Marathi News Photo gallery Vijay Deverakonda wants to go back in time and give tight slap to Emperor Aurangzeb because Chhaava enraged him
‘छावा’ पाहून या व्यक्तीवर विजय देवरकोंडाने काढला राग; म्हणाला “त्याच्या कानाखाली..”
अभिनेता विजय देवरकोंडाने नुकताच विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याने नुकत्याच एका कार्यक्रमात त्यावर प्रतिक्रिया दिली. छावा या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'छावा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे.
1 / 5
विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यातील एका व्यक्तीरेखेवर दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. संधी मिळाल्यास त्या व्यक्तीच्या कानाखाली वाजवण्याची इच्छा विजयने बोलून दाखवली आहे.
2 / 5
साऊथ सुपरस्टार सूर्याच्या आगामी 'रेट्रो' या चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात विजय प्रमुख पाहुणा म्हणून पोहोचला होता. यावेळी निवेदिकेनं विजयला एक प्रश्न विचारला. "तुला भूतकाळात जाऊन कोणाला भेटायला आवडेल", असं तिने विचारलं. त्यावर विजयने दिलेलं उत्तर ऐकून सर्वजण चकीत झाले.
3 / 5
"मला ब्रिटीशंना भेटायचं आहे आणि त्यांच्या दोन कानाखाली वाजवायचं आहे. मी नुकताच छावा हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर मला खूप राग आला. मला संधी मिळाली तर मी भूतकाळात जाऊन औरंगजेबाच्या दोन-तीन कानाखाली वाजवेन. अशा इतरही अनेक व्यक्तींना मला भेटून त्यांना मारायचं आहे. पण सध्या तरी मला हीच नावं आठवतायत", असं तो म्हणाला.
4 / 5
'छावा' या चित्रपटाने भारतात कमाईचा 600 कोटी रुपयांचा तर जगभरात 800 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. विकी कौशलच्या करिअरमधील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.