Maharashtra Breaking News LIVE 30 August 2024 : स्थानिकांचा वाढवन बंदराला विरोध, केंद्र-राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 30 ऑगस्ट 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Chhatrapati Shivaji Statue Collapse : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी 76 हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमीपूजन करणार आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024’ ला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पंतप्रधान पालघरमधील सिडको मैदानावर विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल. तसेच सिंधुदुर्गातील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. याच पार्श्वभूमीवर येत्या 1 सप्टेंबर रोजी महाविकासआघाडीकडून सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन केले जाणार आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. सध्या इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. तसेच अनेक नेते हे विविध जिल्ह्यांचे दौरे करताना दिसत आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
1984 शीख दंगल प्रकरणी टायटलरवर आरोप निश्चित
1984 शीख दंगल प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत. टायटलरवर हत्येसह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
-
3 आणि 4 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी ब्रुनेईला भेट देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3-4 सप्टेंबर रोजी ब्रुनेईला भेट देणार आहेत. भारतीय पंतप्रधानांची ब्रुनेईची ही पहिलीच भेट असेल. यानंतर पंतप्रधान 4-5 सप्टेंबरला सिंगापूरला भेट देतील.
-
-
सुकेश चंद्रशेखरला दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टातून जामीन
सुकेश चंद्रशेकर यांना दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दो पत्ती प्रतीक टीटीव्ही दिनाकरन प्रकरणात न्यायालयाने सुकेशला जामीन मंजूर केला आहे. मात्र, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश तुरुंगात असल्याने तो सध्या तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाही.
-
आलोक राज हे बिहारचे नवे डीजीपी
बिहारच्या नितीश कुमार सरकारने राज्याचे नवे डीजीपी म्हणून आलोक राज यांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत राज्य पोलिसांची कमान आरएस भाटी यांच्या हाती होती.
-
धुळ्यात जोरदार पावसाला सुरुवात
धुळ्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांच्या गडगटासह जोरदार पाऊस पडत आहे. जोरदार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
-
-
वाढवन समुद्र किनाऱ्यावर प्रतिकात्मक प्रेताचे दहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पालघरमध्ये वाढवन बंदराचे भूमिपूजन केलं. तर दुसरीकडे वाढवण बंदर परिसरातील 10 हजारांपेक्षा अधिक स्थानिक भूमीपुत्रांनी केंद्र-राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली. इतकंच नाही तर वाढवन समुद्र किनाऱ्यावर प्रतिकात्मक प्रेताचे दहनही केलं. या प्रतिकात्मक प्रेतयात्रेत मध्ये लहान मूलं, महिला, पुरुष उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. वरोर ते वाढवन बंदरापर्यंत 4 किलोमीटर अशी प्रेत यात्रा काढण्यात आली. यावेळेस कोणत्याही परिस्थितीत आम्ही वाढवन बंदर होऊ देणार नाही, असा इशारा ही स्थानिक महिलांनी दिला आहे.
-
आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाशिकमधील नांदगाव येथे भव्य दिव्य स्वागत केलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांवर दोनशे जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर नांदगाव शहरात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसृष्टीच्या लोकार्पणाच्या वेळी लेझर शो आणि फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे.
-
नाशिकच्या पंचायत समितीच्या कार्यालयात संतापजनक घटना
नाशिकमधून संतापजनक वृत्त समोर आलं आहे. नाशिकच्या पंचायत समितीच्या कार्यालयात संतापजनक घटना घडली आहेत. निवृत्त मुख्याध्यापकाने दिव्यांग महिला कर्मचाऱ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. कहर म्हणजे निवृत्त मुख्याध्यापकाने गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच हा प्रकार केला. कार्यालयातील कपाटांच्या आड दिव्यांग महिलेच्या हतबलतेचा फायदा घेतला. मात्र संशयितला सोडून देण्यात आल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत. कर्मचारी आक्रमक झाल्याने पंचायत समितीत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कर्मचारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ठाण मांडून आहेत. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
-
Narendra Modi: आदिवासींना योजनांचा लाभ- नरेंद्र मोदी
देशात एवढा मोठा आदिवासी विभाग आहे. पण आदिवासींच्या कल्याणासाठी एक विभागही बनवला गेला नाही. वेगळा जनजाती मंत्रालयाची स्थापना भाजपच्या सरकारने केली होती. आमच्या सरकारने मच्छिमारांच्या कल्याणासाठी वेगळं मंत्रालय बनवलं. नेहमी उपेक्षित राहिलेल्या आदिवासींसाठी पीएम योजनेचा लाभ मिळत आहे.
-
Narendra Modi: दहा वर्षांत मासे उत्पादन दुप्पट- नरेंद्र मोदी
२०१४ मध्ये देशात ८० लाख टन मासे उत्पादन होत होते. आता १७० लाख टन मासे उत्पादन होत आहे. १० वर्षांत मासे उत्पादन तुम्ही दुप्पट केले आहे. भारतातील सीफूडची निर्यात वेगाने होत आहे. १० वर्षापूर्वी २० हजार कोटी रुपयांचा झिंगा निर्यात होत होतं. आता ४० हजार कोटीचा झिंगा निर्यात होतंय. म्हणजे दुप्पट निर्यात होत आहे.
-
Narendra Modi: मुंबईचे आर्थिक चित्र बदलणार- मोदी
पालघरमध्ये होणाऱ्या या पोर्टवर हजारो जहाज येतील. कंटेनर येतील. या संपूर्ण परिसराची आर्थिक चित्र बदलणार आहे. रेल्वे आणि हायवे कनेक्टिव्हीटीशी आम्ही बंदराला जोडू. या पोर्टवरून नवीन व्यापार सुरू होणार आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
-
Narendra Modi: नरेंद्र मोदी यांनी मागितली शिवाजी महाराज यांची माफी
सिंधुदुर्गात जे झाले. ते माझ्यासाठी शिवाजी महाराज हे केवळ नाव नाहीये. ते आमच्यासाठी शिवाजी महाराज हे फक्त राजा महाराज, राजपुरुष नाहीये. आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्यदैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो.
-
Narendra Modi: काँग्रेसने कधी सावरकरांची माफी मागितली का?
भारताचे महान सुपुत्र वीर सावरकरांना ते शिव्या देतात. अपमानित करतात असे लोक आम्ही नाहीत. देशभक्तांच्या भावनांचा चुरडा करतात. सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नाही. कोर्टात जातात, पण त्यांना पश्चात्ताप होत नाही.
-
नाशिक शहरातील गणेश मंडळांची जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठकीचे आयोजन
पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता बैठक सुरू. शहरातील खड्ड्यांमुळे शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी आक्रमक. गणेश मंडळांच्या अध्यक्षांकडून शांतता समितीच्या बैठकीत शहरातील खड्ड्यांचा मुद्दा गाजला
-
नरेंद्र मोदी यांनी दिला स्थानिकांना न्याय- एकनाथ शिंदे
स्थानिकांना न्याय देऊन नरेंद्र मोदी यांनी प्रकल्प पुढे नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नरेंद्र मोदींबद्दल मोठे विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये परीस आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
-
नवी मुबंईत सानपाडा परिसरात कोयता गँग सक्रिय
कोयता गँग सानपाडा परिसरातील इमारतीत जाताना सीसीटीव्हीमध्ये कैद. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
-
पुढील 2000 वर्ष मोदींचे नाव इतिहासामध्ये राहिल- देवेंद्र फडणवीस
पुढील 2000 वर्ष मोदींचे नाव इतिहासामध्ये राहिल, असे देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच म्हटले आहे.
-
विकासासाठी पाऊल मागे पुढे करावे लागते- अजित पवार
विकासासाठी पाऊल मागे पुढे करावे लागते, असे नुकताच अजित पवार यांनी म्हटले आहे.
-
दिल्लीत सुरक्षा यंत्रणांमधील अधिकाऱ्यांसोबत झाली बैठक
झेड प्लस सुरक्षामधील काही अटी पवारांना मान्य नसल्याची माहिती. त्यामुळेच शरद पवार केंद्र सरकार देत असलेली सुरक्षा नाकारणार असल्याची माहिती
-
बदलापूर मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण कोर्टात केला हजर
दुसऱ्या मुलीच्या अत्याचार प्रकरणमध्ये कल्याणच्या जळदगती न्यायालयात केले हजर
-
शरद पवार झेड प्लस नाकारणार ?
झेड प्लस सुरक्षा मधील काही अटी पवारांना मान्य नसल्याची माहिती असून शरद पवार केंद्र सरकार देत असलेली सुरक्षा नाकारणार असल्याचे सूत्रांची माहिती
-
उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशामध्ये पाहावे मग पंतप्रधानांवर बोलावे – गिरीश महाजन
उद्धव ठाकरे यांना म्हणावं तुम्ही जरा स्वतः आरशामध्ये बघा , आपण काय आहोत. आपण अडीच वर्षांमध्ये काय दिवे लावले..आपलं स्वतःचं काय कर्तुत्व आहे ते बघा..आणि मग पंतप्रधानांवर बोलावे अशी टिका भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
-
काँग्रेस नेत्यांचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर मूक आंदोलन
काँग्रेस नेत्यांचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर मूक आंदोलन सुरू असून कॉंग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड , आमदार अस्लम शेख आणि सचिन सावंत हे या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
-
काँग्रेस नेत्यांचं शिवाजी पार्कमध्ये आंदोलन सुरू
काँग्रेस नेत्यांचं शिवाजी पार्कमध्ये आंदोलन सुरू. वर्षा गायकवाड शिवाजी पार्कमध्ये दाखल.
-
कोल्हापूर : गोकूळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी राडा, थेट म्हैस आणली
कोल्हापूरमध्ये गोकूळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी राडा. विरोधक थेट म्हैस घेऊनच सभेसाठी झाले दाखल.
-
तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा – अजित पवार गटाच्या नेत्याची मागणी
तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी करत अजित पवार गटाच्या उमेश पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारमधून बाहेर पडण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता आहे, उमेश यांनी नमूद केलं.
राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसल्यावर उलट्या होतात, असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केल्यावर गदारोळ माजला.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिओ वर्ल्डच्या बाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिओ वर्ल्डच्या बाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन. मालवणमधील महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेनंतर करण्यात आले निषेध आंदोलन. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
-
फिनटेकमुळे कर्ज, विमा या सेवांचा लाभ घेणंही सोपं – पंतप्रधान मोदी
फिनटेकमुळे कर्ज, विमा या सेवांचा लाभ घेणंही सोपं झालंय. – पंतप्रधान मोदी
-
भारतातील बँकिंग व्यवस्था 24 तास सुरू असते – पंतप्रधान मोदी
‘ ग्लोबल फिनटेक’द्वारे 31 अब्ज डॉलर्सीची गुंतवणूक. भारतातील बँकिंग व्यवस्था 24 तास सुरू असते – पंतप्रधान मोदी
-
फिनटेक स्टार्टअपमध्ये 500 टक्क्यांची वृद्धी – पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारतात फिनटेक क्रांती कधी होईल असं विचारलं जायचं. गेल्या 10 वर्षांमध्ये फिनटेक स्टार्टअपमध्ये 500 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन सुरू.
-
मच्छिमारांनी केला तीव्र विरोध
पालघरमध्ये वाढवन बंदराचा भूमिपूजन सोहळा पार पाडतोय तर दुसरीकडे डहाणूच्या समुद्र खाडीत बोटी ला काळे फुगे, झेंडे बांधून मच्छिमारांनी तीव्र विरोध केला आहे.
-
महाराज आम्हाला माफ करा म्हणत आत्मक्लेश जल आंदोलन
हिंगोली जिल्ह्यातील शिवप्रेमींनी कयाधू नदीपात्रामध्ये आत्मक्लेश जल आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्याच अनुषंगाने हे जिल्ह्यातील शिवप्रेमींनी कयाधू नदीपात्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक घालून आत्मक्लेश जल आंदोलन सुरू केले.
-
नाशिक पश्चिम मतदार संघात इच्छुकांची फौज
नाशिक पश्चिम मतदार संघात यंदा भाजपकडूनच सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत.भाजपाच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पक्षातूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम मतदारसंघात भाजपकडूनच पाच ते सहा उमेदवार इच्छुक असल्याचे समोर येत आहे.
-
राष्ट्रपती येणार आहेत, खड्डे बुजवा
राष्ट्रपती येणार आहेत. गणेशखिंड रस्त्याचे खड्डे बुजवा, असे पत्र पुणे महापालिकेने पीएमआरडीएला दिले आहे. त्यावर पीएमआरडीएने चुप्पी साधल्याचे समजते. आता महापालिकेकडूनच खडडे बुजवायला सुरूवात केली आहे. विद्यापीठ चौकात पीएमआरडीएकडून मेट्रोच काम सुरू आहे.
-
जळगावमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
जळगावात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात कोंडून शेजारच्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. जळगावच्या रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना घडली आहे. घरात मुलेमुली लपंडाव खेळत असताना, एका ११ वर्षीय मुलीला घरात कोंडून ४० वर्षीय व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली.
-
जितेश अंतारपूरकर, झिशान सिद्दीकी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी
जितेश अंतारपूरकर आणि झिशान सिद्दीकी हे दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोघांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याची आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले आहे.
-
शिरूर तालुक्यात ट्रक चालकाकडून एसटी बस चालकाला बेदम मारहाण
शिरूर तालुक्यातील जांबुत येथे बेल्हे जेजुरी महामार्गावरील पंचतळे येथे ट्रक चालकाकडून एसटी बस चालकाला बेदम मारहाण. मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद. ट्रक चालक एसटी चालकाला मारहाण करताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. मारहाण करणाऱ्या ट्रकचालकावर सरकारी कामात अडथळा आणल्या बाबत शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.
-
आम्ही सरकारमधून बाहेर पडावं अशी कार्यकर्त्यांची भावना – उमेश पाटील
“महायुतीसाठी हे किती घातक आहे, यावर मी आता बोलणार नाही. माझी विनंती आहे, तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होत नाही, तो पर्यंत आमच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाऊ नये. जर, मुख्यमंत्री कारवाई करणार नसतील, आम्ही सरकारमधून बाहेर पडावं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे” असं उमेश पाटील म्हणाले.
-
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली
शहरात डेंग्यूच्या रुग्णांनी शंभरी पार केली. शहरात सध्या डेंग्यूचे 104 रुग्ण आढळले.शहरात चिकनगुनिया चे रुग्नेही वाढत आहेत. सध्या 15 जण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे तर झिकाचेही 4 रुग्ण शहरात आढळले आहेत नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
-
वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
मुंबई काँग्रेस अध्यक्ष, खासदार वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. इमारतीला पोलिस छावणीचे स्वरूप. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची पोलिसांकडून ठिकठिकाणी धरपकड करण्यात येत आहे. पोलिसांकडून आंदोलन हाणून पाडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर.
-
तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – उमेश पाटील
“तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. शिंदेंनी सावंतांना मंत्रिमंडळात स्थान देऊन दर्जा घालवला. अशांसोबत राहण कार्यकर्त्यांनाही आवडणार नाही” राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया.
-
Maharashtra News: संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात संतापजनक प्रकार समोर
संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात संतापजनक प्रकार समोर… एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत चुकीचं कृत्य… महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप…
-
Maharashtra News: पिंपरी-चिंचवड शहरामध्ये डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली
शहरात डेंग्यूच्या रुग्णांनी शंभरी पार केली. शहरात सध्या डेंग्यूचे 104 रुग्ण आढळले.शहरात चिकनगुनिच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या 15 जणांना आजाराची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. तर झिकाचेही 4 रुग्ण शहरात आढळले आहेत नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
-
Maharashtra News: नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा पालघरच्या सिडको मैदान येथे पार पडणार आहे. या बंदराला विरोध असलेल्या स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून बोटीमध्ये काळे फुगे बोटींना बाधून निषेध नोंदवला आहे. डहाणू खाडी येथील मच्छीमारांनी केला निषेध…
-
Maharashtra News: मलेरिया ,डेंग्यूची साथ ठाणे शहरात अतिसार स्वाईन फ्लू लेप्टोचे रुग्ण, पालिकेचा जनजागृतीवर भर
ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात मलेरिया आणि डेंगूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यात मलेरियाचे 653, डेंगूचे 505 रुग्ण आढळले आहेत आणि महापालिका क्षेत्रात मलेरिया डेंगू सोबत अतिसाराचे 106, स्वाईन फ्लू 27 आणि लेप्टो 6 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात दोन लाख 6 हजार 288 रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली…
-
Maharashtra News: वर्षा गायकवाड आज मुंबईत आंदोलन करण्याची शक्यता
वर्षा गायकवाड आज मुंबईत आंदोलन करण्याची शक्यता… मोदींच्या दौऱ्याला वर्षा गायकवाड यांचा विरोध… मोदी आज खासगी कार्यक्रमानिमित्त मुंबई दौऱ्यावर…
-
Maharashtra Breaking News LIVE : पंतप्रधान मोदी आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, वाढवण बंदर प्रकल्पाचे करणार भूमीपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 76 हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमीपूजन
सकाळी 11 वाजता पंतप्रधान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024’ ला करणार संबोधित
दुपारी दीडच्या सुमारास पंतप्रधान पालघरमधील सिडको मैदानावर विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार
-
Maharashtra Breaking News LIVE : नांदेडमध्ये कॉंग्रेसला आणखी एक धक्का, जितेश अंतापुरकर करणार भाजपात प्रवेश
– नांदेडमध्ये कॉंग्रेसला आणखी एक धक्का
– नांदेडचे कॉंग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर आज भाजपात प्रवेश करणार
– नांदेडच्या देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार
– खा अशोक चव्हाण यांचे समर्थक मानले जातात
– गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या प्रवेशाच्या चर्चा
– गेल्या आठवड्यातच होणार होता प्रवेश , खा वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे लांबला होता प्रवेश
-
Maharashtra Breaking News LIVE : एकनाथ शिंदेंसह श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे देखील आज नाशिक दौऱ्यावर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनमाड नांदगाव येथील शिवस्मारक कार्यक्रम उद्घाटन सोहळ्याला राहणार उपस्थित – तर श्रीकांत शिंदे यांचा शिव-संवाद दौरा आज नाशिकमध्ये – श्रीकांत शिंदे आज नाशिकमध्ये आढावा बैठक घेऊन घेणार पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा – आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीकांत शिंदे यांचा आढावा बैठक मानला जातोय महत्वाचे
-
गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा, सत्ताधारी-विरोधकांमध्ये सोशल मीडिया वॉर
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे आज वार्षिक सर्वसाधारण सभा
आधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सोशल मीडिया मध्ये वर
मलई बोका हॅशटॅग करत सत्ताधार्यांना गोकुळच्या कारभारावर सवाल
साधारण कडून हॅशटॅग उघडा डोळे बघा नीट म्हणत त्यांच्या प्रश्नांना विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न
-
Maharashtra Breaking News LIVE : चंद्रपुरात एकाच दिवशी 2 चिमुकल्या मुलींचा विनयभंग, आरोपींना अटक
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी चिमुकल्या मुलींच्या विनयभंगाच्या २ घटना उघडकीस
पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना केली अटक
पहिली घटना नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील असून घराजवळ खेळणाऱ्या एका ८ वर्षीय चिमुकल्या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून महादेव गोरडवार (५२) या आरोपीने केला विनयभंग,
तर दुसऱ्या एका घटनेत चिमूर तालुक्यातील दाबला हेटी गावात मद्यपी तरुणाने ५ वर्षीय मुलीचा केला विनयभंग,
पीडित मुलगी शाळेत जात असतांना २५ वर्षीय आरोपीने दारूच्या नशेत केला चिमुकल्या मुलीचा विनयभंग
-
Maharashtra Breaking News LIVE : शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये, आरोपी चेतन पाटीलला घेतलं ताब्यात
राजकोट किल्ला पुतळा प्रकरण
आरोपी चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली कारवाई
मध्यरात्री तीन वाजता चेतन पाटीलला घेतलं ताब्यात
Published On - Aug 30,2024 8:27 AM
