Marathi News » Photo gallery » CM Eknath Shinde and his supporting MLAs paid homage to Hutatma Smarak, Tribute to Dr. Babasaheb Ambedkar, Balasaheb Thackeray and Anand Dighe
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक; डॉ. आंबेडकर, हुतात्मा स्मारक आणि दिघे साहेबांनाही अभिवादन
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं 164 विरुद्ध 99 अशा मोठ्या फरकाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेचं विशेष अधिवेशन आज संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा स्मारक, चैत्यभूमी, बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आणि आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे-भाजप सरकारनं आज विश्वास दर्शक ठराव जिंकला. 164 विरुद्ध 99 अशा मोठ्या फरकाने शिंदे यांना हा विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेचं विशेष अधिवेशन आज संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा स्मारक, बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आणि आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
1 / 8
विधिमंडळ अधिवेशनात बहुमत चाचणीला यशस्वीरित्या सामोरं गेल्यानंतर शिवसेना आमदार आणि सहयोगी आमदारांसह हुतात्मा स्मारकाला भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी यांनी महाराष्ट्र लढ्यातील सर्व हुतात्म्यांना अभिवादन केलं.
2 / 8
हुतात्मा स्कारकावर सर्व हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार चैत्यभूमीवर दाखल झाले.
3 / 8
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं.
4 / 8
त्यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही उपस्थित होते. आठवले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छोटा पुतळाही भेट दिला.
5 / 8
चैत्यभूमीवर महामानवाला वंदन केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार थेट शिवतीर्थावर दाखल झाले.
6 / 8
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री शिंदे नतमस्तक झाले. बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आमचं सरकार आलं, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार या राज्याला पुढे नेणार आहेत. म्हणून आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार, शिवेसना-भाजपचं सरकार आज स्थापन झालं आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी यावेळी दिली.
7 / 8
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना आमदार दाखल झाले त्यावेळी जोरदार पावसालाही सुरुवात झाली. भर पावसात शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं.