Photo : ‘आनंदवना’तली दाई: डॉ. शीतल आमटे!

महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे.(Senior social worker Dr. Sheetal Amte commits suicide)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:30 PM, 30 Nov 2020
1/6
2/6
त्यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली. आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे.
3/6
गेले काही महिने आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला.
4/6
वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर आलं आहे.
5/6
शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या.
6/6
२००३मध्ये नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतल्यानंतर आनंदवनातच काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता.