मुंबईतील ऑन व्हील रेस्तराँ पाहिलंत का?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबईतले पहिले ऑन व्हील रेस्तराँ सुरू करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने रेल्वेच्या जुन्या डब्याचे रूपांतर रेस्तराँमध्ये केले आहे. जे डब्बे रेल्वेसाठी उपयुक्त नाहीत अशा डब्यांचे आता रेस्तराँमध्ये रुपांतर होईल. | on Wheels Restaurant

1/6
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबईतले पहिले ऑन व्हील रेस्तराँ सुरू करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने रेल्वेच्या जुन्या डब्याचे रूपांतर रेस्तराँमध्ये केले आहे. जे डब्बे रेल्वेसाठी उपयुक्त नाहीत अशा डब्यांचे आता रेस्तराँमध्ये रुपांतर होईल.

2/6
या रेस्तराँचे कंत्राट निविदेद्वारे देण्यात येईल. विशेष बाब म्हणजे हे रेस्तराँ चोवीस तास खुले राहणार आहे. या रेस्तराँमध्ये ग्राहक कधीही येऊन खाद्य पदार्थांची चव चाखू शकतात.

3/6
रेल्वे डब्याच्या आतील भागात विशिष्ट प्रकारची रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच रेल्वे थीमसह मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे सुद्धा डब्यात दर्शवण्यात आली आहेत.  रेस्तराँमध्ये सुरक्षित अंतराचे पालन करुन ही व्यवस्था सुरु केली आहे.

4/6
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबईचे फर्स्ट ऑन व्हील रेस्तराँ खुले करण्यात आले आहे. हे रेस्तराँ प्लॅटफॉर्म क्रमांक १८ च्या प्रवेशद्वाराजवळ आहे. या रेस्तराँमध्ये एकावेळी ४० जण जेवणाचा आस्वाद घेऊ शकतील.

5/6
रेस्तराँमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतील. डाइन इन व्यतिरिक्त या ठिकाणी मिनी कँफे व ज्यूससाठी एक स्वतंत्र टेक अवे विन्डो सुद्धा उपलब्ध असणार आहे. या रेस्तराँमध्ये दोन स्वतंत्र विभाग असतील. या ठिकाणी तुम्ही बसून सुद्धा खाऊ शकता किंवा उभे राहून सुद्धा वडापाव किंवा समोसा या सारख्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

6/6
 रेस्तराँ  नियमित सुरु झाल्यावर लोकांना ऑनलाइन अॅप्सद्वारे द्वारे देखील खाद्यपदार्थ मागवता येतील.  तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण ,बोरिवली आणि शहरातील इतर ठिकाणी सुद्धा अशी रेस्तराँ सुरु करण्याचा रेल्वे खात्याचा विचार सुरु आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI