PHOTO : बिनकामाचे घराबाहेर पडण्यापूर्वी या चिता बघा, नगरमध्ये मृतदेहांचे खच, एकाचवेळी 22 अंत्यसंस्कार

बीडमध्ये एकाचवेळी 8 मृतदेहांवर संस्कार केल्याची घटना ताजी असताना, अहमदनगरमध्येही एकाचवेळी 22 जणांवर अत्यसंस्कार करण्याची वेळ आली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:03 AM, 9 Apr 2021
1/7
Ahmednagar Funeral
कोरोनाचं थैमान वाढल्याचं दिसतंय, पण त्याची भीषणता सध्या नगर (Ahmednagar funeal on 22 corona patients) जिल्ह्यात जाणवत आहे.
2/7
Ahmednagar Funeral
नुकतंच बीडमध्ये एकाचवेळी 8 मृतदेहांवर संस्कार केल्याची घटना ताजी असताना, अहमदनगरमध्येही एकाचवेळी 22 जणांवर अत्यसंस्कार करण्याची वेळ आली. अहमदनगर येथील अमरधाममध्ये हे हृदयद्रावक चित्र समोर आलं.
3/7
Ahmednagar Funeral
अमरधाममध्ये सरणावर एकाचवेळी 22 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. तर विद्युत दाहिनीत दिवसभरात 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
4/7
Ahmednagar Funeral
त्यामुळे एकाच दिवसात तब्बल 42 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान शववाहिनीतून एकाचवेळी 6 मृतदेह भरून अमरधाममध्ये नेण्याची नामुष्की महानगरपालिकेवर ओढावली.
5/7
Ahmednagar Funeral
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोनामुळे आत्तापर्यंत 1270 जणांचा मृत्यू झाला आहे.
6/7
Ahmednagar Funeral
जिल्हा प्रशासनाने काल गुरुवारी 8 एप्रिलला दिलेल्या आकडेवारीत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
7/7
Ahmednagar Funeral
त्यामुळे संख्येचा ताळमेळ बसत नाही. नगर जिल्हयात सध्या 11 हजार 237 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.