Mumbai Rains News LIVE : नांदेडच्या मुखेड तालुक्यातील बारहाळी महसूल विभागात रेकॉर्ड ब्रेक पाऊस
Maharashtra, Mumbai Rains News LIVE Updates : हवामान विभागाने मुंबईला आज आणि उद्यासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. मुंबई शहरासह उपनगरांत, विविध भागात तूफान पाऊस कोसळत असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसासंबंधी सर्व लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला इथे वाचायला मिळतील. फॉलो करत रहा हा ब्लॉग..

Maharashtra, Mumbai Rains News LIVE Updates: मुंबईत रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे हवामान खात्याने ऑरेंज अर्लट जारी केला आहे. पावसामुळे मध्य रेल्वे आणि हार्बल मार्गाची लोकल सेवा उशिराने सुरु आहे. पुढील 3 तासांत रायगडमधील आणि मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे परभणी, नांदेड, पालघर, छत्रपती संभाजीनगर, बीड जालना या भागात ऑरेंज अलर्ट आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. पाच ते सहा गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून NDRF टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
नांदेडच्या मुखेड तालुक्यातील बारहाळी महसूल विभागात रेकॉर्ड ब्रेक पाऊस
नांदेडच्या मुखेड तालुक्यातील बारहाळी महसूल विभागात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. मागील 24 तासात 354.75 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बारहाळी परिसरातील हसणाळ, रावणगाव आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. मुखेड तालुक्यातील मुकरामबाद महसूल मंडळात 206 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
-
तुळजाभवानी मंदिर गाभारा पाडकाम-शिखर उतरण्याच्या संदर्भात मुंबईत बैठक
तुळजाभवानी मंदिर गाभारा पाडकाम आणि शिखर उतरण्याच्या संदर्भात मुंबईत महत्वपूर्ण बैठक झाली आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून राज्य सरकार तुळजाभवानी मंदिराच्या शिखर आणि गाभाऱ्याबाबत 30 दिवसात अहवाल घेणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईतील बैठकीत माहिती याबाबत माहिती दिली.
तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच तुळजाभवानी मंदिराचे काम करा, अशा सूचना शेलारांनी मंदिर संस्थानाला दिल्या आहेत. तसेच तुळजाभवानी मंदिर परिसरातील कुलधर्म कुलाचारसाठीच्या जागा निश्चित करण्याच्याही सूचना दिल्या गेसल्या आहेत. या बैठकीला तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष विश्वस्त, पुरातत्त्व विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पुजारी उपस्थित होते.
-
-
वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीचा पूर मोठ्या प्रमाणात वाढणार!
पैनगंगा नदीवरील बुलढाणा जिल्ह्यातील पेन टाकळी प्रकल्प 87.79 टक्के भरलंय. तसेच मोठ्या प्रमाणात प्रकल्पात सतत आवक होत आहे. त्यामुळे प्रकल्पाची 9 द्वारं 50 सेंटीमीटरने उघडून त्यातून पैनगंगा नदी पात्रात 16 हजार 533 कुसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
आधीच वाशिम जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीने रौद्र रूप धारण केलं आहे. त्यातच पेन टाकळीमधून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग करण्यात येत आहे.त्यामुळे पुरामुळं भीषण स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
-
बोरनार शिवारात अतिवृष्टी-वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान, शेतकरी अडचणीत
जळगाव तालुक्यातील बोरनार शिवारात अतिवृष्टी-वादळी वाऱ्यामुळे मका जमीनदोस्त झाला आहे.बोरनार शिवारात अनेक शेतांमध्ये काढणीला आलेला मका जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.
मका पिकाला कणीस सुद्धा लागली होती. हाता तोंडाशी आलेला घास फिरवून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जळगाव तालुक्यातील बोरनार शिवारात अनेक शेतांमध्ये मका आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तात्काळ पंचनामे करुन हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
-
मुंबईत मिठी नदीत तरुण वाहून गेला, शोध सुरू
मुंबईतील वांद्रे येथील वाल्मिकी नगर परिसरातील बीकेसी पुलावरून मिठी नदीत आंघोळीसाठी उडी मारणारा एक तरुण जोरदार प्रवाहात वाहून गेला. माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. सध्या त्या तरुणाचा शोध सुरू आहे.
-
-
उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सीपी राधाकृष्णन 20 ऑगस्टला अर्ज करणार
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री, किरेन रिजिजू म्हणाले की, “एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सीपी राधाकृष्णन यांचे नामांकन 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दाखल केले जाईल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, सर्व एनडीए नेते नामांकन दाखल प्रक्रियेत सहभागी होतील.”
-
भिवंडीमध्ये जीर्ण इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले, चार जण जखमी
भिवंडीतील चौहान कॉलनीतील उरुशा अपार्टमेंटमधील चार मजली इमारतीच्या छताचे प्लास्टर खाली पडल्याने एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. या अपघातात एका मुलाच्या डोक्याला आणि दुसऱ्याच्या पायाला दुखापत झाली आहे, महिलेच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झाले आहे, तर पुरूषाच्या खांद्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
वसई विरार महापालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर केली पाहणी
वसई विरार महापालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर पूरपरिस्थितीची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे काही सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचून आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिका अधिकारी यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. महानगरपालिकेकडील 54 संक्शन पंपांचा आवश्यकतेप्रमाणे वापर सुरु असून पावसाचे पाणी साचून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही यासाठी पालिका तत्पर असल्याचे सांगण्यात आले आहे. उद्या हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन ही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
-
सोलापूर: रयत क्रांती शेतकरी संघटना आक्रमक
रयत क्रांती शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकीत बिले न मिळाल्याने शेतकरी आणि ऊस वाहतूकदार आक्रमक झाले आहेत. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय साखर आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घातला.
-
2000 सालच्या पूर्वीच्या घरावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर गणेश नाईक संतापले
वनमंत्री गणेश नाईकांचा आज जनता दरबार पार पडला यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या समस्या गणेश नाईक यांच्यापुढे मांडल्या. यामध्ये कोपरी येथील ज्योती सिंग यांनी त्यांच्या 2000 साल पूर्वीच्या घरावर मनपा व सिडको कडून कारवाई करण्याच्या नोटीसा येतं असून या सर्व प्रकारमुळे आमचं कुटुंब भीतीच्या छायेत होतं, आमचं घर हे 2000 साल पूर्वीच असून आम्ही संबंधित विभागाला सर्व कागदपत्र दिले तरीही आमच्यावर कारवाई करणार असं आम्हाला सांगण्यात आलं असं ज्योती सिंग यांनी म्हटलं. यावेळी अधिकाऱ्यांना कारवाई करु नका असा दम गणेश नाईक यांनी दिला.
-
पालघर – मुसळधार पावसात मनसेच्या नेतृत्वाखाली कंपनी कामगारांच आंदोलन
पालघर पोलीस ठाण्याबाहेर पालघर मधील मस्तांग इंटरप्राईजेस या कंपनीच्या मुजोर मालकीण विरोधात आंदोलन सुरु आहे. मागील आठवड्यात आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या मालकिनी विरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, मात्र मात्र अटक न झाल्याने कामगार आक्रमक झाले आहे. कंपनी मालकीण यांना अटक करण्यासाठी मनसेच्या नेतृत्वाखाली कामगारांच आंदोलन सुरु आहे.
-
जळगाव- मुसळधार पावसाचा जिल्हाधिकारी कार्यालयाला फटका
जळगावमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला पाणी साचलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जाताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काल अजित पवार दौऱ्यावर असताना या ठिकाणी मुरुम टाकण्यात आला होता. मात्र तरीही पाणी साचले आहे.
-
मध्य रेल्वेला पावसाचा मोठा फटका, ठाणे स्थानकात प्रवाशांची गर्दी
मध्य रेल्वेला पावसाचा मोठा फटका
ठाणे स्थानकात प्रवाशांची गर्दी
ऑफिसला लवकर सुट्टी दिल्यामुळे अनेकांची ठाणे स्थानकामध्ये मोठी गर्दी
अप आणि डाऊन मार्गावरील मध्य रेल्वेच्या गाड्यांना 15 ते 20 मिनिटे उशिर
-
सांताक्रुजमधील अकोला पोलीस स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले
सांताक्रुजमधील अकोला पोलीस स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले…
गेल्या तासाभरापासून पाऊस बंद झाला आहे… तरी या भागातील पाण्याचा निचरा अजून झालेला नाही…
त्यामुळे साचलेल्या पाण्याचा नागरिकांनी पोलिसांना त्रास सहन करावा लागतो त्याचा आढावा घेतला
-
बीडच्या केज तालुक्यात शेताला तलावाचे स्वरुप, पिकांचे मोठे नुकसान
बीड : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये माजलगाव आणि केज तालुक्यात नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. दरम्यान केज तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अक्षरशः शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. दरम्यान प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे केले जाणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे.
-
कल्याण आणि डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला
कल्याण डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला आहे. कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आंबेडकर रोड पाण्याखाली गेला आहे. वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावं लागलं आहे.
-
सोलापुरात शिवसेना शिंदे गटाला बसणार मोठा धक्का
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आपल्या गटासह भाजपत प्रवेश करणार आहेत. शिवाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. मात्र पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
-
जोरदार पावसामुळे मुंबईसह पुण्यात येलो अलर्ट
पुण्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस बरसतोय, आज पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहरात सकाळपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप आल्याचे चित्र पाहायला मिळतंय.
-
मरीन लाइन्स परिसरात पावसाची संततधार
सकाळपासूनच मुंबईला पावसाने झोडपले आहे. मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. मरीन लाइन्स परिसरात पावसाची संततधार. अनेक ठिणार पाणी साचल्याची दृश्ये पाहायला मिळत आहेत.
-
अंधेरीमध्ये देखील गुडघाभर पाणी, पाण्यात बुडालेल्या कार, जोरदार प्रवाहामुळे एकमेकांवर धडकल्या
मुंबईत रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचलं आहे. अंधेरीमध्ये देखील गुडघाभर पाणी साचलं आहे. अनेक वाहनं पाण्याखाली आहेत. पाण्यात बुडालेल्या कार जोरदार प्रवाहामुळे एकमेकांवर धडकल्याची घटनाही घडली आहे. या धडकेत कारचा पुढचा भाग मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे.
-
माटुंगा रेल्वे स्टेशन बाहेर रस्त्यावर साठलं पाणी; संपूर्ण रस्ता जलमय
मुंबईत मुसळधार सुरु असून, दादर, माटुंगा परिसरात, रेल्वे स्टेशन बाहेर रस्त्यावर भरपूर पाणी साठलं आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना कडून पंपाच्या सहाय्याने पाणी काढण्याचे काम सुरू आहे.
-
मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु; मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. याचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेण्यात आला आहे. त्यांनी मुंबईच्या पावसासोबत सांगितलं की, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीवर लक्ष असल्याचं फडणवीस म्हणाले. कोकण विभागात जास्त पाऊस झाला असल्याचंही त्यांनी म्हटलं.
-
अंधेरीतील वीरा देसाई रोडवर पाणी साचलं; पाण्यात अनेक वाहने अडकली
अंधेरीतील वीरा देसाई रोडवर पाणी साचलं आहे. पाण्यात अनेक वाहने अडकली आहे. तसेच अंधेरीमधील सर्वच रस्ते पाण्याखाली आहेत.
-
वसई विरार मध्ये दुपार नंतर ही पावसाचा जोर कायम आहे
वसई विरार मध्ये दुपार नंतर ही पावसाचा जोर कायम आहे. विरार पश्चिम यूनिटेक कॉम्प्लेक्स मधील 40सोसायट्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे.
वसई विरार महापालिकेकडून सक्षण पम्प लावून पाणी बाहेर काडण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र जोरदार पाऊस सुरू आहे. समुद्रात भरती असल्याने पाण्याची पातळी कमी होण्याऐवजी वाढत आहे. तळमजल्यावर राहणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.
-
कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार, सखल भागात पाणी साचण्याची शक्यता
कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार असून खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण झालेत. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून कल्याण-डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात अधूनमधून जोरदार सरींची बरसात झाली. पावसाचा जोर वाढल्यास किंवा सायकाळ पर्यंत कायम राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
-
ठाण्यात अवघ्या 4 तासात 31.22 मिलिमीटर पावसाची नोंद
ठाणे रेन अपडेट – ठाण्यात अवघ्या 4 तासात 31.22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी 11 ते 12.30 च्या दरम्यान सर्वाधिक म्हणजे 16.26 मिमी पाऊस पडला.
-
अंधेरीमध्ये पाण्यात अडकलेली मर्सिडीज काढण्यासाठी बोलावली टोइंग व्हॅन
पावसामुळे अंधेरीत पाण्यात मर्सिडीज कार अडकली होती, ती कार पाण्यातून बाहेर काढण्यासाठी टोइंग व्हॅन बोलावण्यात आली. ती बाहेर काढण्यासाठी कठोर मेहनत केली जात आहे, प्रयत्न केला जात आहे.
-
मुंबईत हिंदमाता परिसर जलमय, रस्ते, वाहनं गेली पाण्याखाली, नागरिकांचे हाल
मुंबईत हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचलं आहे. सकाळपासून पावसाने जोर धरला असून त्याचा परिणाम दिसत आहे, हिंदमाता परिसर जलमय झाला असून रस्ते, वाहनं पाण्याखाली गेली आहेत. अनेक नागरिक रस्त्यातच अडकून पडले आहेत.
-
आज आणि उद्या कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसराला रेड अलर्ट
आज आणि उद्या कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसराला रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबईला आज आणि उद्या रेड अलर्ट तर पुण्यासाठी आज व उद्या यलो अलर्ट देण्यात आला आहे.
-
SDRF पथकाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य
SDRF पथकाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. अजूनही मुखेडच्या रावण गावात 100 लोक अडकल्याची माहिती. कालपासून नागरिक उपाशी.
-
मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत
मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत. एका मागे एक लोकल गाड्या थांबवण्यात आल्या. सायन माटुंगा दरम्यान लोकल गाड्या थांबल्या. चाकरमानी वर्ग आता माटुंग्याहून रेल्वे ट्रॅक वर चालत दादर स्थानक गाठत आहे.
-
पुण्यात गाड्या तोडफोड सत्र सुरूच
घोरपडीतल्या म्हस्कोबा मंदिराजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांची केली तोडफोड. चार ते पाच गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती. रस्त्यावर पार केलेल्या गाड्यांची तोडफोड केल्याने नागरिक भयभीत. अधिक तपास मुंढवा पोलिस करत आहेत.
-
माटुंग्यामध्ये एसी लोकल थांबून
माटुंग्यामध्ये एसी लोकल थांबून. दादरमध्ये रेल्वे ट्रॅक पाण्याखाली. दादरमध्ये गुडघाभर साचलं पाणी. मंत्री आशिष शेलार आढावा घेण्यासाठी कंट्रोल रुममध्ये. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक संथगतीने.
-
सदाभाऊ खोत यांच्याकडून सरकारला घरचा आहेर
गोपालक हत्या कायदा बनल्याची टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी करत सरकारला घरचा आहेर दिला आहे. गोरक्षा हा गोरक्षकांचा गोरख धंदा बनला असून शेतकऱ्यांकडून त्यांची जनावरे रस्त्यात अडवून खंडणी वसुली करण्याचा उद्योग सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांची भाकड जनावर सांभाळायचं अवघड बनल्याने शेतकरी संकटात सापडलाय असं सदाभाऊ खोत म्हणाले.
-
मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज, सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारच्या सत्रात सुट्टी जाहीर. सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश.
-
दादर, कुर्ला परिसरात रेल्वे रुळांवर साचलं पाणी
दादर इथल्या रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईहून कसारा आणि खोपोलीकडे जाणारे लोकल उशिराने धावत आहेत. पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे.
-
रावेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नागझरी नदीला पूर
रावेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नागझरी नदीला पूर आला आहे. शेतातील केळीचं पिक अक्षरशः पावसामुळे वाहून गेलं आहे. रामजीपुरातील मारुती मंदिर पाण्याखाली गेला आहे. भाटखेडा उटखेडा तर ऐनपुर रावेर वाहतुकीसाठी काही काळ बंद होता.
-
विरार पश्चिम युनिटेक परिसरातील ४० इमारती पाण्याखाली
विरार पश्चिम युनिटेक परिसरातील ४० इमारती पाण्याखाली गेल्या आहेत. युनिटेक कॉम्प्लेक्स मधील 1 ते ३७ नंबरच्या सर्व सोसायटीमधील इमारतीच्या तळ मजल्यात गुडघाभर पाणी साचलं आहे. पूर्ण परिसर जलमय झाला असून युनिटेक कॉम्प्लेक्सला तलावाचं स्वरूप आलं आहे.
रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने विरार पश्चिम यूनिटेक ३५ ते चाळीस सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. महापालिकेचे पंपाने पाणी काढायला सुरुवात केली आहे.
-
नांदेडच्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी
नांदेडच्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जुन्या नांदेड शहरातील पुलाला पाणी टेकलंय. पाण्याची आवक सुरूच असून पुराचा धोका वाढला आहे. विष्णुपुरीचे 6 दरवाजे उघडले आहेत. तर 64 हजार 412 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तासाभरात अजून दोन दरवाजे उघडले जाणार आहेत.
-
पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी साचलंय पाणी
मुंबईत संततधार पावसामुळे चुनाभट्टी विभागातील चुनाभट्टी रेल्वे स्टेशन, आंबेकर नगर, समर्थ नगर, भक्ती धाम रोड, धावजी केणी मार्ग, भाजी मार्केट, वि.एन.पूर्व मार्ग परिसरात पाणी साचलंय.
-
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासांत 83 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली असून चांदोली धरण 91.80 टक्के भरलं आहे. त्यामुळे चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात साडेसहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापासून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे.
-
मुंबईत रेल्वे सेवा विस्कळीत, लोकल वाहतूक उशिराने सुरु
मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दादर येथील रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने कसारा आणि खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. या पावसामुळे अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या असून, मुंबईकरांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.
-
मुंबईची तुंबई, पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी साचलं
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम सखल भागात दिसून येत आहे. सध्या या ठिकाणी पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. तर दहिसर टोल नाक्याजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी साचले आहे. त्यासोबतच मालाड सबवेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यासोबतच जोगेश्वरी पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ पाणी साचण्यास सुरुवात झाली.
-
जळगावात मुसळधार पाऊस, शेतकरी सुखावले
जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुक्ताईनगर, रावेर आणि भुसावळ तालुक्यांसह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असला, तरी काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून काही ठिकाणी धुके (धूर) पसरले आहे.
-
सिंधुदुर्गात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, मालवणकडे जाणारी वाहतूक ठप्प
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कणकवली-आचरा राज्य महामार्गावरील वरवडे येथे गड नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे मालवणकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून, या पावसाळ्यात पाचव्यांदा हा महामार्ग बंद झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काळातही पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे.
-
अमरावतीत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
अमरावती जिल्ह्याच्या मोझरी बायपासजवळ शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. बायपासच्या बांधकामात पाण्याचा योग्य निचरा होण्याचे नियोजन न केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कपाशी आणि सोयाबीन पिकांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची आणि पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. या समस्येबद्दल वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने योग्य लक्ष दिले नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
-
मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
-
दादर स्टेशन परिसरात भरले पाणी
रात्रीपासूनच्या मुसळधार पावसामुळे आता दादर स्टेशन परिसरात पाणी भरले आहे.
-
अंधेरी सब वे वाहतूक बंद
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून अंधेरी सब वे वाहतूक बंद करण्यात आली आहे.
-
रस्त्यावर साचले पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पावसाने अनेक रस्ते जलमय झाली आहेत.
-
मुंबईत पावसाचा जोर वाढला
हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे.
-
त्रंबकेश्वर मध्ये भाविकांना मारहाण आणि धक्काबुक्की चे प्रकार सुरूच..
दोन दिवसांपूर्वी सुरक्षारक्षकांनी रांगेत उभे असलेल्या भाविकाला दिला होता चोप… काल पुन्हा एका भाविकाची आणि सुरक्षारक्षकाची हाणामारी… त्रंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी सध्या गर्दी… मात्र मंदिर प्रशासनाच्या सुरक्षारक्षकांकडून दादागिरी सुरूच… भाविकांना होणाऱ्या मारहाणीवर सर्व स्तरातून होत आहे टीका…
-
आज श्रावणातला शेवटचा सोमवार, महादेव मंदिरांमध्ये गर्दी
चौथा श्रावणी सोमवार निमित्त महादेव मंदिरांमध्ये गर्दी… पुरातन कपालेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा… तर त्रंबकेश्वर मध्ये देखील हजारोंच्या संख्येने भाविक दाखल…. शहरातील अनेक ठिकाणी वाहतूक मार्गात बदल
-
मुंबई मध्यरात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू
पावसामुळे मध्य रेल्वे आणि हार्बल मार्गाची लोकल सेवा उशिराने सुरु आहे. पुढील ३ तासांत रायगडमधील आणि मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून पुढील अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
-
सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीची पाणी पातळी वाढली
माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातून ही नदी वाहते… मात्र मागील आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदी प्रवाहित झालीय… त्यामुळे नदीकाठच्या शेतीपिकांना धोका निर्माण झालाय… त्याचबरोबर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा ईशारा दिलाय
-
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 108 गावातील 38 हजार हेक्टर वरील पिकाचे नुकसान
धाराशिव जिल्ह्यात गेले तीन चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलय. जिल्ह्यातील 108 गावातील 38 हजार हेक्टर वरील पिकाचे या अतिवृष्टीमध्ये नुकसान झाले आहे. तर 53 जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेले असल्याचा प्राथमिक अहवाल महसूल आणि कृषी विभागाने सादर केला आहे, जिल्ह्यात महत्त्वाचं असणार सोयाबीन पिकाचू मोठ नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
Published On - Aug 18,2025 8:01 AM
