Photo Gallery : राज्यात पावसाचा हाहाकार, चोहीकडे पाणीच-पाणी

मुंबई : यंदा वेळेपूर्वी आगमन होऊनही राज्यात पाऊस सक्रीय झाला नव्हता. आतापर्यंत केवळ कोकण आणि मुंबईत बरसणाऱ्या पावसाने आता राज्य व्यापले आहे. हंगामात प्रथमच सर्वत्र पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरणी झालेल्या पिकांना तर नवसंजीवनी मिळणार आहेच पण ज्या क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या होत्या त्याला देखील गती येणार आहे. यंदा सरासरीएवढा पाऊस होणार असल्याचा अंदाज होता पण प्रत्यक्षात पावसाला सुरवातच झाली नसल्याने चिंता व्यक्त केली जात होती. अखेर राज्यातील चारही विभागात पावसाने हजेरी लावली आहे. असे असले तरी कोकण, मुंबई आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे.

Jul 05, 2022 | 12:00 PM
राजेंद्र खराडे

|

Jul 05, 2022 | 12:00 PM

पाणीच-पाणी मुंबईतील रस्ते तर जलमय झाले आहेतच पण सखल भागात देखील पाणी साचले आहे. कोकणपाठोपाठ मुंबईसह उपनगरात अधिकचा पाऊस झाला आहे. मंगळवारी तर सकाळपासूनच पावसाला सुरवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

1 / 6
मुंबईतील रस्ते जलमय कोकणपाठोपाठ मुंबईत वरुणराजाची कृपादृष्टी राहिलेली आहे. त्यामुळे सखल भागात तर पाणी साचले आहेच पण रस्तेही जलमय झाले आहेत. वाहनधारकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसामध्ये सातत्य आहे. पण सोमवारपासून जोर वाढला आहे.

2 / 6
कोकणात सातत्य  कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. हंगामाच्या सुरवातीपासून या विभागात अधिकचा पाऊस झालेला आहे. चिपळूण येथील नदी-नाले ओसंडून वाहत होते तर जागोजागी पाणी साचले होते. चिपळूणमध्ये खरिपातील पेरण्या उरकल्या आहेत. तर आता पिकवाढीसाठी या पावसाचा फायदा होणार आहे.

3 / 6
शेतशिवारात पाणी चिपळूण जिल्ह्यात पावसामध्ये सातत्य राहिल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. शिवाय शेतशिवारात पाणी साचून राहत आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणात झाला आहे. त्याचा फायदा उत्पादनवाढीसाठी होणार असल्याचे बोलले जात आहे.

4 / 6
खरिपासाठी पोषक पाऊस विदर्भात पावसाने हजेरी लावली होती पण सर्वदूर समप्रमाणात पाऊस झालेला नव्हता. सोमवारी रात्री आणि मंगळवारी झालेल्या पावसाने शेतजमिनीत पाणी साचले होते तर नदी नाले ओसंडून वाहत होते. पावसाने आपले रुप बदलले असून त्याचा फायदा खरिपासाठी होत आहे.

5 / 6
अमरावतीमध्ये नदी नाले ओव्हरफ्लो जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. शिरजगावात तर नालीतले पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे. तर मोझरीमध्ये सूर्यगंगा नदीला पूर आला आहे. तर नदी-नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. दोन दिवसांतील पावसाने चित्र बदलले आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें