अमरावतीमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे काँग्रेसच्या नेत्याचा मुलगा लग्नाच्या आदल्या दिवशी बेपत्ता झाला आहे.
1 / 5
याबाबत बेपत्ता मुलाच्या वडिलांनी अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस बेपत्ता मुलाचा तपास करत आहेत.
2 / 5
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव मोहोड, (वय 30) असं बेपत्ता झालेल्या तरुणाचं नाव आहे. वैभव हा काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा आहे.
3 / 5
शिवाजी महाविद्यालयात वैभव हा लिपिक म्हणून कार्यरत आहे. उद्या त्याचं लग्न होणारं आहे. त्यापूर्वीच तो आज (13 मे) सकाळी सामान आणायला बाहेर जातो, असं सांगून घराबाहेर केला होता.
4 / 5
त्यानंतर तो घरात परतलाच नाही, असं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगण्यात आलं आहे. बेपत्ता झालेल्या वैभव याने सकाळीच ATM मधून 40 हजार रुपये काढल्याची माहिती आहे. फ्रेजरपुरा पोलीस या प्रकरणाचा अधिक करत आहे.