Maharashtra News LIVE : आसाममध्ये बहुपत्नीत्वावर बंदी घालणारे विधेयक मंजूर
Maharashtra Breaking news : महाराष्ट्रात नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. या राजकीय रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. महाराष्ट्रासह देश-विदेशातील क्रीडा, मनोरंजन, ट्रेडिंग या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी टीव्ही 9 मराठीच्या ब्लॉगमधून जाणून घ्या.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. रामभाऊ खाडे यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यातील मंदाली गावातील एका हॉटेलजवळ अनोळखी व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. राम खाडे यांची गाडी फोडत धारदार शस्त्रांनी हल्ला केला. राम खाडे यांच्यासोबत तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अहिल्यानगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अंबरनाथमध्ये प्रचाराच्या कारणावरुन भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा आरोप. भाजपच्या प्रचाराला जावू नको म्हणून हल्ला केल्याचा प्राथमिक माहिती. अंबरनाथ सर्वोदय नगर परिसरातील घटना. डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ आज मालेगावात मालेगाव मुंबई महामार्ग रोखणार. मंत्री दादा भुसे यांचे लहान चिरंजीव आविष्कार भुसे हे देखील या रस्ता रोको मध्ये सहभागी होणार. आरोपीला फाशी व्हावी, त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी मालेगावकरांचा आज महामार्गावर रस्ता रोको.
LIVE NEWS & UPDATES
-
आसाममध्ये बहुपत्नीत्वावर बंदी घालणारे विधेयक मंजूर
आसाममध्ये बहुपत्नीत्वावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. या कायद्यानुसार दोषी आढळणाऱ्या कोणालाही सात वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. तसेच पीडितेला 1.40 लाख भरपाई देण्याची तरतूद आहे.
-
पंतप्रधान मोदी उद्या कर्नाटक आणि गोव्याला भेट देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी कर्नाटक आणि गोव्याला भेट देतील. कर्नाटकमध्ये ते उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देतील आणि लक्ष कंठ गीता पारायण कार्यक्रमात सहभागी होतील. गोव्यात ते श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठा येथे भगवान रामाच्या 77 फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण करतील.
-
-
हरियाणातील सिरसा महिला पोलिस ठाण्याबाहेर ग्रेनेड हल्ला
हरियाणातील सिरसा महिला पोलिस स्टेशनबाहेर ग्रेनेड हल्ला झाला. पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. पोलिस स्फोटकांचा कसून तपास करत आहेत.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जेजुरीमध्ये जाहीर सभा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जेजुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा
दिलीप बारभाई यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल
दिलीप बारभाई यांनी भूषवलंय जेजुरी नगरपालिकेचे तब्बल पंचवीस वर्षे नगराध्यक्ष पद
दिलीप बारभाई यांचे चिरंजीव जयदीप बारभाई लढवत आहेत जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक
जेजुरीतील धालेवाडी रोड येथे होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची थोड्याच वेळात जाहीर सभा
-
राष्ट्रवादी अजित पवार गट सोलापूर महापालिका स्वबळावर लढवणार
राष्ट्रवादी अजित पवार गट सोलापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार
राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांची मोठी घोषणा
आमच्या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने आगामी सोलापूर शहरातील सर्व 26 प्रभागात 102 जागा लढवणार – बनसोडे
भाजप सत्तेत असतानासुद्धा सोलापूर शहराचा मागील पाच वर्षात अपेक्षित असा विकास झालेला नाही – बनसोडे
-
-
बदलापुरात राष्ट्रवादीच्या उमेदवारावर पैसे वाटल्याचा आरोप
बदलापुरात राष्ट्रवादीच्या उमेदवारावर पैसे वाटल्याचा आरोप
अजित पवार गटाचे उमेदवार प्रभाकर पाटील यांच्यावर मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तुकाराम म्हात्रे यांनी केला आरोप
निवडणूक आयोगानं कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा
राष्ट्रवादी अजित पवार गटानं आरोप फेटाळले
-
घोडबंदर रोड येथे कंटेनरसह क्रेन उलटली
गायमुख घाटावर घोडबंदर वाहिनीवर दुपारी दोनच्या सुमारास एक मल्टी एक्सेल कंटेनर बंद पडल्यामुळे तो बाजूला करण्याचा प्रयत्न चालू असताना क्रेनसह कंटेनर देखील उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून चालकांला किरकोळ दुखापत झाली आहे.वाहतूक कोंडी दूर करण्याचे काम वाहतूक विभाग करत आहे.
-
जमिनीचे घोटाळे बाहेर काढले म्हणून पतीवर हल्ला – तुळसा खाडे यांचा आरोप
सुरेश धसांच्या विरोधातले घोटाळे बाहेर काढले.तसेच देवस्थान जमिनीच्या घोटाळ्यासह इतर घोटाळे बाहेर काढले म्हणून आपल्या पतीवर हल्ला झाल्याची प्रतिक्रिया राम खाडे यांच्या पत्नी तुळसा खाडे यांनी दिली आहे. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर काल नगर बीड सिमेलगत मांदगाव परिसरात प्राणघात हल्ला झाला. सध्या त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
आम्ही सत्तेचा माज कधी येऊ दिला नाही – अजित पवार
सातारा – सत्ता येत असते जात असते कुणाकडेच कायम राहत नसते. ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस सत्तेचा गैरवापर करून चालत नाही. आम्ही कधीच सत्तेचा माज येऊ दिला नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
-
रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीत शिंदे गट अजित पवार गट एकत्र, अजित पवार प्रचार सभेला उपस्थित
सातारा: रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. या सभेला खासदार नितीन पाटील जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर पदाधिकारी उपस्थित आहेत. शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपच्या विरोधात रहिमतपूर नगरपालिका निवडणूक लढवत आहेत.
-
डॉ. गौरी गर्जे आत्महत्याप्रकरणी सुनावणी सुरु, अनंत गर्जे कोर्टात हजर
डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी सध्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. पती अनंत गर्जेला कोर्टात हजर करण्यात आले आहे. येत्या २ डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्राथमिक अहवालात गौरीच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या आहेत. आत्महत्या की हत्या हे आम्हाला तपासायचं आहे. तसेच आरोपीच्या शरीरावरही काही जखमा आहेत, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली
-
जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात मोठी वाढ
जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात चांदीच्या दरात तब्बल 6 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 70 हजार 980 रुपयांवर पोहोचले आहे. सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ झाली असून सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 29 हजार 574 रुपयांवर पोहोचले आहे. महिनाभरानंतर चांदीच्या दराने पुन्हा 1 लाख 70 हजारांचा आकडा पार केला आहे.
-
कल्याण डोंबिवलीत काँग्रेस मधील धुसफुस चव्हाट्यावर
कल्याण डोंबिवलीत काँग्रेस मधील धुसफुस चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी राजाभाऊ पातकर यांची वर्णी लागल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र. जिल्हाध्यक्ष पद आयारामांना न देता निष्ठावंताना द्या , अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
राजाभाऊ पातकर यांचा भाजपमधून सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला होता. काल संध्याकाळी अकरा वर्ष जिल्हाध्यक्षपदावर असलेले सचिन पोटे यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कडून राजाभाऊ पातकर यांची नियुक्ती केली.
-
मीरा भाईंदर गायमुख घाटात कंटेनर पलटी
मीरा भाईंदर गायमुख घाटात एक कंटेनर पलटी झाला आहे. डबल एक्स क्रेनच्या मदतीने कंटेनर उचलण्याचं काम सुरू असताना तो रोडच्या डाव्या बाजूला पलटी झाला आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली.
-
स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही, ग्रामपंचायतीसमोर सरण रचून अंत्यविधी, दलित बांधव आक्रमक
धाराशिव -तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने दलित बांधव आक्रमक झाले आहेत. गावातील ग्रामपंचायत समोरच सरण रचून दलित बांधवांनी आंदोलन केले आहे. आज दलित समाजातील गावातील 40 वर्षीय अनिल गोरसे यांचा मृत्यू झाल्याने अंत्यविधी करण्यासाठी रस्ता नसल्याने वैतागलेल्या दलित समाजाने ग्रामपंचायत समोरच सरण रचून अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेऊन आंदोलन केले. स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी अनेक वर्ष मागणी करूनही दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले.
-
पुढच्या निवडणुकीत नवनीत राणा या पाच लाख मतांनी विजयी होतील :चंद्रशेखर बावनकुळे
पुढच्या निवडणुकीत नवनीत राणा या पाच लाख मतांनी विजयी होतील, त्याची काळजी करू नका असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणा फक्त 19 हजार मतांनी पराभूत झाल्या. पण आता त्या नक्की विजयी होतील असा विश्वास अमरावतीच्या अचलपूरच्या प्रचार सभेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल वक्तव्य.
-
उमेदवार भेटले नाही, निवडणुकीत ठाकरेंचा फुफाटा होईल : संदीपान भुमरे
संदीपान भुमरे आणि अंबादास दानवेंमध्ये जुंपलेली पाहायला मिळतेय. ‘उमेदवार भेटले नाही, निवडणुकीत ठाकरेंचा फुफाटा होईल’ असा टोला संदीपान भुमरे यांनी लगावला आहे.
-
पैसे सापडलेल्या केनवडेकरांच्या घरी नितेश राणे
पैशांची बॅग मिळालेल्या केनवडेकरांच्या घरी आता नितेश राणे देखील गेले आहेत. त्यांनी केनवडेकरांच्या घरच्यांची भेट घेत या प्रकणाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
-
ट्विट करण्यापेक्षा महाराष्ट्रात किती जागा येतील हे तपासा, त्यावेळी तुमची लायकी कळेल : संदीपान भुमरे
अंबादास दानवे यांच्या ट्विटवरून संदीपान भुमरे यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “दानवे यांनी काय ट्विट केलं, काय फोटो टाकले मी बघितले नाही. पण अंबादास दानवे यांनी ट्विट करण्यापेक्षा महाराष्ट्रात किती जागा येतील, आता हे तपासावे आणि त्या वेळेला तुमची तुम्हाला लायकी कळेल” असं म्हणत संदीपान भुमरे यांनी दानवेंवर टीका केली आहे.
-
अजित पवार यांनी जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्ह असलेला पंचा काढला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कुर्डुवाडी येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्ह असलेला पंचा काढून टाकल्याने चर्चांना उधाण आले आहे. कुर्डुवाडी येथील नगर परिषद निवडणुकीच्या सभेसाठी अजित पवार आले होते. अजित पवार भाषण करण्यासाठी उभे राहिले असता जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांनी अजित पवार यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेला पंचा गळ्यात टाकला असता अजित पवार यांनी तो झटक्याने काढून टाकला.
-
एक वर्षानंतर चार्ज फ्रेम होतोय, एक आरोपी फरार आहे हे दुर्दैव- धनंजय देशमुख
“न्यायालयाने फरार असलेल्या आरोपीबाबतची माहिती देण्यास कळवलं आहे. आमची तपास यंत्रणेला विनंती आहे की लवकरात-लवकर त्याला जेरबंद करावं. पुढच्या 12 तारखेला चार्ज फ्रेमसाठी तारीख आहे. एक वर्षानंतर चार्ज फ्रेम होतोय, एक आरोपी फरार आहे हे दुर्दैव आहे,” असं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले.
-
राम खाडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी
अहिल्यानगरच्या मांदळी येथे राम खाडे यांच्यावर हल्ला झालेल्या घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली. पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे आणि पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली. जखमींचा जबाब नोंदवण्यासाठी ते रुग्णालयात देखील गेले होते. मात्र संबंधित जखमींना पुण्याला हलवण्यात आलं आहे. त्यामुळे अद्याप या संदर्भात कोणतीही फिर्याद आलेली नाही. तशी फिर्याद आल्यानंतर योग्य ती कारवाई करू, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली.
-
खेड तालुक्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या
खेड तालुक्यातील लादवड गावाजवळ तरुणावर गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निवडणुकीच्या काळात जुने वाद उफाळून आले. जुन्या हाणामारीच्या वादातून गोळीबार केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. याप्रकरणी राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे.
-
ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी-अजित पवार
आम्ही सत्तेची उब घेण्यासाठी नाही गेलो तर लोकांची कामे, विकास करण्यासाठी गेलो आहे.ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात हे लक्षात ठेवा. कोणी आरे केले तर का रें करता आले पाहिजे.पण आपण स्वतः कायदा मोडायचा नाही. आमची लाडकी बहीण उज्ज्वला थिटे इथे आहेत पण त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आमची आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
-
मालेगाव अत्याचारप्रकरणातील आरोपीला पोलीस कोठडी
डोंगराळे प्रकरणातील आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली. सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. आरोपीला पुन्हा चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. मालेगाव न्यायालयाने आरोपीला 1 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
-
नातेवाईकांची पोलीस ठाण्यात गर्दी
महिलेच्या आत्महत्या प्रकरणी माहेरच्या नातेवाईकांची पोलीस ठाण्यात गर्दी आहे. आत्महत्या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पती सासू आणि तीन नंदांना पोलिसांनी अटक केली आहे. सासरच्या कडून मानसिक आणि शारीरिक छळ, तसंच चारित्र्यावर संशय घेत असल्याचा महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत उल्लेख केला आहे.चिठ्ठी लिहून महिलेने आत्महत्या केल्यानंतर माहेरचं कुटुंबीय संतप्त, आमच्या मुलीला न्याय द्या अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
-
उद्धव ठाकरे-राज ठाकरे बंधूमध्ये चर्चा
निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाच्या निर्णयावर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मनपा निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या गेल्या तर काय करायचं यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.सध्या महायूतीत सुरू असलेल्या धूसफूस आणि पक्ष प्रवेशावरही दोन्ही भावांमध्ये चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
कळवा रुग्णालयात माणुसकी हरवली
रुग्णाच्या तडफडण्याकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा आणि उपचार न मिळाल्याने रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. डॉक्टर, त्याला हात तरी लावा’ विनंती करूनही प्रतिसाद दिला नाही असा आरोप संतप्त नातेवाईक व राष्ट्रवादी काँग्रेसाने (शरद पवार गट) केला आहे. याप्रकरणी डीन यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे.
-
आमदार राजू खरे यांची राजन पाटलांवर टीका
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांची राजन पाटलांवर टीका केली आहे. रडीचा डाव करुन उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद केला असेल पण जनतेच्या कोर्टात न्याय मिळेल. मला वाजनावरून हिणवले जाते म्हणून मी 26 किलो वजन कमी केले. दादा आगे आगे देखो होता है क्या असा इशारा त्यांनी दिला.
-
राज ठाकरेंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर दाखल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी, त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
-
मालेगाव – चिमुकलीवर अत्याचारप्रकरणी स्थानिक आक्रमक, मुंबई-आग्रा महामार्ग रोखला
डोंगराळे गावातील चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत ग्रामस्थ आक्रमक झालेत. त्यांनी मुंबई-आग्रा महार्ग हा ग्रामस्थांनी रोखून धरला आहे.
-
सोलापूर – उज्वला थिटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
सोलापूर – उज्वला थिटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
-
चंद्रपूर – वाघाने रोखून धरला राष्ट्रीय महामार्ग
चंद्रपूर – वाघाने रोखून राष्ट्रीय महामार्ग धरला . तब्बल अर्धा तास वाघआने राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. चंद्रपूर -मुल महामार्गावरील अगडी फायरलाईनमध्ये हा सर्व प्रकार घडला.
-
लहान मुलांना अंगणवाडीत कोंडून सेविका आणि मदतनीस बैठकीला गेल्या, हिंजवडीत धक्कादायक प्रकार
आयटी हिंजवडीत धक्कादायक घटना घडलीये. वीस लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवल्याच्या प्रताप समोर आला आहे.सेविका अन मदतनीस वीस लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून बैठकीला गेल्या, मुलं रडत बसली. कालच्या घटनेचा व्हिडीओ आज समोर आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत मुलं अक्षरशः रडत होती. हे पाहून पालकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक तीनच्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रताप केला.
-
बीडच्या विशेष मकोका न्यायालयात संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी
सुनावणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित राहणार… विशेष सरकारी वकील उज्वल निकम व्हिसीद्वारे उपस्थित राहणार… आरोपी वाल्मीक कराड यांच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर निर्णय येण्याची शक्यता… तर आरोपी विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर सुनावणी…
-
डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ थोड्याच वेळात मालेगावात रस्ता रोको आंदोलन
आंदोलक मालेगाव मुंबई महामार्ग रोखणार… मंत्री दादा भुसे यांचे लहान चिरंजीव आविष्कार भुसे हे देखील या रस्ता रोको मध्ये सहभागी होणार… डोंगराळे प्रकरणातील आरोपीला फाशी व्हावी, त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी मालेगावकरांचा आज महामार्गावर रस्ता रोको…
-
कल्याण पश्चिम मार्केट परिसरातील धक्कादायक घटना
कल्याण शिवाजी चौक नारायण वाडी मुख्य बाजारात पंचवीस वर्षीय महिलेला नशेत धुंद रिक्षा रिक्षा चालकाकडून छेडछाड… संतप्त नागरिकांनी रिक्षाचालक चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात… रमेश घुडे असे या रिक्षा चालकाचे नाव असून कल्याण महात्मा फुले पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत घेतले ताब्यात…
-
शरद पवारांचे राष्ट्रवादीचे राम खाडे हल्ल्याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींवर आरोप
शरद पवारांचे राष्ट्रवादीचे राम खाडे हल्ल्याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींवर आरोप… राम खाडे यांच्यासोबत जखमी झालेले त्यांचे सहकारी दीपक खिळे यांचा आरोप… राम खिळे यांनी सांगितली घडलेली घटना… हल्ला करून हल्लेखोर पसार…
-
कल्याण शील रोडवर भीषण वाहतूक कोंडी
कल्याण बैलबाजार ते टाटा पावर रोडपर्यंत मोठी वाहतूक कोंडी… कल्याण पूर्वेला जोडणारा स्व. आनंद दिघे उडानपूल देखभाल-दुरुस्तीसाठी बंद असल्याने मोठी वाहतूक कोंडी… पहाटेपासूनच वाहतूक पोलिसांची तारेवरची कसरत… 3 ते 4 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा… वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल… वाहतूक सुरळीत करण्याचा वाहतूक पोलिसांचा प्रयत्न सुरू…
-
खरीप हंगाम गेला मात्र शेतकऱ्यांच्या आशा आता रब्बी हंगामावर
जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना वेग आला असून आतापर्यंत तालुक्यात जवळपास 13 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या. तर उर्वरित पेरण्या पूर्ण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून शेतकरी पेरण्यांच्या कामात व्यस्त आहे.
-
चऱ्होलीमधील नितीन गिलबिले खून प्रकरण धक्कादायक वळणावर
माजी नगरसेवक किसन तापकीर निघाला मास्टरमाइंड. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तापकीर फरार. त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलिसांनी किसन तापकीरच नाव संशयीतामध्ये समावेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ. फरार माजी नगरसेवक किसन तापकीर यांच्या शोधासाठी शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची विविध पथके रवाना
-
4 वर्षीय चिमुकल्याचा ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू
बार्शी तालुक्यातील शेळगावातील दुर्दैवी घटना. शिवराज शेरखाने असे मृत 4 वर्षीय चिमुकल्याचे नाव. विहिरीतून मोटार काढण्याचे काम सुरु असताना घडली घटना. यावेळी शिवराज खेळता खेळता ट्रॅक्टर मध्ये चढला आणि त्याने चुकून गिअर टाकल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला
-
डोंबिवलीत उन्नत मार्गावरून भाजप–शिवसेना बॅनर वॉर
कल्याण-डोंबिवलीत स्थानिक स्वराज्य निवडणुकांची चाहूल लागताच..राजकीय वातावरण तापलं! MMRDAच्या 36 कोटींच्या निविदा जाहीर झाल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) कडून आमचं काम बोलतोय… फोडाफोडीच्या राजकारणाला छेद” **देत खासदार श्रीकांत शिंदे यांचा विकासाकडे कल ..अशा आशयाचे बॅनर लावून भाजपवर आणि प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचं नाव न घेता जोरदार टीका केली होती
-
मालवण निलेश राणे स्ट्रिंग ऑपरेशन
निवडणूक आयोग आज घेणार स्ट्रिंग ऑपरेशनची दखल. 25 लाखाची रक्कम पोलिसांनी केली आहे जप्त. आज पुन्हा एकदा निलेश राणे येणार माध्यमांसमोर. गुन्हा दाखल न झाल्यास घालणार घेराव. निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय देणार
-
मालवण निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेशन
निवडणूक आयोग आज घेणार स्टिंग ऑपरेशनची दखल. 25 लाखाची रक्कम पोलिसांनी केली जप्त. आज पुन्हा एकदा निलेश राणे येणार माध्यमांसमोर. गुन्हा दाखल न झाल्यास घालणार घेराव. निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय देणार.
-
BMC च्या सहाय्यक आयुक्तावर 60 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप
BMC सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर मारहाणीचा, शिवीगाळ करण्याचा आरोप. महेश पाटील हे बीएमसीच्या एस वॉर्डचे सहाय्यक आयुक्त. स्वत:च्याच कार्यालयात डांबून मारहाण केल्याचा आरोप. 60 कोटींची खंडणी मागितल्याचा दावा. मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि सीएम कार्यालयाकडे तक्रार.
-
बोरिवलीत शिवसेना-भाजपमध्ये राडा
भाजपचे गणेश खणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख सुबोध माने भिडले. भाजपचे गणेश खणकर रात्री धरणे आंदोलनासाठी बसले होते. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्तेही दहिसर पोलीस ठाण्यात बसले होते. गणेश खणकर यांना मारहाण झाल्याचा आरोप. सुबोध मानेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात.
-
मुंबईतील मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचं काम अदानी समूहाकडे
मुंबईतील मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचं काम अदानी समूहाकडे. या कामाची निविदा अदानी समूहातील एका कंपनीला प्रदान करण्यात आल्याची माहीती आहे. तब्बल 9 हजार 700 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महानगरपालिकेने अंतिम मंजुरी दिल्याची माहिती. मिठी नदीतील गाळ काढणे, वहनक्षमता वाढवणे, पाणी गुणवत्ता सुधारणा, दोन्ही काठांची दुरुस्ती, पूरप्रतिबंधक उपाययोजना आणि नदीकिनारी आवश्यक सुविधा उभारणे अशा विविध घटकांचा या प्रकल्पात समावेश आहे.
Published On - Nov 27,2025 8:31 AM
