इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या बायकाही खेळाडू, ‘देशासाठी मारलंय मैदान!’

टीम इंडियाचे एकूण 24 खेळाडू इंग्लंड दौर्‍यावर जात आहेत. त्यापैकी काही विवाहित आहेत तर काही अद्याप अविवाहित आहेत. विवाह झालेले बरेच खेळाडू आपल्या पत्नीसमवेत इंग्लंडला रवाना होत आहेत. (india Tour of England ishant Sharma wife pratima Singh And Dinesh karthik Wife dipika pallikal)

1/3
india Tour of England ishant Sharma wife pratima Singh And Dinesh karthik Wife dipika pallikal
टीम इंडियाचे एकूण 24 खेळाडू इंग्लंड दौर्‍यावर जात आहेत. त्यापैकी काही विवाहित आहेत तर काही अद्याप अविवाहित आहेत. विवाह झालेले बरेच खेळाडू आपल्या पत्नीसमवेत इंग्लंडला रवाना होत आहेत. यातील इंग्लंडला जाणाऱ्या 24 खेळाडूंव्यतिरिक्त आणखी 2 भारतीय क्रिकेटपटू इंग्लंडला जातील. क्रिकेट खेळण्यासाठी नाही तर काँमेन्ट्री करण्यासाठी....! रिपोर्टनुसार हे दोन चेहरे असतील दिनेश कार्तिक आणि सुनील गावस्कर.... आपण एक नजर टाकूया इंग्लंडला जाणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंकडे ज्यांच्या बायका खेळाडू आहेत आणि त्यांनी भारताकडून खेळून 'मैदान फतेह' केलं आहे...!
2/3
india Tour of England ishant Sharma wife pratima Singh And Dinesh karthik Wife dipika pallikal
इशांत शर्मा. टीम इंडियाचा सर्वात अनुभवी चेहरा. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज... भारताच्या बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंह हिच्याशी त्याचा विवाह झाला आहे. प्रतिमाचा बास्केटबॉल प्रवास जीसस आणि मेरी कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून सुरू झाला. 2006, 07 आणि 2009 या वर्षात प्रतिमा सिंगने आशियाई बास्केटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या व्यतिरिक्त तिने 2010 मधील ग्वंगझू येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
3/3
india Tour of England ishant Sharma wife pratima Singh And Dinesh karthik Wife dipika pallikal
दिनेश कार्तिक.... भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक इंग्लंडला खेळाडू नव्हे तर कॉमेंटेटर म्हणून जात आहे. जेव्हा टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळेल तेव्हा दिनेश आपल्या सुंदर कॉमेंट्रीने क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधून घेईल. दिनेश कार्तिकने 2015 मध्ये भारताची स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकलशी लग्न केलं आहे. जोशन चिनप्पासह दीपिकाने राष्ट्रकुल 2014 मध्ये सुवर्ण पदकही जिंकले आहे.