Maharashtra Breaking News LIVE 15 February 2025 : साळवींनी आधीच यायला हवं होतं- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 15 फेब्रुवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
महिलांचे धर्मांतर योग्य नाही: रामदास आठवले
महाराष्ट्र सरकारने लव्ह जिहादविरुद्ध समिती स्थापन केल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, ‘लव्ह जिहादविरुद्ध कायदा झाला पाहिजे. महिलांचे धर्मांतर योग्य नाही. दोन तरुणांचे (वेगवेगळ्या धर्माचे) एकत्र येणे सामान्य आहे, परंतु मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर करू नये.
#WATCH | Ahilyanagar, Maharashtra: On Maharashtra government forming a committee against love jihad, Union Minister Ramdas Athawale says, ” There should be a law against love jihad…conversion of women is not right. Two youngsters (of different religions) coming together is… pic.twitter.com/SaBGALX8Qs
— ANI (@ANI) February 15, 2025
-
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणात मुंबई पोलिसांकडून एफआयआर दाखल
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणात मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कार्यवाहक सीईओ देवर्षी घोष यांच्या तक्रारीवरून, महाव्यवस्थापक आणि लेखा प्रमुख हितेश मेहता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
-
धर्म, अध्यात्म आणि संस्कृतीचा हा महाकुंभ दिव्य आहे: ओम बिर्ला
उत्तर प्रदेश: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज प्रयागराज येथील महाकुंभात पवित्र संगमात स्नान केले. यावेळी ते म्हणाले, ‘धर्म, अध्यात्म आणि संस्कृतीचा हा महान कुंभ दिव्य आहे. येथे दैवी ऊर्जा आहे. आपण गंगा मातेला प्रार्थना करतो की तिचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहो.
-
साळवींनी आधीच यायला हवं होतं- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राजन साळवींनी नुकतीच मशाल सोडत हाती धनुष्यबाण घेतलं आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास टाकत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलं. साळवींनी आधीच यायला हवं होतं, येण्यास उशीर केला असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तिथे विचारांना वाळवी लागल्यावर कसा राहील साळवी असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
-
आदित्य ठाकरे यांना सर्व आयते मिळाले- रामदास कदम
आदित्य ठाकरे यांना सर्व आयते मिळाले. त्यांचे पक्षात योगदान काय? असा प्रश्न शिवसेना नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला.
-
-
जि.प. निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार – मंत्री महाजन
जळगाव जिल्हा परिषदेमध्ये 70 टक्के पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल इतर जागा मित्र पक्षाच्या असतील. जळगाव ,धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
-
आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचा समारोप
आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षाचे औचित्य साधून वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थान वामनीकॉमच्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या समारोप कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहे.
-
-
देशमुख कुटुंबीय सीआयडी कार्यालयात जाणार
धनंजय देशमुख आज केज येथे सीआयडी कार्यालयात जाणार आहे. ते सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. संतोष देशमुख यांच्या पायामध्ये असलेली चप्पल आणि गळ्यातील दोरा या वस्तुंची ओळख पटवण्यासाठी देशमुख कुटुंबीय सीआयडी कार्यालयात जाणार आहे.
-
सांगली : गॅस सिलींडरच्या ट्रकने दुचाकींना उडविले, तीन जखमी
सांगलीच्या मिरजेमध्ये एका भरधाव गॅस सिलेंडरच्या ट्रकने पाच वाहनांना उडवल्याचा प्रकार घडला आहे.यात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत तर पाच दुचाकी वाहनांचा चक्काचुर झाला आहे. मद्यधुंद चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे.
-
धाराशिव येथे अफूुच्या झाडांची पोती जप्त
कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे अर्धा एकरातील अफुची (खसखस) झाडांची 33 पोती शिराढोण पोलिसांनी जप्त केली आहेत
-
परतूरचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलियांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश
जालन्यात परतूरचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला. जेथलिया यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी अजित पवार गटात दाखल झाले आहेत.
-
गोंदियात काँग्रेसला मोठं खिंडार पडणार? माजी आमदार सहसराम कोरोटेंसह अनेक कार्यकर्ते शिवसेनेत
गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडणार असल्याच्या चर्चा आहेत. काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कोरोटे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. नाना पटोले यांनी सूड भावनेतून त्यांचं विधानसभेचं तिकीट कापल्याचा त्यांनी आरोप केला आहे. येणाऱ्या 20 तारखेला शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सहसराम कोरोटे पक्ष प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते शिवसेनेचं धनुष्यबाण घेणार हाती असल्याच्या चर्चा आहेत.
-
भाजप नेते राहुल कुल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर
भाजप नेते राहुल कुल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांच्यात काय चर्चा होणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
-
Maharashtra News: पाणी बचतीसह शुद्धीकरणासाठी जलसंपदामंत्री आक्रमक
नाशिक महानगर पालिकेत सुट्टीच्या दिवशी आढावा बैठक… नाशिक महापालिकेच्या पाणी वापराचा घेणार हिशोब… वारेमाप पाणी वापर आणि दूषित पाण्यावरून जलसंपदामंत्र्यांनी व्यक्त केली होती नाराजी… बिगर सिंचन क्षेत्रावरील पाणी वापराचे आरक्षण वाढत गेल्यास नाशिक भागातील शेती संपुष्टात येण्याची व्यक्त केली होती भीती… याच पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आढावा बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष…
-
Maharashtra News: विनायक राऊत यांनी गद्दारी केली यांचे सर्टिफिकेट माझ्याकडे.. ते महागद्दार – राजन साळवी
विनायक राऊत यांनी गद्दारी केली यांचे सर्टिफिकेटमाझ्याकडे.. ते महागद्दार, पक्षात राहून पक्षातील पदाधिकारी यांना हाताशी धरून गद्दारी केली त्यांना नियती सोडत नाही…. मी गद्दारी केली नाही हे मी शपथ घेऊन सांगतो… असं वक्तव्य राजन साळवी यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: राजधानी दिल्लीत आरएसएसच नवीन कार्यालय
राजधानी दिल्लीत आरएसएसच नवीन कार्यालय… कार्यालयाला केशव कुंज भवन असं नाव… येत्या 19 फेब्रुवारीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार उद्घाटन… पहिल्यांदाच दिल्लीत 12 मजली आरएसएसचे कार्यालय…
-
लव्ह जिहादच्या नावाने वातावरण खराब
हे सरकार कामाच्या नावावर मत मागू शकत नाही फसवणूक करून ,निवडणूक आयोगाला हाताशी धरून विजय मिळवतात.त्यामुळे हे अशा घोषणा करत राहणार.लव्ह जिहाद च्या नावाने वातावरण खराब करीत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
-
चांदीने केला कहर
जळगावच्या सराफ बाजारात चांदीचे दर विक्रमी उच्चांकावर पोहचले आहे. एक किलोचा भाव ९८ हजार ३०० रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या भावात दोन दिवसात तीन हजार ३०० रुपयांची वाढ झाली आहे. तर सोन्याचे दर ८६ हजार ३०० रुपये प्रति तोळा पोहोचले आहेत.
-
उद्धव ठाकरेंना पुण्यात मोठा धक्का
शहर उपप्रमुखाने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राजेश पळसकर यांच्या राजीनाम्याची चर्चा होत आहे. 40 ते 50 कार्यकर्त्यांसोबत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
-
पालकमंत्री पदावरून कोल्ड वॉर नाही
पालकमंत्री पदावरून नाशिकमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे, असे मला वाटत नाही. कुंभमेळाव्याचे आढावा घेण्याचे काम मोठे आहे. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री यांचे दायित्व आहे. तर नगर विकास खात्याचे प्रमुख म्हणून शिंदे यांनी बैठक घेतली आहे. मी पण आज मनपात बैठक घेतो आहे, असे वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
-
शेतमाल गंजीला आग
मागील चार ते पाच वर्षापासून बेलाड या शिवारामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामधील शेतमाल गंजिला आग लावण्याचे प्रकार सुरू आहेत. आताही तसाच प्रकार समोर आला असून मध्य रात्रीच्या सुमारास बेलाड येथे जवळपास 15 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेल्या शेतमाल गंजीला अज्ञात व्यक्तीकडून आग लावल्याची घटना समोर आली आहे.
-
भास्कर जाधवांचे चुलत बंधु शिंदे गटात
आमदार भास्कर जाधव यांचे चुलत बंधु माजी जिल्हा परिषद सदस्य बाळ शेठ जाधव उद्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
-
GBS ची लागण झालेल्या दोन रुग्णांचा मिरजेत मृत्यू
गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराची लागण झालेल्या दोन रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मिरजेत मृत्यू झालेल्यात हुक्केरी (जि. बेळगाव) येथील 14 वर्षीय मुलाचा आणि सांगोला (जि. सोलापूर) सांगोला येथील 60 वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे.
-
पुण्यातील कर्वेनगर उड्डाणपुलावर पहाटे अपघात
नियंत्रण सुटल्याने चारचाकी डिव्हायडवरून गेली विरुद्ध दिशेला. अपघातात चार जण जखमी असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाडीने जोरदार धडक दिल्याने एयर बॅग ही खुल्या झाल्या आहेत. पोलिसाकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
-
सुरेश कुमार जेथलिया आज NCP मध्ये करणार प्रवेश
उपमुख्यमंत्री अजित पवार परतूरमध्ये बागेश्वरी साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर दाखल. सुरेश कुमार जेथलिया यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी अजित पवार आज परतुर दौऱ्यावर. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्याचबरोबर युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण सोबत आहे. सुरेश कुमार जेथलिया यांच्यासह शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटात प्रवेश करणार.
-
धस-मुंडे यांच्या भेटीवर मला शंका नाही – धनंजय देशमुख
“सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर मला काही शंका नाही. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. बी टीमची दहशत कायम आहे. मी काही जणांची उघडपणे नावे घेतलीत, यासंदर्भात पोलिसांनी यांची चौकशी करून सोडून दिले असल्याचे मला सांगितले. नोकरी देण्यापेक्षा आम्हाला न्याय महत्त्वाचा आहे. 70 दिवस झाले तरी एक आरोपी सापडत नाही दुर्देवाची गोष्ट आहे” असं धनंजय देशमुख म्हणाले.
-
पुण्यात मंत्री नितेश राणे विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी
सरकारचा कोणता ही निधी हा फक्त्त महायुतीच्या कार्यकर्त्याला मिळेल, असे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी एका कार्यक्रमामध्ये केले होते. महाविकास आघाडीच्या कुठल्या ही कार्यकर्त्याला किंवा सरपंचला निधी मिळणार नाही. विकास होणार नाही. विकास करायचा असेल तर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करावा असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. मंत्रीसाहेब सत्तेचा ऐवढा माज बरा नव्हे अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे.
-
आमदार सुरेश धस हे न्यायासाठी लढतच नव्हते – अंजली दमानियांची टीका
आमदार सुरेश धस हे न्यायासाठी लढतच नव्हते. सुरेश धस – धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी ही टीका केली. राजकारण्यांना भावना नसतात, ते स्वार्थापोटी राजकारण करतात असंही वक्तव्य त्यांनी केलं.
-
क्षमतेप्रमाण मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव – भास्कर जाधव
बाळासाहेब असताना शिबिरांमधून भाषण करायची मला संधी मिळायची. शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद मला लाभले त्यानंतर पवार साहेबांचे आशीर्वाद मला लाभले. महाराष्ट्रात माझा एक वर्ग आहे पण क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मला कधीही मिळाली नाही. माझं दुर्दैव प्रत्येक वेळेला मला आडवं आलं आहे, भास्कर जाधवांनी बोलून दाखवली नाराजी.
-
मस्साजोग येथील गावकरी देशमुख कुटुंबियांच्या पाठीमागे ठामपणे उभे
सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना भेटले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. सुरेश धस हे आम्हाला न्याय देण्यासाठी जज नाहीत त्यामुळे या प्रकरणात कुणी कुठेही गेलं तरी आम्हाला न्याय मिळणार आहे आणि आम्ही सर्व आरोपींना फाशी दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आम्ही देशमुख यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत अशी भूमिका मस्साजोग येथील ग्रामस्थांनी मांडली.
-
नाशिकमध्ये मनसेला पुन्हा धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांचा आज भाजपात प्रवेश होणार
नाशिकमध्ये मनसेला पुन्हा धक्का, 25 ते 30 पदाधिकारी आज भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश पार पडणार असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच मनसेला पुन्हा गळती लागली आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्या नंतर देखील पक्षातील गळती सुरूच असून पक्षातील माजी नगरसेवकांसह आता पदाधिकाऱ्यांनी देखील मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिकमध्ये मनसेला पुन्हा धक्का, 25 ते 30 पदाधिकारी आज भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश पार पडणार असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच मनसेला पुन्हा गळती लागली आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्या नंतर देखील पक्षातील गळती सुरूच असून पक्षातील माजी नगरसेवकांसह आता पदाधिकाऱ्यांनी देखील मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात गेले काही दिवस कमाल तापमान सातत्याने पस्तिशीपार असल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. उन्हाचा चटका, उकाडा त्रासदायक ठरत आहे.काल सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 36.6 अंश, तर निफाड येथे नीचांकी 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्ग तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर देखभालीसाठी कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना रविवारी खोळंबा होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी सकाळी 11.55 ते दुपारी 4.55 पर्यंत ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाईल.राज्यात जीबीएसचा तिसरा बळी, नागपूरमध्ये 55 वर्षीय रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
Published On - Feb 15,2025 9:02 AM





