Photo : भूकंपाच्या धक्क्याने अर्धा देश हादरला, भीतीने लोक सैरावैरा धावत सुटले…!

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:29 AM, 13 Feb 2021
1/6
EarthQuake in Delhi And north India
दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासह शुक्रवारी रात्री उत्तर भारतातील बर्‍याच भागात 6.1 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री साडे दहाच्या आसपास हा भूकंप झाला. नॅशनल सिस्मोलॉजिकल सेंटरच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचे केंद्रबिंदू पंजाबच्या अमृतसर येथे होते आणि ते दहा किमीच्या खोलीवर केंद्रित होते. आतापर्यंत तरी जीवित हानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालेलं कोणतंही वृत्त आलेलं नाही.
2/6
EarthQuake in Delhi And north India
भूकंपाच्या धक्क्याने देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी दहशत पसरली.
3/6
EarthQuake in Delhi And north India
भूकंपानंतर पंजाबच्या अमृतसरमध्ये अनेक लोक घराबाहेर सैरावैरा धावत सुटले.
4/6
EarthQuake in Delhi And north India
जम्मू काश्मीरमधल्याही लोकांनी भूकंपाची तीव्रता अनुभवली. अनेक लोक भीतीने घराबाहेर पडलेले पाहायला मिळाले.
5/6
EarthQuake in Delhi And north India
गाजियाबादच्या वैशाली, वसुंधरा परिसरातले देखील लोक आपल्या घराबाहेर पडून मोकळ्या पटांगणात थांबले होते.
6/6
EarthQuake in Delhi And north India
दिल्लीच्या काही भागातही हीच परिस्थिती होती.