Healthy Food | वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचंय? मग, नाश्त्यामध्ये ‘हे’ घटक सामील करा!

वजन नियंत्रित करण्याची इच्छा असेल तर, नाश्त्यामध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करणे उपयुक्त ठरेल.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:54 PM, 26 Jan 2021
1/6
Weight Loss
वजन कमी करायचे असेल तर दररोज एक हजार कॅलरी करा बर्न
2/6
दलिया अर्थात ओट्समध्ये सर्वाधिक फायबर असते. न्याहारीमध्ये फायबर किंवा प्रथिनेसमृद्ध घटक वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणूनच नाश्त्यामध्ये ओट्स खाल्ले पाहिजेत.
3/6
बदाम, अक्रोड यासारखे ड्रायफ्रुट्स आणि सफरचंद आपल्याला वजन कमी करण्यास मदत करते. यासाठी आपण नाश्त्यामध्ये सफरचंद किंवा त्याचा रस आणि ड्रायफ्रुट्स रोस्ट करून खाऊ शकता.
4/6
अंड्यात भरपूर प्रथिने असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. तर याबरोबर आपण चहा कॉफीऐवजी ग्रीन टी घ्यावी. दोन्ही पदार्थ वजन नियंत्रणात ठेवतील.
5/6
इडली आणि सांबर हा नाश्ता प्रथिने समृद्ध आहे. याची चव वाढवण्यासाठी आणि अधिक पौष्टिक बनवण्यासाठी सांबरमध्ये बर्‍याच भाज्या घालू शकता.
6/6
व्हेजिटेबल सूप आणि ब्राऊन ब्रेड देखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि पौष्टिक पदार्थ आहेत. आपण कोणत्याही भाज्या उकडून त्याचे सूप बनवू शकता. त्यात काही ब्रेडचे तुकडे टाकून सूपची चव वाढवू शकता.