तपास सुरु आहे.
-
धुळे बस स्थानकाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर
धुळे बस स्थानकात सध्या चार कोटी रुपये खर्च करून कॉंग्रेटीकरणाचं काम सुरु आहे. काँक्रिटीकरण असल्याने तात्पुरत्या काही दिवसासाठी शेजारील जागेमध्ये बसेस लावण्यात येते आहेत. मात्र या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. तसेच हजारो प्रवासी महिला पुरुषांची दिवसभर रात्री होते ये जा होत असते. त्याचबरोबर या बसस्थानकात लाईटची व्यवस्था ही नीट नाहिये. अशा बऱ्याच आभावांकडे पाहता धुळे बस स्थानकाची सुरक्षा सध्या वाऱ्यावर आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो.
-
नालासोपारामध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना; सख्या बापानेच केला पोटच्या मुलींवर अत्याचार
नालासोपारामध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सख्या बापानेच आपल्या 3 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पित्यावर आधीपासूनच खंडणी, गोळीबार तसेच हत्येसारख्या गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. बुधवारी नालासोपारा पोलिसांनी मुलींचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला असून, आरोपी पित्यारा अटक केली आहे.
-
परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदाराला स्वत:च्याच मुलाला कॉपी पुरवताना रंगेहाथ पकडलं
अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना रंगेहाथ पकडलं आहे. अनिल तोरडमल असं या रंगेहाथ पकडलेल्या नायब तहसिलदारांचे नाव आहे. बारावी बोर्ड परीक्षेमध्ये स्वतःच्या पाल्यालाच कॉपी पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावर ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित नायब तहसिलदारांवर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे .
-
पुण्यातील स्वारगेट इथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर एसटी विभागात मोठे फेरबदल होण्याची शक्यता
पुण्यातील स्वारगेट इथे 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराचा घटनेनंतर एसटी विभागात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री हे ऊपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला मुक्तगिरी निवासस्थानी दाखल झाले आहेत. पुण्यातील घटनेबाबत एकनाथ शिंदे स्वत: आढावा घेणार आहेत. या बैठकीनंतर एसटी महामंडळ तसेच परिवहन विभागात सुरक्षेसंदर्भात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांपासून आयजी रॅंकचा एक पोलीस अधिकारी एसटीमध्ये पदावर नाही, 36 जिल्ह्यातील सर्व सुरक्षा अधिकारी या आयजीलाच रिपोर्ट करतात मात्र नियुक्ती रिक्त ठेवल्याने अनेक आंदोलने आणि चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याचा माहीती समोर आली आहे.
-
मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली
आज मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली आहे. एक्युआय १७३ वर धोकादायक श्रेणीत पोहोचला आहे. मुंबईत आज पुन्हा धूरकट वातावरण सोबत उकाडाही जाणवतोय. जगातील प्रदुषणग्रस्त शहरांच्या यादीत मुंबई सध्या ५३ व्या क्रमांकावर आहे.
-
गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वारगेट बस आगारात, तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात
गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वारगेट बस स्थानकात दाखल झाले आहेत. योगेश कदम यांच्याकडून स्वारगेट बस स्थानकाची पाहणी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंकडून कदमांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला. स्वारगेटमध्ये आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
-
नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी गावाला कवितेचे गाव म्हणून ओळख दिली जाणार
कविवर्य कुसुमाग्रजांचे जन्मस्थळ असलेल्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी गावाला महाराष्ट्र शासनाकडून कवितेचे गाव म्हणून ओळख दिली जाणार असून आज त्याबाबतची घोषणा करण्यासोबतच पहिल्या कवितेच्या दालनाचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. कवितेच्या या गावात एकूण 15 दालने उभी केली जाणार असून गाव विकासासाठी शासन अनुदान देखील देणार आहे.
-
कांद्यातून मिळणाऱ्या परकीय चलनावर कांदा निर्यातीवर 20% निर्यात शुल्क
लासलगाव (नाशिक) – कांद्यातून मिळणाऱ्या परकीय चलनावर कांदा निर्यातीवर 20% निर्यात शुल्क आकारण्यात येत आहे. तसंच बांगलादेश सरकारने आयातीवर लादलेले शुल्क याच्यावर थेट परिणाम होते. एप्रिल ते नोंव्हेबर 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये 696 कोटीं रुपयांच्या परकीय चलनाची अपेडाच्या आकडेवारीतून तूट समोर आली.
2024 या आठ महिन्याच्या दरम्यान 2663 कोटी रुपयांचं कांदा निर्यातीतून परकीय चलन मिळालं. तर गेल्या 2023 मध्ये एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 16 लाख 26 हजार मॅट्रिक टन कांद्याची निर्यात होऊन 3359 कोटी रुपयांचं परकीय चलन मिळालं.
-
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात हे पुस्तक प्रदर्शन होणार असून २७ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सर्वांसाठी हे खुले राहणार आहे. विशेष म्हणजे १०५ नामांकित प्रकाशकांचे स्टॉल्स, विविध प्रकारची पुस्तके वाचकांसाठी वाचन प्रेमींना वाचण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. आज संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होणार असून यावेळी राज ठाकरे आपल्या आवडीच्या कविता देखील वाचणार आहे.
-
ठाणे महापालिकेचा असा ही दुजाभाव
केंद्र सरकारकडून एकीकडे मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा दिला जातो तर राज्य सरकारच्या पातळीवर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल उचलली जात आहे . तर दुसरीकडे मराठी भाषेतून एमए चे शिक्षण पूर्ण करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतन वाढ न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे..
-
सराफा बाजारात स्वस्ताई
जळगावच्या सराफ बाजारात एका दिवसात सोन्याचे दर ५०० रुपये तर चांदी १ हजाराने घसरली. सोन्याचे दर जीएसटीसह ८९ हजार १९८ रुपये तर चांदीचे दर ९७ हजारावर पोहोचले आहेत.
-
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती गजबजली
जळगावच्या अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रब्बी हंगामातील शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रब्बी हंगामातील पिके बाजारात येऊ लागल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. बाजार समितीत बुधवारी एकाच दिवसात १० हजार ४०० क्विंटल धान्याची आवक झाली.
-
मुंबई-कोकणात तापमानाचा कहर
मुंबई-कोकणात तापमानाचा कहर दिसत आहे. उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. फेब्रुवारीतच उष्णतेची लाट जाणवत असून तापमान ४० अंशांच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. सार्वजनिक ठिकाणे ओस पडली असून उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत.
-
बस थेट गटारात
बस थेट गटारात घुसली. चिपळूण शहरातील मध्यवर्ती बस डेपो बाहेर घटना घडली. डेपोतून प्रवाशी वाहतूक करणारी बस डेपोतून बाहेर पडल्यानंतर गटारात घुसली. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी नाही. चालकाचे नियंत्रण चुकल्याने गटारात बस गेली.
-
बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींची मोठी गर्दी
जालना तालुक्यातील पाहेगाव येथे 2 दिवसीय शंकरपट स्पर्धा उत्साहात संपन्न झालीय.जालना जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विविध भागातून बैलगाडा शर्यत प्रेमी यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकाला 1 लाख 93 हजार 755 रुपयांचे बक्षीस देण्यात आले.दरम्यान यावेळी बैलगाडा शर्यतीचा हा थरार पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींनी या ठिकाणी एकच गर्दी केली होती.
-
साहित्य संमेलनात मराठी माणसाचं दुखणं मांडलंच नाही
मराठी माणसांची दुखणी या संमेलनातून मांडली गेली नाहीत. आमचे प्रश्न, समस्या या मांडण्याचा प्रयत्न केला असता तर रसिकांना देखील बर वाटल असत. राज्यात आज शेतकरी आत्महत्या, नैसर्गिक आपत्ती हे प्रश्न आहेत ते मराठी साहित्यातून प्रभावीपणाने यायला पाहिजे होत. राज्यातील प्रश्नांचे परिसंवाद ठेवले असते तर मराठी माणसांना आनंद झाला असता, असे वक्तव्य शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केले.
-
पुणे – स्वारगेट आगारात महिला वाहकाचे 30 हजार चोरले
पुणे – स्वारगेट आगारात महिला वाहकाचे 30 हजार रुपये चोरीला गेले. बस आगारात आल्यानंतर 30 हजार रुपये चोरण्यात आले.
-
पुणे स्वारगेट बस अत्याचार प्रकरण – आरोपीला पकडून देणाऱ्या 1 लाखाचं बक्षीस
पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरात शिवशाही बसमध्ये तरूणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी अजूनही फरार आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. आरोपीला पकडून देणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपयांचं बक्षीस देण्याक येईल, असं पुणे पोलिसांकडून जाहीर करण्यात आलं आहे.
-
विश्वास संपादन करत अपहार करून फसवणूक करणाऱ्याला नवघर पोलिसांनी केली 24 तासांच्या आत अटक
विश्वास संपादन करत अपहार करून फसवणूक करणाऱ्याला नवघर पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक केली आहे. त्याच्यावर कलम 318(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून फसवणूकीतील 2 लाख 83 हजार 599 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
-
ठाणे – वर्षभरात 1300 हून अधिक वाहने चोरीस ,दुचाकीचे प्रमाण सर्वाधिक
ठाणे- वर्षभरात 1300 हून अधिक वाहने चोरीस ,दुचाकीचे प्रमाण सर्वाधिक. मोटारी आणि तीन चाकी वाहनांच्या चोरीचे प्रमाण देखील अधिक आहे. पोलिसांनी दाखल गुन्ह्यापैकी 503 प्रकरणे उघडकीस, 516 जणांना अटक झाली आहे..
आकडेवारीची सरासरी केल्यास महिन्याला 100 हून अधिक आहे.
-
महाकुंभमध्ये दीड महिन्यात 65 कोटी भाविकांच स्नान
13 जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ मेळा काल रात्री महाशिवरात्रीच्या दिवशी समाप्त. या दीड महिन्यात 65 कोटी भाविकांनी स्नान केल्याचा प्रशासनाचा दावा. काल महाशिवरात्रीच्या पवित्र आणि अखेरच्या दिवशी जवळपास 81 लाख लोकांनी केलं स्नान. स्नान करणाऱ्या भाविकांवर काल दिवसभरात पाचवेळा हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी.
-
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एक प्रतिष्ठित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात तुळजापुरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती. मुंबईतून तुळजापुरात येणारे ड्रग्ज पोलिसांनी पकडल्यानंतर कारवाईचा फास आवळला. मुंबई येथून संगीता गोळे या महिलेला अटक केल्यानंतर तुळजापुरातून एका प्रतिष्ठित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील महिलेसह आतापर्यंत चार जणांना पोलिसांकडून अटक. तुळजापुरात दोन ते अडीच वर्षांपासून ड्रग्जची विक्री होत असल्याचा स्थानिकांचा आरोप.
-
शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हबाबतची सुनावणी टळली
शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हबाबतची सुनावणी टळली. आज सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुन्हा एकदा टळली. गेल्या 17 महिन्यांपासून झालेली नाही सुनावणी. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्याच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाची याचिका. याचिकेवर सुनावणीची आजची तारीख होती. मात्र कामकाजात प्रकरणाचा समावेशच नाही.
-
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कुंभमेळा बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभ 2027 हाय-टेक असणार. AI-चालित गर्दी व्यवस्थापन आणि सर्व्हिलन्स. सुव्यवस्थित समन्वयासाठी स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण स्थापन होणार. प्रयागराज महाकुंभच्या धर्तीवर गर्दीच्या चार-पाच पट तयारी. नाशिक-त्र्यंबक रस्ता 25 मीटरपर्यंत रुंद करणार. रस्त्याच्या कडेला टेंट सिटी. गोदावरी नदीकाठच्या विकासासाठी ड्रोन सर्वेक्षण. प्रत्येक 3 मिनिटांनी भाविकांसाठी ई-बस सेवा उपलब्ध.
-
पुण्यात एका कॅब चालकाकडून महिलेसोबत अश्लील कृत्य
चालकाने अश्लील कृत्य केल्याने महिलेची कॅबमधून उडी. 2 किलोमीटर धावत जाऊन पोलीस ठाण्यात पोहोचली. खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. आरोपी कॅब चालकाला पोलिसांकडून अटक.
Published On - Feb 27,2025 8:12 AM
