Maharashtra Breaking News LIVE : ठाकरे यांनी एका बोटाच्या अंगठ्यावर कर्जमाफी दिली – निंबाळकर
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दाैऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे ते पाहणी करणार असून पुढील दोन दिवस त्यांचा हा दाैरा आहे. आज आहिल्यानगर जिल्हात असून शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, या मुद्द्यावर ते ठाम आहेत. कर्जमुक्ती व्हायलाच हवी, अशी त्यांची भूमिका आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख जाहिर करण्यात आलीये. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची सविस्तर माहिती दिली. राज्यात 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. आता आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगताना दिसले. संपदा मुंडे प्रकरणात विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसतोय. दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
मलबार हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी
मलबार हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी
वाहनाच्या लांबच लांब रांगा
बाणगंगावर महाआरती असल्याने वाहतूक कोंडी झाल्याची माहिती
वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठा फटका
-
अंबरनाथमध्ये नाल्यात रासायनिक सांडपाणी, नागरिक त्रस्त
अंबरनाथमध्ये नाल्यात रासायनिक सांडपाणी
केमिकलच्या उग्र दर्पाने नागरिक हैराण
एमपीसीबीने केमिकल सोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी
केमिकलयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
-
-
धक्कादायक! नालासोपाराच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर स्त्री जातीचे अभ्रक आढळले
नालासोपाराच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर स्त्री जातीचे अभ्रक आढळले
समुद्र किनारी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांना हे अभ्रक सापडले
स्थानिकांनी सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून अर्नाळा पोलिसांना दिली घटनेची माहिती
अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अभ्रक घेतलं ताब्यात
-
परळीत आर्य समाज मंदिर समोर लाईट डीपीला आग
परळी शहरातील आर्य समाज मंदिर समोरील लाईट डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे, या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक ये जा करत असतानाच अचानक लागलेल्या या आगीमुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. आग लागल्यानंतर अग्निशमन दल वेळेवर न पोहोचल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
-
ठाकरे यांनी एका बोटाच्या अंगठ्यावर कर्जमाफी दिली – निंबाळकर
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी एका बोटाच्या अंगठ्यावर कर्जमाफी दिली होती. परंतू महायुतीचे निवडणूक होण्यापूर्वी हम दिल दे चुके सनम, निवडणुकीनंतर हम आपकें है कोण? असे हे सरकार आहे अशी टीका धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.
-
-
मीरा भाईंदर येथे स्पर्धा परीक्षांसाठी स्टडी सेंटर
मीरा भाईंदर विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनात आता MPSC, UPSC, IAS, IPS, IRS, IFS, IFoS या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “स्टडी सेंटर” सुरू करण्यात आले आहे
-
रायगड जिल्ह्यात ४१५६ दुबार मतदार नावे, सर्व नगरपरिषदांची कार्यवाही पूर्ण
रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या मतदार याद्यांमधील दुबार आणि तिबार नावांवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तपासणी आणि कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. एकूण ४ हजार १५६ नावांची पुनरावृत्ती आढळली होती. खोपोलीत सर्वाधिक ८९१ नावे, तर माथेरानमध्ये सर्वात कमी १८ नावे नोंदली गेली. सर्व नगरपरिषदांनी “कार्यवाही पूर्ण” झाल्याचा दावा करत आपले अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून आता या अहवालांचे अंतिम परीक्षण करून मतदार याद्या आगामी निवडणुकांसाठी अद्ययावत करण्यात येणार आहेत.
-
राष्ट्रवादीकडून निवडणूकीच्या तयारीला सुरुवात, वरळी डोममध्ये आढावा बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा आणि तालुका स्तरीय पदाधिकाऱ्यांची मुंबईतील वरळी डोम येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीसाठी अजित पवार देखील हजर आहेत.
-
धाराशिव: नुकसानग्रस्त शेतीची केंद्रीय पथकाकडून पाहणी
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपीक, शेतजमीन, रस्ते, सार्वजनिक मालमत्ता व वैयक्तीक मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर.के.पांडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या हे पथक दौरा करत आहे.आज जिल्ह्यातील परंडा त वाघेगव्हाण या ठिकाणी पथकाने पाहणी केली.
-
धाराशिव: रेशनवर मिळालेले खराब धान्य शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दाखवले
उद्धव ठाकरे सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. धाराशिवच्या पाथरूडमध्ये शेतकऱ्यांनी सरकराने रेशनवर दिलेले खराब धान्य आणि शेतातील खराब झालेले सोयाबीन उद्धव ठाकरे यांना दाखवले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भूम तालुक्यातील पाथरूड गावात अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला.
-
उद्धव ठाकरे पाथरुड गावात, नुकसानग्रस्त भागात पाहणी
शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पाथरुड गावात पोहचले आहेत. उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागात पाहणी करण्यासह शेतकऱ्यांसह संवाद साधत आहेत. उद्धव ठाकरे सध्या 4 दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.
-
उद्धव ठाकरेंकडून शेतकऱ्याच्या बांधावर जात पाहणी
शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख सध्या 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहे. उद्धव ठाकरे यांनी भूम तालुक्यात एका शेतकऱ्याच्या बांधावर जात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. ठाकरेंनी यावेळेस शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळेस शेतकऱ्यांनी ठाकरेंसमोर कर्जमाफी मिळवून द्यावी, अशी विनंती केली. तसेच ठाकरेंनी केंद्रीय पथकावर हल्लाबोल केला.
-
अजित पवार गटाची ‘मिशन स्थानिक स्वराज्य’ मोहीम
अजित पवार गटाने ‘मिशन स्थानिक स्वराज्य’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत वरळी डोममध्ये मोठी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी अजित पवार उपस्थितीत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यावर बैठकीत भर देण्यात येणार आहे.
-
काँग्रेस पक्षात आज अनेक लोकं नाराज : किरेन रिजिजू
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवरुन भाजपच्या किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषदेतून टीका केली आहे. काँग्रेस पक्षात आज अनेक लोकं नाराज आहेत. पक्षात ताळमेळ नसल्याचं काँग्रेस नेत्यांचं वक्तव्य असल्याचंही रिजिजू यांनी म्हटलं आहे.
-
मनसे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज
मनसे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज झाली आहे. नाशिकच्या राजगड या मनसे कार्यालयात बैठकांचे सत्र सुरू झालं आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तसेच आम्ही देखील स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी तयार आहोत, अशी प्रतिक्रिया मनसे नेते दिनकर पाटील यांनी दिली आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंतिम निर्णय घेतील. तसेच ग्रामीण भागात आमची मोठी ताकद असल्याचंही पाटील यांनी म्हटलं.
-
केंद्र सरकारचे पथक धाराशिव जिल्ह्यात दाखल
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपीक, शेतजमीन,रस्ते सार्वजनिक मालमत्ता व वैयक्तीक मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर.के.पांडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या हे पथक दौरा करत आहे. आज जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासगाव आणि वाघेगव्हाण या दोन ठिकाणी पथकाने पाहणी केली.
-
हरियाणात 93 हजार 174 मतदारांचा पत्ता चुकीचा – राहुल गांधी
हरियाणात 93 हजार 174 मतदारांचा पत्ता चुकीचा. मतदार यादीत वेगवेगळ्या नावांसमोर एकच फोटो. देशातील तरुणांना ही मतचोरी समजायला हवी असं राहुल गांधी म्हणाले.
-
दर आठ मतदारांमध्ये एक मतदार फेक होता – राहुल गांधी
“हरियाणात 5 लाख 21 हजार डुप्लीकेट वोटर मिळाले. हरियाणामध्ये दोन कोटी मतदार आहेत. 25 लाख मतचोरीचा अर्थ होतो की, दर आठ मतदारांमध्ये एक मतदार फेक होता” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
-
हरियाणात 25 लाख मतांची चोरी – राहुल गांधी
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, त्यांच्याकडे पुरावे आहेत. हरियाणात 25 लाख मतांची चोरी झाली. हरियाणात 2 कोटी मतदार, 25 लाख मतचोरी असं राहुल गांधी म्हणाले.
-
ब्राझीलच्या मॉडलने हरियाणात मतदान केलं
हरियाणात पोस्टल मतदानात काँग्रेस पुढे होती. ब्राझीलच्या मॉडलने हरियाणात मतदान केलं. हरियाणात एक्झिट पोलमध्ये आमचा विजय दाखवला. हरियाणात काँग्रेस आणि भाजपच्या मतांमध्ये 1.18 लाख मतांचा फरक होता.
-
हरियाणामध्ये मतचोरी पकडली
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हरियाणामध्ये मतचोरी पकडली. मतदार याद्यांबद्दल हरियाणातूनही तक्रारी. संपूर्ण प्रदेशाला चोरी केलं गेलं असं राहुल गांधी म्हणाले.
-
सोलापुरात एसटी बसचा भीषण अपघात
सोलापुरात एसटी बसचा भीषण अपघात. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. बार्शीतून सोलापूरकडे येणाऱ्या एसटी बसचा ब्रेक फेल झाला. एसटी डिव्हायडरवर चढून कारला धडकली. शहरातील बाळे परिसरातील संतोष नगर जवळ घडली घटना. एसटी बसमध्ये एकूण 25 प्रवासी होते. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नसून सर्वजण सुखरूप आहेत.
-
सोलापुरात केंद्रीय पथकाकडून नुकसानीची पाहणी, पण संवाद नाही, शेतकरी नाराज
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येऊन गेले असले तरी, शेतकऱ्यांनी या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, एक महिन्यानंतर गावात पोहोचलेल्या या पथकाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी कुठलाही संवाद साधला नाही. केवळ औपचारिक पाहणी करून ते निघून गेले. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नुकसानीची विदारक परिस्थिती एका महिन्यापूर्वी होती, पण आता पंचनामे झाल्यानंतरही केवळ २०% लोकांनाच मदत मिळाली आहे, तर उर्वरित ८०% शेतकरी अजूनही पहिल्या टप्प्याच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जाहीर झालेली मदत लवकरात लवकर आणि पूर्णपणे मिळावी, एवढीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
-
जालन्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, शेतकरी हवालदिल
जालना जिल्ह्यातील शेतकरी परतीच्या पावसाने चांगलेच हवालदिल झाले आहेत. जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव आणि आसपासच्या परिसरात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे काढणी करून ठेवलेल्या मक्याच्या कणसांना शेतातच कोंब फुटू लागले आहेत. दिवाळीपासून सुरू असलेल्या या पावसाने मका पीक पूर्णपणे खराब केले आहे, कारण कणसे जमा करायलाही वेळ मिळाला नाही. केवळ मकाच नव्हे, तर कापसाच्या वाती आणि इतर पिकांच्या उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता आहे. हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे, या संकटाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
-
निवडणुक आयोगाच्या कार्यपद्धतीवर राज ठाकरे घेणार महत्त्वाचा निर्णय, बैठक सुरु
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची महत्त्वाची बैठक होत आहे. काल दिल्लीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन हे नेते परतले आहेत. आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेवर घेतलेला आक्षेप आणि व्यक्त केलेली नाराजी पाहता, या बैठकीत पक्ष पातळीवर निवडणुकीच्या पुढील वाटचालीबाबत अंतिम व महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे मनसे आता निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर ठोस भूमिका घेणार असल्याचे बोललं जात आहे.
-
जालना जिल्ह्यातल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील आणखी एका आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक
जालना जिल्ह्यात मागील काही महिन्यापूर्वी झालेल्या बहुचर्चित शेतकरी अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यातील 6 व्या आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. विदर्भातील अकोला शहरातून ताब्यात घेत त्याला अटक केली. मागील तीन महिन्यापासून हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. शिवाय मोबाईल न बाळगता तो 8 दिवस शेतात तर 20 दिवस मंदिरात राहिला असल्याची माहिती समोर आली. जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे.
-
पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक सोलापुरात
पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने सोलापूर जिल्ह्याची पाहणी केली. या पथकाने काल रात्री मोहोळ तालुक्यातील कोळेगावात नुकसानीचा अभ्यास केला. आज सकाळी त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील आनंद नगर भागाला भेट दिली, त्यानंतर वडकबाळ गावात विद्युत सबस्टेशनची पाहणी केली. तसेच, उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे आणि मोहोळ तालुक्यातील शिवणी येथील नुकसानीचा देखील या पथकाने आढावा घेतला. पाहणी पूर्ण झाल्यावर हे पथक पुढील दौऱ्यासाठी धाराशिवच्या दिशेने रवाना झाले आहे.
-
कर्जमुक्ती करा, तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्या, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
उद्धव ठाकरे आजपासून चार दिवस मराठवाडा दौर्यावर आहेत. सध्या उद्धव ठाकरे हे पैठण तालुक्यातील नांदर गावात पोहोचले आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कर्जमुक्ती करा, तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्या, अशी मागणी सरकारकडे केली
-
वडाळ्यात मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड, ट्रायल रनदरम्यान अपघात
वडाळा येथे मोनोरेलच्या नवीन डब्यांची चाचणी सुरू असतानाच तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा ठप्प झाली. नेहमीच्या बिघाडांप्रमाणेच यावेळीही मोनोरेल अचानक मध्येच थांबल्याने मोठी अडचण निर्माण झाली. नवीन डब्यांची चाचणी सुरू असतानाच हा प्रकार घडल्यामुळे मोनोरेलच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या बंद पडलेली मोनोरेल पूर्ववत सुरू करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
-
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ग्रंथालय विभागातील आधुनिक अभ्यासिकांचा मोठा गौरव
या अभ्यासिकांमध्ये नियमित अभ्यास करणारे यश शिंदे यांनी MPSC राज्यसेवा गट-अ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यश शिंदे यांनी आपल्या कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर महानगरपालिकेचे नाव उज्ज्वल केले आहे.
-
काँग्रेस आगामी निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर ठाम
मनसेला महाविकास आघाडीतसोबत घेतल्यास काँग्रेसला वैचारीक अडचण… इंडिया आघाडीचे जे पार्टनर आहेत त्यांच्यासोबत ही आघाडीची चर्चा पुढे जाऊ शकते. पण मनसेसोबत नाही या भूमिकेवर कांग्रेस नेते ठाम… काँग्रेसनं इंडिया आघाडीच्या आणि मविआच्या सहकारी पक्षांसोबत जिल्हा स्तरावर आणि स्थानिक पातळीवर चर्चा करून हाय कमांडला निर्णय कळवल्याची सुत्रांची माहीती… राज्य स्तरावर कुठलीही आघाडी किंवा युती करणार नाही यावर कांग्रेस ठाम… अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची दिल्लीत वरिष्ठांशी फोनवर बातचीत…
-
सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सोलापुरात
सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सोलापुरात आले आहे… केंद्रीय पथकाच्या दौऱ्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संवाद… केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा आज सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाला… काल रात्रीच्या सत्रात जी पाहणी झाली ती दौऱ्याचा भाग नसून केवळ माहितीस्तव पाहणी केली आहे… सोलापूर जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे… रस्ते, सब स्टेशन, पिकांचे नुकसान तसेच घरांच्या पडझडींची केंद्रीय पथकाकडून पाहणी होणार आहे…
-
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांकडून 178 बॉडी बिल्डर यांना नोटीस..
निवडणुकीच्या काळात जे समाजात दहशत निर्माण करू शकतात त्याच्या उपाययोजना म्हणून बजविण्यात आल्या नोटीस. अनेक वेळा निवडणुका आल्या की बॉडी बिल्डर, बाउन्सर यांच्यामार्फत समाजात दहशत निर्माण केली जाते. हे होऊ नये म्हणून पोलिसांच्या वतीने 17 पोलीस स्टेशन अंतर्गत व्यायाम शाळा जिम आखाडे बाउन्सर व्यवसाय करणारे यांना देण्यात आल्या नोटीस.
-
14 नोव्हेंबरपर्यंत भिडे पूल खुला
मेट्रोच्या पादचारी पुलासाठी केला होता बंद. महामेट्रो तर्फे पादचारी पुलाच्या उभारणीचे काम सुरू असल्याने सध्या नदीपात्रातील बाबाराव भिडे पूल बंद ठेवण्यात आला आहे. मात्र पेठेत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आता 14 नोव्हेंबरपर्यंत भिडे पूल पूर्ण वेळ वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मात्र 15 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान हा पूल रात्री दहा ते सकाळी सहा वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
-
कल्याण खडवली परिसरात MSEB चा गलथान आणि मनमानी कारभार
दोन वर्षा नंतर शेतकऱ्याला शेतात ट्रान्सफॉर्मरला मंजूरी मात्र जागेवर बसवण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून MSEB शोधत आहे मुहूर्त. कर्मचारी व अधिकारी काम करत नसल्याने शेतकऱ्यांनी आणलेल्या सत्ताधारी आमदार किसन कथोरे यांच्या शिफारस पत्रालाही MSEB अधिकाऱ्यांनी दाखवली ‘केराची टोपली’
-
महावितरणच्या बिलात जवळपास 12 टक्क्यांची कपात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हंगामात महावितरणची वीज स्वस्त झाली असल्याने राज्य भरातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. महावितरणच्या बिलात जवळपास 12 टक्क्यांची कपात. 28 मार्चच्या आदेशानुसार तूर्तास बिल आकारणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. आयोगाचे सुधारी बिलाचे आदेश रद्दबातल केले. या महिन्यात गेल्या महिन्यात वाढवलेला अधिभार शून्यावर आणला
-
शंकर महाराज अंगात येतात असे भासवून पुण्यातील कुटुंबाची १४ कोटी रुपयांची फसवणूक
पीडित कुटुंबीयांचे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र. कौटुंबिक अडचणी दूर होतील या भूलथापाला बळी पडून १४ कोटी रुपये गमावले. परदेशातील घर, शेती, सोन्यावर कर्ज काढून लुबाडले १४ कोटी रुपये. पती पत्नी आणि इतरांनी केली पुण्यातील कुटुंबाची आर्थिक फसवणूक
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर
शिवसेनेच्यावतीने गटप्रमुख मेळाव्याचे आयोजज. यामध्ये शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे गटप्रमुखांना मार्गदर्शन करणार , आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती. शिवसेनेच्यावतीने दुपारी १.०० वाजता रामकृष्ण लॉन, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे गटप्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन
-
सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त भागात केंद्रीय पथकाकडून पाहणी सुरू
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात केंद्रीय पथक पाहणीसाठी पोहोचले. काल रात्रीच्या सत्रात मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथे केंद्रीय पथकाने पाहणी केली. अंधारात पाहणी केल्याने केंद्रीय पथकावर सर्व स्तरातून टीका होत आहे. त्यानंतर आज सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात केंद्रीय पथक पाहणी करणार आहे
Published On - Nov 05,2025 8:11 AM
