Maharashtra Breaking News LIVE 18 February 2025 : दापोलीत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 18 फेब्रुवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
दापोलीत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
दापोलीत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का झाला आहे. ठाकरे गटाच्या पाचही नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पाचही नगरसेवकांनी मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेतलं आहे. दापोली नगरपंचायतचे विलास शिगवण, मेहबूब तळघरकर, अन्वर रखांगे, संतोष कलगुटके आणि अश्विनी लांजेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
-
जितेंद्र आव्हाड यांना धक्का, कट्टर समर्थक अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाटे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. आव्हाडांचे कट्टर समर्थक अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अभिजीत पवार , हेमंत वाणी हे जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय असून ठाण्यातील पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्यांसह दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश होणार आहे. हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीसह जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का मानला जातोय.
-
-
भिवंडीतील ठक्कर प्लाझा शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुसऱ्या मजल्यावर भीषण आग
भिवंडीतून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील ठक्कर प्लाझा या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. या आगीत पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली आहे. घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
-
खासदार सुरेश म्हात्रे फडणवीस यांच्या मंचावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) हे एकाच मंचावर आले. बदलापूरमध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळाचे अनावरण कार्यक्रमात ते एकत्र आले.
-
१७१ गावांमधील २०५ जलस्रोतांमध्ये ‘नायट्रेट’चे प्रमाण अधिक
जळगाव जिल्ह्यात युरियाच्या अतिवापरामुळे १७१ गावांमधील २०५ जलस्रोतांमध्ये ‘नायट्रेट’चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहे. भूजल विभागाने जिल्ह्यातील १४८७ गावांतील २५०७ पाणीस्रोतांची तपासणी केली.
-
-
पिंपरी- चिंचवडमध्ये हाणामारी
पिंपरी- चिंचवडमधील संत तुकाराम भागात दोन गटात तुफान हाणामारी झाली. एक जण दुसऱ्याच्या अंगावर धावून जात कानशिलात लागवली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
शिवाजी महाराजांना सलामी देणार
शिव जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांना राजधानी दिल्लीत आर्मीकडून सलामी दिली जाणार आहे. नवीन महाराष्ट्र सदनात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. मागील आठ वर्षापासून शिवजयंतीचा कार्यक्रम होत आहे.
-
-
युक्रेनवर तोडगा निघेल का? रियाधमध्ये रशिया आणि अमेरिका यांच्यातील चर्चा सुरू
रियाधमध्ये रशिया आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. मुख्य मुद्दा युक्रेनमधील तोडगा आहे. दोन्ही बाजू द्विपक्षीय संबंध पुनर्संचयित करण्यावरही चर्चा करतील.
-
कुंभमेळ्यातही 40 आमदारांचं पाप धुतलं जाणार नाही- राऊत
कुंभमेळ्यातही 40 आमदारांचं पाप धुतलं जाणार नाही अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना एक साबण द्यावा असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तर राऊतांची पापं कोणत्याच संगमावर धुतली जाणार नाही, असं प्रत्युत्तर प्रकाश महाजन यांनी दिलं आहे.
-
छ. संभाजी महाराजांसंदर्भातील वादग्रस्त मजकुरावरून मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक
छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भातील वादग्रस्त मजकुरावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत. विकिपीडियाचा आधार घेत कमाल खान याने ट्वीट केलं होतं. विकिपीडियाशी संपर्क साधून वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश दिले आहेत. सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांना फडणवीस यांनी हे आदेश दिले आहेत.
-
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना, रेल्वेमंत्र्यांविरुद्ध युवक काँग्रेसचे निदर्शने
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल दिल्लीतील भारतीय युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अश्विनी वैष्णव यांच्या विरोधात निदर्शने केली.
-
त्यांनी या राज्याची YZ केली
खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर कडाडून प्रहार केला. त्यांनी या राज्याची वायझेड केल्याचे वक्तव्य त्यांनी केले. या राज्यात भ्रष्टाचार बोकाळला असल्याचे ते म्हणाले.
-
या सरकारला झोप कशी येते? सुप्रिया सुळे
लेक वडीलासाठी राज्यात मोर्चा करत फिरत आहे, या लेकीचे अश्रू अनावर आहेत. मला आश्चर्य वाटतं सरकारला झोप कशी येत आहे. मलाच इथे जाताना अस्वस्थ वाटत होतं की ते त्यांना चेहरा कसा दाखवू, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
-
चंद्रहार पाटील याचा एल्गार
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हा उपोषणाला बसला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
-
थोड्याच वेळात मंत्रिमंडळ बैठक
दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. सहाव्या वित्त आयोगाविषयी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
-
जितेंद्र आव्हाड यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
जुडेशीयल इंक्वायरी लावा, महादेव मुंडे यांच्या बायकोने सुरवातीलाच माझ्यासोबत संपर्क साधला. रामकृष्ण बांगड्यांच्या 18 संस्था वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांना बळकावायच्या होत्या, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. मागच्या अडीच वर्षात इथे खोट्या केस झाल्या इथे धुमाकूळ घातला गेला. तेव्हा माझे पोलीस अधिकारी होते ते येत राहता कामा नये त्याला जिल्हा बाहेर पाठवा. प्रकाश महाजन आणि बापू आंधळे केस मध्ये सुद्धा वाल्मीक कराडला मदत केल्याचा आरोप त्यांनी केला.
-
वाल्मीक कराड खंडणी मागत होते त्याला ED का लागली नाही ? सुप्रिया सुळेंचा सवाल
वाल्मीक कराड खंडणी मागत होते त्याला ED का लागली नाही? , मे महिन्यातच ED आणि CBI लागायला पाहिजे होती. मे महिन्यापासून सुरू होते जूनमध्ये यांच सरकार होतं त्यांनी काय केलं. आवादा कंपनी जेव्हा गुन्हा दाखल केला तेव्हा यांनी काय केलं ? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला .
-
या प्रकरणात लक्ष घालू, अमित शाहांनी शब्द दिलाय – सुप्रिया सुळे
तुम्ही आंदोलन वगैरे काही करू नका तुमचा लढा आम्ही लढू. आठ दिवसांपूर्वीच खा. सोनवणे आणि मी अमित शहांना भेटून आलो, त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की यात लक्ष घालू असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.
-
त्या आईचे अश्रू अनावर आहेत – सुप्रिया सुळे
मी भाषण करायला आले नाही, भेट घ्यायला आले. मी पण कुणाची तरी लेक आहे. त्या आईला अश्रू अनावर झाले आहेत, ते एका आईलाच समजू शकतं. माझ्या मावशीचा मुलगा असाच अचानक गेला, त्या गोष्टीला वीस पंचवीस वर्षे झाले असतील, पण माझी मावशी अजूनही सावरलेली नाहीये. तेच आईचं दुःख प्रत्येक बोलण्यातून दिसतं – सुप्रिया सुळे
-
हा खूुन आरोपींनी नव्हे तर हा यंत्रणेने केला आहे – धनंजय देशमुख
हा खूुन आरोपींनी नव्हे तर हा यंत्रणेने केला आहे – धनंजय देशमुखांचा आरोप.
-
खंडणी प्रकरणातील इतर आरोपी सगळ्यांचा ओळखीचा आहे, मात्र पोलीस कारवाई करत नाहीत – धनंजय देशमुख
खंडणी प्रकरणातील इतर आरोपी सगळ्यांचा ओळखीचा आहे, मात्र पोलीस कारवाई करत नाहीत. संतोष अण्णाचा खून झाल्यानंतर खंडणीच्या केस पोलिसांना काढली. वरून जर फोन आला तर पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत. 29 तारखेला खंडणीची घटना झाली त्यानंतर 11 डिसेंबरला एफ आय आर झाला – धनंजय देशमुख
-
देशमुखांच्या आरोपींना फाशी होईपर्यंत माघार घेणार नाही – मस्साजोगमध्ये ग्रामस्थ आक्रमक
हत्या प्रकरणात पोलिसांनी कोणता तपास केला? PI महाजनांवर कोणतीच कारवाई झाली नाही, आंदोसलन केल्यावरच आरोपी सापडले. देशमुखांच्या आरोपींना फाशी होईपर्यंत माघार घेणार नाही – मस्साजोगमध्ये ग्रामस्थ आक्रमक
-
समृद्धी महामार्गावर अपघात
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर पुन्हा एका खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला असून या अपघातात प्रवासी 10 जखमी झाले आहेत. 24 तासात समृद्धी महामार्गावर दुसरा मोठा अपघात आहे. पुण्यावरून नागपूरला जाणाऱ्या हंस ट्रॅव्हल्सच्या कारंजा इन्टरचेंज टोल प्लाझा जवळ मागून येणाऱ्या वाहनाने ट्रॅव्हल्सला धडक दिली.
-
सुप्रिया सुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीला
खासदार सुप्रिया सुळे मस्साजोगमध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचल्या. सोबत खासदार बजरंग सोनावणे. लेकरांना किती परीक्षा द्यावी लागणार आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून तपासबाबत सुळे माहिती घेत आहेत.
-
सरकारने शेवटच्या दाण्यापर्यंत सोयाबीन खरेदी करावी – रविकांत तुपकर
“सरकारने शेवटच्या दाण्यापर्यंत सोयाबीन खरेदी करावी. खरेदी करायची नसेल तर 3 हजार रुपये भाव फरक द्या. कापसाला पण 3 हजार रुपये भाव फरक द्या. कर्जमुक्तीचे आश्वासन सरकारने दिले होते, ते पूर्ण केले पाहिजे. लाखो शेतकऱ्यांचा पिक विमा अद्याप बाकी आहे, तो विमा सुद्धा द्या.जर आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर लवकरच बैठक घेऊन राज्यव्यापी आंदोलन करणार” असं शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले.
-
शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान, कांद्याच्या गोण्यांची चोरी
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण बाजारातून शेतकऱ्यांच्या 44 कांद्याच्या गोण्यांची चोरी. पहाटेच्या वेळी चाकण बाजार समितीमधून शेतकऱ्यांचा कांदा चोरीला जात असल्याचा प्रकार उघड. 52 हजार 250 रुपयाचे कांदे चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान. चाकण पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल.
-
ठाणे- 34 हजार 782 शिधापत्रिका विविध कारणांनी केल्या रद्द
ठाणे- 34 हजार 782 शिधापत्रिका विविध कारणांनी रद्द केल्या आहेत. त्यामुळे या कार्डधारकांना स्वस्त रेशनचा लाभ ही आता नाकारण्यात आला आहे. सरकारी धोरणानुसार सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पांढरी शिधापत्रिका दिली आहे. त्यामुळे या शिधापत्रिकेवर कोणत्याही प्रकारचे स्वस्त धान्य वितरित करण्यात येत नाही. आधार कार्डशी संलग्न करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
-
ठाणे- सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी आंदोलनाचा इशारा
ठाणे- सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला. ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसह इतर देण्याची रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी देण्यास प्रशासन टाळाटाळ केली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार संघटना मुन्सिपल लेबर युनियनने दिली आहे. कामगार नेते युनियनचे अध्यक्ष रवी राव यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
-
ठाण्यात 195 घर खरेदीदारांची 144 कोटींची भरपाई थकली
ठाण्यात 195 घर खरेदीदारांचे 143.67 कोटी रुपये नुकसान भरपाई थकली असून यापैकी फक्त पाच विकासकाकडे 107 कोटी रुपये अडकलेले आहेत. ही रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाने वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले तर एकूण रकमेच्या तब्बल 75 टक्के रक्कम वसूल होऊन अनेक घर खरेदीदारांना दिलासा मिळणार आहे.
-
नाशिक- शिवजयंतीच्या मिरवणुकीत डीजे लेझर नको, पोलिसांच्या सूचना
नाशिक- शिवजयंतीच्या मिरवणुकीत डीजे लेझर नको, अशा सूचना शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी दिल्या आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. डीजे लेझर यासह ध्वनी क्षेपकांच्या मर्यादांचे पालन करणे प्रत्येक मंडळाला बंधनकारक आहे. मिरवणुकी दरम्यान टवाळखोरांवर वॉच ठेवण्यासाठी निर्भया दामिनी पथक नेमणार आहेत.
-
पुणे- पाणीटंचाईबाबत मोठा दिलासा देणारी बातमी
पुणे- पाणीटंचाईबाबत मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील पाणीटंचाईची चिंता मिटली आहे. ३४९ तालुक्यातील भूजलसाठ्यात वाढ झाली आहे. केवळ खटाव, डहाणू, जव्हार, बल्लारपूर तालुक्यात पाणीटंचाईचे संकेत आहेत.
-
सुप्रिया सुळेंच्या दौऱ्याबाबत धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्याबाबत धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आमच्या ज्या काही अडचणी आहेत, सुरुवातीचा घटनाक्रम, ग्राऊंड लेव्हलला सुरू असलेली दहशत, गुंडगिरी, अपहरण खंडणी, खून हे कशामुळे आणि कोणामुळे चालू होतं या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत. गावकऱ्यांच्या भूमिकेशी मी सहमत असतो, गावकरी जे निर्णय घेतील त्यावरून पुढील दिशा ठरते.”
नव्या केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्ततांच्या नियुक्तीसाठी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत निवड समितीची बैठक झाली. मात्र बुधवारी सर्वोच्च न्यायालया याबाबत सुनावणी होणार असातना निवडीची घाई केली जात असल्याबद्दल काँग्रेस आक्षेप नोंदविला. असं असताना रात्री उशिरा केंद्रीय विधि मंत्रालयाने ग्यानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचं जाहीर केलं. तर दुसरीकडे कॉमेडियन रणवीर अलाहबादियाने इंडियाज गॉट लेटेंटमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानावर महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर अनेकांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. युट्यूबर समय रैना परदेशात असल्यामुळे त्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. ती महाराष्ट्र सायबर विभागाने फेटाळली असून त्याला याप्रकरणी समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं होतं. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाने खचून न जाता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती आखण्यास राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने सुरुवात केली आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 28 फेब्रुवारीला पक्षाचे विद्यमान खासदार, आमदार यांच्यासह माजी आमदारांची बैठक बोलावली आहे. मुंबई इथं ही बैठक होणार आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
Published On - Feb 18,2025 8:23 AM





