Maharashtra Breaking News LIVE 31st May 2025 : मुंबई अहमदाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 31मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी निलेश चव्हाण याला नेपाळमध्ये अटक करण्यात आली असून आज पहाटे पुण्यात आणण्यात आलं. खेडगाव रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. असून आज सकाळी त्याला शिवाजीनगर न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे. पश्चिम रेल्वेवरील कांदिवली यार्ड येथील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी आज (शनिवार) दुपारी 1 ते रविवारी मध्यरात्री 1 पर्यंत, पाचव्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर 36 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. . या कालावधीत सुमारे 162 अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. हे दिवाळखोर सरकार आहे, या सरकारकडे पैसा नाही. पैसा वाचवण्यासाठी आता या सरकारचे सर्वे उद्योग सुरु अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे. जळगावच्या सराफ बाजारात चांदी दोन हजार रुपयांनी घसरली. चांदीचे दर आता 97 हजार 500 रुपये प्रति किलोवर आले आहेत. तर सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली असून सोने 95 हजार 600 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. यासह देश विदेश, राज्य, क्रीडा,राजकारण, मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, सर्व अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
जपानमधील होक्काइडोजवळ भूकंपाचा जोरदार धक्का
जपानमधील होक्काइडोजवळ भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. जपान हवामान संस्थेनुसार, जपानमधील होक्काइडोच्या किनाऱ्यावर शनिवारी संध्याकाळी 5 वाजून 37 मिनिटांनी 6.1 तीव्रतेचा भूकंप झाला. जीवितहानी किंवा वित्तहानीची अद्याप तरी माहिती नाही.
-
पिंपरी चिंचवड पोलीस निलेश चव्हाण याच्या घरी
पिंपरी चिंचवड पोलीस निलेश चव्हाण याच्या घरी पोहोचले आहेत. आरोपी निलेश चव्हाण याला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्या कर्वेनगरच्या घरी दाखल झाले आहेत. निलेश चव्हाणकडे असलेले दोन मोबाईल फोन जप्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्या घरी गेले आहेत. वैष्णवी हगवणे हिची सासू लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या दोघींचे मोबाईल निलेश चव्हाणकडे असून त्याची जप्ती करण्यासाठी पोलीस दाखल झाले आहेत.
-
-
नांदेड : वाहनाला साईड देताना सिमेंटचा कंटेनर उलटला
हिमायतनगर रस्त्यावर खडकी फाट्यावर सिमेंट कंटेनर पलटी होऊन अपघात घडला आहे. समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाला साईड देतांना हा अपघात झाल्याची माहिती आहे. कंटेनर पलटी झाल्यानंतर जवळपास 100 फूट घासत गेले आहेत. यामध्ये कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने चालक बचावला आहे. जखमी चालकाला स्थानिकांनी तात्काळ रुग्णालयात नेऊन उपचार सुरू केले आहेत.
-
मुंबई अहमदाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात
डस्टर कारची समोर असलेल्या ट्रॅकला धडक लागली त्यात मागुन येणारा ट्रक ही कारला धडाक्याने मोठा अपघात झाला. दोन ट्रकच्या मध्ये कार आल्याने कारचा चक्काचूर झाला. अपघातात कार मधील तिघांचा मृत्यू झाला,तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. कार अपघातात एकाच कुटुंबाचे तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतकामध्ये दोन महिला तर एक पुरुषाचा समावेश आहे. मनोर गेट हॉटेल जवळ अपघात झाला.
-
ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे भाजपात येणार – रवी राणा यांचा दावा
दर्यापूरचे ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.
-
-
लाल निशान पक्षाचे भाकप माले ( लिबरेशन ) पक्षासोबत विलीनीकरण
नगर : लाल निशान पक्षाचे भाकप माले ( लिबरेशन ) पक्षासोबत विलीनीकरण झाले आहे. महाराष्ट्रात डाव्या चळवळीला , पुरोगामी चळवळीला बळ देण्यासाठी हे विलीनीकरण झाले आहे. भाकप मार्क्सवादी आणि लेनीनवादी लिबरेशन पक्षाचे महासचिव कॉ. दिपांकर भट्टाचार्य , बिहारचे खासदार राजाराम सिंह , आमदार शशी यादव आदींची उपस्थिती आहे.
-
भाजपाचे नांदेड उत्तर आणि दक्षिण जिल्हाध्यक्ष कायम
भाजपाच्या नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर देशमुख तर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी संतुक हंबर्डे यांची फेरनिवड झाली आहे,
-
हाके दुसऱ्याच्या रिचार्जवर चालणारे – सुरज चव्हाण
हाके दुसऱ्याच्या रिचार्जवर चालणारे – सुरज चव्हाण
– लक्ष्मण हाके यांनी आपल्या लायकीत राहावे.. फार जास्त बोलू नये, लक्ष्मण हाके ते दुसऱ्याच्या रिचार्जवर चालणारे, त्यांनी आम्हाला शिकवू नये असे सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे. आमच्या नेत्यावर टिका करताना १० वेळा विचार करावा अन्यथा त्याचा योग्य तो सन्मान केला जाईल अशीही टीका त्यांनी केली आहे.
-
अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जंयती सोहळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौंडीत उपस्थित
अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जंयती सोहळयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमधील चौंडीमध्ये उपस्थित राहिले आहेत.अहिल्यादेवींचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री चौंडीत उपस्थित आहेत. मुख्यमंत्री नागरिकांना संबोधित करत आहेत.
-
4 महिन्यांत निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राऊतांचे वक्तव्य
4 महिन्यांत निवडणुका होतील असे संकेत मिळत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात संजय राऊतांनी वक्तव्य केलं आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जोमानं लढू असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
-
उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात मोठी अपडेट,आणखी 4 आरोपी ताब्यात
उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दरोडा प्रकरणात आणखी चार आरोपींना पोलिसांन ताब्यात घेतलं आहे. लड्डांचा मित्र चंद्रकांत इंगोलेने दरोडेखोरांना सर्व माहिती दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
-
हिंदी भाषा मुंबईची बोली भाषा बनली, ‘मीरा-भाईंदरमध्ये मीही हिंदीतच बोलतो: प्रताप सरनाईक
हिंदी भाषा आता मुंबईची बोली भाषा बनली आहे असं वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. ‘मीरा-भाईंदरमध्ये प्रवेश केल्यावर मी हिंदीतच बोलतो. मराठी कळत नसेल तर हिंदीतच बोलावं लागतं” असं म्हटलं आहे. तर मीरा-भाईंदरमध्ये हिंदी चालतं. जिथे गरज आहे तिथे बोलावं लागतं असं म्हणत मंत्री शिरसाट यांनी सरनाईकांची पाठराखण केली आहे.
-
आकलुजमध्ये कृषी मंत्र्यांविरोधात ठाकरेंच्या युवासेनेचे आंदोलन
आकलुजमध्ये कृषी मंत्री कोकाटेंविरोधात ठाकरे गटाचे युवासैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. तसेच कृषी मंत्र्यांनी राजिनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
-
गाणं सादर करत असताना शिक्षकाचा जागीच मृत्यू
कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव (ता.शिरोळ) येथील आप्पासाहेब उर्फ डॉ.सा.रे.पाटील उदगांव टेक्निकल हायस्कूलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सन 2001-02 च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळावी शुक्रवारी आयोजित केला होता. दरम्यान, गाणे सादर करत असताना शिक्षकाचा मृत्यू झाला आहे.
-
हवालदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यातील हवालदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. फसवणुकीच्या गुन्ह्यात 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने केली रंगेहात अटक. अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार उमाकांत रंगनाथ टिळेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल.
-
उद्धव ठाकरे गट-मनसेच एकत्र येत आंदोलन
गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच कल्याण डोंबिवली मधील कल्याण शीळ रोडवर सुरू असलेल्या नवीन पुलाचं सात वर्षापासून संथ गतीने काम सुरू असल्याने दोन्ही पक्ष आक्रमक झाले. आज मनसे व ठाकरे पक्षातील कार्यकर्ते एकत्र येत आंदोलन करत पुलाची पाहणी केली. या वेळेला शिवसेनेकडून गाजर दाखवत निषेध व्यक्त केला तर मनसेच्या राजू पाटील यांनी चक्क 500 च्या नोटा दाखवत निषेध केला.
-
राधाकृष्ण विखे पाटील यांनी माणिकराव कोकाटे यांना काय सल्ला दिला?
“माणिकराव कोकाटे हे मोकळ्या स्वभावाचे आहेत. त्यांच्या मनात काही नसते. ते फटकळपणे बोलतात. मात्र मित्र म्हणून, मी त्यांना सल्ला दिलाय की मंत्री झाल्यावर जास्त बोलायचे नसते” असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
-
नाशिक बाजार समितीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप
नाशिक बाजार समितीत भ्रष्टाचार होत असल्याचा बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांचा आरोप. बाजार समितीत प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी. देविदास पिंगळे यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांना पत्र दिले. तीन आठवड्यात चौकशी करण्याचे पणन मंत्री यांचे जिल्हा उप निबंधकांना आदेश.
-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे गटाची तयारी
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत जळगाव जिल्ह्यापासून संजय राऊत यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून या ठिकाणी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत त्यांनी बैठक घेत आहेत.
-
अमोल कुलकर्णींवर गुन्हा दाखल
पुण्यातील शिवसृष्टीच्या गेटवर लघुशंका करणाऱ्या अमोल कुलकर्णीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
-
नांदेडमधील विष्णुपूरी धरणात पाण्याची मोठी आवक
अवकाळी पावसाची नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पावर कृपा केली आहे. नांदेडला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात 1.1 दलघमीने वाढ झाली आहे. विष्णुपुरी प्रकल्पातील जुलैमध्ये होणारी पाणी पातळीची वाढ मे महिन्यातच पूर्ण झाली. तर अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेती पिकाचे 1200 हेक्टरवर नुकसान झाले.
-
साधू महंतासाठी पुरणपोळी आणि आमरसाचा बेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या होणार्या बैठकीत साधु महंतासाठी खास मेजवानी असेल. 13 आखाड्यांचे सर्व प्रमुख साधू महंत उद्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.देशातील वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या साधू महंतासाठी खास महाराष्ट्रीयन पद्धतीच्या पुरणपोळी आणि आमरस चा बेत आहे.
-
पलावा पुलाचे काम संथगतीने
डोंबिवली मधील पलावा पुलाच्या ‘संथगती’ने सुरू असलेल्या कामावर ठाकरे आणि मनसे आक्रमक झाले आहे. मनसेकडून बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. संथगतीचे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्याची घोषणा! अशा बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले.
-
राज्यातील पहिली मराठा कुणबी सरपंच
माहेरी मिळालेल्या मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी सासरी तुळजापूर येथील कुंभारी गावात रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दाखल केली. त्यांची सरपंच म्हणून निवड झाली. वर्षाराणी सत्यवान दळवे (सासरचे नाव वर्षाराणी संतोष वडणे ) या मराठा कुणबी पहिल्या महिला सरपंच असल्याचं सांगितले जाते.
-
निलेश चव्हाण याच्याकडे मोबाईल
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात निलेश चव्हाण याला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बावधन पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले होते. शिवाजीनगर कोर्टात नुकतीच सुनावणी झाली. त्याच्याकडे आरोपींचे मोबाईल असल्याचा दावा सुनावणी दरम्यान करण्यात आला होता.
-
निलेश चव्हाणला पोलीस कोठडी
निलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाने हा निर्णय दिला.
-
१६ लाखांचा गुटखा जप्त
मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ येथे तब्बल १६ लाख ९४ हजार रुपये किंमतीच्या गुटख्याची वाहतूक करणारा बोलेरो टेम्पो चिपळूण पोलिसांनी सापळा रचत पकडला आहे. या प्रकरणी टेम्पोचालक सज्जन रामचंद्र निवेगी याला पोलिसांनी अटक केली आहे.
-
अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिकृती असणारी विश्वविक्रमी रांगोळी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्ताने सांगलीच्या मिरजेमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिकृती असणारी विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या विश्वविक्रमी रांगोळीचे उद्घाटन पार पडले. माजी महापौर संगीता खोत फाउंडेशनच्या माध्यमातून 60 बाय 80 फुटांची प्रतिकृती प्रसिद्ध रांगोळीकार आदमअली मुजावर यांनी साकारली आहे.
-
मुख्यमंत्री आज चौडीत येणार
अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळा आज चौडी येथे पार पडणार आहे. या उत्सव सोहळ्याला मुख्यमंत्रीसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित राहणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जनसमुदायाला करणार संबोधित आहेत.
-
निलेश चव्हाण याला कोर्टात आणले
वैष्णवी हगवणे यांच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाण याला शुक्रवारी नेपाळमध्ये अटक करण्यात आली होती. त्याला शनिवारी पहाटे पुण्यात आणले. आता त्याला शिवाजीनगर कोर्टात आणले गेले आहे. त्याची सात दिवसांची पोलीस कोठडी पोलीस मागणार आहे.
-
जळगाव ड्रग प्रकरणातील आरोपीशी संपर्क ठेवल्या प्रकरणी निलंबित पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटेंची विभागीय चौकशी
जळगावातील ड्रग प्रकरणातील आरोपीशी संपर्क ठेवल्या प्रकरणात निलंबित पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांची आता विभागीय चौकशी केली जाणार आहे.
निलंबित करण्यात आलेले एलसीबीचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे. त्यांची आता विभागीय चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
-
ठाणे-घोडबंदर मार्गावरील मानपाडा पुलावर अपघात
ठाणे-घोडबंदर मार्गावरील मानपाडा पुलावर अपघात झाला आहे. ट्रकची दुभाजकला धडक बसून मोठा अपघात, मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
-
गडचिरोली महसूल विभागातील 117 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकाच दिवशी बदल्या
गडचिरोली महसूल विभागातील 117 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकाच दिवशी जिल्हास्तरावर बदल्या करण्यात आल्या. महसूल सहायक, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, लिपिक व तलाठी यांचा समावेश.
जे अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी दीर्घकाळ सेवेत होते अशा अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या दुर्गम भागात बदल्या करण्यात आल्या आहेत.
-
जालना – खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची कारवाई
खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची कारवाई, 10 टन बोगस डीएपी खत जप्त, जाफराबादच्या माहोरामध्ये कारवाई करण्यात आली आहे.
-
पश्चिम रेल्वेवर 36 तासांचा मोठा ब्लॉक
पश्चिम रेल्वेवरील कांदिवली यार्ड येथील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी आज दुपारी 1 ते रविवारी मध्यरात्री 1 दरम्यान पाचव्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर 36 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सुमारे 162 अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत लोकल सेवा आणि मेल, एक्स्प्रेस जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत, तर रविवारी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरूस्ती करण्यासाठी मेगा ब्लॉक असणार आहे.
Published On - May 31,2025 9:02 AM
