Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Badlapur News LIVE : कर्जतहून सीएसएमटीला निघालेली लोकल बदलापूरवरून रवाना

| Updated on: Aug 21, 2024 | 8:40 AM

Badlapur Rape Case, Rail Roko Andolan News LIVE Updates in Marathi : आज 20 ऑगस्ट 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Badlapur News LIVE : कर्जतहून सीएसएमटीला निघालेली लोकल बदलापूरवरून रवाना

कलकत्ता येथील डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टात आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेतली असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. सीबीआयचे वकीलही सुप्रीम कोर्टात उपस्थित राहणार आहेत. उद्या महाविकास आघाडीची बैठक होणार असून समन्वय समितीतील नेते उपस्थित राहणार आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठीं आयोजन करण्यात आलं आहे. जागा वाटपाच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. पोलीस भरती मध्ये लेखी परीक्षा देत असताना मोबाईल द्वारे कॉपी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Aug 2024 09:42 PM (IST)

    पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन

    पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरु आहे. विद्यार्थी शास्त्री रोडवर जमले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कृषी सेवेच्या पदांचा समावेश जाहिरातीत होत नाही त्यामुळे तरुणांकडून आंदोलन केलं जात आहे.

  • 20 Aug 2024 08:52 PM (IST)

    कोलकाता पोलिसांनी संदीप घोष यांना नोटीस बजावली

    कोलकाता पोलिसांनी आरजी कार कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना उद्या लाल बाजार पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पीडितेची ओळख उघड करण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

  • 20 Aug 2024 08:37 PM (IST)

    मंकीपॉक्स रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये खोल्या तयार करण्याच्या सूचना

    दिल्ली सरकारने आपल्या तीन रुग्णालयांना मंकीपॉक्सच्या संशयित आणि पुष्टी झालेल्या प्रकरणांच्या व्यवस्थापनासाठी वेगळा कक्ष तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्लीत अद्याप मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

  • 20 Aug 2024 08:25 PM (IST)

    ‘आप’चे खासदार संजय सिंह यांना अटक करण्याचे आदेश

    आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. यूपीमधील सुलतानपूर येथील न्यायालयाने 23 वर्षे जुन्या खटल्याबाबत संजय सिंगला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश जारी केले आहेत.

  • 20 Aug 2024 08:19 PM (IST)

    अंबरनाथमध्ये कार चालकाने जुन्या रागातून तीन ते चार लोकांना उडवलं

    अंबरनाथमध्ये कार चालकाने तीन ते चार लोकांना उडवलं आहे. बदलापूर अंबरनाथ रोडवरील ही धक्कादायक घटना आहे. जुन्या वादातून गाडी अंगावरून नेल्याची माहिती असल्याचं सांगण्यात येत आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.

  • 20 Aug 2024 08:12 PM (IST)

    कर्जतहून सीएसएमटीला निघालेली लोकल बदलापूरवरून रवाना

    कर्जतहून सीएसएमटीला निघालेली लोकल बदलापूरवरून रवाना झालेली आहे. बदलापूरहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल वाहतूक सुरू झाली आहे. 10 ते 12 तासापासून रेल्वेसेवा ठप्प झाली होती.

  • 20 Aug 2024 07:26 PM (IST)

    गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून बेलबाग चौकात आंदोलन

    बदलापूर अत्याचार प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. पुण्यात आज बदलापूर घटनेचा निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. गणेश मंडळाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. बेलबाग चौकात आंदोलन करण्यात येत आहे.

  • 20 Aug 2024 07:15 PM (IST)

    राज्य परिवहन विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

    सोलापुरातून राज्य परिवहन विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अक्कलकोटहून धाराशिवला जाणारी बस सोलापूरात दुपारी 12 वाजल्यापासून हायवेवर बंद पडली. बस बंद पडून 7 तास लोटले. तरीही सोलापूर आगारातून एकही कर्मचारी किंवा अधिकारी तिकडे फिरकला नाही. विशेष म्हणजे गाडी बिघडलेल्या ठिकाणापासून डेपो एक किलोमीटर च्या अंतरावर आहे. गाडीतील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये पाठवण्यात आले आहे.

  • 20 Aug 2024 07:05 PM (IST)

    धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस

    धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊसाने हजेरी लावली आहे. पावसाने गेली काही दिवस दडी मारली होती. त्यानंतर अखेर पावसाने एन्ट्री घेतली आहे. संध्याकाळी अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान विभागाने वर्तवण्यात आल्यानुसार सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

  • 20 Aug 2024 06:09 PM (IST)

    पोलिसांनी बदलापूर स्टेशन केले मोकळे, थोड्याच वेळात सुरु होणार लोकल सेवा

    गेल्या नऊ तासांपासून सुरु असलेले आंदोलन अखेर पोलिसांनी बळाचा वापर करुन संपवले आहे. पोलिसांनी बदलापूर स्टेशन मोकळे केले आहे. त्यामुळे काही वेळेतच लोकल सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

  • 20 Aug 2024 05:56 PM (IST)

    बदलापूर : पोलिसांवर आंदोलकांकडून दगडफेक

    बदलापूर स्थानकावर सुरु असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना बाजुला केले आहे. या दरम्यान आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.

  • 20 Aug 2024 05:55 PM (IST)

    बदलापूरमध्ये पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज

    बदलापूर स्थानकावर सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. त्यानंतर आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे.

  • 20 Aug 2024 04:58 PM (IST)

    उज्ज्वल निकम चालवणार खटला

    चर्चेतून विषय सुटत असतो. इथे कुणाची लीडरशीप नाहीये. कुणी कुणाचं ऐकत नाही. तरुण आहेत. त्यांचा राग योग्य आहे. पण रेल्वे बंद करणं हा पर्याय नाही. एसआयटी नेमली आहे. फार्स्ट ट्रॅकमध्ये खटला चालवणार आहेत. उज्ज्वल निकम यांना आम्ही हा खटला चालवायला देणार आहोत अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

  • 20 Aug 2024 04:50 PM (IST)

    अधिकारी आरती सिंह करणार तपास

    बदलापूर घटनेचा तपास अधिकारी आरती सिंह या करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री यांनीही सूचना दिल्या आहेत. तत्काळ चार्जशीट दाखल केली जाईल. फास्ट ट्रॅक कोर्टाचा अहवाल मागवला आहे. नराधमांना कुठेही पाठीशी घातल जाणार नाही जाणीवपूर्वक कोणी दिरंगाई करत आहे का हे पाहिलं जाईल. पीडितेच्या कुटुंबियांना जाणीवपूर्वक त्रास दिला असेल तर त्याचीही चौकशी होईल, असे त्यांनी सांगितले.

  • 20 Aug 2024 04:40 PM (IST)

    इम्तियाज जलील यांचे सरकारला खडेबोल

    बदलापूर घटनेप्रकरणी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. विशेष अधिवेशन बोलवून कडक कायदा निर्माण करा.अन्यथा लोक तुम्हाला कसे चिरडतात ते पाहा, असा इशारा इम्तियाज जलील यांनी केला आहे.

  • 20 Aug 2024 04:30 PM (IST)

    आंदोलनामुळे वाहतूक ठप्प

    बदलापूर येथील एका शाळेत मुलींचे लैंगिक शोषण झाल्याच्या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या नागरिकांना बदलापूर स्थानकात जोरदार रेल रोको केल्याने लोकल गाड्यांसह लांबपल्ल्याच्या गाड्यांचाही खोळंबा झाला आहे. सकाळी साडे दहा वाजल्यापासून सुरु झालेल्या या रेल रोकोवर अजूनही तोडगा न निघाल्याने मध्ये रेल्वे ठप्प झाली आहे. मुंबईत सकाळी पोहचणाऱ्या इंटरसिटी गाड्यांतील प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

  • 20 Aug 2024 04:20 PM (IST)

    बदलापूर घटनेबाबत राज ठाकरे यांचा संताप

    “बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या”, अशी सूचना राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

  • 20 Aug 2024 04:10 PM (IST)

    गिरीश महाजन येताच, आंदोलकांनी केली आरोपींच्या फाशीची मागणी

    घटना 13 तारखेला झाली आहे. 13 तारखेपासून पोलिसांनी काय केलं? असा सवाल आंदोलकांनी गिरीश महाजन यांना केला. यावेळी गिरीश महाजन यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन झाली आहे. आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असं गिरीश महाजन म्हणाले. आंदोलकांनी यावेळी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली.

  • 20 Aug 2024 04:00 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

    बदलापूरच्या घटनेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या राजीनामाची मागणी केली आहे.

  • 20 Aug 2024 03:23 PM (IST)

    मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचे आंदोलकांना आवाहन, लोकल सेवेबद्दलची ताजी अपडेट

  • 20 Aug 2024 03:09 PM (IST)

    यात्रेचा कलर बदला गुलाबी ऐवजी काळा करा – महबूब शेख

    अजित पवार यांच्या गुलाबी कलर यात्रेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते महबूब शेख यांची हिंगोलीत जोरदार टिका, यात्रेचा कलर बदला गुलाबी ऐवजी काळा करा अशी मागणी केली.

  • 20 Aug 2024 02:56 PM (IST)

    आरोपीला फाशी देण्याची मागणी

    आंदोलकांकडून आरोपींना फाशी देण्याची मागणी केली जात आहे

  • 20 Aug 2024 02:46 PM (IST)

    नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, फडणवीस

    बदलापूरच्या नागरिकांना आवाहन करत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, नागरिकांनी कायद्या हातात घेऊ नये.

  • 20 Aug 2024 02:37 PM (IST)

    आंदोलकांनी केली पोलिसांवक दगडफेक

    बदलापूर येथे पोलिसांवर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आलीये

  • 20 Aug 2024 02:18 PM (IST)

    संतप्त पालकांकडून शाळेची तोडफोड

    संतप्त पालकांकडून शाळेची तोडफोड करण्यात आलीये. बदलापूरचे प्रकरण वाढताना दिसतंय.

  • 20 Aug 2024 02:11 PM (IST)

    पाच तासांमध्ये रेल रोको आंदोलन सुरू

    बदलापुरमध्ये गेल्या पाच तासांमध्ये रेल रोको आंदोलन सुरू आहे.

  • 20 Aug 2024 02:10 PM (IST)

    देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, सुषमा अंधारेंची मागणी

    सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गेल्या साडेसात वर्षापासून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहे, तर सात वर्षात महिला अत्याचाराच्या सर्वाधिक घटना झाले आहेत. खरं सत्तेचा मोह नसेल आणि गृहमंत्री म्हणून वारंवार अपयशी ठरत असेल तर देवेंद्र फडणवीस राजीनामा का देत नाही, असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.

  • 20 Aug 2024 02:03 PM (IST)

    राज्यात पोलिसांची भीती राहिली नाही- सुप्रिया सुळे 

    बदलापूरच्या प्रकरणानंतर सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, राज्यात पोलिसांची भीती राहिली नाहीये.

  • 20 Aug 2024 01:38 PM (IST)

    लाडक्या बहि‍णींच्या छोट्या मुलीही सुरक्षित नाही – उद्धव ठाकरे

    लाडक्या बहि‍णींच्या छोट्या मुलीही सुरक्षित नाही. या घटनेचे राजकारण न करता आरोपींनी कठोर शिक्षा करावी. यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

  • 20 Aug 2024 01:33 PM (IST)

    बदलापूर अल्पवयीन अत्याचार प्रकरणी पोलीस आणि आंदोलकांचा संवाद सुरु

    बदलापुरातील जो आरोपी आहे, त्याला आमच्या ताब्यात द्या, आरोपीला फाशी द्यायला हवी, अशी मागणी महिला आंदोलकांनी पोलिसांना केली आहे. तर पोलिसांनी ही मागणी मान्य करता येणार नाही. भारतात कायद्याचे राज्य आहे, असे पोलिसांनी सांगितले.

  • 20 Aug 2024 01:16 PM (IST)

    बदलापुरातील रेल्वे रोको आंदोलनाला आक्रमक वळण, 3 ते 4 पोलीस जखमी

    बदलापूर अल्पवयीन अत्याचार प्रकरणी, स्टेशनवर गर्दी कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स

    वारंवार विनंती करून आंदोलन पाठी घेत नसल्याने गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी पोलीस बळ वापरण्याचा केला प्रयत्न

    मात्र संतप्त आंदोलन कर्त्यांनी पोलिसांवरती दगडफेक

    दगडफेकीनंतर पोलिसांनी काढता पाय घेत घटनास्थळावरून काढला पळ

    पोलिसांनी शांत भूमिका घेत आंदोलनाचे तर त्यांचे हात जोडून आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न सुरू

    दगडफेकी तीन ते चार पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

  • 20 Aug 2024 01:01 PM (IST)

    बदलापुरात पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक

    बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी संतप्त बदलापूरकरांचा रेल्वे रोको

    पोलीस लाठीचार्ज करण्याच्या प्रयत्नात असताना आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक

    दगडफेकीनंतर बदलापूर स्थानकात धावपळ सुरु

    पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज

  • 20 Aug 2024 01:01 PM (IST)

    Maharashtra News : बदलापुरात पोलिसांवर दगडफेक

    बदलापुरात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. बदलापुरात तीन तासांपासून रेल रोको आंदोलन सुरु आहे. बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. त्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे.

  • 20 Aug 2024 12:22 PM (IST)

    Maharashtra News : राहुल गांधी उद्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

    काँग्रेस खासदार राहुल गांधी उद्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांची घेणार भेट. विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेस अलर्ट मोडवर. जागांबाबत राहुल गांधी काश्मीरमधील नेत्यांची चर्चा करणार

  • 20 Aug 2024 12:18 PM (IST)

    Maharashtra News : बदलापूर पूर्वच्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली

    बदलापूर शाळा दोन अल्पवयीन मुली अत्याचार प्रकरण. संबंधित बदलापूर पूर्व पोलीस अधिकाऱ्यांची बदली. गुन्हा दाखल करण्यास हलगर्जी केल्याचा आरोप करत बदली केल्याची माहिती. संस्था चालकांवरती कारवाई करण्यासाठी शिक्षण संस्थेने नेमली चौकशी समिती.

  • 20 Aug 2024 11:55 AM (IST)

    मालेगावमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला सुरुवात

    मालेगावमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. भर पावसात शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. जय श्रीराम, वंदे मातरमच्या घोषणा देत या मोर्चाला सुरुवात झाली आहे. मालेगावच्या रामसेतू पुलापासून हा मोर्चा सुरू झाला आहे.

  • 20 Aug 2024 11:42 AM (IST)

    अंबरनाथवरून बदलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद

    मध्य रेल्वे विस्कळीत झाली असून अंबरनाथवरून बदलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद झाल्या आहेत. तर अंबरनाथवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्यादेखील पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू आहेत. बदलापूरमध्ये संतप्त नागरिकांकडून रेल रोको आंदोलन करण्यात आलं आहे. बदलापूरच्या खासगी शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याने संतप्त पालक आणि बदलापूर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

  • 20 Aug 2024 11:32 AM (IST)

    बदलापुरातील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार- मुख्यमंत्री शिंदे

    बदलापुरातील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. संस्थाचालकांची चौकशी करण्याचेही आदेश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.

  • 20 Aug 2024 11:13 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुसऱ्यांदा गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुसऱ्यांदा गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. 21 ऑगस्टपासून त्यांचा विदर्भ दौरा सुरू होणार असून 26 ऑगस्टपर्यंत हा दौरा असणार आहे. या सहा दिवसीय दौऱ्याची सुरुवात गोंदिया पासून होणार असून यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील मनसे सैनिकांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे.

  • 20 Aug 2024 11:03 AM (IST)

    मध्य रेल्वेवरील कल्याण-कर्जतदरम्यानची सेवा ठप्प

    बदलापूर स्थानकावरील रेल्वे सेवा गेल्या एक तासापासून ठप्प आहे. बदलापुरात संतप्त नागरिकांकडून रेलरोको आंदोलन सुरू आहे. शाळेच्या गेटवर पालकांकडून आंदोलन सुरू आहे. नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. त्याच्या निषेधार्थ पालकांनी आंदोलन केलंय.

  • 20 Aug 2024 10:57 AM (IST)

    Maharashtra News: पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही अनंत बोस दिल्लीत दाखल

    पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही अनंत बोस दिल्लीत दाखल… राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार… कोलकत्तामधील महिला डॉक्टर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी चर्चा होणार… काही वेळापूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचीही बोस यांनी घेतली भेट…

  • 20 Aug 2024 10:45 AM (IST)

    Maharashtra News: बदलापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणी नागरीक आक्रमक

    बदलापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणी नागरीक आक्रमक… पालकांसह बदलापूरकरांचं शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन… बदलापूर पोलिसांकडून शाळेच्या गेटवर बंदोबस्त वाढला… संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेंचं निलंबन…

  • 20 Aug 2024 10:35 AM (IST)

    Maharashtra News: चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर आज महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

    चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर आज महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन… आपल्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन… आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त… चंद्रकांत पाटील मात्र त्यांच्या निवासस्थानात नाही…

  • 20 Aug 2024 10:20 AM (IST)

    Maharashtra News: राजीव गांधी यांच्या जयंती निमित्ताने कोल्हापुरात सद्भावना दौड

    माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्ताने कोल्हापुरात सद्भावना दौड होतीय…. दरवर्षी दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या उपस्थितीत ही दौड होत असे… मात्र 31 वर्षात पहिल्यांदाच पी एन पाटील यांच्या अनुपस्थित ही दौड होतीय… शाहू महाराज यांच्या हस्ते सद्भावना दौडला सुरुवात होतीय…

  • 20 Aug 2024 10:07 AM (IST)

    Maharashtra News: मलिक पुराव्यानिशी बोलत होते, त्यामुळे सुडाने कारवाई केली… संजय राऊत

    मलिक पुराव्यानिशी बोलत होते, त्यामुळे सुडाने कारवाई केली… मलिकांबाबत फडणवीसांनी लिहिलेलं पत्र मागे घ्वावं… मलिकांवर दाखल केलेले खटले फडणवीसांनी मागे घ्यावे… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 20 Aug 2024 10:02 AM (IST)

    Maharashtra News: महायुतीत आता प्रकरण मारामारीपर्यंत गेलं आहे – संजय राऊत

    महायुतीत आता प्रकरण मारामारीपर्यंत गेलं आहे… महायुतीत तिकीट वाटपाच्या वेळी खून – खराबा होईल… महायुतीत अंतर्गत वाद सुरु… महायुतीतून अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 20 Aug 2024 09:57 AM (IST)

    राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त कोल्हापुरात सद्भावना दौड

    माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्ताने कोल्हापुरात सद्भावना दौड होत आहे. दरवर्षी दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत ही दौड होत असते. मात्र 31 वर्षात पहिल्यांदाच पी. एन. पाटील यांच्या अनुपस्थित ही दौड होत आहे. शाहू महाराज यांच्या हस्ते सद्भावना दौडला सुरुवात होत आहे.

  • 20 Aug 2024 09:45 AM (IST)

    सोनिया गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा

    ‘द हिंदू’ वृत्तपत्रात सोनिया गांधी यांचा लेख प्रकाशित झाला आहे.  सोनिया गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमावरून मोठा आरोप केला आहे. केंद्र सरकारने हाताने बनवलेला खादीचा तिरंगा वापरायचे बंद केलेत. सरकार पॉलिस्टर तिरंगा वापरत आहे. पॉलिस्टर चीनमधून आयात केलं जात आहे, असं त्या म्हणाल्या. सरकारने खादीची खरेदी कमी केल्याचा आरोपही सोनिया गांधींनी केला. हातानं तयार केलेल्या खादीच्या वस्तूंसाठी जागतिक बाजारपेठ तयार करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही सोनिया गांधींनी केला आहे.

  • 20 Aug 2024 09:30 AM (IST)

    पूजा खेडकर प्रकरणी अपडेट

    दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्य्या टीमने पुण्यात पूजा खेडकर प्रकरणाचा तपास केला आहे. पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्राशी संबधीत शासकीय कार्यालये यांच्याकडे चौकशी केली आहे. पुजा खेडकरच्या पुण्यातील सर्व रहीवासी पत्त्यांवर जाऊन सोसायटीलमधील लोकांकडे देखील चौकशी करण्यात आली आहे.

  • 20 Aug 2024 09:15 AM (IST)

    गडचिरोलीत तरूणीला मारहाण

    गडचिरोलीत मोबाईल चार्जर न दिल्याच्या कारणावरून युवतीला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण झाली आहे. रेस्टॉरंटमधल्या सीसीटीव्ही कॅमेरात घटना कैद झाली आहे. रेस्टॉरंट मध्ये काम करणाऱ्या 19 वर्षीय युवतीला बेदम मारहाण केल्याची घटना गडचिरोलीच्या आरमोरी शहरात उघडकीस आली आहे. हा व्हीडिओ वायरल होताच संताप व्यक्त केला जात आहे दोन्ही आरोपीला अटक करण्याची मागणी नागरिक करत आहेत. आरमोरी शहरातील वडसा टी पाॅईटच्या रेस्टॉरंट मध्ये हा प्रकरण घडला प्रकरणावर संताप व्यापाऱ्यानी आरमोरी शहर आज बंद पुकारला आहे.

  • 20 Aug 2024 08:58 AM (IST)

    झिशान सिद्दीकी अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना

    झिशान सिद्दीकी अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत बाबा सिद्दीक देखील आहेत. झिशान सिद्दीकी हे लवकरच अजित पवार गटाच प्रवेश करणार असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

  • 20 Aug 2024 08:45 AM (IST)

    पुणे – पोर्श अपघाता प्रकरणी पुणे पोलिसांकडून आणखी दोघांना अटक

    पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्श अपघाताप्रकरणी आणखीन दोघांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातील रक्त अदलाबदल प्रकरणात अटकेची ही कारवाई करण्यात आली असून आशिष मित्तल आणि आदित्य सूद अशी त्यांची नावे आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

  • 20 Aug 2024 08:39 AM (IST)

    मुंबई महापालिकेत लिपिकांची महाभरती

    मुंबई महापालिकेत नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असलेल्या हजारो उमेदवारांसाठी खुशखबर आहे.  लिपिक846  जागा सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी 20ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून, 9 सप्टेंबर रात्री 11.59 पर्यंत अर्ज करता येतील. पालिकेच्या वेबसाइटवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे.

  • 20 Aug 2024 08:34 AM (IST)

    कोलकाता येथील डॉक्टरवरील बलात्कार-हत्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

    कोलकाता येथील डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टात आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेतली असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. सीबीआयचे वकीलही सुप्रीम कोर्टात उपस्थित राहणार आहेत.

  • 20 Aug 2024 08:29 AM (IST)

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन, अंनिसकडून निर्भय मॉर्निंक वॉकचे आयोजन

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खूनाला 11 वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा सुनावली गेली, पण खूनाचा सूत्रधार मात्र अजूनही मोकाट आहे. या गोष्टीचा निषेध करत, खूनाचा सूत्रधार लवकर पकडला जावा अशी मागणी करत मुंबईतील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आज शिवाजी पार्कवरील मीनाताई ठाकरे पुतळ्या जवळ निर्भय मॉर्निंक वॉक करण्यात आला.

  • 20 Aug 2024 08:21 AM (IST)

    नवी दिल्ली – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 80 वी जयंती

    देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 80 वी जयंती असून त्यानिमित्त काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वीरभूमीवर जाऊन समाधीचे दर्शन घेतले . पुष्पहार अर्पण करून वडिलांना अभिवादन केलं .

  • 20 Aug 2024 08:17 AM (IST)

    काश्मीर खोऱ्यात सलग दोन वेळा भूकंप , नागरिकांमध्ये घबराट

    जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी सलग दोनवेळा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.2 इतकी मोजली गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी आणि वित्तहानी झाली नाही. मात्र भूकंपामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

Published On - Aug 20,2024 8:15 AM

Follow us
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.