IND VS SL: टीम इंडियाच्या विजयाची पाच कारणं, तीन ‘हिरो’ आणि 28 वर्षानंतर श्रीलंकेला क्लीन स्वीप

IND VS SL: पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे दुसऱ्या कसोटीचाही टीम इंडियाने (Team India) तीन दिवसात निकाल लावला आहे. भारताने दिलेल्या 447 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा (India vs srilanka test) दुसरा डाव 208 धावात संपुष्टात आला.

Mar 14, 2022 | 6:50 PM
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Mar 14, 2022 | 6:50 PM

भारताच्या विजयाचं प्रमुख कारण आहे गोलंदाजी. जसप्रीत बुमराह, अश्विन, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीच्या गोलंदाजीच्या बळावर भारताने श्रीलंकेला धुळ चारली.

1 / 5
भारताचे दोन युवा फलंदाज श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतने दमदार कामगिरी केली. मोहालीनंतर बंगळुरुतील फलंदाजीसाठी कठीण खेळपट्टीवर दोघांनी सुंदर फलंदाजी केली. अय्यरने 62 च्या सरासरीने 186 धावा आणि पंतने 61.66 च्या सरासरीने 185 धावा केल्या. दोघांनी प्रत्येकी दोन अर्धशतक झळकवली.

2 / 5
मोहाली कसोटीचं सबकुछ रवींद्र जाडेजा असं स्वरुप होतं. त्याने पहिल्या डावात नाबाद 175 धावांची खेळी केली. त्यानंतर 10 विकेटही घेतल्या. मालिकेत जाडेजाडी फलंदाजीची सरासरी 100 पेक्षा जास्त होती.

3 / 5
श्रीलंकेच्या संघाकडे अनुभवाची कमतरता होती. त्यात त्याचे प्रमुख खेळाडू मालिके दरम्यान दुखापतग्रस्त झाले. त्यामुळे पूर्ण क्षमतेने श्रीलंकेचा संघ मैदानात उतरला नाही. श्रीलंकेचा फलंदाज निशांका दुखापतीमुळे दुसरी कसोटी खेळला नाही. दुष्मंत चमीरा संपूर्ण मालिकेत खेळला नाही. कुशल मेंडीसही एकच कसोटी सामना खेळला.

4 / 5
श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेशिवाय श्रीलंकेचा दुसरा कुठलाही फलंदाज दमदार कामगिरी करु शकला नाही. करुणारत्नेच सीरीजमध्ये 100 पेक्षा जास्त धावा करु शकला. गोलंदाजीत श्रीलंकेची कामगिरी सरासरीच होती.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें