Maharashtra Local Body Election LIVE Updates : राज्यातील 23 नगरपालिकांच्या मतदानाला सुरूवात
Maharashtra Nagar Parishad and Panchayat Election 2025 Voting Live Updates in Marathi : 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडेल. उद्या राज्यातील सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागतील.

LIVE NEWS & UPDATES
-
नाशिकच्या निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा घसरला
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुका गारठला आहे. तालुक्यातील रुई येथे 4.07 अंश सेल्सिअस तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 4.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. या वाढत्या थंडीमुळे लासलगाव येथील शिवनदीवर बाष्पयुक्त धूके पाहायला मिळत आहेत. थंडीचा शेती पिकांवर देखील परिणाम होत आहे. द्राक्षासाठी अपायकारक तर गहू हरवण्यासाठी पोषक थंडी आहे…
-
भुसावळ सावदा वरणगाव,परिसरात मतदानाला सुरुवात
भुसावळ सावदा वरणगाव,परिसरात मतदानाला सुरुवात झाली आहे. प्रत्येकी एक दोन जागेसाठी मतदान होत आहे. थंडीच्या प्रमाणात प्रचंड वाढ असल्यामुळे मतदारांचा प्रतिसाद अल्प स्वरूपात प्रतिसाद दिसून येत आहे. केंद्रांवर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात दिसतोय.
-
-
अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी नगर परिषदेसाठी आज मतदान…
नगर परिषद शाळेच्या मतदान केंद्र 4/3 वर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड बिघाड झाल्याने काही वेळ मतदान प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या मात्र त्यानंतर ईव्हीएम मशीन सुरू झाल्याने पुन्हा एकदा मतदान सुरळीत सुरू झाले. अंजनगाव सुर्जी मध्ये आज नगरपरिषद मतदानाला साडेसात वाजता झाली सुरुवात..
-
फलटण नगरपालिकेसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजीत नाईक निंबाळकर यांची प्रतिष्ठापनाला
महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पुरस्कृत उमेदवाराच्या मध्ये महत्वपूर्ण लढत. महाबळेश्वर मध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर सुनील शिंदे तर शिवसेनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार कुमार शिंदे यांचे मध्ये महत्त्वपूर्ण लढत. 20 जागांसाठी 61 उमेदवार रिंगणात आहेत.
-
फलटण आणि महाबळेश्वर नगरपालिकsसाठी आज मतदान प्रक्रिया
फलटण नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये थेट लढत. फलटणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी रामराजे गटाकडून शिवसेनेच्या चिन्हावर अनिकेतराजे नाईक निंबाळकर तर माजी खा. रणजीत नाईक निंबाळकर यांचे बंधू भाजपच्या चिन्हावर समशेर सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये थेट लढत
-
-
सिन्नरच्या प्रभाग 2 च्या मतदान केंद्रावर बोगस मतदाराला पकडले
बनावट आधार कार्ड बनवून आला होता मतदानाला. निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला दिले पोलिसांच्या ताब्यात. भावाच्या जागेवर आलेल्या मतदाराला पोलिसांनी घेतले ताब्यात. सिन्नर मध्ये आज होते आहे 3 जागांसाठी मतदान
-
अहिल्यानगरच्या पाथर्डी नगरपरिषदेसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात
सकाळी सात पासून कर्मचारी आणि उमेदवार मतदान केंद्रावर दाखल. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून अभय आव्हाड आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून बंडू बोरुडे,.पाथर्डीत एकूण 10 प्रभागातून नगराध्यक्ष पदासह 21 जागेसाठी मतदान , 27 मतदान केंद्र, कर्मचारी 135मतदान केंद्रावर तैनात
-
-
अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी नगरपरिषद साठी आज मतदान
दुसरीकडे कडाक्याची थंडी असल्याने मतदान केंद्रावर थंडीपासून बचाव करण्यासाठी कामगारांनी पेटवल्या शेकोट्या. मागील काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात तापमानात घट..थंडीचा कडाका वाढला
-
ऊळगाव राजानगर परिषद साठी आज मतदान
देऊळगावराजा नगर परिषदेसाठी आज मतदान होणार असून त्यापूर्वीची पूर्ण तयारी म्हणजेच मोकपॉल पूर्ण झाली आहे.. सर्व अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर पोहोचले असून त्यांनी प्रतिनिधींना बोलावून ई व्ही एम मशीन मोकपॉल करून दाखविली .. तसच थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होत आहे..
-
अंबरनाथमध्ये हजारोच्या संख्येने बोगस मतदार
शिवसेना शिंदें गटाने हे सर्व बोगस मतदार आणण्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप. एका पुढार्याच्या मंगल कार्यालयात एकाच ठिकाणी शेकडो महिला आढळल्या, काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उघड केला प्रकार. रात्रभर केला मंगल कार्य ल्याच्या बाहेर पहारा
-
अहिल्यानगर जिल्हयातील 12 पैकी चार नगरपालिकांसाठी मतदान
कोपरगाव, देवळाली प्रवरा , नेवासा तसेच पाथर्डी नगरपालिकेसाठी मतदान. मतदान प्रकियेला सुरूवात , मात्र थंडीचा कडाका असल्याने मतदानासाठी अत्यल्प गर्दी. जिल्हयाचे तापमान 11 डिग्री सेल्सिययवर. नेवासा आणि कोपरगाव नगरपालिकेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला…. .
-
जळगाव जिल्ह्यातील 6 नगरपालिकांच्या 9 जागांसाठी आज मतदान
जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या जागांसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार आज 20 रोजी मतदान होत आहे. त्यात वरणगाव येथील 10 11 अ आणि 12 ब, भुसावळ येथील 4 ब आणि 11 ब सावदा येथील 4 ब येथील 1 अ आणि यावल येथील 8 ब या जागांसाठी मतदान होईल. या जागांसाठी एकूण 44 मतदान केंद्रे आहेत, यात एकूण 33 हजार 664 मतदार आपला हक्क बजावतील.
-
अंबरनाथ नगरपालिका निवडणूक आज पार पडणार, 276 मतदान केंद्र हे सज्ज
अंबरनाथ नगरपरिषद च्या 59 जागांसाठी आज मतदान होणार असून थेट नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार आहे अंबरनाथ शहरात गेल्या अनेक वर्षांपासून शिंदेंच्या शिवसेनेचे सत्ता आहे यावेळी भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहेत.
-
अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुर्जी नगरपरिषदेसाठी आज मतदान
नगराध्यक्ष व 28 सदस्यांसाठी मतदान.नगराध्यक्ष पदासाठी 7 तर सदस्य पदासाठी 173 उमेदवार रिंगणात. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे, शिवसेनेचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांची प्रतिष्ठा पणाला. आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे देखील निवडणुकीच्या रिंगणात. शहरात एकूण 52 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था. प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख, मतदान कर्मचारी व महिला कर्मचारी नियुक्त.
-
सिन्नर, ओझर आणि चांदवड नगरपरिषदांच्या सहा जागांसाठी आज मतदान
मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30पर्यंत. सिन्नर येथे 3, ओझर येथे 2 तर चांदवड येथे 1 जागेसाठी मतदान नाशिक जिल्ह्यातील ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची. सिन्नर नगरपरिषद निवडणूक माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी प्रतिष्ठेची. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपसमोर ठाकरे शिवसेनेकडून कडवे आव्हान. तिन्ही ठिकाणी मतदान प्रक्रियेला थोड्याच वेळात होणार सुरुवात. शांततेत मतदान पार पडावे यासाठी प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज
-
फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदसाठी आज मतदान, लोकांमध्ये उत्साह
नगराध्यक्षासह 32 नगरसेवकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार. पहिलीच नगरपरिषद निवडणूक असल्याने नागरिकांमध्ये उत्साह.
राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी पार पडल्या. मात्र, त्यापैकी 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज त्या उर्वरित 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे मतदान होणार आहे. निकाल उद्याच म्हणजे 21 डिसेंबर रोजी लागेल. 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यांचे भविष्य आज ठरणार आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर काही प्रमाणात घोळ बघायला मिळाला. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल होता. मात्र, कोर्टाच्या निर्णयानंतर 21 डिसेंबरपर्यंत निकाल राखीव ठेवण्यात आली. आता आता 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतदान प्रक्रिया पार पडेल. अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, सोलापूरातील अनगर, मंगळवेढा, साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटणसह 23 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीची आज मतदान प्रक्रिया पार पडेल.
Published On - Dec 20,2025 7:03 AM
