Vegetable Rate | पावसामुळे Navi Mumbai APMC मध्ये भाजीपाला पडून, दर 10 ते 15 टक्क्यांनी घसरले

Vegetable Rate | पावसामुळे Navi Mumbai APMC मध्ये भाजीपाला पडून, दर 10 ते 15 टक्क्यांनी घसरले

| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 12:33 PM

पावसाचा नवी मुंबईतील एपीएमसी (Navi Mumbai APMC) भाजी मार्केटला फटका बसला आहे. भाजीचे दर 10 ते 15 टक्क्यांनी घसरले आहेत. उपनगरातील ग्राहक बाजारात फिरकला नसल्यानं शेतमाल पडून आहे.

 

महाराष्ट्रात मान्सून (Monsoon 2021) पाऊस दाखल झालेला आहे. दोन दिवसांपासून पावसानं चांगली हजेरी लावली आहे. पावसाचा नवी मुंबईतील एपीएमसी (Navi Mumbai APMC) भाजी मार्केटला फटका बसला आहे. भाजीचे दर 10 ते 15 टक्क्यांनी घसरले आहेत. उपनगरातील ग्राहक बाजारात फिरकला नसल्यानं शेतमाल पडून आहे. एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक मात्र ग्राहक नसल्यानं मालाला उठाव नाही.

एपीएमसी भाजी मार्केटमध्ये गाड्यांची आवक ही जास्त होती मात्र कोरोना काळामध्ये भाज्यांच्या गाड्यांची आवक कमी झाली. त्यात दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सुद्धा भाजी मार्केटला बसला आहे. त्यामुळे बराचसा शेतमाल बाजारात पडून असल्याचं एपीएमसी भाजी मार्केटचे उपसचिव सुनील सिंगटकर यांनी टीव्ही 9 शी मराठी शी बोलताना सांगितले.