PHOTO | नितीश कुमारांची नव्या साथीदारांसह बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची इनिंग सुरु

जेडीयूचे नेते नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा सूत्रे स्वीकारली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. (Nitish Kumar takes oath as Chief Minister of Bihar)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:38 PM, 16 Nov 2020
1/7
nitish kumar
जेडीयूचे नेते नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा सूत्रे स्वीकारली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
2/7
Tarkishor prasad1
भाजपकडून तारकिशोर प्रसाद (Tarkishor Prasad) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना भाजपनं उपमुख्यमंत्रीपदावर संधी दिली आहे.
3/7
Renu devi
भाजपनं रेणु देवी यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी दिली आहे. याद्वारे अतिमागास जातींमधील समाज आणि महिलांना भाजपसोबत जोडण्याचा प्रयत्न आहे.
4/7
Amit Shah in bihar
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नितीश कुमार आणि भाजप मंत्र्यांच्या शपथविधीसाठी बिहारमध्ये दाखल झाले.
5/7
तारकिशोर प्रसाद यांनी शपथविधीपूर्वी विजयाचे चिन्ह दाखवले. सुशीलकुमार मोदी यांच्या ऐवजी त्यांना संधी देण्यात आली आहे.
6/7
amit shah and j p nadda
अमित शाह यांच्या सोबत भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा देखील शपथविधी कार्यक्रमासाठी बिहारमध्ये आले आहेत.
7/7
Amit Shah
बिहारच्या विजयाच्या आनंदात भाजप कार्यकर्त्यांनी अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्यावर फुलांची उधळण केली.