Valentines Week 2021 | ‘इज़हार-ए-इश्क’ करण्यापूर्वी जाणून घ्या गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ…

7 फेब्रुवारीपासून ‘रोझ डे’ अर्थात गुलाबाची देवाण-घेवाण करून व्हॅलेंटाईन वीक सुरु होणार आहे. अशावेळी आपणही आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाब देण्याचा विचार करत असाल, तर सगळ्यात आधी गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय?, ही जाणून घ्या...

Feb 05, 2021 | 6:07 PM
Harshada Bhirvandekar

|

1 / 8
लाल गुलाब : लाल रंगला ‘प्रेमाचा रंग’ म्हणतात. जर आपळे एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे आणि आपल्या त्या भावना व्यक्त करायच्या असतील, तर त्याला या खास दिवशी लाल गुलाब द्यावा. लाल गुलाब आपल्या प्रेमाची उत्कटता दर्शवतो.

2 / 8
पांढरा गुलाब : जर आपण कधीही ख्रिश्चन लोकांच्या विवाह सोहळ्यामध्ये सामील झाला असाल, तर आपल्या लक्षात आले असेल की त्याच्या हातातील पुष्पगुच्छात पांढरे गुलाब आहेत. पांढरा रंग आपल्या मनाची शुद्धता, आपली निरागसपणा आणि बिनशर्त प्रेमाची भावना दर्शवतो. जर तुमचा एखादा मित्र तुमच्यावर रागावला असेल, तर त्याला पांढरा गुलाब देऊन तुम्ही माफी मागू शकता.

3 / 8
गुलाबी गुलाब : जर तुम्ही पहिल्यांदा एखाद्याला भेटायला जात असाल तर गुलाबी रंगाचा गुलाब न्या. हे गुलाब एखाद्याचे कौतुक आणि प्रशंसा करण्यासाठी दिले जाते.

4 / 8
पिवळा गुलाब : आपण एखाद्यास मित्र बनवू इच्छित असाल किंवा त्या मित्राला नेहमी आपल्या जवळ ठेवू इच्छित असाल, तर अशा भावना व्यक्त करण्यासाठी त्या व्यक्तीला पिवळा गुलाब द्या.

5 / 8
लेव्हेंडर गुलाब : जर आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रथमदर्शनी प्रेमात पडला असाल, तर त्यांना लेव्हेंडर रंगाचे गुलाब द्या. लॅव्हेंडर गुलाब आपले आकर्षण व्यक्त करण्यासाठी दिला जातो.

6 / 8
हिरवा गुलाब : ही फुले ज्यांना जीवनात यश मिळवायचे आहे, अशा खास जवळच्या व्यक्तीला भेट म्हणून दिली जाऊ शकतात. हिरवा गुलाब आनंद, संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

7 / 8
काळा गुलाब : कोणालाही काळ्या रंगाचा गुलाब भेट म्हणून देऊ नका. हा रंग शत्रुत्वाची भावना दर्शवतो. यामुळे तुमच्या नात्यात कटुता येऊ शकते.

8 / 8

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें