उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशानिमित्त वर्षा बंगल्यावर स्वागत समारंभ, मुख्यमंत्री-मिसेस मुख्यमंत्री उपस्थित

प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी 1 डिसेंबर रोजी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला होता.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:45 PM, 9 Dec 2020
1/5
प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी 1 डिसेंबर रोजी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. उर्मिला मातोंडकर या राज्यपालनियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेनेच्या उमेदवार आहेत.
2/5
दरम्यान, आज उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेनेतील प्रवेशानिमित्त वर्षा बंगल्यावर स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, 'सामना'च्या संपादिका रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
3/5
या कार्यक्रमावेळी उर्मिला मातोंडकर यांची पहिल्यांदाच शिवसेनेच्या महिला आघाडीशी भेट झाली. या भेटीबाबत उर्मिला यांनी ट्विट करुन माहिती दिली. याबाबत उर्मिला यांनी लिहिलं आहे की, “स्त्री शक्ती”शी भेट, “रणरागिणीं’ना सलाम !!!
4/5
या स्वागत समारंभावेळी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह शिवसेना महिला आघाडीशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या.
5/5
या कार्यक्रमावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते.